बुडीत खाते

0
0

सत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.

**

२००६
असाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.
ढडाम्म्म !!!!! करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.

थोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.

त्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता wink त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते Big smile

मस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे ? आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी... wink लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. ! हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला " बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर......." मी म्हणालो " कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा."

पण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म wink ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.

प्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला " उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. " मामा म्हणाला "ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. " रात्रभर त्याला फुल्लपार्टी wink

दुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.

मामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.

दोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले ! मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब wink ).

टॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.
हेड मामाकडे आला व म्हणाला "जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले" व म्हणाला "मी बघतो काय करता येईल ते." मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला "बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते ? इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही." त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला " मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते "

मामाचे डोके फारच फिरले होते... त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला " बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार" असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला " काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल" तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला " चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही" मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला " आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते "

तासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो " कसा वाटतो हा माणुस ? विश्वास ठेवण्यायोग्य ? " मामा ताडकन म्हणाला " धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे " मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला " दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत." मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.

दुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला " राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. " मी म्हणालो " मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे" त्यावर माझा लगेच म्हणाला " ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस." आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.

मी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले "मोजलेस का ? " मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले " मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या... " व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले....

" झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. " मामा ओरडला. मला काहीच कळेना... मी म्हणालो " म्हणजे ? " मामा म्हणाला " अरे टॉवरचे काम झाले" मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष... सगळेच खुष. wink

त्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो...
परत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..
सगळे उदासपणे बीयर पीत होते....
मी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला " तु ते पॅकेट का नाही बघितलेस "
मी गोंधळलो मी म्हणालो " कुठले पॅकेट ??? "
मामा म्हणाला " अरे ते त्या बिहारीने दिले होते ते... "
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.
मी म्हणालो " मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले... मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. "
मामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला " *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. "

मग कळली खरी हकीकत.... ती अशी.

तो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.
तो हेड येणे हे नाटक होते.
तो हेड नकली होता.
ती लेबर नकली होती..
कॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते...
पेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती...
मोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही...
एकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.

काही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता...

मामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा... बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच... !

मामाने कप्पाळावरचा हात काढत... आमच्याकडे पहात म्हणाला " सात लाखाचे अजून एक बुडीत खाते.... "

आम्ही ओरडलो " काय ? अजून एक ? म्हणजे ? "

तो म्हणाला.... " सांगतो.... काय झाले माहीत आहे का.... "

लेख उत्तम... फक्त शिर्षक बदला

1

लेख उत्तम...
फक्त शिर्षक बदला मालक....

+१

2

असेच म्हणतो..

अरे बाबा त्या बुखा चा व ह्या

3

अरे बाबा त्या बुखा चा व ह्या बुखाचा काही संबध नव्हता व बुखा हे काय तिकडेच निर्माण झालेला शब्द नाही आहे असो, मला तरी काही वावगे वाटत नाही शिर्षकामध्ये.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुढे? -अनामिक

4

पुढे?

-अनामिक

मस्तं पुढे लिही पटापट.

5

मस्तं पुढे लिही पटापट.


-पुण्याचे पेशवे

:-)

6

मस्त. लिही अजुन..

छान..... पुढे लिहा पटापट.

7

छान..... पुढे लिहा पटापट. हास्य

"दि ग्रेट ट्रेन रॉबरी"

8

जणू काही एखादी "थ्रीलिंग" कादंबरी वाचत आहे असा अनुभव आहे, जो खरोखरी पुस्तकरुपात येणे आवश्यक वाटते. साल्यांनी "अ‍ॅक्सिडेंट" चा देखील प्लॅन केला होता म्हणजे सीन कॉनेरीच्या "दि ग्रेट ट्रेन रॉबरी" मध्ये शोभतील अशीच पात्रे होती असे म्हटले पाहिजे.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

कसे आहे फार्म हाउस मध्ये

9

कसे आहे फार्म हाउस मध्ये बाहेरच्या व्यक्तीला घुसू देत नाही तिकडे हा एक मुद्दा होता व हे जे मामा टाईप नवश्रीमंत होते ते आपला माज दाखवण्यासाठी विचित्रपणे वागायचे म्हणजे दुसर्‍याशी बोलायचे नाही, बोलले तर तुसडेपणाने असे.. मग त्यांच्या जवळ जाण्यासाठी असे काहीतरी त्यांना करावे लागले.. शेवटी किती ही झाले तरी मातीतील माणूस (आधीचा शेतकरी) लगेच पळत येणार मदतीला हे नक्की त्यांना माहीत होते wink

त्यांनि आधीच पुर्ण माहीती गोळा गेली असेलच.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पळत येणार मदतीला....

10

त्यांनि आधीच पुर्ण माहीती गोळा गेली असेलच....

नक्कीच.... त्याशिवाय इतका "सॉलीड अ‍ॅण्ड रिझल्ट ओरिएंटेड प्लॅन" ते कसे करु शकतील. मी सध्या बडोद्यात आहे.... तिथेही अशाच एका घटनेचा मी..... दुरुन का होईना साक्षीदार आहे.... आता मीही ती घट्ना इथे धाग्यास्वरुपात देण्याचा विचार करीत आहे.

रक्ताचा एक थेबही न सांडता लोक "नशीब" कसे लुटू शकतात यांचीच ही उदाहरणे होत.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

पुढे??

11

मस्त... लिहा पटापट.

मस्तच!

12

आयला.... जबर्‍या स्टोरी आहे.....

आंबोळी

मालक क्रमशः टाकायला विसरलात

13

मालक क्रमशः टाकायला विसरलात का हो?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

कसं फसवलं

14

कसं फसवलं


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आच्रत/हल्कट राजेचा त्रिवार

15

आच्रत/हल्कट राजेचा त्रिवार णिषेध!!!
आम्ही मोठ्या अपेक्षेन धागा उघडला होता. म्हटल की तिथे बुडलेले खात्याचे इथे पुनरुज्जीवन झाले की काय?
पण कसलं काय. भरवश्याच्या म्हशीला राजे wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

हॅ हॅ हॅ

16

हॅ हॅ हॅ

Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लै भारी

17

भरवश्याच्या म्हशीला राजे
Laughing out loud . एकदम सही बोला.

हा हा हा लै भारी... बुडीत

18

हा हा हा लै भारी...

बुडीत खात्यांचा विजय असो...

लै भारी

19

लै भारी राजे.

फक्त दिल्लीतसुद्धा NH4 चा मोह काही सुटत नाही.

पण असो...


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

अरे.. टायपो झाला NH8

20

अरे.. टायपो झाला Big smile

NH8 लिहाय्चे होते मला... करतो बदल.

धन्यवाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

>> फक्त दिल्लीतसुद्धा NH4 चा

21

>> फक्त दिल्लीतसुद्धा NH4 चा मोह काही सुटत नाही.

असंच म्हणतो.. NH8 म्हणायचंय का राजे?

समजून घ्या रे तो दिल्लीतल्या

22

समजून घ्या रे तो दिल्लीतल्या NH4 बद्दल बोलत असेल.


-पुण्याचे पेशवे

च्यायला

23

काय पब्लिक असतं राव.

ओ मालक, याचं काय झालं पुढं?

24

ओ मालक, याचं काय झालं पुढं?