पुस्तके आम्हां सोयरी..

0
0

मीमवर येणार्‍या बर्‍याच जणांना वाचनाचा छंद आहे असे वाटते. सातत्याने वेगवेगळी पुस्तके वाचणारे बरेच जण इथे आहेत. तेह्वा आपण कोणती पुस्तके वाचली आणि सद्ध्या वाचत आहात, ते एकमेकांना सांगूयात. तुम्ही स्वतः पुस्तकांचा संग्रह करत असाल, तर तुमच्याकडे मराठी व इतर भाषेतील कोणती पुस्तके आहेत तेही सांगा, एखादे पुस्तक खूप आवडले असेल, तर त्याबद्द्लही सांगा - एकाहून जास्त असतील तर ग्रेटच! माहिती शेअर करा लोकहो! हास्य

आणि एखादे अगदीच आवडले नसेल, तद्दन भिक्कार वाटले असेल, तर त्याबद्दलही सांगा!

शेवटी, कोणीसे म्हटलेच आहे ना, वाचाल तर वाचाल! wink

माझ्या यादीतील काही लिहिते

1

माझ्या यादीतील काही लिहिते -

जी.एं ची निवडक पत्रे (खंड १ते ४) - संपादित हातकणंगलेकर, श्री पु भागवत
शोध मर्ढेकरांचा - विजया राजाध्यक्ष
गांधीहत्या आणि मी -गोपाळ गोडसे
बापलेकी -संपादित - पद्मजा फाटक, विद्या विद्वांस, दीपागोवारीकर,
बोरकरांची समग्र कविता (खंड १ व २)
आपल्या आत्म्यांची लुटालूट - अरुण शौरी , अनुवादः सुधा नरवणे

माझी यादी

2

युगांत (इरावती कर्वे ) : महाभारतावर एका संशोधकांनी लेहिलेले म्हून वाचनीय. नुसती कथा म्हून न मांडता वगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीकोनातून महाभात दाखवण्याची पद्धत मला आवडली
समिधा (साधना आमटे )/ प्रकाशवाटा (प्रकाश आमटे ) : आनंदवन आणि आमटे कुटुंबियांच्या परिश्रमाबद्दल खूप माहिती मिळाली
सेवाग्राम ते शोधग्राम (अभय बंग - इ बुक ): अभय बंग व राणी बंग यांचे शोधाग्रमच्या पाठीमागची भूमिका आणि त्याची कहाणी यात कळते
It is not about the byke My journey back to life (lance armstrong) : प्रत्यकाने वाचवा असे हे पुस्तक आहे. लान्सचा गरिबीतून यशस्वी सायकल स्पर्धक बनण्याकडे प्रवास. आणि यशाच्या जवळ असताना कन्सर त्याच्या आयुष्यात आला. मग त्याचे उपचार आणि परत तोच प्रवास. भाषा खूप साधी आहे. पण अनुभव ग्रेट आहे.
बहीणा बाईंची गाणी (बहिणाबाई चौधरी ) - त्यांची गाणी तर आहेतच पण त्यांच्या व्यक्तीमात्वाबद्दल पण खूप चान माहिती मिळाली

two states (चेतन भगत ) : खुसखुशीत पुस्तक आहे

खरेखुरे आयडॉल -
नर्मदे हर हर (जगन्नाथ कुंटे)
एका रानवेड्याची शोधयात्रा (कृष्णमेघ कुंटे)
शारदासंगीत (प्रकाश नारायण संत)


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

आताच अ‍ॅना फ्रँकची डायरी

3

आताच अ‍ॅना फ्रँकची डायरी वाचून झाली... अप्रतिम आहे, प्रत्येकाने वाचावी अशी. त्यानंतर लगेचच 'फॉर हियर ऑर टू गो'पण वाचून झालं. याआठवड्याच्या सुरवातीलाच सलमान रशदीचं "इस्ट अँड वेस्ट" हाती पडलं... म्हणजे गोरा बॉस वाचत होता त्याने दिलं. या पुस्तंकात वेगवेगळ्या कथांचा संग्रह आहे. भाषा कंटाळवाणी वाटली, बरचसं वाचून झाल्यावर कंटाळा आला... म्हणून सोडून दिलं. आता परत मूड चांगला होण्याकरता परत एकदा पुलंचं पुर्वरंग वाचत आहे. कितीही वेळा वाचलं तरी पुलंच लिखाण नेहमीच वाचावसं वाटतं!

-अनामिक

मा़झी यादी सात सक्कं

4

मा़झी यादी

सात सक्कं त्रेचाळीस
माचीवरचा बुधा
झुल
सोन्याचे मडके (अनुवादित)

हरझॉग (अनुवादित)

जैत रे जैत

आणखी बरीच.............


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

खूप दिवसांपासुन ' सोन्याचे

5

खूप दिवसांपासुन ' सोन्याचे मडके ' शोधते आहे. कुठे मिळेल ?


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

मी देखील, दोन-तीन जणांना

6

मी देखील, दोन-तीन जणांना सांगून ठेवले आहे मिळाले की सांगतो.

रसिक.कॉम वर विचारले का ?


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद अनामिक खरं आहे,

7

धन्यवाद अनामिक हास्य खरं आहे, पुलंची पुस्तकं मलाही खूप आवडतात, पण मला त्यांच ललित लेखन अधिक आवडतं. दाद, चार शब्द, पुरचुंडी, मैत्र, गुण गाईन आवडी ही फार आवडतात मला.

रवींद्रनाथ : तीन व्याख्याने आणि मुक्काम शांतिनिकेतन ही वाचायची आहेत अजूनही.

