खरे तर साहित्य हे सामान्यपणे कोण्या एकाच्या कह्यात येईल असा विषय नाही. मिपासारखया संकेतस्थळावर तेव्हा माझा नुकताच जन्म झालेला. थोडीफार वाचनाची जिज्ञासा जागृत झालेली. अशातच अक्षरधाराच्या प्रदर्शनात जाण्याचा योग आला. अपघातानंच महाराष्ट्र सारस्वत हाती लागलं. अर्थातच संशोधकी पुस्तक म्हणून दुर्लक्षयुक्त चाळणं सुरु केलं. आणि जे मधलं पान हाती आलं त्यात एकदम अद्भुत गोष्ट हाती लागली. ती म्हणजे शाक्तांच्या असलेल्या विचित्र मंत्रांच जर सकळी किंवा सुंदरी मधून बालबोध (देवनागरीत) लिप्यंतर केले तर त्या मंत्रांचा सरळ अर्थ "हे देवी अमुक गोष्ट मला दे." प्रकरण एकदम सुरस वाटू लागले. म्हटलं घ्यावं. केवळ १५० रु २ खंड तेही सवलतीत १२० रु. म्हटलं हे तर सोन्याहूनही पिवळं झालं.
जसं घरी येऊन हे पुस्तक वाचू लागलो तसं तसं पुस्तक अधिक चित्तवेधक वाटू लागलं. शं गो तुळपुळे यांनी वि ल भाव्यांच्या परिचयात लिहीलेलं सदर एकदम भारावलं करुन गेलं. भावे हे मूळातच शाळेची आवड नसली तरी वाचनाची प्रचंड आवड असलेलें व्यक्तिमत्व. लहानपणातच औत्सुक्यापोटी अनेक ग्रंथ पोथ्या वाचून काढल्या. पुढे जाऊन मिठाचा यशस्वी धंदा करणारे वि ल भावे हे साहित्यप्रेमाची आवड जोपासता यावी या साठी धंदा बंद करणारे एक मनस्वी व्यक्ती होते हे कळाले.
यांनी (वि ल भाव्यांनी) १८९८-९९ मधे गोविंदराव विजापूरकरांच्या 'ग्रंथमाला' या मासिकातील लेखापासून 'महाराष्ट्र सारस्वत' या ग्रंथाची प्रेरणा अथवा सुरुवात झाली. आणि कालांतराने महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाची निर्मिती झाली. पुढे शं गो तुळपुळे यांनी याच ग्रंथाची पुरवणी म्हणून जोड ग्रंथ अथवा खंड २ प्रकाशित केला. यात विलंचे अप्रकाशीत संशोधन + शंगोंचे संशोधन अशा २न्ही गोष्टी समाविष्ट आहेत.
विल सुरुवात करतात ते महाराष्ट्र या नावाने ओळखल्या जाणार्या देशापासून. त्यात अनेकविध कविंनी दिलेल्या व्याख्यांपासून सध्याची चांद्यापासून बांद्यापर्यंत. त्यानुसार महाराष्ट्रात याचे वानगीदाखल कुठे कुठे शिलालेख मिळत गेले याचे विवेचन मिळते. अनेकविध प्रागैतिहासिक, ऐतिहासिक संकल्पनांचा विचार केलेला दिसतो. व त्यातून त्यांनी प्रतिपादिलेली मतेही वाचनीय आहेत.
मग एकूण महाराष्ट्राचा वांशिक इतिहास. महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती, महाराष्ट्री या नावाने संस्कॄतापासून जन्मलेली प्राकृत भाषा. नंतर तिचे झालेले मराठी असे रुपांतरण याबद्द्ल माहीती मिळते. महाराष्ट्री या संस्कॄत जवळ्च्या प्राकृतातले ग्रंथ आज उपलब्ध नाहीत अन्यथा अभ्यासास अजून एक नवीन एक पैलू मिळाला असता असे विल नमूद करतात. मग येणारे चातुर्वण्य यासंबंधाने येणारे चिंतनही वाचनीय आहे.
