प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते

0
0

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....तुमचे आणि आमचे अगदी सेम असते
हे जरी खरे असले...आपले ते अफ़ेयर आणि दुस-याची ती भानगड असे जरी म्हणत असलो तरी प्रेमात पडणे हे भाग्य सगळ्याना मिळतेच असे नाही.....न मिळणारी द्राक्षे आंबट मानुन काहीजण त्याची बोळवण करतात...
पण एक अनुभवलय तुम्ही....प्रेमात पडले की जग अगदी चांगले दिसायला लागते....सगळे लोक जणु आपल्याबद्दल बोलत आहेत असे वाटु लागते.ती विशेष व्यक्ती दिसली नाही की कसे तरी होते...आणि दिसली की इंग्रजीत बोलायचे तर "थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. काळ थांबवणे आपल्या हातात असते तर घड्याळ तिथेच थांबवुन ठेवले असते.....
तुझ्या वाटेकडे डोळे लागले असतात. उगाचच फ़ोन व्हायब्रेट झाल्यासारखे वाटते.त्या वळणावरुन एखाद्या महाराणीसारखी चालत तू येशील.आणितुझे ते वेड लावणारे मिल्लीयन डॊलर स्माईल देशील......
तुझ्या त्या मुस्कुरहाटी च्या ओझरत्यासुद्धा दर्शनासाठी एका पायावर उभे राहुन तप:श्चर्या करावी लागली तरी चालेल असे आपण स्वत:शीच गुणगुणत असतो....मदनमोहनची गाणी पुन्हापुन्हा आठवत रहातात...प्रेम याबद्दल विचार करणंही खूप मस्त वाटु लागते..........आणि आपण चक्क कविता करु लागतो...

तुम दिखाई देती होती हो
तो युंही अच्छा लगता है
हर पेड और दरख्त; भी खुषमिज़ाज़ लगते है......
बस वही एक पल
हर चलता राहगीर
मासूम बच्चा लगता हैं.....
मै भी वही होता हुं
फ़िज़ा भी वही होती है
ये बदलाव कैसे होते है....
ये सोचना भी अच्छा लगता है
इस सोच मे हम कुछ उलझ जाते है....
और....तुम दिखाई देती हो......

कबीर म्हणतो "ढाई अक्षर प्रेमके" .खरंच काय जादू भरली असेल या अडीच अक्षरांत....
माझी तुझी कधीतरी भेट होईल... मनातली भावना तुला बोलुन दाखवु....मग तु ही माझ्यासारखीच मोहरुन येईशील......मनातल्या श्रावणसरींत चिंब भिजशील......खरंच होईल का असे....मला जे वाटते तेच तुलाही वाटत असेल? का मग हे आपल्या मनाचे सगळे खेळ....खरेच असेच असेल का....पण मग मी तुला आवडत नसेन तर? मी आवडत नसेन तरीही तु बोलशील माझ्याशी?
एक ना अनेक मन प्रश्नानी भरुन जाते.....उगाचच मुकेश ची गाणी आपलीशी होतात....
एखाद्या क्षणी तू दिसतेस ....मनात हिम्मत करुन आपण तुझ्या दिशेने पुढे होतो......मनातल्या मनात तुझ्याशी कसे बोलायचे याची हज्जारदा उजळणी होते...घसा उगाचच कोरडा होतो..छातीतली धकधक चौकातल्या सगळ्याना ऐकु येइल इतकी मोठ्याने होत असते. प्रेमात पडण्याच्या क्षणाची ती नांदी असते.पडदा वर जाणार असतो....आणि आपण सारे संवाद पुन्हा पुन्हा म्हणतो....या प्रवेशात प्रॊम्प्टर नसतो......असतो तो तुझ्या माझ्यातला एक अदृष्य अवकाश......तो कसा भरुन काढायचा हे कोणीच सांगितलेले नसते.....आपण पुन्हा प्रत्येक शक्यता पडताळुन पहात रहातो.... आलेला क्षण पकडणे हेच काय ते जमवायचे असते...

अब की बार आपसे मिलुंगा ....
कुछ सुनुंगा कुछ कहुंगा....
पता नही आप क्या कहोगी...
शायद यही सोचकर
हमने ये मुलाकात
खामोशी में गुज़ार दी है.........

