शुद्ध भाषा....शुद्ध अर्थ

1
0

आपण जेंव्हा एखाद्याला शुद्धा शब्द वापर असे म्हणतो तेंव्हा त्याने त्याभाषेतला मूळ शब्द शब्द वापरावा अशी अपेक्षा असते.
पण त्या भाषेतले असे किती शब्द मूळ त्या भाषेतले असतात हो?
आपण मराठीच बोल असे म्हणताना किती शब्द मूळ भाषेतले वापरतो?
कोणतिही भाषा संपन्न होते ती इतर भाषांमधील शब्द स्वतः मध्ये सामावून घेऊन. अन्यथा इतर भाषेतले शब्द सामावून न घेता निव्वळ शुद्धतेचा आग्रह धरणे हे त्या भाषेच्या र्‍हासास कारणीभूत होते.
कदाचित मराठीत जर शब्द उपलब्ध असेल तर परकीय भाषेतला शब्द वापरला जाऊ नये अशी अपेक्षा असते....त्यात काही गैर नाही पण...... नवे शब्द रुळवायला करणे आपण सहसा टाळतच असतो. त्या ऐवजी अवघड असे संस्कॄत शब्द वापरायला जातो.
काही शब्दाना आपल्या भाषेत शब्दच नाहीत यावर आपला विष्वासच नसतो.
उदा: योगदान हा शब्द हिंदीतून आलेला आहे त्याला चपखल बसेल असा मराठी शब्दच नाहिय्ये
इंग्रजी ही भाषा ही संपन्न मानली जाते त्याचे कारण बहुधा त्या भाषेत आलेले इतर भाषीक शब्द. पक्का /चपाती हे शब्द इंग्रजीत सहज येतात. आपण अजूनी पोळी की चपाती हे चर्चा करत बसतो
हिंदीत सुद्धा इंग्रजी/परभाषीक शब्द सहज सामावले जातात. उदा : तकनीक ( टेक्नीक) त्रासदी( ट्रॅजडी) वगैरे...
मराठीतही असे शब्द आहेत. आणि त्या शब्दांच्या जोडीने आलेले मूळ भाषेत नसलेले शब्द सर्रास आपण मराठी म्हणून वापरत असतो. उदा पास हा तद्दन शब्द आपण मराठीत समाविष्ठ करून घेतलाय त्याच्या जोडीने निव्वळ मराठीच असलेला शब्द म्हणजे नापास..... पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला मानायचा?
रेल्वे. रूळ्. हे शब्द कोणी काही म्हणो आता इथलेच झालेत.
काही शब्द जसेच्या तसे इकडे आले तर काही चक्क एकदम टोकाचे विरुद्ध अर्थ घेऊन आलेत.
विलायत याचा मूळ अफगाणी अर्थ स्वदेश /स्वभूमी. तो शब्द अफगाण लोक आपल्या घरी जाऊन येतो या अर्थानेविलायत जा रहा हुं असा वापरायचे आपण त्याचा अर्थ पाश्चात्य देश असा घ्यायला लागलो
गर्व आणि अभिमान हे शब्द मराठीत ज्या अर्थाने वापरतो त्याच्या अगदी उलट अर्थाने ते हिंदीत वापरले जातात. मराठीत गर्वाचे घर खाली असे म्हणतो.... हिंदीत मात्र तो गर्वसे कहो असा होऊन येतो.
कानडी शब्द बंगार हा मराठीत अक्षरशः भंगार होऊन आला. मूळ कानडी शब्दाचा अर्थ सोने असा आहे.
तीच काहिशी गत कुंडी या शब्दाची. मराठी आणि कानडी चा अर्थोअर्थी काहिही संबन्ध नाही.
काही संस्कृत शब्दांचे देखील तसेच आहे.
उदा तिक्त या संस्कॄत शब्दाचा अर्थ कडू चवीचा असा आहे. मराठीत त्या शब्दावरून तिखट हा शब्द आला आहे.
तर कटू या संस्कॄत शब्दाचा अर्थ भेदक/तीक्ष्ण असा आहे उदा कर्णकटू.. मराठीत तो कडू होऊन आला.
मूळ संस्कृतात कडू चवीला कषाय असा शब्द आहे
तुम्हाला माहीत आहेत असे काही शब्द?
असतील तर लिहा ना इथे अम्मळ