आमची यादी

8

जमा केलेल्या पुस्तकांची यादी द्यायची तर एक फाईल अटॅच करावी लागेल. फक्त आवडलेल्या आणि त्याहि निवडक पुस्तकांची सूची:

१. नरहर कुरूंदकरांची सध्या उपलब्ध असलेली सर्व.
२. संपूर्ण जी. ए.
३. संपूर्ण अनिल अवचट (बालवाड्मय सोडून)
४. तो प्रवास सुंदर होता - के. रं शिरवाडकर
५. कवडसे पकडणारा कलावंत - विजय पाडळकर
६. बाराला दहा कमी - फाटक/नेरूरकर
७. शाश्वताचे रंग - विद्याधर पुंडलिक
८. बंडखोरीचे तत्त्वज्ञान - अल्बर्ट कामू
९. उध्वस्त धर्मशाळा (नाटक) - गो. पु. देशपांडे
१०. लांडगा - अनंत सामंत
११. पाडस - अनु. राम पटवर्धन
१२. मितवा - ग्रेस
१३. सुजन हो - पु.ल.
१४. अज्ञाताच्या ज्ञानासाठी - रफिक झकारिया
१५. परिव्राजक - गौतमीपुत्र कांबळे
१६. आरण्यक - विभूतीभूषण बंदोपाध्याय
१७. तिसरी लाट - अल्विन टॉफ्लर
१८. पर्व - भैरप्पा
१९. ओअ‍ॅसिसच्या शोधात - फादर फ्रान्सिस दिब्रिटो
२०. षड्ज गांधार - कृ. द. दीक्षित.

जशी आठवली तशी लिहिली आहेत. परत ही संग्रही असणारी आहेत. संग्रही नसलेली पण आवडलेली वेगळीच.

'पर्व' सहमत....

9

१८. पर्व - भैरप्पा

केवळ अप्रतिम आणि प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे. भैरप्पांनी कादंबरी स्वरुपात वास्तव महाभारत डोळ्यांसमोर उभे केले आहे असे म्हटल्यास वावगे नसावे. मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे, मेहता पब्लिशिंग ने प्रकाशित केले असल्यामुळे थेट त्यांच्या कडून खरेदी केली तर मोठी सवलत मिळू शकेन. नाहितर अप्पा बळवंत मधे रसिक साहित्य मधे थोडी घासाघीस केलीत तर १५ % सवलत मिळू शकेन...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पर्व मलाही खूप

10

पर्व मलाही खूप आवडले.

रसिकमध्ये जर मेंबरशिप असेल तर २०% पर्यंत सूट मिळते.

>>१. नरहर कुरूंदकरांची सध्या

11

>>१. नरहर कुरूंदकरांची सध्या उपलब्ध असलेली सर्व.>> ह्या वेळी ही घ्यायची इच्छा आहे.
>>सुजन हो - पु.ल. >> हेही पाहीन.
राम शेवाळकरांची बघायची आहेत.
दळवींची हवी आहेत...

वी, द नेशन - नानी पालखीवाला

12

वी, द नेशन - वाया घालवलेली वर्षे

मूळ लेखक - नानी पालखीवाला
अनुवाद - वि.स्.वाळींबे

हे नुकतच वाचल. अ‍ॅड. नानी पालखीवाला यांच्या जवळपास २० वर्षातल्या अनेक ठीकाणच्या भाषणांचा संग्रह आहे.
स्वातंत्रानंतरच्या ५० वर्षांचा ताळेबंद मांडणार पुस्तक आहे. मोठा माणूस.

गत ५० वर्षातल्या आणि भविष्यातल्या अनेक गोष्टींकडे एका हुशार वकीलाच्या दृष्टीकोनातून पहायची संधी मिळते.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

नीळा टॅग

13

बंद करतोय

पाच वाक्ये

14

चांगला उपक्रम. उगीच पुस्तकांची नावेच नावे होण्यापेक्षा आवडत्या किंवा न आवडत्या पुस्तकांविषयी कमीत कमी पाच वाक्ये लिहिल्याशिवाय पुस्तकाचे नाव देऊ नये असा नियम करावा.

पाच वाक्ये

15

चांगला उपक्रम. उगीच पुस्तकांची नावेच नावे होण्यापेक्षा आवडत्या किंवा न आवडत्या पुस्तकांविषयी कमीत कमी पाच वाक्ये लिहिल्याशिवाय पुस्तकाचे नाव देऊ नये असा नियम करावा.

स्मरणगाथा

16

गोनीदांचे स्मरणगाथा. तसे आत्मचरित्रच आहे पण कादंबरीपेक्षाही विलक्षण आहे. त्यांचे बालपण, घरून पळून जाणे, पुण्यात प्रभात स्टुडियोतले अनुभव, गाडगे बाबांबरोबरचे दिवस, नर्मदा परिक्रमा सगळेच विलक्षण. कुठलाही अभिनिवेश न बाळगता मोकळेपणाने लिहिलेले हे पुस्तक एक प्रवासचरित्रच आहे. गोनीदा प्रवासीच.

त्यांचेच 'दुर्गभ्रमणगाथा' हेही पुस्तक सुंदर आहे. उद्धव ज शेळक्यांनी पुभाभाव्यांच्या जीवनावर लिहिलेली मन:पुत ही वाचले तेव्हा आवडले होते. भाव्यांचे 'प्रथमपुरूषी एकवचनी'सुद्धा वाचनीय.

गोनीदांची आतापर्यंत वाचलेली

17

गोनीदांची आतापर्यंत वाचलेली पुस्तके-

शितू
कुणा एकाची भ्रमणगाथा
मोगरा फुलला
दास डोंगरी राहतो
वादळांतील दीपस्तंभ
पडघवली

पैकी माझी आवडती, वादळांतील दीपस्तंभ, पडघवली आणि कुणा एकाची भ्रमणगाथा.

