प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते ३

1
0

मागील दुवा http://mimarathi.net/node/1450
ए काय पाहिलेस रे माझ्यात तू ? हा प्रश्न तू मला बरेचदा विचारला होतास.
एकदा मी मला स्वत:लाच हा प्रश्न विचारला. आणि उत्तर शोधत बसलो.
खरेच नक्की काय पाहिले असेल मी तुझ्यात की ज्या मुळे असा वागु लागलो?
तू चांगली दिसतेस ? तू चांगली वागतेस? तू चांगली हसतेस? तू चांगले गाणे म्हणतेस? तू चांगली भाषणे देतेस? तू मला समजून घेतेस ? एक ना अनेक प्रश्न उभे राहिले डोक्यात.
तू चांगली दिसतेस? तू चांगली दिसतेस म्हणून मला आवडतेस की मला आवडतेस म्हणून तू मला चांगली दिसतेस असे वाटते ? ते पहाणा-यावरच बरेचसे अवलंबून असते
काळ्या सावळ्या साधारण रूपाच्या मुमताज़ला पाहुन एका फ़कीराने शहाजहान ला विचारले होते "क्या ये है तेरी मुमताज़; जिसके लिये तू इतना पागल हो गया है? "
त्याला उत्तर देताना "अगर मुमताज़ को देखना है तो मेरी नजरोंसे देखो". असे तो शाहजहान म्हणून गेला.
असू ही शकेल ते खरे. ......सौंदर्य पहाणाराच्या नजरेत असते.
तू चांगली वागतेस? तू खरोखरीच तशीच आहेस की मला ते तसे वाटते?
तू चांगली हसतेस? हसरा आनन्दी चेहेरा हा जगातला सर्वात सुंदर चेहेरा असतो असे मीच एकदा तुला म्हंटले होते. ते तुला पाहुनच म्हंटले होते.
तु अगदी सहज उत्तरलीस "हो ना. लहान बाळे बघ कशी सुंदर दिसतात"

तू चांगले गातेस? एखादा गायक तल्लीन होऊन गात असेल तर त्याचा तल्लीन झालेला चेहेरा हा नेहमीच देवाचा चेहेरा वाटतो. आंब्याची कोवळी पालवी ही देखील काहितरी आनन्दाने गुणगुणत असते असेच वाटते. तल्लीन होऊन गाणारा गायक , स्वत:च्याच नादात मग्न होऊन बाहुलीशी खेळणारी लहान मुले , स्वत: घडवलेल्या घाटदार माठाकडे तृप्तीने पहाणारा कुंभार ही त्या क्षणी एकदम सुंदर दिसत असतो.
काळ्या खडबडीत दगडी विठोबाच्या चेहे-याला सुंदर ते ध्यान म्हणणा-या वारक-या सारखे आपल्याला आपले प्रेमपात्र सुंदरच दिसत असते.
तु चांगली हसतेस ? हो तुझे मोकळे खळखळुन हसणे हे मला खूप आवडायचे. लहान मुलाचे हसु असते तितके ते निरागस असायचे. उत्साही असायचे. एखाद्या गोष्टीला तु अगदी मनापासुन हसायचीस. तुझे हसणे मला चेहे-यावर पडणा-या पावसाच्या सरी सारखे वाटायचे. मी तसे तुला

ये काले बादल और गीली हवायें
जहांसे भी आती हैं साथ खुशीयां लाते है
टपटप बारीश की बूंदे , हर चेहरे पर
मुसकान लाती हैं
सूखी, थकी बूढी आखों मे भी
चमकसी छा जाती हैं
चेहरी की झुर्रीयां खिल उठती हैं
बचपनकी यादों मे फ़िर एक बार नहाती हैं
मौसम की हर बारीश में
हमे हर बार ये एहसास हुवा हैं
चेहरे पर टपकती हर बूंद पर
हर बार वही महसूस किया हैं
आखों से बहते आसूओं को हमने
तुम्हारी उस खिलखिलाती हसी की
यादों से थामा हैं

