तथास्तु.....

0
0

ती : आपण काही झाले तरी लग्न करतो आहोत, तु मला वचन दे. नाही तर मी जीव देईन...
तो : दिले, जा. तथास्तु !
ती : हे बघ, मला हे तुझे तथास्तु नाही आवडत..
तो : सवय, संकृत मधला हाच एक शब्द येतो मला.
ती : पण कधी कधी बोलले खरं होते रे..
तो : हो माहीत आहे.
ती : मग का ?
तो : माहीत नाही..

**

ती : आपण लग्न कधी करतो आहोत रे ?
तो : लवकरच गं.. तुझ्या घरी बोलतो मी एकदा लवकरच.
ती : ह्म्म, मी वाट पाहत आहे..
तो : लवकरच होईल, हो म्हणतील अथवा नाही...
ती : मी तयार आहे.
तो : मी देखील.
ती : तीला सांगितले आहेस का तु ?
तो : हो गं, सांगितले आहे, तीच माझ्याबरोबर घरी येईल तुझ्या.
ती : मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे..
तो : मी देखील, व तुला माझ्या आधी जाऊ देणार देखील नाही..
ती : असे कसे होईल..
तो : होईल म्हणलो ना ? मग होईल.
ती : नाही झाले तर, तु जर नाही मिळालास तर आधी मी जाईन, तथास्तु !!
तो : हे... काय हा फालतुपणा...
ती : चिढलास काय रे ?
तो : नाही, पण वेडेवाकडे नको बोलत जाऊ...
ती : ठीक आहे, स्वारी.

**

तो : कुठे आहेस गं ?
ती : अरे मी ऑफिसमधून निघते आहे.
तो : मी गेलो होतो घरी आज तुझ्या...मनाची तयारी कर.. आपण दुसरा मार्ग अवलंबतो आहोत.
ती : काय ? बाबा नाही म्हणाले का ?
तो : हो, धक्के मारुन बाहेर काढलं.
ती : काय ? असे कसे करतील ते ? त्यांनी तर मला हो म्हणाले होते..
तो : होतं कसं कधी कधी..
ती : पण आपल्याच बरोबर का ?
तो : तुला पुन्हा विचार करायचा आहे का ?
ती : नाही.
तो : मग मी वाट पाहतो आहे तुझ्या उत्तराची. आज पासून ४ दिवसानंतर कोर्ट जवळ भेट.
ती : हो. काय घेऊन येऊ ?
तो : जशी असशील तशी ये. काही घेण्याची गरज नाही आहे. नोंदणी करतो मी आज सेटींग लावता आली तर बघतो.
ती : खरंच. मी एकदा बोलू का घरी ?
तो : ह्म्म. तुझी इच्छा.. !
ती : मी ट्राय करते, नाही तर प्लान आहे तसाच.

**

तो : सेटिंग झाले आहे, ३० दिवसाची वाट बघावी लागणार नाही.
ती : ह्म्म...
तो : सगळी तयारी झाली आहे, नोंदणी झाली की आपण मंदिरात जाऊ.
ती : ह्म्म्म..
तो : वेळेची काळजी घे, तुझे बाबा कळाल्या क्षणी रुद्रावतार मध्ये येतील.
ती : ह्म्म...
तो : मी गीता सांगत नाही आहे तुला..
ती : हम्म्म...
तो : काय झाले कोणी आहे का बरोबर ?
ती : ह्म्म.. नाही विचार करते आहे..
तो : आता विचार ? ह्या स्टेपला ?
ती : तो नाही रे.. घरचा...
तो : मग ठीक आहे... भेटू उद्या.

**

तो : निघते आहेस ?
ती : हो निघाले..
तो : घरी बोललीस ?
ती : हो.. जाऊ दे..
तो : तु एकुलती एक आहेस... पुन्हा विचार कर वेळ आहे..
ती : केला मी विचार तथास्तु !!
तो : माझेच शब्द मलाच ?
ती : हो..
तो : तुझा हा अवखळपणाच माझा जीव घेतो..हे... लक्ष्यात आहे ना..
ती : हो.. सगळे तयार आहे.
तो : मी पोहचतेच आहे.