संघाचे संस्थापक डॉं हेडगेवार ह्यांच्यावर लिहिलेले हे चरित्रात्मक पुस्तक डॉं ना व्यक्ती म्हणून समजून घेण्यासाठी मला तरी उपयुक्त वाटले. डॉ. च्या मनाची जडणघडण कधी झाली ह्याची उत्तम माहिती देते. संघस्थापनेसाठी, संघाच्या वाढीसाठी डॉ. नी घेतलेले अथक परिश्रम पाहून थक्क व्हायला होते.

अपूर्ण...

गोनीदांनी लिहीलेलं

18

गोनीदांनी लिहीलेलं गाडगेबाबांचं चरित्रंही नक्की वाचावं असं.

अक्षय यांना अनुमोदन

19

किमान पाच वाक्यांची सूचना केवळ महत्त्वाचीच नसून आवश्यक आहे. पुस्तकांची यादी गुगलून कुठेही मिळेल. नगाला नग मिळतो. मात्र तुम्हाला एखादे पुस्तक का महत्त्वाचे वाटते , त्यातून तुम्हाला नवे काही मिळाले काय ? इत्यादि इत्यादि काही नसेल तर ही बनेल निव्वळ एक यादी.

किंवा अनेक पुस्तकांबाबत एकत्र काही सांगायचे असल्यास तसेही करता येते. उदा. दुर्गा भागवतांची शैली किंवा जीएंचा जीवनविषयक दृष्टीकोन. किंवा विद्रोही कवितांच्या अनेक पुस्तकांबद्दल एकत्र काही लिहिणे.

माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट आहे. निव्वळ जंत्री आली तर उद्देश सफल झाल्यासारखे होणार नाही.

नक्की मुकसुनीतजी! करा पाहू

20

नक्की मुकसुनीतजी! करा पाहू तुम्हीच सुरुवात.. हास्य

+०.५

21

निव्वळ जंत्री आली तर उद्देश सफल झाल्यासारखे होणार नाही.
हे खरे असले तरी पाच वाक्ये प्रत्येक पुस्तकबद्दल लिहिण्याइतका उत्साह नि वेळ किती जणांकडे असेल. सूची तयार झाल्यानंतर एकमेकाला तपशील विचारता येऊ शकतो. किंवा एखादे पुस्तक न वाचलेले पण वाचायचे आहे ते एखाद्या सभासदाकडे आधीच आहे हे समजले तर अधिक तपशील तर विचारता येतोच पण उसने नेऊन वाचण्याची सोय होते. आताच 'किमया' नि 'शाश्वताचे रंग' ही दोन पुस्तके निर्मयीतैंना वाचायची होती पण आता मिळत नाहीत असा समज होता. तर माझ्याकडे दोन्हीच्या प्रती आहेत नि बाजारातही कदाचित मिळवू शकेन. हा फायदा नाही का? आम्हा दोघांव्यतिरिक्त इतराना कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फायदा होणार नाही हे खरे.

अनुमोदन रमतारामजी. उत्साह,

22

अनुमोदन रमतारामजी. उत्साह, वेळ हे तर आहेच आणि कधीकधी आळशीपणाही नडतो Big smile
माझा मुख्य उद्देश्य पुस्तकांबद्दल जाणून घेणे हा होता, कधीकधी पुस्तकच ठाऊक नसते. पुस्तके माहित व्हावीत हे ही आणि कोणी पुस्तकांबद्द्ल लिहिणार असेल तर दुधात साखर! हास्य

+०.२५

23

हे खरे असले तरी पाच वाक्ये प्रत्येक पुस्तकबद्दल लिहिण्याइतका उत्साह नि वेळ किती जणांकडे असेल
पाचच वाक्ये लिहायची आहेत तपशील नाहीत. त्याला कितीसा वेळ लागणार? यादी द्यायची असेल तर पुस्तकाविषयी एखादे वाक्य तरी लिहावे. निव्वळ नावांनीही काहीएक फायदा होतो, याच्याशी सहमत.

माझ्या संग्रहातील पुस्तके

24

अनुवादीत कादंबर्‍या:
०.तोत्तोचान - तेत्सुको कुरोयनगी - अनु: चेतना सरदेशमुख गोसावी
१. सेवन्थ सिक्रेट - आयर्विंग वॅलेस - रविंद्र गुर्जर
२. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु. अजित ठाकुर
३. ब्लडलाईन - सिडने शेल्डन - विजय देवधर

ऐतिहासिकः
१. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर
२. पानिपत - विश्वास पाटील
३. स्वामी - रणजित देसाई
४. ५५ कोटींचे बळी - गोपाळराव गोडसे
५. गांधीहत्या आणि मी - गोपाळराव गोडसे
६. काळे पाणी - स्वातंत्र्यवीर सावरकर

अध्यात्मः
१. साद देती हिमशिखरे - मूळ इंग्रजी लेखक जी.के.प्रधान - मराठी अनुवाद - रामचंद्र जोशी
२. नर्मदे हर - जगन्नाथ कुंटे
३. साधनामस्त - जगन्नाथ कुंटे
४. नित्य निरंजन - जगन्नाथ कुंटे
५. प्राणायाम रहस्य - रामदेवबाबा


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सागर, नित्य निरंजन कसे आहे?

25

सागर, नित्य निरंजन कसे आहे? मी नर्मदे हर आणि साधनामस्त वाचली आहेत. ह्यात काही वेगळे आहे का?

साधना या विषयावर आहे.

