नृसिंहवाडी

0
0








फोटोज् सुंदर आहेत.. वर्णनाने

1

फोटोज् सुंदर आहेत.. वर्णनाने अजून मजा आली असती राजे!! हास्य

आकाशाचे फोटो मस्त आहेत! मेवे

2

आकाशाचे फोटो मस्त आहेत! मेवे म्हणतो तसं, वर्णनही द्यायला हवं होतत..

फोटो अतिशय सुंदर

3

फोटो अतिशय सुंदर आलेत.....फोटोग्राफी आणि अँगल मसत जमलाय......नृसिंहवाडी माझे अतिशय प्रिय ठिकाण आहे........मी थोडी माहिती लिहीली तर चालेल का ???

वाह

4

फोटो क्रमांक ४ व ५ फार छान!

बाकीचे व त्यातुन शेवटचा फोटो मात्र आवडला नाही. फूल साईझ मधे पाहील्यावर वाटते की ह्या देवस्थानाकडे स्वच्छतेपुरते पैसे जमा होत नाहीत का? खरं तर फोटोत जितका दिसतो आहे तो सगळा परिसर कसा पिक्चर परफेक्ट ठेवला पाहीजे त्या देवस्थानाने.

बघ राजे, फोटो बघताना जे विचार येतात ते लिहले की उगाच गैरसमज व्हायचे चान्सेस जास्त. कोणाला वाटेल धार्मिक चेष्टा, निवासी-अनिवासी, हिरवा माज इ इ पण खर सांगतो, भारतात भरपूर पैसा आहे पण त्याचा योग्य विनिमय होत नाही. बघ म्हणून देखील प्रतिसाद टाळले जात असावेत.

खालचे काही फोटो पहा. खूप काही खर्च नसलेले पण किमान स्वच्छता पाळली जात असलेले ते बघायला डोळ्यांना सुखकारक वाटते आहे की नाही सांगा. पुण्यात ओशो नाला पार्क कोणी पाहीला आहे का?

Dhorla River bank

Public park

Riverside park

ह्या देवस्थानाकडे

5

ह्या देवस्थानाकडे स्वच्छतेपुरते पैसे जमा होत नाहीत का? खरं तर फोटोत जितका दिसतो आहे तो सगळा परिसर कसा पिक्चर परफेक्ट ठेवला पाहीजे त्या देवस्थानाने.

सहमत..!

अवांतरः हे समोर जे कृष्णेचे पात्र दिसतेय, ते देखील गेल्या १० वर्षात प्रचंड घाण झालेय..! अमिताभला म्हणे दारू न पितादेखील रक्तामुळे लिव्हर सिर्‍होसिस झालाय, पण या भागात दारू न पिता, कोणतेही व्यसन न करता केवळ पाण्यामुळे लिव्हर सिर्‍होसिस किंवा यकृताचा कर्करोग झालेले हजारो लोक सापडतील.. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ "पाणी उकळून प्या" याशिवाय काहीही सांगू शकत नाही इतका तिथे भ्रष्टाचार आहे..

दुसरी गोष्ट, हे कृष्णेचे पात्र वहाते नाहीय, थ्यान्क्स टू अलमट्टी धरण, जे कर्नाटकाने आमच्यावर लादलेय..

--सुहास००७

फोटो सुंदर आहेत. वर्णन असत

6

फोटो सुंदर आहेत. हास्य
वर्णन असत तर अजुन छान वाटल असत.

फोटो छानच...

7

फोटो छानच...

हम्म्म.. राजे, पेढे आणले का

8

हम्म्म..

राजे, पेढे आणले का वाडीचे..?

--(अम्मळ नॉस्टाल्जिक) सुहास००७

खल्ले पण...

9

खल्ले पण...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बास्स्स !! पुढचे नको - ||

10

बास्स्स !! पुढचे नको हास्य

- || Laughing out loud ||

(विषय दिलेला नाही)

11

Laughing out loud

निघालो घेऊन दत्ताची पालखी..

12

निघालो घेऊन दत्ताची पालखी.. निघालो घेऊन दत्ताची पालखी.
आम्ही भाग्यवान आनंदनिधान, झुलते हळूच दत्ताची पालखी..

वाट वळणाची जीवाला या ओढी..
दिसते समोर नरसोबाची वाडी...

वाट वळणाची जीवाला या ओढी..
दिसते समोर नरसोबाची वाडी...
झुळूक कोवळी चंदना सारखी....

