कोरी पाटी

0
0

बरेच दिवसांत नाना भेटला नाही. आज जाऊ उद्या जावु करता करता काल संध्याकाळी वेळ मिळाला. नानाच्या घरापाशी गेलो. असेल की बाहेर गेला असेल याचा विचार करतच बेल दाबली. नाना कुठे कधी असेल आणि काय करत असेल याचा काहीच भरवसा नाही. दार उघडले तर नानाच समोर होता.

'ये ये... कुठे मेला होतास इतके दिवस?' अशी प्रेमळपणे चौकशी करुन मला आत घेतले. 'बैस' असे म्हणुन एका कोप-यात जावुन बसला.नीट पाहिले तर कोप-यात शेगडी पेटवुन, एक एक कागद वाचत त्यात टाकत होता. सगळ्या घरभर धुर झाला होता.

'अरे नाना! काय करतोस?'

'कागद जाळतोय.'

'थंडी वाजतेय का? मग उघडा का बसलास? स्वेटर घाल'

'स्वेटर घातला गणपतीला. मला नाही थंडी वाजत'

'मग का जाळत बसलास कागद...'

लाल डोळ्यांनी मला पहात, नानाने एक कागद हळुच पुढे केला. त्याच्या हातातुन कागद घेवुन मी वाचायला सुरवात केली. बघता बघता माझ्या कपाळावर घाम जमा झाला. घशाला कोरड पडली. 'नाऽना' एवढेच बोलुन मी कागद परत दिला. त्याने शांतपणे तो कागद शेकोटीत टाकला. कधी काळची मनाच्या खोल गुहेत लपलेली स्मृती लख्खकन समोर आली. इतक्या दिवसांत तर मी विसरुन गेलो होतो. आठवण सुद्धा कधी झाली नव्हती. ती आठवण समोर यावी असे कधी नंतर आयुष्यात झालेच नाही. मनाला मिळालेले विस्मृतीचे वरदान किती महत्वाचे आहे आणी सुंदर आहे हे जोपर्यत अशा आठवणींची भुते आपल्याभोवती फेर धरुन खिदीखिदी हसत कर्णकर्कश्श किंचाळत आरडाओरडा करत अंगावर धावुन येत नाहीत तोपर्यंत कळत नाही. आणि ते जेव्हा कळते तेव्हा आपल्या हातात काहीही नसते. अक्षरशः काहीही राहिलेले नसते.

नानाने दाखवलेला कागद जळुन खाक झाला होता. त्याची राख झाली होती. पण स्मृती जशी काही ती घटना अगदी काही क्षणापुर्वी घडलेली असावी अशी टक्क जागी झाली होती. हळुच खाल मानेने नानाकडे पाहिले. माझ्या मनातील द्वंद्वाचा त्याच्या मनावर काही ओरखडा आला असावा की काय म्हणुन त्याचे निरिक्षण केले. पण त्याचे एक एक कागद वाचुन शांतपणे शेकोटीत टाकणे चालु होते. चर्रर चर्रर असा भुरुभुरु जळणा-या कागदांचा आवाज आणि टक टक अशी घड्याळ्याची टिकटिक चालु होती. किती वेळ गेला कळले नाही.

अचानक नाना बोलला 'खुप कागदं आहेत अशी.'

'दाखव....'

'नको. सगळीच काही अशी दाखवता येणार नाहीत. त्रास होतो. जुनी पत्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, कधी काळी जमा झालेल्या मित्रमैत्रिणींच्या पत्रिका, ग्रिटिंग्ज... आणिक काय काय. त्या त्या वेळेस काहीतरी भावना गुंतवतो.. जपुन ठेवतो. पण पुढे त्यापासुन त्रासच जास्त होतो. कारण, राजकारण काय आणि आयुष्य काय कुणी कुणाचा कायम मित्र नाही की शत्रु नाही. भुमिका बदलत रहाते. जुनी नाती नव्या नात्यांत बदलतांना ही अशी कागदे फार त्रास देतात.'