उदा: योगदान हा शब्द हिंदीतून

उदा: योगदान हा शब्द हिंदीतून आलेला आहे त्याला चपखल बसेल असा मराठी शब्दच नाहिय्ये
कानडी शब्द बंगार हा मराठीत अक्षरशः भंगार होऊन आला. मूळ कानडी शब्दाचा अर्थ सोने असा आहे.

अशा अनेक विधानांमुळे अधिक अभ्यासाची गरज आहे असे वाटून गेले. म्हणून तूर्तास मतप्रदर्शन फाट्यावर मारले आहे.



-पुण्याचे पेशवे

यावरुन आठवले

यावरुन आठवले

मी शिवाजीराजे बोलतोय पाहिला आणी मराठी असल्याचा गर्व बाळगा मधला गर्व शब्द खटकला. अभिमान आणि गर्व मध्ये नक्कीच फरक आहे.

नंतर विचार केला "गर्व से कहो हम हिंदु है" मधला गर्व चा नक्की अर्थ काय आणि तसे असेल तर हींदी मध्ये गर्व म्हणजेच अभिमान का...?

असो दुसरे शब्द वापरावेत जरुर पण अर्थाचा अनर्थ होउ नये इतकी काळजी घ्यावी

चेतन

अशा अनेक विधानांमुळे अधिक

अशा अनेक विधानांमुळे अधिक अभ्यासाची गरज आहे असे वाटून गेले
नुसते मतप्रदर्शन नको. आपला अभ्यास बराच अधीक असल्यास त्यासाठी अधीकॄत मराठी शब्द सांगावा ही इनन्ती.
चर्चा मुद्द्यास धरून व्हावी .व्यक्तीस धरून होऊ नये ही देखील इनन्ती



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

आपली अंमळ गल्लत होते आहे (तशी

आपली अंमळ गल्लत होते आहे (तशी ती नेहमीच होते). आम्ही अधिक अभ्यासाची गरज आहे असे म्हटले आहे तुमच्या असे म्हटले नाही. सूज्ञ योग्य अर्थ घेऊन वाद घालणार नाहीत असे वाटते. तोच न्याय मतप्रदर्शनाला.
आम्ही त्याला मराठी शब्द सांगितला तर त्याला संस्कृतोत्भव म्हणून फाट्यावर मारले जाईल याची जाणीव आम्हाला आहे.
राहीला शब्द योगदान ह्या शब्दाचा तर तो इकडून तिकडे गेला का तिकडून इकडे आला याला काही पुरावा आहे का? मग आपला हा दावा कोणत्या गोष्टीवर आधारित आहे? आता तळण्याला 'तलना', पिण्याला 'पीना' असे अनेक समानोच्चारी शब्द आहेत; मग तुम्ही ते सर्व शब्द तिकडून इकडे आले असं म्हणणार का?
असो.



