प्रतापगड
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला. ह्या शिवप्रतापदुर्गाचे पुनर्बांधणीचे प्रचंड महत्वाचे कार्य चालू झाले आहे. ह्या कार्याची सर्वांगीण माहिती ह्या संकेत स्थळामार्फ़त आपल्यापर्यंत पोहोचत आहे.
इंदिरा पुरस्कार विजेते मा. हिराभाई बुटाला खेड रत्नागिरी यांचे सुपुत्र व रेव्हमॅक्स या कंपनीचे प्रवर्तक-मालक श्री. कौस्तुभ बुटाला यांच्या पुढाकाराने व सांगलीचे दुर्गतज्ञ श्री. प्रवीण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचा पहिला मेळावा ९ मे २०१०ला गडावरील भवानी मातेच्या मंदिर परिसरात संपन्न झाला.
त्यावेळी मा. कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ, राजमाता कल्पनाराजे भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वास्तूचे ऐतिहासिक व पर्यटनाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाची बघ्याची भूमिका न राहता भरीव कार्य व आर्थिक मदत मिळेल असे आश्वासन त्यावेळी मिळाले.
कोल्हापुरातील मराठेशाहीचे इतिहासतज्ञ श्री.इंद्रजित पवार, श्री. भगवान चिले यांचा भाषणे व नंतर श्री. प्रवीण भोसले याच्या मार्गदर्शनाखाली गडावरील जसेच्या तसे बांधकाम करायच्या प्रकल्पाची पहाणी व कार्याची माहिती दिली गेली.
श्री. कौस्तुभ बुटाला यांनी आपल्या भाषणात या कार्याची प्रेरणा संहितामहर्षीं भृगुच्या विविध आदेशातून मिळत गेली असे अभिमानाने सांगितले.
मी मराठीवरील इतिहास व गडप्रेमी याची दखल घेऊन या कार्यात सहभागी होतील असा विश्वास वाटतो.
.jpg)
धन्यवाद शशिकांतजी या
धन्यवाद शशिकांतजी या माहितीबद्दल...... उशीरा का होईना सरकारला जाग आली असं म्हणायला हरकत नाही.... प्रतापगडच्या अफजल बुरुजाची फार वाईट अवस्था झाली होती मागच्या पावसाळ्यात.... अगदी पडायला आला होता बुरुज.... मला नाव नाही आठवतं त्या व्यक्तीचं पण त्यांनी स्वत:च्या खिशातुन पैसे दिले आणि अफजल बुरुजाची दुरुस्ती करुन घेतली..... आज परत तो ढासळलेला बुरुज उभा आहे तो त्यांच्याच प्रयत्नाने..... पण अजुनही गडाचा चोर दरवाजा, देव टाकं आणी बालेकिल्ल्याचा काही भाग दुर्लक्षितच आहे.... आता या घोषणेमुळे थोडं समाधान आहे की राजेंच्या वास्तव्य लाभलेला हा किल्ला नामशेष होण्यापासुन वाचेल.... निदान तशी आशा ठेवायला तरी हरकत नाही.....
जाता जाता : त्यादिवशी मी प्रतापगडावरचं होते.... तिथल्या सगळ्या हॉटेल व्यवसायीकांनी आपल्या हॉटेलमधे प्रतापगड जिर्णोध्द्दार निधी जमा करायची सोय केली आहे... मला अतिशय स्तुत्य उपक्रम वाटला हा.
प्रतापगडावर होत असलेले चांगले
प्रतापगडावर होत असलेले चांगले बदल पाहून खरोखर मन सुखावले !
जेव्हा मी प्रतापगडला गेलो होतो डिसेंबर मध्ये तेव्हा काम चालू झाले होते त्याचे काही फोटो येथे आहेत.
http://www.mimarathi.net/node/591
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उत्साह वाढला
आपले फोटो पाहून आपल्या प्रतिसादाने उत्साह वाढला.
ओक
नाडी ग्रंथ प्रेमी
शशिकांत ओक
बरोबर आहे
प्रतापगड ढासळेल, पन अफझल खानाची कबर मात्र आबाधित राहिल...