यानंतर ओघानेच येतो तो म्हणजे "श्रीचावुण्डराये करवियले" वाला श्रवणबेळगोळचा शिलालेख. साष्टीजवळचा शक ११०९ मधील "तेहाची माय गाढवे झ*जे" वाला शिलालेख. एक येवढे जुने क्रियापद अजून वापरात आहे हे वाचून गंमत वाटते. असो. तर अशा अनेक शिलालेखांचा मागोवा घेतला आहे. तेव्हाची लेखन कष्ट वाचवण्यासाठीची पृष्ठमात्रेची पद्धत इ. बारकावे समजतात. लेखकाच्या मते ही मराठी साहित्यनिर्मीतीची सुरुवात. मग ज्ञानेश्वर अथवा मुकुंदराज यांच्या आधी कोणी उत्तम ग्रंथकार आधी निर्माण झाला नाही याचा समाचार विल पुरव्यानिशि घेतात. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट एकदम उच्चपदाला पोचत नसते. त्याची सुरुवात अतिसामान्य, सामान्य, असामान्य अशीच होत असते म्हणूनच जेव्हा ज्ञानेश्वर आणि मुकुंदराजांचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याच क्षमतेचे आणि लायकीचे ग्रंथकार त्याआधी मराठीत होऊन गेले हे मान्य केले पाहीजे असे विल म्हणतात आणि वानगीदाखल २-३ पुरावेही सादर करतात. हळूहळू विल महानुभाव या एका समृद्ध पंथाकडे वळतात. या पंथाच्या उगमापासून ते त्याच्या लौकिकार्थाने लुप्त आणि सुप्त मार्गाने होणार्या प्रसाराबद्दल माहीती आणि कारणमिमांसा येते. यातच महानुभावांच्या अलौकिक ग्रंथकर्तृत्वावर विल प्रकाश टाकतात. नंतरच्या काळात सुप्तमार्गानं पंथाचा प्रसार करण्यासठी महानुभावांनी केलेला वेगवेगळ्या सांकेतिक लिपींचा प्रयोग. व त्यासंदर्भातच पहिल्या परिच्छेदातील वाक्यं येते. विलंनी सांकेतिक लिपी आणि बालबोध लिपी यांचा पूर्ण तक्ताच तिथे दिला आहे. मग महानुभाव पंथाच्या अनेक ग्रंथकारांचा मागोवा घेऊन विल समकालीन अमहानुभवीय लेखकांकडे वळतात.
त्यातच हेमाडपंतानं प्रचलित केलेल्या 'मोडी लिपी'चा उल्लेख येतो. व त्यामुळे झालेले फायदे वाचलेले लेखनकष्ट याचा उल्लेख येतो. त्याच काळात लिहील्यागेलेल्या व्यावहारीक लेखन नियमांचा उल्लेख येतो.
मग विल ज्ञानेश्वर आणि भावंडाच्या रचनांचा मागोवा घेतात. त्यात ज्ञानेश्वरांनी अनेक तत्वज्ञान प्रणालींचा उहापोह करुन मग स्वीकारलेली नाथपंथाची वाट यावर चिंतन येते. त्यानंतर समकालीन संत नामदेव, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखोबा, सेना न्हावी इ. च्या रचनांचा सविस्तर परामर्ष विल घेतात. नामदेवांची वाल्या कोळ्याशी साधर्म्य असणारी कथा आणि त्याला त्यांची पत्नी आणि उत्तम ओवी, अभंगरचनाकार राजाई यांच्या ओव्यां आणि अभंगांमधून मिळणारा दुजोरा विल नजरेस आणून देतात. संपूर्ण कुलच कवि असणार्या या नामदेवांच्या कुळातील इतर कविंचाही परामर्ष विल घेतात.
मग याच मार्गाने गाडी एकनाथ १४, १५, १६ या शतकातील अन्य परिचीट आणि असंख्य अपरीचीत कविंची आणि त्यांच्या रचनेची माहीती विल देतात. सरतेशेवटी पेशवाईत बहरास आलेल्या लावण्याकार शाहीर, छंदकवि इ मागोवा घेऊन मग विल तेवढ्याच ताकदीने पुस्तकाचा उपसंहार लिहीतात. त्यातुन विलंची स्वत:ची लेखन प्रतिभाही प्रकट होते.