'हं...'

'चुकुन कधीतरी एखादा कागद समोर येतो... सगळे भावविश्व पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळुन देतो. जाळुन टाकले की समोर कधी येणार नाही, स्मृतीला जागे करणार नाही. आठवण म्हणजे काय तर जे विसरलेले आहे त्याची स्मृती होणे. स्मृती ज्याने होईल असे काही आलेच नाही नजरेत वा ऐकण्यात, तर आठवण होणारच नाही'

'पण मग इतके प्रेमाने जपुन ठेवलेस आजवर...'

'पाटी कोरी करायची.... वर्तमानात जे आहे ते खरे. नाते जे आज आहे ते. मागचे विसरुन जायचे..'

'जमेल?'

'प्रयत्न करायचा'

नानाच्या घरुन निघालो. विचाराच्या तंद्रीतच होतो. आल्या आल्या संगणक चालु केला. पाच हजाराहुन अधिक मेल, चॅट, व्यनी, खरड. कित्येक स्टार करुन ठेवलेले. चर्चा, गु-हाळ, भांडणे, स्नेह संवाद.... काय काय. सिलेक्ट ऑल. डिलिट. कन्फर्म. येस.

आज पाटी कोरी आहे. बघु या किती काळ अशीच ठेवु शकतो...

नाना मस्तच्...डेली पाटी

1

Big smile नाना मस्तच्...डेली पाटी पुसावी.

शब्बास रे पठठ्या... मी देखील

2

शब्बास रे पठठ्या...

मी देखील करतो असे कधी मधी...

मग ऑर्कुट उडव कुठे फेसबुक उडव... चालू असते...

कधी रागाच्या भरात.. तर कधी दुखःच्या आवेगात तर कधी सहजच म्हणून..... पाटी कोरी राहीलेली बरी......


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तच

3

मस्तच हास्य

पाटी कोरी राहिलेलीच

4

पाटी कोरी राहिलेलीच बरी..

सहमत आहे!! मस्तच रे नाना!! हास्य

हम्म.

5

हम्म.


-पुण्याचे पेशवे

मस्त नाना....

6

हृदयाला भिडलं लिखाण!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

वाह!! नानातुझी कोरीपाटी

7

वाह!! नाना
तुझी कोरीपाटी आवडली, पण मला माझी करता येईलच का सांगण कठीण आहे.
उलट आयुष्याच्या संध्याकाळी एक एक पान उलगडत वाचायला आवडेल मला.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

लग्न झालेलं दिसतयं

8

लग्न झालेलं दिसतयं Laughing out loud

ह.घे.रे.ले.ना.डो.फो.मा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काय टपुन बसला होतास का?

9

Laughing out loud काय टपुन बसला होतास का?
Laughing out loud


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

हॅहॅहॅ...लै भारी रे नाना!!

10

हॅहॅहॅ...लै भारी रे नाना!!

नाते जे आज आहे ते.

11

".... लिखे जो खत तुझे, लो तेरी याद में हजारो रंग के नजारे बन गये !"

या गीताप्रमाणे विविध रंगांची ती गोळा केलेली... विविध भावनांनी श्रीमंत केलेली... इंद्रधनुष्ये नष्ट करताना यातना होतात... भले मग जिच्यासमवेत केली ती जवळ असो वा साता समुद्रापल्याड गेलेली असो.... नको वाटते तसा निर्णय घ्यायला !!! त्यामुळे कर्सर "डिलीट की" कडे जाताना थरथरतो..... आणि त्याऐवजी "ती" फाईल "क्लोज" वर क्लीक केले जाते.

असो... व्यक्ती तितक्या प्रकृती....आणि प्रवृतीही....त्यामुळे मतभिन्नता अपरिहार्य ! बाकी श्री. नाना यांची कृती मन हेलावून टाकणारी आहे.... तद्वतच श्री. अवलिया यांचे लिखाण !!


