एका लग्नाची गोष्ट

0
0

(Disclaimer : लेखन इतरत्र पुर्वप्रकाशीत)

सुशांत :"मी आणी प्रियाने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय"
मी:"काय???"
सुशः "हो..आणी तुला साक्षीदार म्हणून यायचय."
मी: "बरं बाबा...मी करेन तुला हवी ती मदत.."

अशा रितीने चालू झाली एका लग्नाची गोष्ट.गोष्ट आहे माझा मित्र सुशांत आणी त्याची प्रेयसी प्रिया यांच्या लग्नाची.

सुशांतने प्रियाला सेकंड ईयर मधे प्रपोज केलेलं...तिचा होकार आला लाष्ट ईयरला.

सुशांत माझा ईंजिनियरींगच्या पहिल्या दिवशी झालेला मित्र...आणी आम्ही जिवलग मित्र कधी झालो ते समजलंच नाही आम्हाला..नुकतीच त्याला ४ महिन्यांपूर्वीच नोकरी लागलेली.

प्रिया त्याच्याच सोसायटीत राहणारी.वर्षापूर्वी ती 'हो' म्हणाल्यापासून दोघांच सुरळीत चाल्लेलं.
पण एक मोठा झोल झाला....प्रिया सुशांत पेक्षा दीड वर्षाने मोठी...सो तिच्या घरच्यांनी तिच्याकरता स्थळं बघायला सुरुवात केलेली.

परिस्थीती काय तर..आमच्या बापड्याला नोकरीला लागून चारच महिने झालेले..पुण्यात स्वत:च घर पण नाही...शिक्षण काकांकडे राहून घेतलेलं. आणी सगळ्यात मोठा अडसर म्हणजे...मुलगी मराठा आणी मुलगा ब्राम्हण.घरचे कसे तयार होणार????

असाच एक दिवस सुशांत चा मला फोन आला.
"काय करोयस?? वेळ असेल तर पटकन एक तासात ए बी सी(अप्पा बळवंत चौक) मधे ये."
ए बी सी मधे आम्ही भेटलो, तर म्हणाला की प्रियाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी चालू केलीय..ती पण त्यांना आता थोपवू शकत नाहिये..मी ३०-४० हजार वाचवलेत...थोडे ऊधार घेउ (अस्मादीक तेंव्हा बेकार होते.. ह्यांचं लग्न लावलं त्याच्या पुण्याईवर ह्यांच्या लग्नाच्या १ महिना आत नोकरीला लागलो)

मी: बरं , आता काय कराचयं??
सुश्या : "चल स्वर्गात जाउया."
मी: "स्वर्गात?"
सुश्या :"साल्या, ते दागिन्यांच दुकान आहे.तिथे १-२ ग्राम असे आपल्या बजेटमधे मिळणारे दागिने मिळतात. प्रिया आणी माझं भेटणं सध्या आवघड झालय. तिच्या घरी समजलं असावं. घरच्यांनी युद्धपातळीवर मुलगा बघायला सुरुवात केलीय तिच्यासाठी. म्हणून १५-२० दिवसात सगळं निस्तरायचय. माझ्या घरचे पण तयार नाही होत आहेत.

उद्या मी आणी स्टिफन आळंदी ला जाणारे, ब्राम्हण बघायला लग्नासाठी."

स्टिफन हा माझा आणी सुश्याचा ईंजिनियरींगच्या पहिल्या दिवसापासून चा मित्र . त्याचे बाबा पाद्री आहेत.बाप मुलगा दोघेही मनाने एक नंबर.जिव्हाळा तर एव्ह्डा कि आमचा पूर्ण ग्रूप त्याच्या मम्मी पप्पा ना मम्मी पप्पा म्हणायचा आणी म्हणतो पण अजून.

हा रहायचाही सुशांतच्याच जवळ. ह्याचच घर आमच्या प्लानींग चा अड्डा बनला होता.

असंच बोलत बोलत आम्ही स्वर्ग मधे पोचलो...

थोडं ईकडे तिकडे पाहून शेवटी एक २ ग्रामच मंगळसूत्र पसंत केलं. किंमत : २०००. ह्याच्यातच कानातले पण इन्क्लूड होते.

आंधळा मागतो एक आणी देव देतो दोन, याच ऊक्तीनुसार स्वर्गवाल्याकडे स्कीम चालू होते की, २००० ची खरेदी केली की ४ गोल्ड्प्लेटेड बांगड्या फुकट.
त्याही घेतल्या.

तिथून २ दुकानं सोडली की स्वर्गच दुसरं दुकान होतं , तिथून दोघांसाठी अंगठ्या घेतल्या.