आपण एकत्र बरोबर असायचो तेंव्हा मला वेळ थांबवुन ठेवता आला तर किती बरे होईल असे वाटायचे. आणि तू नसताना वेळ थांबलाय असे वाटायचे. हे असे का व्हायचे ते कधीच कळाले नाही. असे होणे म्हणजे नक्की काय तेच कळायचे नाही. त्यात गंमत यायची. तू आलीस की मला आपण बरोबर असतानाचा प्रत्येक क्षण आठवणीत जपून ठेवावा आणि तू नसताना तो जपलेला क्षण फ़ोटोच्या अल्बम प्रमाणे पुन्हा पुन्हा अनुभवावा असे वाटायचे.
तू मला समजून घेतेस ?म्हणजे नक्की काय असते? एखाद्याने एखाद्याला समजून घेणे म्हणजे काय? हा तर साधा संवाद. उत्तम श्रोता कोणालाही हवाच असतो. एखाद्याला हवी ती दाद देणारा श्रोता मिळाला की त्याला वाटते श्रोता समजून घेतोय. समजून घेणे हे सापेक्ष असते. मी जे समजलो ते तू समजली असशीलच असे नाही होत..
आपण दोघेच असताना तू कधी कधी गप्प गप्प रहायचीस.
तुला जे वाटते ते तु मौनातुन बोलत असायचीस जणु. आणि मी बोलायला लागलो की म्हणायचीस आपण एकमेकाना न बोलताही समजू शकतो की. शब्द कशाला हवेत.
ते खरे ही असायचे.

आखें सूखी और पलके बंद
आप ऐसे खामोषी से ही
सारी बाते कह देती हो.
आपकी अदाओं से;
आपके तवर पहचनने में
हम इतने वाकीफ़ हो गये है;
के अब बन्द दीवाले भी
हसती और खुशमिज़ाज़ नज़र आती हैं

कसा कोण जाणे एक दिवस अचानक मी एकाकी झालो. एकटेपणाचा उत्सव साजरा करु लागलो. कोणातच न मिसळता मी माझ्या दुनियेत मग्न असायचो. माझ्या जगाची दारे स्वत:पुरताच उघडायचो. कसलातरी ठेवा कपाटात जपल्यासारखा काहितरी जपत रहायचो. एकटेपणाची सोबत बरी वाटु लागली. मौनाची भाषा उमगायला लागली.या एकटेपणालाच मी सखा सोबती समजुन त्याच्याशीच गूज करायचो ही अवस्थाही मागे पडली. एकटेपणात मी कुठेतरी स्तब्ध झालो.

ये खामोशी अब सताने लगी हैं
फ़ुरसत ही फ़ुरसत चुभने लगी हैं
हमने तारे गिनना छोड दिया हैं
घडी देखना भी बंद किया हैं
काटे घूमकर कोई फ़र्क नही होता
वक्त ही कुछ अटकसा गया हैं
दिन पर दिन बीत जाते हैं
आसमान और फ़िज़ा वही रहते हैं
मैने जोरसे चीखना चाहा
फ़ूट्फ़ूट कर आवाजे लागायी
लाखोंसे पूछा भी
के वक्त का ठहरना मेरे साथ ही क्यूं ?
क्या मेरा हम राह भी है कोई?
सिला तो कोई नही आया
मेरे सवाल का.
शायद मेरे लब्ज़ भी बीच हवां मे
जमकर ठहर गये
बस......इस वक्त की तरह.

हे का असे तूही कधी विचारले नाहीस. तू विचारणार नाहीस हे ही मला माहीत आहे. तुझ्याही बाबतीत कधीकधी असेच होत असेल.. तेंव्हा काय करत असशील तू. झाडाखाली बसून माझी आठवण काढत असशील? की मोठ्याने रेडीओ वर गाणी लाउन मनातल्या भावनाना गोंगाटाने गप्प बसवत असशील? गोंगाटात विचाराना दाबुन टाकता येते. पण पापण्यां बाहेर पडु पहाणा-या त्या पाण्याचे काय ? त्याना कसे लपवतेस? मला माहीत आहे हे तू कधीच कोणालाच सांगणार नाहीस. खोटे हसुन; हसण्यामुळे डोळ्यात पाणी आले असे सांगण्याचा तुझा स्वभाव नाही.
स्वत:ची समजूत काढत, दिवसभर वेगवेगळ्या भूमिकांत वावरत असताना एखादातरी क्षण येतो की जेंव्हा आपण स्वत:च स्वत:ला भेटतो. काय करतेस त्या क्षणाला? कोणाला कोणापासुन झाकतेस?