-पुण्याचे पेशवे

बर्‍याच भाषेतले

बर्‍याच भाषेतले समानाच्चोरी.....सॉरी समानोच्चारी शब्द या भाषेतून त्या भाषेत अथवा तिकडून इकडे आलेले आहेत..... उदा मातृ... मदर ...भ्रातृ.... ब्रदर
गुजराथी मराठीत देखील तसे काही शब्द तसे आहेत पण अर्थ अगदीच भिन्न आहेत
उदा : चोखा... गुजराथीत तांदूळ आहे. मराठीत तो क्रियापद आहे
योगदान हा शब्द आजच्या इतका आठ दहा वर्षांपूर्वी वापरात नव्हता. ( गर्वसे कहो चे सुद्धा तेच)
मूळ मुद्दा शब्द इकडून तिकडे गेला की तिकडून इकडे आला असा नाहिय्ये.
हे असे शब्द तुम्हाला ठौक असल्यास इथे लिहा हे माझे म्हणणे आहे.
मराठीत आलेले परभाषीक शब्द ( संदर्भः तद्भव्/तत्सम्/देशी या विषयाचा इयत्ता १० च्या अभ्यासात मराठीत व्याकरणात एक धडा होता ) त्याचा थोडासा अभ्यास व्हावा ही देखील इनन्ती. असो
मराठीतून संस्कॄतात गेलेले शब्द असतील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे
अवांतरः इस्पितळ दवाखाना
बाकी "फाटा" हा तद्दन देशी शुद्ध मराठी शब्द सुचवल्याबद्दल आपले अभिनन्दन
केवळ तुम्ही त्याला मराठी शब्द सांगितला तर त्याला संस्कृतोत्भव म्हणून फाट्यावर मारले जाईल असा अपसमज कशाला बाळागता. एवढी मिरास इथले लोक दाखवणार नाहीत



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

मराठीत आलेले परभाषीक शब्द (

मराठीत आलेले परभाषीक शब्द ( संदर्भः तद्भव्/तत्सम्/देशी या विषयाचा इयत्ता १० च्या अभ्यासात मराठीत व्याकरणात एक धडा होता ) त्याचा थोडासा अभ्यास व्हावा ही देखील इनन्ती.
कदाचित जुन्या कालात तसले धडे असतील पाठ्यपुस्तकात आमच्या वेळेला नव्हता.

योगदान हा शब्द आजच्या इतका आठ दहा वर्षांपूर्वी वापरात नव्हता. असहमत. आमच्या पहीलीच्या पुस्तकात जोतिबा फुल्यांवरच्या धड्यात सदर शब्द होता. व ही घटना १४हून अधिक वर्षापूर्वीची आहे.

बर्‍याच भाषेतले समानाच्चोरी.....सॉरी समानोच्चारी शब्द या भाषेतून त्या भाषेत अथवा तिकडून इकडे आलेले आहेत..... उदा मातृ... मदर ...भ्रातृ.... ब्रदर असो नेहेमीप्रमाणे उदाहरणावरून कॉन्टेक्स्ट कळलेले नाही हे सिद्ध होत आहे. आमचे उदाहरण भारतीय क्रियापदांबद्दल होते.
मूळ मुद्दा शब्द इकडून तिकडे गेला की तिकडून इकडे आला असा नाहिय्ये.

तुमचा रोख तसाच आहे हे स्पष्ट. तुम्ही म्हणता शुद्ध शब्द म्हणजे एतद्देशीय या भाषेतले शब्द. पण ते तरी आपले कुठे आहेत. वगैरे वगैरे.....

केवळ तुम्ही त्याला मराठी शब्द सांगितला तर त्याला संस्कृतोत्भव म्हणून फाट्यावर मारले जाईल असा

केवळ एका विशिष्ठ भावनेतून संस्कृताचा द्वेष करणे सर्वथा अनावश्यक आहे. अन्यथा फाट्यावर मारणे योग्य ठिकाणी लागू करतोच.

अपसमज कशाला बाळागता. एवढी मिरास इथले लोक दाखवणार नाहीत
हो सगळेच काही काजुखाऊ नसतात.