26

हो निर्मयी,

यात थोडे वेगळे आहे. वरवर चाळले आहे त्यावरुन एवढे कळाले की संपूर्णपणे साधना या विषयावरचे हे पुस्तक आहे. जगन्नाथ कुंटेबुवांनी हे पुस्तक फक्त १२ दिवसांत पूर्ण केले आहे. मागच्या आठवड्यात पुण्यात आलो होतो तेव्हा घेतली होती ही पुस्तके

सध्या साधनामस्त संपवत आणले आहे. वाचून झाले की नित्य निरंजन हातात घेईन. पूर्ण वाचून झाले की तुम्हाला नक्की सांगेन. सध्या तरी साधनामस्त मधे मस्त होतो आहे हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नित्य निरंजन पुस्तक अप्रतिम

27

नित्य निरंजन पुस्तक अप्रतिम आहे.
साधना कशी असावी व साधना म्हणजे नक्की काय ? यावर फारच सुंदर व सोप्या भाषेत भाष्य केल आहे.
ज्याला खरच अध्यात्म म्हणजे काय हे जाणुन घ्यायचय त्याने हे पुस्तक नक्की वाचाव.
त्यांचच कालिंदी नावाच अजुन एक पुस्तका आहे हे सुद्धा वाचाव.


राधा
Grade Innocent Quest

||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||

माझीही वर टाकलेली संग्रहातली,

28

माझीही वर टाकलेली संग्रहातली, अजून काही -

लेखिका: दुर्गाबाई भागवत

व्यासपर्व
दुपानी
भावमुद्रा
रुपरंग
पैस
ऋतूचक्र

१८५७चे स्वातंत्र्यसमर - स्वा. वि दा सावरकर
यज्ञ - शैलजा राजे, भा. द खेर,
युगांत - इरावती कर्वे
जास्वंद - माधव आचवल (किमया मिळत नाही आचवलांचे Sad )
पत्र - माधव आचवल
सर्वोत्तम रविंद्र पिंगे - रविंद्र पिंगे ह्यांचे ललित लेखन
आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
सोयरे सकळ - सुनीता देशपांडे
आहे मनोहर तरी: वाचन आणि विवेचन ( हे मुक्तसुनीत ह्यांनी सुचवलं होतं) - संपादन : विजया राजाध्यक्ष व श्री पु
५५ कोटींचे बळी - गोपाळ गोडसे

नंतर अजून टाकते...
रमतारामजी, टाका नावं अजूनही असतील तर.. शाश्वताचे रंगही नाही मिळत.. Sad दुर्गाबाईंचे डूबही..

अक्षय, सूचना चांगली आहे, पण ते लिहायचे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून हास्य तुम्ही लिहा ना बैजवार. मीही लिहीन जमेल तसे. तुमची सूचना आवडली.

किमया मिळत नाही आचवलांचे

29

किमया मिळत नाही आचवलांचे
परवा अत्रे सभागृहात शुभम् साहित्यच्या प्रदर्शनात होते. म्हणजे उपलब्ध असावे. पाहतो. नसेल तर माझ्याकडे एक प्रत आहे. लहानसे पुस्तक आहे. स्कॅन करून पीडीएफ बनवू शकतो का ते पाह्तो.

याशिवाय मला आवडणार्‍या लेखिका म्हणके इरावती कर्वे. अरुणा ढेरे (यांच्या पुस्तकांचे संदर्भ मी माझ्या विठ्ठलाच्या स्त्रिया या लेखात दिले होते) आणि शांताबाई.

वर विसरलेले आणखी एक पुस्तक म्हणजे 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'. या विदुषीची विचारधारा जाणून घेण्यास उत्तम.

शाश्वताचे रंगची एक जादा प्रत आहे माझ्याकडे पण त्यावर नंदनचे आरक्षण आहे. हास्य बहुतेक बाजारातही मिळेल.
किमया आणि शाश्वताचे रंग तुमच्यासाठी विकांताला शोधतो.

>शाश्वताचे रंगची एक जादा प्रत

30

>शाश्वताचे रंगची एक जादा प्रत आहे माझ्याकडे पण त्यावर नंदनचे आरक्षण आहे. >> नंदन! Angry

>> बहुतेक बाजारातही मिळेल. किमया आणि शाश्वताचे रंग तुमच्यासाठी विकांताला शोधतो. >> लय उपकार व्हत्याल! Grade मिळाली तर प्लीज प्लीज प्लीज माझ्यासाठी घ्यावीत. pray

>>'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'. >> येस्स! आहे हे माझ्याकडे, मस्तच आहे हे पुस्तक. प्रतिभा रानडेंनी दुर्गाबाईंशी खूप सार्‍या विषयांवर गप्पा केलेल्या आहेत.

पर्व - एस. एल. भैरप्पा

31

पर्व

मूळ लेखक - एस. एल. भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी

महाभारतातले सगळे चमत्कार दूर सारून नक्की काय घडल असेल याचा शोध घेणार पुस्तक.
पहील्या प्रथम तर हे पचवालायच थोड जड गेल. कारण आजपर्यंत महाभारत हे फक्त फक्त चमत्कारांच्याच दृष्टीकोनातून पाहीलेल.

माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती यांच समर्पक दर्शन घडवणार पुस्तक. आणि हो अजून एक महत्वाच म्हणजे एका दाक्षिणात्याच्या नजरेतून केलेल उत्तरेच्या इतिहासाच निरिक्षण.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

हम्म

32

महत्वाच म्हणजे एका दाक्षिणात्याच्या नजरेतून केलेल उत्तरेच्या इतिहासाच निरिक्षण.
केवळ भैरप्पा कन्नड आहेत म्हणून हे म्हणताय की तुम्हाला त्या 'दाक्षिणात्य दृष्टीकोन' कुठे दिसला आहे? यावर अधिक तपशील ऐकायला/वाचायला आवडेल.
अतिशय सुंदर पुस्तक, नवा दृष्टीकोन आणि मुख्य म्हणजे वेगळा घाट. इथे निवेदनात्मक मांडणी असूनही कथेचा प्रवाहीपणा खंडित होत नाही किंवा एकच गोष्ट संदर्भाच्या सोयीसाठी दोन किंवा त्याहून पात्रांच्या निवेदनात येत नाही (द्विरुक्तीचा दोष टळतो). एका पात्राचे निवेदन चालू असताना तो/ती सांगत असलेल्या घटनातून पुढचा निवेदक एक पात्र म्हणून प्रवेशतो आणि हळूहळू आधीचा निवेदक कथेतून मागे पडू लागतो. एक छान प्रवाही कथा वाचायला मिळते.