जानना भी चाहा
पहचानना चाहा
मगर पहचान ना पाया
ये होगा कभी सोचा भी ना था
तुम्हारे जाने के बाद
आईने मे खुदही को
अनजान पाया.

माझेच प्रतिबिंब माझ्याकडे विस्फ़ारुन पहात असते. कोणितरी नवा माणुस पाहिल्या सारखे.ओळखीची बरीच लक्षणे दिसतात पण ओळख पटत नाही कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो असा चेहेरा आरशात दिसत असतो. मी गोंधळतो पुन्हा पुन्हा आरशात पहातो. माझ्या प्रतिबिंबात काय फ़रक आहे ते ताडुन बघतो. माझ्याच प्रतिबिंबाच्या डोळ्यात अविश्वासाने पहातो. आणि एका क्शहणी जाणीव होते त्यात काय दिसत नाही त्याची. मी नजरेला नजर द्यायचे टाळतो. स्वत:ला त्या प्रतिबिंबाचा अपराधी मानु लागतो. ही जाणीव होते त्यावेळी हातातुन काय निसटून गेलंय ते उमगतं. स्वत:ला ही न कळेल अशी नुसतीच मान हलवण्या शिवाय मी काही करु शकत नाही.

इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.
हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है

एखादी रात्र अशी येते की चन्द्र गायब असतो. आकाशात अगदी टीपुर म्हणावे असे मस्त चान्दणे असते.

कुठुन तरी दुरून रातराणीचा उन्मत्त गन्ध येत असतो. साधे रस्त्यावर चालले तरी ढगात चालल्याचा भास होत असतो.

थन्डी बेताची म्हणजे अंगावर काटा फुलेल इतकीच असते.सगळ्या वातावरणात कसलातरी मस्त उत्साह नांदत असतो.

आणि का कोण जाणे तू आठवतेस्.चांदण्याना बघुन तुझे ते खळखळून हसणे आठवते.का कोणास ठाउक तू अशी मनमोकळे हसायला लागलीस की मला टीपुर चान्दणे सांडते आहे असेच वाटायचे. मी तुला तसे म्हणायचो देखीलआणि मी तसे म्हणालो की तू अधीकच हसायला लागायचीस. माझ्याकडे पहात हा किती येडबम्बू आहे अशा आविर्भावात तू हसायला लागलीस की मला एकदम चुकल्यासारखे व्हायचे.माझा चेहेरा पडायचा आणि मला एक टपली मारुन तू म्हणायचीस "ए येडबम्बू"

असे म्हणताना तू एकदम काहितरी वेगळीच दिसायचीस. तू तुझी स्वप्ने जगते आहेस असे वाटायचे.

कुछ चन्द अशर्फीयॉ और बन्द मुट्ठी

कुछ उम्मीदे और हौसला अफजाई

बस यही रह गया साथ मेरे....

वो तब भी तो थे साथ मेरे;

जब हम मिलकर जहॉ बसा रहे थे.

हल्ली उजेड नको वाटतो. अन्धारात एकटेच बरे वाटते.एकट्याला तशीही उजेडाची काय गरज असते? काही आठवणी सोबत असल्या की झाले.दिवाळीतल्या पणतीसारख्या त्या अंधार दूर करतात. आपण म्हणतो खरे पण खरेच का त्या अन्धार दूर करतात?

अब हम रौषनदान नही रखते

दियासलाई शमादान की जरुरत नही महसूस होती

आप की याद आती है

रौषन करती है दिल को

................फानूस बनकर

मी काल असाच एकटाच चालत फिरत होतो.त्या रस्त्यावरुन्...आपण तिथे उगाचच हिन्डत बसायचो. हल्ली त्या रस्त्यावर रहदारी नसते.वाहने, रीक्षा, गाड्या,ओळखीचे लोकही नसतात. मी उगाचच अगान्तुकाप्रमाणे तिथे भटकत होतो.समोरुन कोणीतरी एक चेहेरा दिसला. मी पहाणे टाळले. का कोणास ठाउक ?