दागिने तर झाले...आता कपडे

लक्ष्मी रस्त्यावर गेलो...२-४ साडीची दुकाने पाहीली.साड्या आवडल्या नाहीत.
मग एक चांगलं दुमजली साडीच दकान पाहून आत घुसलो (आता नाव आठवत नाही). सेल्समन ला सांगितलं की आम्हला सिल्कमधे आंबा कलरची साडी हवीय...१०-१५ साड्यांतून शेवटी एक चांगली साडी घेतली.

घरच्यांची परवानगी नव्हती लग्नाला तरी त्यांच्या साठी (आई, काकू, आत्या, आजी) यांच्यासाठी पण साड्या घेतल्या.

तिथेच समोर एका ज्वेलरीच्या दुकानातून प्रियासाठी जोडवी घेतली.

संध्याकाळी सगळं सामान अड्ड्यावर टाकून मी चिंचवडला परतलो.

दुसर्‍यादिवशी माझी एक नोकरीसाठी मुलाखत होती सो स्टिफन आणी सुशांत आळंदीला जाउन मंगल कार्यालय आणी पंडीत ठरवून आले.लग्नाची तारीख ठरली होती..५ ऑक्टो २००६. जो पंडीत ठरवला होता तो असलीच लग्ने लावण्यासाठी प्रसिद्ध होता. तो त्याचं कार्यालयाचं एक प्रमाणपत्र देणार होता लग्न झाल्याचं आणी लग्न रजिस्टर करायचा फॉर्मपण देणार होता.

येता येता त्यांनी सुशांतसाठी जयहिंद मधून एक जोधपूरी आणी १ फॉर्मल जोडा पण आणला होता. आता लग्नासाठी फक्त सात-आठ दिवस राहिले होते.

त्यारात्री आईला फोन करुन सांगितला सगळा सीन..विचारलं की बाई तुझा पोरगा एका पळून केलेल्या लग्नाला साक्ष राहतोय..तुला काही म्हणायचय का?

"अरे दोघं सज्ञान आहेत ना..तर तिथे कायदा पण काही बोलू शकत नाही मी काय म्हणणार??.आणी तुझे मित्र वाया गेलेले नाहीयेत हे मला माहितिय" इती आई.

रात्री झोपचं लागेना..झोप नाही की नेहमी चा उतारा काढला...दुनियादारी वाचायला घेतली..पण पूर्ण वाचू शकलो नाही...मधेच थांबलो...विचार आला कि आपण करतोय आपल्या दोस्ताला मद्त ...त्यला नोकरीला लागून फक्त ४ महिने झालेत.... त्याचा 'मनिष भालेराव' तर नाही न होणार???

क्रमशः

नोकरी पक्की आसेल तर काही

1

नोकरी पक्की आसेल तर काही काळजी करू नका. काही मदत लागली तर फोन करा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अरे पाभे, ही साडेतीन वर्ष

2

अरे पाभे, ही साडेतीन वर्ष जुनी घटना आहे... Big smile

पुढे ?

3

प्रभ्या पुढचा भाग लवकर लिही रे !
उत्कंठा लागुन राहिली आहे ...

- डॉन्या भालेराव

>>>पुढचा हाग लवकर लिही रे

4

>>>पुढचा भाग लवकर लिही रे !

आवशीचा घो..... Big smile

दचकलोच Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

**
योग्य शब्द टाकला आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

च्यायला ...

5

मायला आम्च्या की-बोर्डाचे "बी बटन" जरा गंडले आहे त्यामुळे हा घोळ झाला.
विविक्षित जागी "भाग" असे वाचावे ...

@ राजे : मालक, जरा दुरुस्ती करा हो प्लीज !!!

- ( दिलगीर ) छोटा डॉन

चालतय रे डॉन्या..... पुढचा

6

चालतय रे डॉन्या.....

पुढचा भाग टाकतो एक दोन दिवसात..

लिवा लवकर लिवा...येवु दे

7

लिवा लवकर लिवा...येवु दे पटापट

पुढचा भाग टाका मालक....

8

पुढचा भाग टाका मालक....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुढे?

9

लिही लवकर...!

पुढे

10

पुढे काय? लिवा लवकर

ए.. तंगवू नकोस रे.. पटापट टाक

11

ए.. तंगवू नकोस रे.. पटापट टाक पुढले भाग... हास्य

पुढे काय? लिवा लवकर

12

पुढे काय? लिवा लवकर

प्रभो पुढचा भाग येउदे लवकर

13


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

ओ टाका कि लवकर पुढचा भाग

14

ओ टाका कि लवकर पुढचा भाग हास्य


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

काय मदत लागली तर सांगा.

15

काय मदत लागली तर सांगा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

प्रभ्या लवकर टाक रे पुढचा

16

प्रभ्या लवकर टाक रे पुढचा भाग.....