-पुण्याचे पेशवे

अम्मळ हा शब्द शुद्ध एत्तदेशीय

अम्मळ हा शब्द शुद्ध एत्तदेशीय आहे. प्राकृतात अथवा पाली वाङ्मयात असा शब्द वानगीदाखल आल्याचा दाखला नाहिय्ये.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अंशतः सहमत. मूळ शब्द अंबळ,

अंशतः सहमत. मूळ शब्द अंबळ, अमळ, अमळसा असा आहे. परंतु या शब्दाचे वरील रुप एका सुप्रसिद्ध संस्थळाच्या मालकांमुळे प्रचलित झालं.
बाकी कोणत्या प्राकृतात नाहीये असे आपण म्हणता आहात. मागधी का महाराष्ट्री?



-पुण्याचे पेशवे

अर्धमागधीवाचा कण्णकाची

अर्धमागधी
कण्णकाची खट्टतुलीका याचा अभ्यास असेलच wink
अवांतर : म्हाईंभटाच्या प्राकॄत मराठीतले बरेचसे शब्द अस्तंगत( लोप) पावले आहेत



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अर्धमागधी कण्णकाची खट्टतुलीका

अर्धमागधी
कण्णकाची खट्टतुलीका याचा अभ्यास असेलच

नाही आमचा नाही तरी तुम्ही कोण कोणते ग्रंथ वानगीदाखल तपासलेत याची जंत्री मिळेल का?
आपलाही पैशाची, मागधी, शौरसेनी, महाराष्ट्री पाकृतांचा अभ्यास असेल असे वाटते. आमचा तो ही नाही. बाकी महाराष्ट्री प्राकृतातले फारसे ग्रंथकर्तृत्व आज उपलब्ध नाही हे आपणास ठाऊक असेलच. म्हणजे त्यातीलही बरेचसे शब्द लोप पावले आहेत हे ही आपणास माहीत असेल. परंतु साष्टीतील शक ११०९ मधील शिलालेखाप्रमाणे "झ*जे" मधील क्रियापद अजूनही त्याच अर्थाने वापरात आहे.



-पुण्याचे पेशवे

भाषेवरील प्रेमासाठीच....!

"....... कोणतिही भाषा संपन्न होते ती इतर भाषांमधील शब्द स्वतः मध्ये सामावून घेऊन....."
फार मौलिक विचार आहे हा ! निव्वळ भाषेवरील प्रेमासाठीच नव्हे तर दुभंगलेली मने सांधण्याचे देखील बहुमोल कार्य भाषा करीत असते, ते देखील इतर भाषांमधील शब्द स्वत:मध्ये सामावून घेऊन. "हा शब्द हिंदीमधून आला आणि आपल्या बोडक्यावर कायमचाच बसला"..... "तो शब्द आपण विनाकारण इंग्रजीमधून उचलला आणि आमच्या पोरांचे नुकसान केले !" काय अर्थ आहे अशा प्रकारच्या कडवटपणाला? "शुक्रिया" आला असेल हिंदी मधून....पण त्यामुळे मराठी कसे काय अपंग होते? आजदेखील फोनवरून बोलताना प्रत्येकजण "हॅल्लो"च म्हणता असतो, इतका तो रुळला आहे. "हेल्लो" खटकत नाही, "बाय" नाही, "ओके" नाही, "थँक्स" तर नाहीच नाही...!

मुलगी म्हणते, "आई, आता लगेच मी आता कॉम्प्युटरच्या क्लासला जाणार आहे गं", हे त्या आज तारखेअखेर कॉम्प्युटर न पाहिलेल्या आईला चटकन कळते, पण "आई मी आता संगणकाच्या शिकवणी वर्गाला जाणार आहे ग !" हे किती आयांना समजेल ? हीच गोष्ट "दादा, ती सांगावची एसटी डेपूत आली की मला जरा हात करा बरं का भाऊ".... या विनंतीवर थोड्या वेळाने जर त्या इसमाला आपण "सांगाव गावी जाणारे राज्य मार्ग परिवहन मंडळाचे वाहन थांब्यावर आले" असे कदापीही सांगू शकणार नाही, इतके या मातीत "एस्टी" हे नाम रुळले आहे. तीच गोष्ट टेबल, पोस्ट, सायकल, रिक्षा, टॅक्सी, (आजही या तीन वाहनांना चपखल पर्यायी मराठी शब्द शासनाच्या भाषा विकास मंडळाकडे नाहीत.)