परंतु एक दोषही दिसला तो सांगितला पाहिजे. या कथेवरील अद्भुताची पुटे दूर करून माणूस म्हणून उभे करताना उगाचच त्यांना काहीवेळा खलनायकी/उद्दाम बाज येतो. उदा. भीम धृतराष्ट्राबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलतो. जरी ती साधीसुधी माणसे आहेत हे गृहित धरले तरी हीनतेचा दोष स्वाभाविक मानता येणार नाही.

हम्म हम्म..

33

नाही, भैरप्पा कन्नड आहेत म्हणून नाही.
हे (बहुतेक) पुस्तकाच्या प्रस्तावनेतच स्वतः भैरप्पांनी म्हटलेल आहे म्हणून म्हणतो आहे. (प्रस्तावनेत आहे की आणखीन कुठे ते खात्री करून सांगतो, आत्ता प्रत हाताशी नाही.)

या कथेवरील अद्भुताची पुटे दूर करून माणूस म्हणून उभे करताना उगाचच त्यांना काहीवेळा खलनायकी/उद्दाम बाज येतो.
सहमत.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

.

34

.

.

35

अरुणा ढेरे ह्यांची माझ्याकडची

36

अरुणा ढेरे ह्यांची माझ्याकडची - नव्या जुन्याच्या काठावर,स्त्री आणि संस्कृती आणि वेगळी माती, वेगळा वास
इरावती कर्वे - गंगाजल, भोवरा, परिपूर्ती, आमची संस्कृती
पुशि - मातृका
वि द घाटे - पांढरे केस हिरवी मने
श्री वि कुलकर्णी - डोह
डॉ देशपांडे - भारतीय शिल्पवैभव,
बा भ बोरकर - प्रियकामा, मावळता चंद्र, जळते रहस्य, अंधारातली वाट आणि भावीण. माझं सगळ्यात आवडतं, भावीण. लिहिते का ते थोड्या वेळाने.
महेश एलकुंचावर - संवादाचा सुवावो

सांगायचं तर पुस्तक वाचायची

37

सांगायचं तर पुस्तक वाचायची आवड लहानपणापासूनच.. वाचनालयाचा सदस्य वयाच्या ६व्या वर्षापासून (ई.२री) असल्याने मुख्यतः सगळं वाचन लायब्ररीच्या पुस्तकांचच...

विकत घेतलेली पुस्तके:
१. राजा शिवछत्रपती : बाबासाहेब पुरंदरे - ओळखीची गरज नाही
२. मृत्युंजय : शिवाजी सावंत- ओळखीची गरज नाही
३. दुनियादारी : सुहास शिरवळकर- ओळखीची गरज नाही
४. शांताराम (इंग्रजी) : ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस - एका ऑस्ट्रेलियन माणसाचा मुंबईत अंडरवल्ड(७०-८० चे दशक) आणी अफगाणीस्तानातल्या(रशियन साम्राज्याच्या वेळचा) वास्तव्याचा लेखाजोखा.
५. अदर साईड ऑफ मिडनाईट (इंग्रजी) : सिडने शेल्डन
६. टेल मी युअर ड्रीमस (इंग्रजी) : सिडने शेल्डन
७. प्रिझनर ऑफ बर्थ (इंग्रजी) : जेफ्री आर्चर
८. फस्ट अमंग इक्वल्स (इंग्रजी) : जेफ्री आर्चर : इंग्रज राजकारणावरची एक रहस्य कादंबरी
९. पॅपिलॉन (इंग्रजी) : हेन्री शेरर (ह्यचा मराठी अनुवाद ही सुंदर आहे) : फ्रेंच गयाना मधल्या एका तुरुंगस्थित कैद्याची कहाणी

आणीक लायब्ररीत वाचलेलं एक पुस्तक बरंच आवडलं होतं, पण नाव आठवत नाहीये. ते इंदीरा गांधींच्या सेक्रेटरीने आणीबाणी वर लिहिलेले होते. हास्य

यावरुन आठवले ...

38

८. फस्ट अमंग इक्वल्स (इंग्रजी) : जेफ्री आर्चर : इंग्रज राजकारणावरची एक रहस्य कादंबरी

यावरुन फ्रेडरिक फोर्सिथ याची मध्यस्थ ही मराठीतून अनुवादित झालेली मूळ इंग्रजीतील "द निगोशिएटर" ही कादंबरी आठवली. प्रचंड गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कथानक वाचताना मति गुंग होऊन जाते. फ्रेडरिक फोरसिथ म्हणजे केवळ अप्रतिम लेखक आहेत. एवढ्या गुंतागुंतीचे आणि खिळवून ठेवणारे कथानक लिहिणारा कदाचित फ्रेडरिक फोरसिथ हा मोजक्या लेखकांपैकी असावा. जिज्ञासूंनी अवश्य वाचावी ही कादंबरी. अपहरण करणार्‍यांशी मध्यस्थी हा जरी मूळ गाभा असला तरी आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा त्याचा परिणाम एकदम खिळवणारा आहे.


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हे का? Indira Gandhi, the

39

हे का?

Indira Gandhi, the "Emergency", and Indian Democracy
- by P. N. Dhar

हेच असावं...ह्याचा मराठी

40

हेच असावं...ह्याचा मराठी अनुवाद वाचला होता...