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

कारण, राजकारण काय आणि आयुष्य

12
कारण, राजकारण काय आणि आयुष्य काय कुणी कुणाचा कायम मित्र नाही की शत्रु नाही. भुमिका बदलत रहाते. जुनी नाती नव्या नात्यांत बदलतांना ही अशी कागदे फार त्रास देतात.'

आम्ही बी हेच म्हंतो

आज पाटी कोरी आहे. बघु या किती काळ अशीच ठेवु शकतो...

परत ती स्मृती चित्रांनी भरली जाते. अशी कोरी राहत नाही कधी. इतक स्वॉप आस्तय व्हय!


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

खरय ! काहीवेळा पाटी कोरी

13

खरय !
काहीवेळा पाटी कोरी करावीच, जुन्याच नात्यांना काहिवेळा झळाळी येते.
किंवा नविन नात्यांना स्पेस मिळते........खूप सुंदर झालय लिखांण

णाणा'स स्पेषल !!

14

हास्य णाणा'स स्पेषल !!

मस्त!

15

नेहमीप्रमाणे मस्त लेखन!

नॅन्स, अप्रतिम लेखन. एकदम

16

नॅन्स,
अप्रतिम लेखन. एकदम वातावरणच बदललं आजुबाजुचं थोड्या वेळासाठी. हास्य

मस्त. हास्य

येऊ देत अजुन.

नाना रजनीश नेहमी

17

नाना रजनीश नेहमी म्हणायचे........... यू हॅव टो अनलर्न मेनी थिंग्स टू लर्न न्यू थिंग्स

चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो
वो अफसाने जिन्हे तकमिल तक लाना न हो मुमकीन
उन्हे एक खूबसूरत मोड देकर छोड देना अच्छा..
चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

चार ओळी कोर्‍या पाटीवर ...

18

नको नको ते मनात येते
विश्रांतीस्तव मी निजल्यावर
प्रकट मनाच्या पाडिती भिंती
सुप्त मनातील घुशी बिलंदर.

पाटी कोरी कधी होते का?/करता

19

पाटी कोरी कधी होते का?/करता येते का? त्यापेक्षा पाटीवर जे काहि आहे ते आपलं आहे असं समजून तीच्यावरील अक्षरात फार न गुंतता सतत चालत रहावं हे उत्तम

छान लेखन


-ऋ

विजुभाऊंची कृपा ...

20

विजुभाऊंची कृपा ... हास्य

हॅ हॅ हॅ

21

उत्खनन जोरात चालू आहे, हेल्मेट घालून या हो. (हा प्रतिसाद नानाचा धागा वर ठेवण्यास मदत म्हणून, पुन्हा... विजुभाऊ कृपा Big smile )

मस्त लेखन

22

पाटि कोरि करणे कहि वेळा आवश्यक असते. पण कमि लोकांना हे जमत आसावे. पण हे नक्कि कि ज्यांना हे जमते ते आयुश्याचा मनसोक्त उपभोगु शकतात


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

छ्या ..काही दिवस दुर राहिलो

23

छ्या ..काही दिवस दुर राहिलो तर कळतय काय मिस केलय ते ....

नाना क्या बात है ..मस्त लिखाण रे !!

खाली उतरंनं सोपं वर निघंनं

24

खाली उतरंनं सोपं
वर निघंनं जमेना..
बळ पुराचं आणून
नदी उलटी वाहिना..


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

वा वा!

25

वारे वा नाना तुमची ती पाटी साफ, आमचे पेपर श्रेडींग ती अफरातफर काय?

नही चलेगी नही चलेगी नाना फडणवीसगीरी नही चलेगी. Big smile

सगळ्यांना हे जमले तर काय हो नाना! प्रकाशकाका म्हणतात तसे जैवरसायनाचा माणुस...