या ना त्या निमित्ताने माझा शासकीय कार्यालयांशी वारंवार संपर्क/संबध येत असतो. काही वेळा तेथील "रावसाहेब, भाऊसाहेब" आदी मंडळींची "फाईल" पुढे सरकवण्यासाठी मनधरणी करावी लागते (कुठल्याप्रकारे ? ते सांगण्याचे इथे प्रयोजन नाही). आता या "फाईल" ला पर्याही मराठी शब्द काय असावा? काही नाही, ("प्रकरण" होत नाही....) त्या क्लार्कला मी नेहमी असेच विचारतो "अहो देसाई फाईल पुढे गेली कि नाही अजून?" इथे जर मी "प्रकरण" शब्द वापरला तर "देसाई विरुद्ध मी लाचलुचपतीची कारवाई करीत आहे" असा अर्थ निघतो. शासन दरबारी फाईल आणि प्रकरण यातील हा सूक्ष्म फरक आहे. वरिष्ठ अधिका-याची सही होणे लांबणार असेल तर कित्येकवेळा वेळ जाईपर्यंत मी तेथील "सर्क्युलर्स" (याला खास शासकीय भाषेत "परिपत्रके" म्हणतात.... मला "परी" माहित होती, पण तिला "पत्रके" नावाची अपत्ये असतात ते शासनाचा "व्यवहार कोश" पाहिल्यानंतर लक्षात आले.) वाचीत बसतो. मजा येते "भाषेची" उलाढाल वाचताना. त्यातील काही मासलेवाईक (चांगला शब्द सापडला, ब-याच दिवसांनी वापरण्याची संधी मिळाली....) काही उदाहरणे :
१. विद्येकनिष्ठ
२. वज्रसम
३. परीसाहायक
४. अभ्यावेक्षण
५. अनुघाती
६. सम्पत
७. पेशन प्रस्तर
८. पश्चप्रवासी

किती वाचकांना वरील "मराठी" शब्द समजतील? फार कमी. त्यामुळेच मूळ लेखात लेखकाने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे.



~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

आता या "फाईल" ला पर्याही

आता या "फाईल" ला पर्याही मराठी शब्द काय असावा? काही नाही,

फाईल ला मराठी शब्द धारणी (धारीणी ? ) असा आहे

(विषय दिलेला नाही)

हास्य

म्हण

नाना एक म्हण आठवली, शायरीबद्दल आहे पण एकुणच व्याप्ती मोठी केली तरी चालेल.
दोन गोष्टी कवितेला मारक आहेत, अनधिकारी व्यक्तीची दाद आणि जाणकाराचे मौन.
काय म्हणता?

भडभुंजा........ हा शुद्ध देशी

भडभुंजा........ हा शुद्ध देशी शब्द पुरातन वाङ्मयात सापडतो. फुटाणे लाह्या वगैरे भाजणारा तो भडभुंजा
पण तो व्यवसायवाचक आहे. खरडवहीत तो उचकपाचक करणारा या अर्थाने
मि म वरही सापडतो



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

जसे भड्भुंजे लाह्या भाजतात

जसे भड्भुंजे लाह्या भाजतात तैसे...अस काहीस अर्ध वाक्य भाउसाहेबांच्या बखरीत वाचल्याच आठवतय कधीतरी



पुष्करिणी

तो उल्लेख भाऊसाहेबांच्या

तो उल्लेख भाऊसाहेबांच्या बखरीत नाही.. गोडसे भटजींच्या प्रवास वर्णनात आहे.
भडहुंजाने लाह्या भाजाव्या तशा तोफांच्या फैरी झडत होत्या
हे वर्णन आहे १८५७ मधले कानपूर शहरातील लढाईचे.
अवांतर : फायर.... चे मराठीकरण फैर असे झालेले आहे. फैर हा शब्द कानाला खटकत नाही.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

फैर हा शब्द 'राउंड'(राऊंड ऑफ

फैर हा शब्द 'राउंड'(राऊंड ऑफ बुलेट्स) या शब्दाला समानार्थी वापरला जातो.. फायर कुठून आला???