तसेच Autobiography of a Yogi By Paramhansa Yogananda (मराठी अनुवाद)
आणी साद देती हिमशिखरे पण अवडलं होतं..

मी लैच्च कमी वाचल्यात पुस्तकं

41

मी लैच्च कमी वाचल्यात पुस्तकं Sad
असो .. आत्ता बर्‍याच जणांना नं आवडलेलं चेतन भगतचं टु स्टेट्स वाचतोय हास्य

प्रतिसाद

42

विषय आवडता आहे. पुस्तकांची नावे (मलाच काय , कुणालासुद्धा) भरपूर सांगता येतील. जे लोक मराठी संस्थळांवर येऊन काहीतरी सांगत आहेत म्हणजे किमान मराठी भाषेबद्दल आस्था असणारच. अशा व्यक्तीनी कितीतरी पुस्तके आतापावेतो वाचली असतील. या सार्‍या पुस्तकांबद्दल समग्ररीतीने बोलता येणे अशक्य आहे. निवड करूनच , आठवेल तसे बोलता येईल. माझ्या या प्रतिसादाचे स्वरूप बरेच विस्कळित असणार याबद्दल आगाऊ माफी मागतो.

वाचनाबद्दल अभिरुची बदलत असते. वयोमानानुसार, परिस्थितीनुरूप बदल घडत जातात. "कुंपणापलिकडचे शेत" हा परदेशस्थांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह मी १९८८-८९ च्या सुमारास वाचला तेव्हा थोडा रोचक वाटला. मनाने दखल घेतली नि "आणखी एक पुस्तक" म्हणून तेव्हा बाजूला ठेऊन दिले. आज मात्र "फॉर हिअर ऑर टू गो ?" हे , एनारायच्या पहिल्या पिढीचा अभ्यास पुढे मांडणारे पुस्तक मनापासून वाचावेसे वाटते. "स्व-देस" हे परदेशातून परत गेलेल्यांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणारे पुस्तक कुतुहलाचा विषय बनते.

काल आवडलेली पुस्तके आज तितक्याशा महत्त्वाची वाटत नाहीत. काल दुर्लक्षिलेल्या पुस्तकांमधे आज अचानक इंटरेस्ट निर्माण होतो. दळवींची पुस्तके मनापासून वाचत वाचत मोठा झालो. आज समग्र दळवी आवडणे कठीण आहे. विशेषतः त्यांचा विनोद. (ठणठणपाळचा नव्हे, दळवींचा) मात्र मानवी संबंधांवर , मनोविकृती , डिस्फंक्शनल फॅमिलिज चे चित्रण करणार्‍या त्यांच्या कादंबर्‍या अजूनही खुणावतात. मात्र "काळा सूर्य" , "हॅट घातलेली बाई" लिहिणार्‍या कमल देसाईंबद्दल काल बिलकुल कुतुहल नव्हते. आज आहे. तीच गोष्ट किरण नगरकरांबद्दल. कायतरी येडचापसारखे लिहिलेय असे त्यांचे लिखाण तेव्हा वाटले होते. आज परत जाऊन वाचावेसे वाटते.

काही पुस्तकांबद्दल अतिपरिचयादवज्ञा होते. जीए कुलकर्णी यांच्या एकेका कथेतून उलगडणार्‍या एकेका व्यूहाने एकेकाळी डोके खाल्ले होते. आज महिनोन महिने जीए उघडले जात नाहीत. "हां हे माहिती आहे." अशी अत्यंत उद्धट भावना होते. याला अपरिचयादज्ञा नाही तर काय म्हणायचे ? काही लेखका-पुस्तकांकडे आज नजर टाकली असतां "आता याचे-आपले नाते काय राहिले आहे ?" असा संभ्रममिश्रित वैषम्याचा विचार येतो. पेंडशांची "लव्हाळी" बेहद्द आवडली होती. त्यातले मुंबईच्या चाळीचे नि उपनगरीय जीवनाचे उल्लेख अत्यंत परिचित असल्यामुळे ते होते हे कळते. पण महायुद्धकालीन जीवनाच्या चित्रणाचे माहात्म्य आता काय ? तीच कथा होते गंगाधर गाडगीळांची. ज्या कारणांकरता त्यांना नवकथेचे अध्वर्यू मानले गेले, मानमरातब मिळाला ते ५०-६० चे जग केव्हाच मागे पडले आहे. त्यावर अनेक दशके पाईल अप झालेली आहेत. आज गाडगीळ वाचणे म्हणजे खानेसुमारीवजा प्रक्रिया होते.

"रेलेव्हन्स" हा मुद्दा महत्त्वाचा ठरत जातो. आणि काय रेलेव्हन्स वाटते ? हे सतत बदलत राहाते. "रेलेव्हन्स" आणि "फॉर द ओल्ड टाईम्स सेक" या बर्‍याचशा परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. म्हणजे एखादे पुस्तक "फॉर द ओल्ड टाईम्स सेक" वाचण्याकरता उचलले असेल तर बहुदा त्याचा रेलेव्हन्स बर्‍यापैकी मावळत गेलेला असतो. याउलट जे पुस्तक "आज" रेलेव्हंट वाटते त्यामधे स्मृतीरंजनमूल्य बहुदा नसते.

रेलेव्हन्स हे मूल्य जर का सतत बदलणारे असेल तर दुसरे एक असे एक मूल्य आहे जे निश्चित स्वरूपात दिवसेंदिवस कमीकमी होत जाते : ते म्हणजे रेव्हरन्स. चिकित्सा , "क्वेश्चन एव्हरीथिंग" या प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत जातात.