एखादा हसरा चेहेरा मला हल्ली नकोसा होतो.खरेतर हसरा चेहेरा हाच जगातला सर्वात सुंदर चेहेरा असे तूच तर मला सांगायचीस. पण मी हल्ली कोणत्याच हसर्‍या नजरेला नजर देउ शकत नाही.

इन दिनो आप कुछ

अलगसे दिखते हो

डर लगता है

नजरे मिलानेसे भी

लब्जोंका सहारा

अब ले नही सकता

हमने कुछ सपने

मिलकर देखे थे

कैसे बयॉ करु नजरोंसे

उन सपनो को नमी बहॉ ले गयी है.

मी कैकदा त्या रस्त्याने जात असतो. ओळखीच्या खुणा शोधत फिरत असतो.एखादी ओळखीची खूण दिसली की त्यामागच्या सार्‍या आठवणी धावत येतात. तो रस्ता ते वळण . त्या वळणावरचे बैठं घर. त्या घरा समोर बसणारी भाजीवाली.आणि नेहमी भेटणारा तो फुलवाला. काल तो तिथे नव्हता. तसे पाहिले तर त्या रस्त्यावर कोणीच नव्हते माझ्याखेरीज.

त्या रस्त्यालाही आठवत असतील का एखादे असे क्षण......कोणी कोणाला भेटल्याचे....बोलल्याचे...पाहिल्याचे. ...भांडल्याचे....अबोल्याचे...... नुसतेच निशःब्द न बोलता हातात हात घेउन चालल्याचे........ रस्त्याने तरी कायकाय लक्षात ठेवायचे?

चलते चलते हर कदम पर महकते

हम ताजातरीन होकर राहसे गुजरे

सूर्ख मिट्टी ओढे वह कच्ची सडक

कुछ देर से ही जाग रही थी

सुबह की ओस और

टहनीयो के पत्तों से लुकछिप खेलती

गुनगुनी कच्ची धूप........

वक्त कुछ ऐसा था

सडकने कुछ देर सोनाही चाहा

रातभर पास के पेडोंने

पत्तोकी बौछार की थी

वही चादर सडकने ओढ ली

सुबह कुछ देर सवेर निकलते पंछीयोंने

चहकना रोक लिया था

अब इन्सानी शोरगुल जो शुरु होना था

सडकने फिरभी सोना चाहा

हम ऐसेंही चलते रहे

दूर से एक ट्रक

पीछे बवंडर लिये धूल रगडता चला आया

सडक पर पडे सारे पत्ते बिखर गये

सडक को अब जागनाही पडा

आखीर सुबह भी तो

........अपने वक्त से मजबूर थी.

माझ्या मनात या भावना नक्की भावना येतात हे मला कधीच कळत नाही. बरेचदा तर मी एकटाच माझ्याशीच बोलत असतो. माझ्या त्या बोलण्याला सलगता ही नसते. हे तूच मला एकदा दाखवुन दिले होतेस. आणि ते माझ्या लक्षात आल्यावर मी ओशाळलो होतो. माझ्या त्या पडक्या चेहेर्‍याला तू इतकी जोरदार दाद दिली होतीस की सगळे विसरुन मी हसत सुटलो होतो. ते क्षण आठवले की मी पुन्हा हरवुन जातो......त्या स्वप्नात.....

वो पल जो

आपके ख्वाबों से चुराये थे;

वो अश्क जिनसे

आपके ख्वाबों मे फूल सींचे थे;

दर्या ए तनहाई बनकर.....

हमे आजमा रहे हैं

.

1

.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

..

2

..

मस्तच... विजुभाऊ लै भारी...

3

मस्तच... विजुभाऊ लै भारी...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद अवलीया जी..

4

धन्यवाद अवलीया जी..


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

मस्त

5

मस्त...