स्वत:वर चरफ़डत मी तसाच घरी येतो...अंगातला टी शर्ट हवेत भिरकावत बेडवर पसरतो....झोपायचा प्रयत्न करतो...कितीतरी वेळ तुझाच विचार मनात असतो....
खरेच मी वेडा आहे...मी असा का वागतो.?.... मी खरेच तुला काय देउ शकतो? काय आहे असे माझ्याकडे ज्यावर तू भरोसा ठेउ शकशील ? माझे हे असे अधांतरी जगणे....ना अजुन नोकरीचा पत्ता ना कशाचा ? काय म्हणुन मी तुला काही बोलावे.....काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर...........उलट सुलट विचारानी मी कावराबावरा होतो....

हवा का झौका और...
सनसानाती तुम्हारी याद.....
मै कांप उठता हुं...
किसी बुढे बरगद सा.
अपनी ही जडोंको
और एक बार सहमाता हुं
किसी बुढे बरगद सा.....

सकाळी कधीतरी मला जाग येते....मी नक्की काय विचार करत होतो तीच आता संगती लागत नाही

या रब की सुनु या आपकी
ये सोचते हम जागते रहें
हर करवट की साथ नतीज़ा बदलता गया
सुबह होते होते....
क्या बताऊं अब...
क्या रब का क्या आपका
ये ही भूल गया
माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात. केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात...
ये पेन और कैल्क्युलेटर
क्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात....
इस मंझील की हर बुनियाद;
इटोंकी जगह
तुम्हारी याद से रखी है..
कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ.....आपले भविष्य काय असेल....आपण काय करत असु.....याचाच विचार करत असु... मी तुझा मेहेंदी लावलेला हात हातात घेईन. त्यावरच्यी वेलबुट्टी निरखुन पाहीन.....भूतकाळ माहीत नाही पण आता आपला भविष्यकाळ मात्र एकत्र बांधला गेलाय एकमेकांसोबत..........पण ए...एक सांगशील?
आपके हाथ और ये मेहेंदी..
मै खो जाता हुं इन लकीरों मे...
भटक जाता हुं राह मे....खोजते हुवे....
बतादो इन मे से....
वो कौनसी....
..........मेरे तकदीर की लकीर हैं?
तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं
रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत.
जब तुम साथ होती हो
हर राह युंही अच्छी होती है...
हर मोड मंज़ील लगता है..
पैरों मे काटोंका कोई
.......हिसाब नही लगता हैं...
मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला...
कुछ अंधेरा कुछ रौशनी.....
बादलो की आडमे..
सूरज युं आधासा ढल गया था.
रेल की खीडकी से वो ओझल होता
तुम्हारा चेहरा याद आया
पलके भीगी; जमीन भीगी...
आज की बारीश मे..
कुछ मेरे आसूं भी शरीक थे
तू अशी नेहमी माझ्या पासुन दूर कधी नसतेसच...माझा प्रत्येक क्षण तुझी काही ना काही आठवण करुन देतोच...माझ्या टेबलावरचे हे घड्याळ....तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते. मीही आता तो विचार करतोय...घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...तुझ्या समवेत जगलेला प्रत्येक क्षण पुन्हा तितक्याच उत्कटतेने जगायचाय मला....खरच ते क्षण ....आठवतात तुला?