**
तो मित्र : अरे एक लफडा झाला रे...
तो : काय झाले रे आता ?
तो मित्र : अरे कोणी तरी नेता गचकला आहे. सरकारी ऑफिसला सुट्टी दिली आहे.
तो : अबे...

**

तो : अग एक अचडण आली आहे.
ती : काय झाले रे ?
तो : कोर्ट आज बंद आहे..
ती : अरे देवा..
तो : काय झाले..
ती : मी घरी चिठ्ठी सोडून आलो रे...
तो : ओह नो.. तुला काय बोलू आता मी...
ती : स्वारी.. काय करु मी आता..
तो : वाचली असेल का घरी कोणी आता ?
ती : मी टिव्ही समोर ठेवली होती.. आई आली असेल घरी..
तो : ओह.. बरं ठीक आहे मी बोलतो तिच्याशी.. ती मार्ग काढेल.
ती : ठीक आहे मी वाट पाहते आहे तुझी...

**

तो : आपण आताच्या आता मनालीला जातो आहोत..
ती : काय ?
तो : हो..
ती : बरं...कोण कोण ?
तो : ती, तीची फॅमिली व आपण दोघे. गाडी घेऊन.. तीची.
ती : बरं. कुठे भेटू ?
तो : मी तुला भेटतो, एक तासात. मॉल समोर उभी रहा.

**

ती : तु ड्राईव्ह कर ना थोडा वेळ ती दमली आहे..
तो : हो, करतो आहे थांबू थोडावेळाने पुढे तेव्हा मी करेन..
ती : तु गाडी पुढील धाब्यावर थांबव गं...पुढील आठवड्यात आपलं लग्न होईल..
तो : ह्म्म्म... होईल १००% होईल..
ती : तुम्ही का हसताय.. बघ ना रे.... कसे हसत आहेत ते..
तो : लहान आहेत गं..
ती : अरे... समोर बघ................. गाडी............ डिव्हाडर..

**

धडाधडा... समोर चिता जळत होती..
सगळेच सुन्न असे कसे झाले..
त्याला कोणी सांगायचे ? कसे...
तिच्या आई वडिलांचा आक्रोश पाहिलास...
कोण समजावेल रे त्यांना एकुलती एक...
हो तो पण एकुलता एक... तो पण होता..
वाचला नशीबाने..

**

डॉक्टर म्हणत आहेत वेड लागले आहे..
नाही वाटत यार.. त्याचे डोळे बघ ना..
पण तो एकच शब्द म्हणतो आहे पुन्हा पुन्हा..

तथास्तु !

**

तीने आपले वचन पुर्ण केले....

अजून एक भावुक प्रकरण. अवांतर

1

अजून एक भावुक प्रकरण. अवांतर स्टोरी कुठेतरी जवळच घडल्यासारखी वाटते आहे.


-पुण्याचे पेशवे

>>स्टोरी कुठेतरी जवळच

2

>>स्टोरी कुठेतरी जवळच घडल्यासारखी वाटते आहे.

हास्य

जख्मेवरील काही खपल्या काढणे अवघड असते तर काही जवळ जवळ अशक्य... पण कधी तरी असे काहीतरी घडते की... कळत न कळत एखादी खपली निघते व सुताचा धागा हाती यावा त्याप्रमाणे माणूस ओढत राहतो व खपलीवर खपली निघत राहते.... शेवटी राहते रक्ताचे थारोळे नाहीतर आश्रुचे... हीच कहानी सर्वांची.. बस थोडासा फरक.. शब्दांचा फेरफार...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खरं आहे रे ...

3

जास्त काही बोलत नाही फक्त 'राज्याचा भावना समजतात' हे मान्य करतो.

