संस्कृत धडा ७

0
0

मागचा भाग - http://www.mimarathi.net/node/1407

आता या भागात आपण विध्यर्थक रुपे पाहु.

धातु - वद्

आशा, इच्छा, विनंती, नियम, अपेक्षा, भविष्यसुचक, परवानगी अशा अर्थाने वापरले जाते

प्रथम पुरुष
अहम् वदेयम् - मी बोलावे, बोलेल, बोलत असतो
आवाम् वदेव - आम्ही दोघांनी बोलावे, बोलु, बोलत असतो
वयम् वदेम - आम्ही सर्वांनी बोलावे, बोलु, बोलत असतो

द्वितीय पुरुष
त्वम् वदेः - तु बोल, बोलावेस, बोलत असतोस
युवाम् वदेतम् - तुम्ही दोघे बोला, बोलावेस, बोलत असतात
यूयम् वदेत - तुम्ही सर्व बोला, बोलावे, बोलत असता

तृतीय पुरुष
बालकः वदेत् - बालकाने बोलावे, बोलत असतो
बालकौ वदेताम् - दोघा बालकांनी बोलावे, बोलत असतात
बालकाः वदेयुः - सर्व बालकांनी बोलावे, बोलत असतात

पठ् धातु साठी हेच

पठेयम् पठेव पठेम
पठेः पठेतम् पठेत
पठेत् पठेताम् पठेयुः

असे होईल.

नमुन्यादाखल वर्तमान कालीन रुप आणि त्याचे विध्यर्थक रुप दाखवले आहे.
त्याचा नीट अभ्यास करा

रामः लिखति - रामः लिखेत्

सीता लिखति - सीता लिखेत्

बालकौ गच्छतः - बालकौ गच्छेताम्

तौ पठतः - तौ पठेताम्

ताः पठन्ति - ताः पठेयुः

अहम् जयामि - अहम् जयेयम्

यूयम् अर्चथ - यूयम् अर्चेत

वयम् क्रीडामः - वयम् क्रीडेम

आतापर्यंतच्या भागांमधे आलेले नामे आणि धातु अशा प्रकारे चालवुन पहा, वापरुन पहा

क्रमशः

(पुढील आठवड्यात चाचणी परिक्षा १... ज्यांना परिक्षा द्यायची असेल त्यांनी तयारीला लागावे.)

{काय हे}

1

उजळणी व्हायच्या आतच चाचणीची घोषणा झाली. Sad
असो, आता वाचायला हवे

{मस्त}

2

चाचणीचा अभ्यास सुरु करतो.

अवांतर -

वयम् वदेम - आम्ही सर्वांनी बोलावे, बोलु, बोलत असतो
यूयम् वदेत - तुम्ही सर्व बोला, बोलावे, बोलत असता
बालकाः वदेयुः - सर्व बालकांनी बोलावे, बोलत असतात

--- हे तर मराठी संकेतस्थळांचं (अनुक्रमे नव्हे, एकंदरीत) सारच झालं की wink

{मस्त नाना!! परीक्षेच्या}

3

मस्त नाना!!
परीक्षेच्या तयारीला लागलोय!! येऊ दे!! हास्य

{उत्तम लेखमाला ह्याचे पुस्तक}

4

उत्तम लेखमाला ह्याचे पुस्तक करावे अशी खुप इच्छा आहे, जर परवानगी असेल तर करुन टाकू.

प्रस्तावना लिहून दे व इमेज पण तयार करुन दे रे...


Hope is a good thing...

{पुस्तक करायला हरकत नाही. पण}

5

पुस्तक करायला हरकत नाही.

पण पुढचे भाग कसे जोडणार ? की तु ते काम करशील ?

प्रस्तावना, इमेज देतो ३-४ दिवसांत

{मी जोडत राहीन ना... तु}

6

मी जोडत राहीन ना...

तु प्रस्तावना व इमेज चे बघ.


Hope is a good thing...

{वोके}

7

वोके

{+१}

8

>> ह्याचे पुस्तक करावे अशी खुप इच्छा आहे,

कराच.. परीक्षेच्या वेळी अभ्यासाला बरं पडेल!! हास्य

{विजुभाऊंची कृपा ...}

9

विजुभाऊंची कृपा ... हास्य

{नान्यानं व्यवस्थित धडे दिले}

10

नान्यानं व्यवस्थित धडे दिले आहेत. पण आम्हीच कमनशिबी जाऊन नीट वाचायला वेळ झाला नाहीये. Sad
असो आता तयारी करून चाचणी द्यायला पाहीजे


-पुण्याचे पेशवे

{+ १ बाडिस !}

11

+ १

बाडिस !


Hope is a good thing...

{"नान्यानं व्यवस्थित धडे दिले}

12

"नान्यानं व्यवस्थित धडे दिले आहेत. पण आम्हीच कमनशिबी जाऊन नीट वाचायला वेळ झाला नाहीये."

खरं आहे, खूप कष्ट करून ही लेखमाला तयार झालेली दिसत आहे.
सगळे भाग वाचले आवडले व संग्रही देखील ठेवले आहेत.

हास्य

{अवलिया}

13

छान उपक्रम राबवतोस बघ अवलिया. सॉफ्टवेयर अभियंत्यांबरोबर चांगले संस्कृत जाणणारे तरूण- तरूणी तयार होणे ही काळाची गरज आहे.
जेमतेम संस्कृत जाणणारी- रमाबाई

{(विषय दिलेला नाही)}

14


And then !