तुम्हारे साथ जीना
कुछ अलग ही बात है.
जैसे एक ही पल में
दिन और रात है
खिलखिलाते हसते हुवे भी
आंखों मे नमी का साथ है
सिसकियां लेते हुवे भी
होठों पर मुस्कान की राहत है.
तुम्हारा गुस्सा भी प्यारा लगता है
इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी
पुरे दिन जितना लंबा लगता है
और साथ बीताया दिन भी
चन्द लम्हो में समेट जाता है.
तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी
बहुत कुछ कह जाता है.
और वो घन्टो की बातचित भी
कुछ मायने नही रखती.
कभी लगता है
की तुम एक वो पुलिन्दा हो
अतीत और वर्तमान
जिसमे एक साथ समेटा हो
तुम्हारी उन्ही नम आंखोंमे
ज़ज़्बातों का बारूद भी है
मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु
ये तय नही कर पाता हु
बस तुम्हारी तरह ही.....
बहुत कुछ चाहते हुवे भी....
बोल नही पाता हुं..
आपण फ़िरायचो तो चतु:श्रुंगीचा रस्ता आठवतो तुला....काहीही न बोलता चालत असायचो.....कशी कोण जाणे आसपास एकदम शांतता असायची....खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे...
रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो.....
एकटा असताना डोळे मिटुन घेतले की ते सगळे पुन्हा आठवते
जब भी कभी आंखे मूंद लेता हुं
कुछ दूसरीही दुनियामे चला जाता हुं
वहां तुम होती हो और साथ कुछ खामोशी
कुछ कदम चलकर तुम मेरे पास आती हो
एक हवा का झौका आता है.
तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है
आंख खुल जाती है........
सामने कुछ खामोशी पाता हुं
शायद तुम उसे यहां छोडकर
मेरी दुनिया मे आ बसी हो.....
एकदा तू विचारले होतेस की "काय पाहिलेस माझ्यात " मला उत्तर सुचले नव्हते....खरे तर मीही कधी स्वत:ला हा प्रश्न विचारला नव्हता
या असल्या प्रश्नांचे उत्तरे नसतात....आणि जी मिळतात ती तेव्हढी सद्धर नसतात. तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.
तुझ्या हसण्यात काय जादु होती हे कधी उमगलेच नाही....खूपदा विचार केला...आरशात पाहुन तुझ्यासारखे डोळे मिचकावुन हसता येते का तसा प्रयत्न केला......पण ते जमणार आहे थोडेच.
तुला सुद्धा माझ्या थोडे पॊज घेउन बोलण्याची मजा वाटायची..तु म्हणायचीस सुद्धा की मी थोडा अजून मोठा पॊज घेतला तर कर्मा चित्रपटातल्या दिलीपकुमारलाही मागे टाकेन म्हणुन.....
मी तुझ्या बोलण्यातले "अय्या हो" मोजायचो आणि तू माझ्या "शॊटच की " या ऊद्गारांचा स्कोर मोजायचीस.....काहीही कारण नसताना उगाचच मधेच कधितरी ३५ / ३७ / ५७ / ६३ असा काही आकडा तुझ्या तोंडुन आला की समजायचे की आज मी जरा जास्तच "शॊटच की " बोलतोय. तीन मिनिटात दोन वेळा चालेल ही आपण घालुन घेतलेली लिमिट.....
वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो......
ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना..........
मला तर तू कधी कधी अगदी लहान दुसरी तिसरीतली मुलगी वाटायचीस.....निरागस....हसरी.......रुसकी... तांबडी रेबीन आणि चप्पट केस असते तर मी कदाचित शाळेत नेउन सोडलं असतं......पण खरे सांगु............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं....
"काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो.
एक सादासा फ़ूल
और उसकी सादिसी पंखुडिया
कुछ जादूसा कर देते हैं
किसी राह पडे पत्थर को.....
................. भगवान बना देते है.......
...............................ही प्रचिती मी घेतली आहे.............
तुझे हे साधेपण तुला कधीच जाणवायचं नाही. हे साधेपण तुझ्या वागण्या बोलण्यातही असे. बाहेरच्या देखाव्याला भुलुन न जाता दबुन न जाता समोरच्याशी सहज बोलण्याची अवघड कला तु कुठुन अवगत केली होतीस कोण जाणे.....तुझ्या या असल्या सहज बोलण्यामुळे उलट समोरचाच दबुन जायचा.
तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.

मी कधी कधी एकटा असताना या खिडकीतुन बाहेर बघत असतो........मल कळत नसते मी काय पहात असतो ते......नजरेला दिसत नसणारे काहितरी दिसत असते.....

खिडकी से बाहर झांकना
अब ये आदतसी हो गयी हैं
उस मोड से तुम्हे आते निहारना
ये भी आदतसी हो गयी हैं
नजरे मिलतेही मुस्कुराना
ये आदतसी हो गयी है
उसी से बस दिन अच्छा गुजरेगा कहना
ये आदतसी हो गयी है
कभी ना दिखायी दिये तो
दिन काट लेते है
तुम्हारी रुखत के बहाने
इंतजार में खिडकी से झांकना
ये आदतसी हो गयी है
तुम नही आओगी...ये तो पता है
बाहर झांकना फ़िज़ुल है....
ये दिल को समझाने की भी
अब आदतसी हो गयी है.
(क्रमश:)

हम्म

1

हम्म

मस्तच विजु भाऊ ! लै भरी लेखन

2

मस्तच विजु भाऊ !

लै भरी लेखन !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

विजुभाउ बर जमत ह्या वयात...

3

Oups विजुभाउ बर जमत ह्या वयात...

विजुभाउ बर जमत ह्या वयात...

4

विजुभाउ बर जमत ह्या वयात...
इश्श्य.........अच्र्त्च अहेस.... काहीतरीच काय मेलं......... wink


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अहो प्रेम म्हणतेय मी

5

घाबरगुंडी अहो प्रेम म्हणतेय मी