असो. एकंदर हा धागा फार आवडलेला आहे म्हणून अत्यंत अस्ताव्यस्त लिहिले आणि इतके करून जे सांगायचे त्याच्यापेक्षा फार कमीच सांगितले गेले याची जाणीव आहे.

+१

43

केवळ आणि रेलेव्हन्स बाबत अगदी अगदी. १४-१५ व्या वर्षी अगदी भारावून वाचलेले खांडेकरांचे अमृतवेल, आता तेच पुस्तक २ पानांच्या पुढे वाचूही शकत नाही!

मुसूंशी संपूर्ण सहमत. माझीही

44

मुसूंशी संपूर्ण सहमत. माझीही हीच भावना आहे. रिलेव्हन्स महत्त्वाचा. खांडेकरांचे लिखाणही मला अनेकदा उपदेशी वाटते. म्हणूनच ज्ञानपीठ मिळूनही ययाति वाचण्याची 'इच्छा' अद्याप झालेली नाही.

खरं आहे.. १०० % सहमत.. काही

45

खरं आहे.. १०० % सहमत..
काही पुस्तके मात्र प्रत्येकवेळी नवे काहीतरी बोलतात..
मला गौरी देशपांडे ची पुस्तके कधीही जुनी वाटत नाहीत.. कुसुमाग्रजांच्या कविताही..आणि भा.रा.तांबे, बोरकर हे ही नित्यनूतनच !


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

१०० % सहमत..

46

१०० % सहमत..

हं

47

एक शून्य मी

लेखक श्री. पु.ल. देशपांडे

पु. ल. यांनी लिहलेल्या निवडक विचारप्रधान लेखांचा हा संग्रह आहे. त्यांच्या चतुरंग वाड्मयीन व्यक्तिमत्वाचे तुलनेने सहज लक्षात न येणारे पण महत्वाचे अंग त्यात व्यक्त झाले आहे. कोणत्याही पोथीनिष्ठ राजकिय, सामाजिक वा आर्थीक विचारव्यूहात त्यांची बुद्धी अडकली नाही की पारिभाषिक संज्ञांच्या विद्वज्जड जंजाळात त्यांची शैली फसली नाही.

१९६२ ते १९८९ या कालखंडात लिहलेले हे लेख वाचताना आजही लोकांच्या मानसिकतेत फारसा फरक पडला नाही आहे हे पाहून खिन्न व्हायला होते.

आजही (संकेत स्थळावर) महात्मा गांधी, प्रांतवाद, धर्म, (अंध)श्रद्धा, मराठी माणूस हे वादग्रस्त (सर्वाधीक प्रतिसाद घेउन जाणारे) विषय गेल्या ५०, ६० वर्षात तेच ते मुद्दे घेउन पण नव्या खेळाडूंना घेउन कसे काय वर येतात हा खरचं पीएचडीचा विषय होईल.

या पुस्तकात पु.लं. चे याविषयावरील मत वाचायला मिळेल.

अवश्य वाचावे.

जाताजाता: काही कारणाने घरी जेव्हा इतर भाज्या नसताना पटकन बटाटाभाजी किंवा पिठलं-भात बेत होतो. तसे प्रत्येक संस्थळावर अधुन मधुन पटकन निघणारा धागा म्हणजे पुस्तके पुस्तके पुस्तके उदो उदो उदो!! हास्य

>>पुस्तके पुस्तके पुस्तके उदो

48

>>पुस्तके पुस्तके पुस्तके उदो उदो उदो!! >> पुस्तकांचा नाही करायचा तर कशाचा? हास्य

:-)

49

श्री मनिषजी यांच्या ब्लॉगवर वाचलेली एक ओळ

धूप मे निकलो, घटाओंमे नहाकर देखो, जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देख लो!

बाकी चालू द्या.

>>ब्लॉगवर वाचलेली एक ओळ >>

50

>>ब्लॉगवर वाचलेली एक ओळ >> हास्य

!

51

प्रतिसादाला चुकीचं टाचण दिलं आहे.
धाग्याशी अंसंबद्ध प्रतिसाद.

ओके

52

अंसंबद्ध - बर तेवढा उच्चार पण शिकवा शास्त्रीजी

प्लीज, सहज आणि अवलियाजी,

53

प्लीज, सहज आणि अवलियाजी, वादावादी नको ही विनंती. पुस्तकांबद्दल बोलूयात.
सहज, तुम्हांला पुस्तकांचे वा ह्या धाग्याचे वावडे असेल तर न वाचायचा पर्याय आहेच ना हास्य

दोघेही विनंती मान्य कराल अशी आशा करते, धन्यवाद.

+१.०

54

मुसु भाऊंशी सहमत....!! पण असे ही वाटते की काळा प्रमाणे विचार पण बद्लतात, आणि म्हनून एखादे आवड्लेले पुस्तक नावडते बनते....!! पण पुस्तक यादित तर नक्कीच राह्ते हास्य

माझ्या बद्दल बोलायेच्ये तर ... आजूनही जर कूठे "चांदोबा", "फासटर फेणे", "एकच षटकार" अशी पुस्तके व नियतकालीन मिळाली... तर स्पंदने तेव्हढिच धडधडतात.... किती ही काळ बद्दला तरी.(परिपक्वता आली नसेल असे संभोधीत करणार्यांना आधीच धन्यवाद हास्य )

~ स्पंदन ~

स्मरणगाथा - गो नि

55

स्मरणगाथा - गो नि दांडेकर
इडली ऑर्किड आणि मी

मनुस्मृती: प्राचार्य अ दा आठवले
वाटा आपुल्या हिताच्या: वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे अ दा आठवले
श्री रामानंद बीडकर महाराज चरित्र - ल ग बापट
सद्गुरू सोयिरा - श्री सद्गुरु काकामहाराज अर्थात अशोक र जोशी


-पुण्याचे पेशवे

वास

56

पुस्तकाचा कोरा वास ही काही और चीज असते. शाळेतील पुस्तके नवीन घ्यायला का आवडायच तर ते या वासामुळे. आतमधे काय आहे हा भाग वेगळा
वाचन म्हटल कि आम्हाला ग्रंथालयाच्या कथा आणी व्यथा आठवते. हल्ली वाचन बंदच झालय.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नर्मदा परिक्रमेवर बरीच

57

नर्मदा परिक्रमेवर बरीच पुस्तके निघाली. त्यातले नर्मदे हर हर हे जगन्नाथ कुंटयांचे, नर्मदे हर| हर नर्मदे हे लिमयांचे आणि नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर ही पुस्तके मी वाचली. पैकी भारती ठाकुरांचे पुस्तक मला अतिशय आवडले.