सहमत. मॅगेझीन हा गोळ्या

सहमत. मॅगेझीन हा गोळ्या साठवण्यासाठीच्या उपकरणाला असलेला शब्द मागझन या शब्दावरुन आला आहे असे ऐकले आहे. मागझन म्हण्जे दारुगोळ्याचे कोठार. कोकणातल्या मागझनला असे नाव तिथल्या दारूगोळ्याच्या कोठारामुळे मिळाले एवढे मात्र नक्की. बाकी मॅगेझिन च्या व्युत्पत्तीबाबत वाचायला आवडेल.



-पुण्याचे पेशवे

मॅगेझिन हा शब्द makhazin या

मॅगेझिन हा शब्द makhazin या अरेबिक शब्दावरून आला आहे. याचा शब्दशः अर्थ होतो warehouse.

ग्रेट मी हाच शब्द शोधत

ग्रेट मी हाच शब्द शोधत होतो... wink

* असे लिहले की आपण पण विचारवंत आहोत असे दाखवता येतं..



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

गोडसे भट्जींच्या प्रवासात ही

गोडसे भट्जींच्या प्रवासात ही असेल पण मी वाचलेल पानिपताशी संबंधित होत्...



पुष्करिणी

बरोबर आहे तुमचे. पण विजुभाउ

बरोबर आहे तुमचे. पण विजुभाउ विचारवंत असल्याने त्यांचा इतिहास राणीच्या जाहिरनाम्यापासुन सुरु होतो. असो.

.

.



-पुण्याचे पेशवे

हाणा हाणा ..........

हाणा हाणा ..........



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

लाह्या ,फुटाणे आणि

तत्सम पदार्थ भट्टेवर भाजणारे जे बनीये असतात त्यांना भोज वाणी असे उत्तरप्रदेशात म्हणतात. कदाचीत भडभुंजा या शब्दाचा संबंध त्याच्याशी असावा.आपण ज्याला कुरमुरे म्हणतो त्याला ते भुजा म्हणतात.

मम्मी.....मूऴ शब्द मॉमी(

मम्मी.....मूऴ शब्द मॉमी( इंग्रजीतूनही हा शब्द आता हद्दपार झालाय).....मूळ अर्थ्...गोर्‍या मुलांचा सांभाळ करणारी काळी आया.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

पार हद्द झाली; कठीण

पार हद्द झाली; कठीण आहे.

ब्रिटीश लोकं मम (Mum) म्हणतात आणि अमेरीकन मॉम (Mom) ... मम्मी आणि मॉमी कुठून आलं कोण जाणे!

'मॉम' असं वर्किंग क्लास

'मॉम' असं वर्किंग क्लास ब्रिटीश लोकं म्हणायची ( आता सगळेच म्हणतात ) पण ( तथाकथित )जुनी पॉश लोकं ममी ( किंवा मम्मी ) अस म्हणतात,
( प्रिन्स चार्ल्स राणीच्या उपस्तिथीतील भाषणात जर राणीला उद्देशून काही व्यक्तिगत असेल ( वाढदिवसाच्या शुभेच्छा इ.) तर तो ममी म्हणतो )



पुष्करिणी

'मॉम' मधला (बंगाल्यांसारखा) ऑ

'मॉम' मधला (बंगाल्यांसारखा) ऑ असेल तर तो दक्षिणेलाच ... उत्तरेला मी इंग्रजांच्या तोंडून 'मम' ऐकलं आहे.