विविध ग्रंथकारांनी केलेले विपुल रसाळ लेखन वाचून हरपून जायला होते. तसेच या ग्रंथांच्या पोथ्या करून, त्यांच्या नकला करून त्या जपणारे तेव्हाचे लोक आणि त्या सर्वांचा आताच्या काळात संग्रह आणि अभ्यास करणारे विलंसारखे लोक पाहीले की अक्षरशः भारावून जायला होते. अशा बुद्धी-शास्त्र संपन्न महाराष्ट्रात आपला जन्म झाला याबद्द्ल अभिमानानं आणि कृतज्ञतेनं कंठ दाटून येतो.
प्रत्येके मराठी ग्रंथप्रेमीने आणि काव्यप्रेमीनं आवर्जून वाचावं असं हे पुस्तक.
फार छान ओळख
त्यांच्या मते कोणतीही गोष्ट एकदम उच्चपदाला पोचत नसते. त्याची सुरुवात अतिसामान्य, सामान्य, असामान्य अशीच होत असते म्हणूनच जेव्हा ज्ञानेश्वर आणि मुकुंदराजांचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याच क्षमतेचे आणि लायकीचे ग्रंथकार त्याआधी मराठीत होऊन गेले हे मान्य केले पाहीजे असे विल म्हणतात आणि वानगीदाखल २-३ पुरावेही सादर करतात.
चांगला मुद्दा. ( विषयांतर वाटेल पण डार्वीनचा सिद्धांत आठवला.)
हा हा हा ११०९ मधे लिहले होते हा हा हा..
पुपे फार छान ओळख. पुस्तक वाचले पाहीजे.
असेच म्हणते
लेख भारी आहे.
ओळख करून दिल्याबद्द्ल आभार.
साष्टीजवळचा शक ११०९ मधील "तेहाची माय गाढवे झ*जे" वाला शिलालेख. एक येवढे जुने क्रियापद अजून वापरात आहे हे वाचून गंमत वाटते.
हा शिलालेख आहे का एन्शन्ट ग्राफिती?!
हसून हसून वाट लागली
>>. साष्टीजवळचा शक ११०९ मधील
>>. साष्टीजवळचा शक ११०९ मधील "तेहाची माय गाढवे झ*जे" वाला शिलालेख
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उत्तम परिचय. काही मतांबद्दल
उत्तम परिचय.
काही मतांबद्दल दुमत असले तरी वाचलाच पाहिजे असा ग्रंथ !!
पुप्याच्या कृपेने हा ग्रंथ
पुप्याच्या कृपेने हा ग्रंथ वाचायला मिळाला... दोन्ही खंड. धन्यवाद, पुपे. अतिशय सुंदर आणि मेहनतीने तयार केलेला ग्रंथ.
नाही नाही बिका. कृपा तर
नाही नाही बिका. कृपा तर त्यांची ज्यांनी खपून हा ग्रंथ तयार केला.
-पुण्याचे पेशवे
उत्तम ओळख
पुपे, उत्तम ओळख.
या प्रकारच्या इतर काही प्रकाशनांची ओळख करून द्याल तर उपकृत होऊ. उदा. "पुण्याचे पेशवे" ! माणूस नव्हे, पुस्तक ! (दैनिक नव्हे सैनिक च्या चालीवर)
अतिअवांतर : अस्मादिकाना तुळपुळे-भावेकृत या पुस्तकाची ओळख पटली ती पुलंच्या "गाळीव इतिहासा"मुळे. त्यात या पुस्तकाची यथेच्छ थट्टा केलेली आहे. (अर्थात थट्टा केलेल्यालाही मजा लुटावी अशीच निर्विष थट्टा आहे हेवेसानल !)
आभार
पुपे. चांगली ओळख करून दिली आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
पुपे, उत्तम ओळख.
पुपे, उत्तम ओळख.
उत्तम परिचय
अशा काळाच्या पडद्या आड जाणार्या पुस्तकाचा परिचय करुन दिला हे उत्तम जाहले. सर्व च इतिहासाचे जतन करणे अवघड असते. त्यामुळे काही गालीव व घोटीव इतिहास हा मैलाचा दगड ठरतो.
(वाक्य ज्याने त्याने आपापल्या सोयीने घ्यावे)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.