निघालो घेऊन दत्ताची पालखी..

नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी

13

नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी याची आधी थोडक्यात माहिती देते आणि मग फोटोंबद्दल बोलेन

श्रेष्ठ दत्तावतार श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्याकरिता श्री गाणगापूर क्षेत्र निवडले. भीमा- अमरजा नद्या तसेच या नद्यांच्या संगमाच्या आसपास 2- 3 मैलांचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाले, पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या, यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून तसेच अष्टतीर्थ आणि जागृत देवतांची मंदिरे यामुळे हा प्रदेश परमपवित्र व मंगलकारक झाला आहे.

श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दुसरे दत्तावतार होय. पूर्वाश्रमीचा नरहरी आणि संन्यास आश्रमातील नरसिंह सरस्वती यांचा जन्म इ.स. 1380 मध्ये पौष शुध्द द्वितीयेस शनिवारी मध्यान्हकाळी वल्हाड प्रांतात कारंजे येथे झाला.
चातुर्मासातील आपल्या योगानुष्ठाने ती भूमी पवित्र केली. औदुंबर येथील एकांतवास स्वामींना फारच अनुकूल वाटला. चातुर्मासानंतर स्वामी नरसोबावाडीकडे वळले. जिथे त्यांनी बारा वर्षे वास्तव्य केले. तिथे त्यांनी ज्या पादुका ठेवल्या त्यांना "मनोहर पादुका ' म्हणतात. या कालावधीत त्यांनी एक विशिष्ठ हेतू बाळगला होता. तो असा की, प्रथम भक्तांना सन्मार्गाला लावणे. त्यांची शारीरिक किंवा मानसिक व्यथा कमी किंवा नाहीशी करणे आणि भक्तांत पारमार्थिक जागृती निर्माण करून अद्वैत मार्गाने मोक्षाच्या मार्गाला लावणे.

वर्णन कुठय??? फोटो मस्त!!

14

वर्णन कुठय??? फोटो मस्त!!

राजे -मस्त आवडले सर्व फोटो

15

राजे -मस्त आवडले सर्व फोटो .मीपण मागच्या वर्षी गेलो होतो
फाट्यावर उतरलो नि चालत गेलो. उसाची तोडणी चालू होती एक उस मागून घेतलां
दाताने उसाची सालटी काढत मस्त अंतर कापीत गेलो फार छान वाटले. दर्शन झाले .
नदीकिनारी छान लांबलचक प्लॉटफार्म बांधलाय काही झाडे. त्याला पार. मी बेलाच्या झादाच्या
पारावर बसलो मग मस्त आडवा झालो. बेलाच्या पानापानातून आभाळ बघत बसलो मस्त आनंद मिळाला.
आभार तुमच्या फोटोमुळे आठवण झाली .सारे आठवले. नि धन्य धन्य झालो. !!

छान आलेत फोटो

16

पहीला फोटो बघुन तर त्या पवित्र वास्तुन जाउन आल्याचा आनंद झाला, बाकी सगळे फोटो मस्तच!!!!


दिप्ती जोशी

वाह !!!!!!!!!!!! वर्णन आणि

17

वाह !!!!!!!!!!!!

वर्णन आणि वाडीची थोडी माहिती टाकली असतीत तर अजुन मजा आली असती. हास्य

छान आहे एकदम.. जुन्या आठवणी

18

छान आहे एकदम.. जुन्या आठवणी जाग्या केल्यात. सांगलीच्या. नरसोबावाडीची सायकलवरुन ट्रिप..

लहानपणापासून कोकणात समुद्रात पोहायला शिकून तीच सवय होती. त्यामुळे ओव्हरकॉन्फिडन्स. तशात या वाडीच्या घाटावर नदीत मध्यात खोलात शिरलो आणि नदीच्या प्रवाहाचा असा काही जोर लागलाय म्हणता. कितीही जोरात हात मारुनही वहातच चाललो धारेला लागल्यासारखा. मग शहाणपणा करुन वहून दूर न जाण्याची धडपड थांबवली आणि जमेल तितक्या वेगाने किनारा गाठायचे प्रयत्न चालू ठेवले. मग अर्धाएक मैल पुढे कुठेतरी काठाला लागलो एकदाचा.

नदीत पोहण्याचा पहिला आणि (असा फटका मिळाल्याने धास्ती घेऊन बहुधा..) शेवटचा प्रसंग होता तो.