मी दोन्हीकडे दोन्हीही

मी दोन्हीकडे दोन्हीही ऐकलय...थोडसं अजून वर गेल तर मॅम पण म्हणतात.



पुष्करिणी

थोडसं अजून वर गेल तर मॅम पण

थोडसं अजून वर गेल तर मॅम पण म्हणतात

वर म्हणजे स्वर्गात का‍ ? आमच्याकडे 'वर गेला' म्हणजे स्वर्गात गेला असं म्हणतात...

मी स्वर्गात जाण्याबद्द्ल

मी स्वर्गात जाण्याबद्द्ल इतक्या खात्रीशीर पणे नाही बोलू शकत म्हणून वर म्हणजे फक्त उत्तर दिशा ...तुम्हांला कस कळत की स्वर्गातच जाणार म्हणून हास्य ....?



पुष्करिणी

ऑ.......... कैच्या कैच मॉम

ऑ.......... कैच्या कैच
मॉम म्हणजे Message-oriented middleware
आणि Mum म्हणजे चुप बसणे असे अर्थ मी शिकलो होतो.
असो......



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

हे कैच्याकैच ब्रिटीश किंवा

हे कैच्याकैच ब्रिटीश किंवा अमेरिकन लोकांना सांगा ... तुम्ही इंग्लिश पिक्चर पहात नाही का?

असो. आई म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर असं मी शिकले आहे त्याचं काय ते सांग आधी!

कविवर्य शंकर रामाणी....

या संदर्भात कविवर्य शंकर रामाणी आपल्या कवितेच्या माध्यमातून करीत असलेल्या प्रयोगाची दखल घेतल्यास त्यांनी वापरलेल्या प्रतिमा तसेच सामासिक शब्द (सहजगत्या तयार झालेले...) पाहिल्यास, अनुभवल्यास ते अतिशय चमकदार, आकर्षक वाटतात. त्यांच्या "पालाण" (मौज प्रकाशन मुंबई) या काव्य संग्रहातील काही अनोखे शब्द जे भाषा प्रयोगासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
१. पालाणिल्या
२. उजवाडचे उठले थवे
३. मेटीला
४. माघमाहुरे
५. अरळ
६. अवसआंधळे



~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

इस्कि, शब्दांचे साधारण अर्थ

इस्कि,
शब्दांचे साधारण अर्थ पण द्यावेत. शब्द जरा बोलीभाषेतले वाटत आहेत. म्हणजे काही काही बोलींमधे वेगवेगळे शब्द छान असतात पण तितकेसे पटकन कळत नाहीत. जसे गोव्याच्या कोकणीतले पिसोळे (फुलपाखरू), तर (होडी), तवसं (मोठी काकडी शक्यतो घारग्याची), हुंबले (लाल रंगाचे डोंगळे).



-पुण्याचे पेशवे

शब्दांचे साधारण अर्थ......!

नक्कीच.... किंबहुना असे शब्द इथे देण्याचे ते प्रयोजन तर आहेच, पण माझा उद्देश या निमित्ताने अन्य सदस्यांनादेखील अशा प्रकारचे जगावेगळे, पण भाषेला संपन्न करणारे शब्द शोधायाला प्रोत्साहीत करावे.

प्रथम वरील शासकीय व्यवहार कोशाचा उलगडा >>
१. विद्येकनिष्ठ (academician)
२. वज्रसम (adamant)
३. परिसहायक (ADC)
४. अभ्यावेक्षण (censorship)
५. अनुघटी (clockwise)
६. संपत (coincidence)
७. पेशन प्रस्तर (Grinding stone)
८. पश्च प्रवासी (pillion passenger)

(शंकर रामाणी.... या पाठोपाठ आहेतच...)



