किंमत
माझ्या नावाच्या आधी तुझे नाव लिहुन
तासन् तास पाहुन
वा-यावर उधळलेल्या कपट्यांच्या लगद्याची
पत्रिका घेवुन आलीस
अन जोडीने ये
म्हणुन बजावुन गेलीस.
*
सहज पाहिली पत्रिका
जशी असायला हवी तशीच होती
फक्त नव्हते
माझे नाव
अन
बदलली होती सगळीच नाती
*
आठवले
ते वाट पाहणे
तासनतास
अन
सेकंदातच
निघुन जाणे चारपाच तास
*
पहीला एकत्र पाहीलेला सिनेमा
नाव नाही आठवत की कथा
पण आजही
त्या खुर्च्या पाहुन
जीव येतो कालाबुली
*
आठवते तुला ?
गाडीवर पहिल्यांदा मागे बसलीस
खेटुन बैस...
गावातले क्रेडीट घालवु नकोस म्हणालो
अन
तु अशी चिपकुन बसलीस की
जायचे ठिकाण कोणते
हेच विसरुन गेलो
*
केव्हातरी भेटीगाठी कमी झाल्या
तुला समजले अन मला उमजले
मी ही काही बोललो नाही
तु ही काही बोलली नाही
शब्दांनी व्यक्त झालेली नाती शब्दांविनाच संपुन गेली.
*
विरली सगळी स्वप्ने
तुझ्याबरोबर साकारायची ठरवलेली
काय अन किती ठरवले होते
असे करु अन तसे करु.
सगळेच संपले.
*
आज तशी काही ओढ नाही
मागे वळुन पहावेसे वाटत नाही
*
वाटलीच कधी
तर एकच खंत येते उरी
भाड्याच्या जागेतुन
मालकीच्या फ्लॅटमधे येण्याची किंमत....
जरा जास्तच पडली.

.jpg)
{नानाने माझा विकेन्द चा मुड}
{जिओ !!!! नाना.... जा दोनचार}
जिओ !!!!
नाना.... जा दोनचार बुडीतखाती तुझ्या नावावर केली.
Hope is a good thing...
{हे मात्र मस्तच}
हे मात्र मस्तच
{नाना.... जा दोनचार बुडीतखाती}
नाना.... जा दोनचार बुडीतखाती तुझ्या नावावर केली
बाब्बो !
कविता लिहिण्याची किंमत जास्तच पडली.
{नाना..}
अरे कसं रे हे.. कधी कधी तुझी रचना म्हणजे ना.. नुसता छळ होतो..
असो. बाकी रचना चांगलीच. त्याबद्दल वाद नाय.
राघव
{लै भारी!}
लै भारी!
{मस्त!}
मस्त!
{हम्म. नान्या रडवू नको रे..}
-पुण्याचे पेशवे
{नाना , नाना , नाना}
खरच रे !!!
रडवु नकोस ना
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{+१}
+१
{छानच.}
आठवले

ते वाट पाहणे
तासनतास
अन
सेकंदातच
निघुन जाणे चारपाच तास
अप्रतिम.
*
आठवते तुला ?
*
बाकी छानच.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{काय नाना ते हाटेलात जाणं अन}
काय नाना ते हाटेलात जाणं अन ती बिले राहीलं की लिहायचं!
त्याची पण किंमत आहेच ना!
बाकी लय भारी!
बेवफा सनम नाना!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{(विषय दिलेला नाही)}
{हायल्ल्ला.... नाना ! तू}
हायल्ल्ला.... नाना ! तू पण...........
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{कवितेची तारीफ करायला शब्द}
<<शब्दांनी व्यक्त झालेली नाती शब्दांविनाच संपुन गेली.>> कवितेची तारीफ करायला शब्द सापडत नाहिएत ...very touching....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{ओहह्ह...}
ओहह्ह...
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…