राज्या लै बेक्कार लिहतो राव, उगाच आता लै अस्वस्थ वाटत राहिल व काही जुने लेख पुन्हा उचकटुन वाचावे वाटतील. Sad
असो.

सुन्न करणारी कथा.....

4

डॉन्याशी सहमत..... आता दिवसभर खुप उदास वाटत राहिल......... Sad

हाय ! मनाला चटका लावून जाणारी

5

हाय !
मनाला चटका लावून जाणारी कथा Sad

चटका....!!

6

सुन्न झालो... वाचन संपल्यानंतर खर्‍या अर्थाने काही वेळ चुपचाप बसून राहिलो... धक्कातंत्र जबरदस्त आहे. इन्ग्लिश मध्ये "स्टार्क रिअ‍ॅलीटी" नावाची अनुभूती असते, तिचाच चटका बसला. माझ्या एका मित्राच्या (रितसर लग्न झालेल्या) धाकट्या बहीणीच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेची आठवण या वाचनाच्या निमित्ताने झाली आणि डोळ्यात पाणी तरारले..... विलक्षण "तथास्तु"


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

"स्टार्क रिअ‍ॅलीटी" ह्यावर

7

"स्टार्क रिअ‍ॅलीटी"

ह्यावर काहीतरी लिहण्याचा खुप दिवसापासून मानस आहे लिहीन लवकरच.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

"स्टार्क रिअ‍ॅलीटी"...

8

शुअर !!! अ‍ॅण्ड व्हेन यू विल डू इट.... इट विल बी अ ट्रीट टु माईंड...!


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

चटका.. राजे बेकार लिहिलंयस

9

चटका.. राजे बेकार लिहिलंयस यार...

सफर

10

माझी सफर (suffer) मधे लिंक लागली असे वाटते.

ईट्स बेटर टु हॅव्ह लव्हड एन्ड लॉस्ट दॅन नेव्हर टु हॅव्ह लव्ह्ड अ‍ॅट ऑल.

लगी आज सावनकी फिर वो

>>ईट्स बेटर टु हॅव्ह लव्हड

11

>>ईट्स बेटर टु हॅव्ह लव्हड एन्ड लॉस्ट दॅन नेव्हर टु हॅव्ह लव्ह्ड अ‍ॅट ऑल.

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ए बाबा, तू नको लिहू बे असल्या

12

ए बाबा, तू नको लिहू बे असल्या प्रेमकथा... Sad
त्यापेक्षा एका रात्रीच्या गोष्टीचे पुढचे भाग टाक..

समजू शकतो

13

हा संवाद लेख वाचून असा प्रसंग ज्याच्यावर येतो तो कोणत्या अवघड मनस्थितीतून जात असेल ह्याची कल्पना येते.

.........

14

.........

तुम्ही लोकांनी चटके लावण्याचा

15

Sad
तुम्ही लोकांनी चटके लावण्याचा कंत्राट घेतलय का रे?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

टू लव्ह ईज ड्युटी टू बी लव्हड

16

टू लव्ह ईज ड्युटी
टू बी लव्हड ईज गिफ्ट

खुप छान लिहिता तुम्ही

17

Sad

खुप छान लिहिता तुम्ही राजे.

आता दिवसभर खुप उदास वाटेल. Sad

:(

18

आता दिवसभर खुप उदास वाटेल. Sad

भिडला लेख काळजाला.....!!!

19

भिडला लेख काळजाला.....!!!


मी इथेही असतो -- साधं-सरळ

खुप सुन्न करुन सोडणार...

20

काळजाला भिडणार असं लिखाण्...स्वानूभवावर आधारित असल्याने डोळ्यात अश्रु आलेत. "माझी सफर" मधल्या एका भागातला हा स्वानुभव खुप रडवतो....बाहेर ये त्यातून !!!!


दिप्ती जोशी