~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

वा! छान आहेत. वज्रसम शब्द फार

वा! छान आहेत.
वज्रसम शब्द फार आवडला. विद्येकनिष्ठ (academician),परिसहायक (ADC),पश्च प्रवासी (pillion passenger) यातले दोन्ही सारखेच अपरिचीत आहेत. परिसहायक माहीत होता. अभ्यावेक्षण थोडा जड आहे.
संपत साठि परिचीत शब्द योगायोग जरा जास्त चांगला वाटतो. अनुघटी पेक्षा घड्याळ्याच्या दिशेने चांगला वाटेल.
धन्यवाद इस्कि.



-पुण्याचे पेशवे

शरदिनी तैंच्या कवितेतले शब्द

शरदिनी तैंच्या कवितेतले शब्द वाटतात जसे.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अरे वा पेशवे

अरे वा पेशवे साहेब्..........सर्वप्रथम आपले अभिनन्दन.. प्रथमच चर्चेला धरून केलेल्या विधानामुळे बरे वाटले



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

"....... कोणतिही भाषा संपन्न

"....... कोणतिही भाषा संपन्न होते ती इतर भाषांमधील शब्द स्वतः मध्ये सामावून घेऊन....."
फार मौलिक विचार आहे हा ! निव्वळ भाषेवरील प्रेमासाठीच नव्हे तर दुभंगलेली मने सांधण्याचे देखील बहुमोल कार्य भाषा करीत असते, ते देखील इतर भाषांमधील शब्द स्वत:मध्ये सामावून घेऊन.

सहमत नाही. भाषेमधे पराकीय शब्द वापरण्याची कारणे अनेक असु शकतात 'जेत्यान्चे अन्धानुकरण'हे एक महत्वाचे कारण.

स्वभाषेमध्ये शब्द असताना परकीय शब्द घेउन भाषा संपन्न होते असे म्हणणे हे स्वतःची मुले मारुन, बाहेरची दत्तक घेतल्याने संपन्नता येते असे म्हणण्यासारखे आहे. (ईतर मुद्द्यांवर सवडीने )

>>स्वभाषेमध्ये शब्द असताना

>>स्वभाषेमध्ये शब्द असताना परकीय शब्द घेउन भाषा संपन्न होते असे म्हणणे हे स्वतःची मुले मारुन, बाहेरची दत्तक घेतल्याने संपन्नता येते असे म्हणण्यासारखे आहे. (ईतर मुद्द्यांवर सवडीने )

अल्पसा असहमत.
कारण जर एखाद्या वस्तूला आपल्याकडे शब्दच नसेल तर ???
उगाच अट्टाहास करुन विचित्र शब्द तयार करण्यात काय हाशील ???



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अल्पसा असहमत. कारण जर एखाद्या

अल्पसा असहमत.
कारण जर एखाद्या वस्तूला आपल्याकडे शब्दच नसेल तर ???
उगाच अट्टाहास करुन विचित्र शब्द तयार करण्यात काय हाशील ???

संपूर्ण सहमत... एखाद्या वस्तूला शब्द उपल्ब्ध नसेल तर नक्कीच परकीय शब्द वापरावा. पण शब्द उपलब्ध असताना (केवळ माहीति नाहि / प्रचलित नाहि म्हणुन/) वापरू नये. आणि उगाच विचित्र शब्द तयार तर करूच नयेत.
पण बहुतेक वेळेला शब्द प्रचलीत नाहीत म्हणुनही विचित्र वाटतात..

उत्तम चर्चा.

उत्तम चर्चा.

विजूचे सगळे चुकीचे

विजू आजवर उगीच इकडले तिकडले निवडतोय. त्याचे चुकिचे बिघडवले, की उगाच दुसरीकडले दाघवडले की चुकीचे सांगतोय.

विंदू हा तात्या, हे नक्कीच.

*संपादित*

उत्तम चर्चा

नक्कीच उत्तम चर्चा.



नचिकेत

नाभीक या शब्दाची फोड राम

नाभीक या शब्दाची फोड राम नगरकरानी जो भीक मागत नाही तो नाभीक अशी केली आहे



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते