मी ..... हो मीच्.बरेच दिवस संधी शोधत होते ल्ह्यायची.पण वेळच मिळत नव्हता
कित्ती कामं होती........ सीरीयलच्या कलाकाराना मार्गदर्शन करायचे, रामसे च्यास्टुडीऑतले घर साफ करायचे.
तरी बरे हल्ली बरेच लोक आम्हा मंडळीना रंगीत कपडे द्यायला लाग्लीत. पूर्वी फक्त पांढर्या धोप साड्यांवर भागायच.......आणि कपडे तरी किती तर्हेचे बै........किनतान..... वल्कले....... फाटक्या फॅशनेबल जीन्स...
पण पूर्वी आणी आत्ता मध्ये एक फरक आहे पूर्वी पांढरे कडे असले तरी चेहेरे चांगले मिळायचे ..... आत्ता रंगीत कपडे मिळाले तर चेहेरे हिडीस दाखवतात...
असो...
तर काय म्हणत होते मी ... आमचा एक प्रॉब्लेम झालाय. हल्ली हडळीनी वयात यायचे सोडून दिले आहे.........त्या एकदम म्हातार्या म्हणूनच जन्माला येताहेत.
तरी बरे...... तो फॅक्टरी वाला रामू आला म्हणून बर........ रामसे ब्रदर्स नी मध्ये निर्मिती बंद केली आणि आम्ही बेकार रहायला लागलो..... आता बेकार माणूस ....अर्र हडळी काय करणार...... मग सुरू झाले कुरापती काढायला.लोकाना वेगावेगळ्या नावाने हाका मारायला... वेगवेगळी रूपे घेऊन लोकाना छळायला..पण कोणीतरी यात सुद्धा लोचा केला........ हो लोचाच........ हा मूळ गुजराती शब्द मुम्बैत भल्ताच पॉप्यूलर आहे. इतका की तो मराठीच वाटतो....अग्दी नाराज ठाक्रे सुद्धा तो शब्द वापरतात. असो...... हां तर लोचा असा झाला की ते कोणीतरी संस्थळ काढले....... पूर्वी लोक स्थळे पहायचे........आता संस्थळे पहातात..... तर त्या संस्थळावर लोक यायला लागले आणि ते वेगवेगळी रूपे घेऊन आमचेच काम करू लागले......
त्यातून हाकामारी ला खरडमारी असे नाव घ्यावे लागले..... आम्ही वेगवेगळे रूप घेतले की लोक म्हणतात हे...डुप्लिकेट आयडी............ आता सांगा.... हे असे सांगितल्यावर कोण घाबरणार...........
लोक घाबरले तर ते नारळ लिंबू कोंबडं बकरं भात वगैरे देतात् तेवढे पुरते काही दिवस तरी ......आम्हा हडळीना कोणी देत नाही पण खवीस असला तर बाटली सुद्धा मिळते कधी कधी....... बाकी काही म्हणा.पुरुषांच्या काही खोडी मेल्यावरसुद्धा जात नाहीत. असो.
तर मी काय म्हणत होते..........आमची झालीय जाम पंचाईत.......... कोणी घाबरत नाही
आता आम्ही कायतरी नवा धंदा शोधतोय........
हल्लीचे आमचे रूप फारच निरागस वाटू लागलय असे कोणीतरी परवा सांगत होता...
हो वाट्णारच ना.......... राखी सावंत वगैरें पुढे आम्ही फारच निरागस आणि सोज्वळ दिसणारच ना.... खानदानी सौंदर्य आणि बाजारू सौंदर्य यात फरक असणारच ना. घरचे व॑रण भात्/भाजी भाजीभाकरी कोशिंबीर आणि धाब्यावरची तर्रीदार रस्सेवाला करी यात फरक असणारच ना. पण सात्वीक ते सात्वीकच.
त्या राखीने म्हणे स्वयंवर रचले....... आम्ही पाहिले नाते........ काय ती बिचारी मुले..... आमच्या कडचे काही खवीस आणि मुंजे गेले होते..... राखीला ते फारच सात्वीक वाटले.....
मग काय त्या राहूलने सुद्धा स्वयंवर रचले........ हे काहीतरी आच्रटच........ स्वयंवर रचणे हे स्त्रीयांसाठी....मग कोणीतरी राजपुत्र येतो पण जिंकतो आणि स्वयंवरातून राजकन्येला पण जिंकून घेऊन जातो...... असे असायचे........ त्याकाळी राजकन्या नाजूक असत....... त्याना पळवून जिंकून उचलून नेणे शक्य असायचे..... त्या राहूल ला उचलून न्यायला जे सी बी बुक केला होता म्हणे कोणीतरी.....
पण एक मात्र खरे.....राहूल हसायला लागला की कसा एकदम मंजूळ हसतो......... ( हे म्हणाले म्हणून तुम्ही हसू नका) मला तर तो बई एकदम हसताना राजखवीस वाटतो. कसा एकदम अगदी एखाद्या गोड खोकडासारखा हसतो ना
तरे मी काय म्हणत होते......... आणि त्याच्या गालावर पडणार्या अठीत ( आमच्याकडे इतक्या मोठ्या खळीला अठीच म्हणतात) तर एकदम विरघळूनच जायला होतं. असे माझी ७०५ वर्षांची चुलत चुलत मावस बहीण म्हणते
विसरलेच की....अग्गो बाई........
चला चला......... दुपारच्या श्..कोई है.....च्या शुटिंग ची वेळ झाली... निघायला हव..... वेळेत पोहोचले नाही तर उगाच त्याच मानधनावर दुसर्या एपीसोडमध्ये काम करावं लागेल
मी तुम्हाला नन्तर भेटेन हो.......
तोपर्यन्त क्रमशः
( हो... ही सवय इथलीच)
विजुभौ
आत्मकथन आवडले
(विषय दिलेला नाही)
-पुण्याचे पेशवे
+ १
+ १
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
आयचा घो!! नाना पेटला!!
आयचा घो!! नाना पेटला!!
मस्त.
आज काय लोळण महोत्सव आहे
आज काय लोळण महोत्सव आहे काय......... सग्ळेच लोळ्ताहेत
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
'लोळण महोत्सव' हा शब्द
'लोळण महोत्सव' हा शब्द ह्रिदयास भिडला
ह्रिदयास हा शब्द कलिजास
ह्रिदयास हा शब्द कलिजास भिडला!!
"कलिजास" या शब्दाची अंमळ मौज
"कलिजास" या शब्दाची अंमळ मौज वाटली!
अच्र्त
एवढं सगळे भिडलेले पाहून
एवढं सगळे भिडलेले पाहून काळजाची पण भिड चेपली आता....
असो..
बदडीन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काळजाची पण भिड चेपली
काळजाची पण भिड चेपली आता....>>>
चला .., आता भिडायला काही हरकत नाही !
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
"आजच्या हाडळींची प्रतिमा-१"
"आजच्या हाडळींची प्रतिमा-१" आवडली

हॅहॅहॅ
खीखीक्;हीक
(विषय दिलेला नाही)
ही हडळ फेस्बुक वर पाहिली मी
(विषय दिलेला नाही)
शाबास विजुभाऊ!
वेल्कम टू द अदर साईड!!!
(विषय दिलेला नाही)
प्रतिसाद एकापेक्षा एक भारी.
प्रतिसाद एकापेक्षा एक भारी.