कुंटे व लिमये ह्यांची पुस्तकेही उत्तम आहेत, पण भारतींचे पुस्तक वाचताना त्यांनी किती समरसून परिक्रमेतले अनुभव घेतले आहेत, आणि त्यावर मनापासून चिंतन, मनन केलेले आहे ह्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. स्वतःच्या मनाशी त्यांनी वेळोवेळी अंतर्मुख होऊन केलेले संवाद - ज्याला त्यांनी सखीचं रुपक वापरलेलं आहे - मुळातूनच वाचण्याजोगे आहेत, अतिशय सुंदर असे हे संवाद म्हणजे पुस्तकाचं बलस्थान आहे. माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक.

सहमत. हे पुस्तक मलाही याच

58

सहमत. हे पुस्तक मलाही याच कारणासाठी आवडले. कोणत्याही चमत्काराचा अनुभव न देता जे दिसले ते 'रिपोर्ताज' शैलीतले लेखन आहे. त्यामुळे ते जास्त भि़डते. बादवे. हे पुस्तक वाचल्यानंतर मी भारतीताईंशी बोललो होतो. त्या सध्या महेश्वरजवळील मंडलेश्वरलाच वास्तव्यास असतात. तिथे त्या आता पुनर्वासितांमध्ये शिक्षणविषयक काम करताहेत. पुस्तकात त्यासंदर्भात पुसटसा सूचक उल्लेख आला आहेच. इंदूरहून ते ठिकाण जवळ आहे. जाण्याची योजना आहे. बघूया कधी जमते ते.

अगदी ज्ञानेश्वर, तुकाराम नाहीत तरी...

59

वरची यादी वाचताना सुमारे १९६० ते १९९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचाच भरणा अधिक आढळला. असं का?

मला खालील पुस्तकं यादीत वाढवावीशी वाटतात.
- ग्योडेल, एश्चर, बाख : पुस्तकाविषयी काय बोलावं? हे पद्यकाव्यच आहे - वैज्ञानिक संकल्पना सांगताना, संगीत, चित्र व गणित या तीन अमूर्त सत्यशोधक प्रवृत्तींमधली काही समान सूत्रं मांडतं. पण त्याहीपलिकडे जाऊन सत्य म्हणजे काय, सिद्धता म्हणजे काय, झेन म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजे काय, या सर्वाचा उत्क्रांती व जनुकीय पातळीवरच्या घडामोडींशी संबंध कसा येतो... काय नाही विचारा. व्यासोच्छिष्टं... हे पुस्तक म्हणजे एकाच जेवणात इंटलेक्च्युअल जगातल्या सर्व क्विझीन्सचे वेगवेगळे पदार्थ एकाच वेळी चाखून बघण्याची, तरीही भूक कायम राहाण्याची सोय आहे.
- द सेल्फिश जीन/ ब्लाइंड वॉचमेकर : आपण कोण आहोत, या विश्वात काय करतोय, आपल्या अस्तित्वाचं कारण काय हे जाणून घ्यायचं असेल तर डॉकिन्सची पुस्तकं वाचणं अत्यावश्यक आहे. ८० च्या दशकात कार्ल सेगन जी विज्ञानाचा चेहेरा म्हणून भूमिका करत होता, ती डॉकिन्सने काही काळ घेतली होती. अर्थात सेगनपेक्षा अधिक आक्रमक असल्याने ती किती काळ त्याच्याकडे टिकली हे विवाद्य आहे. परंतु जीवशास्त्र व उत्क्रांतीपासून सुरूवात करून मानवजातीच्या अस्तित्वाचं कारण समजावून सांगणं, आज दिसणाऱ्या प्रवृत्तींचं जैविक मूळ काय आहे याचा शोध घेणं यात डॉकिन्सचा हात धरणारा कोणी नाही. त्यात त्याला शास्त्रीय परखडपणा व काव्यात्म लेखन या दोन्हीची देणगी आहे.
- द लॅंग्वेज इन्स्टिक्ट : स्टीव्हन पिंकर हा गेल्या दोन दशकांतला मानलेला कॉग्निटिव्ह न्यूरॉलॉजिस्ट. मेंदू कसा काम करतो, त्यातून वरच्या पातळीवर ज्ञान कसं निर्माण होतं, ज्ञानग्रहण कसं होतं वगैरे विषयांवर त्याने अनेक पुस्तकं लिहिली आहेत. पण मला लॅंग्वेज इन्स्टिंक्ट आवडलं ते मुख्यत्वे त्यातल्या भाषेवरच्या भरामुळे. गेल्या पन्नास वर्षात जी मानसशास्त्रात क्रांती झाली त्यात बिहेविअरीझम (स्किनर व त्याची कबुतरं; माइंड नावाची गोष्ट नसते वगैरे...) मागे पडून मेंदूच्या प्रक्रियांतून मन, आत्मा, बुद्धी, माइंड या गोष्टी कशा निर्माण होतात यावर अधिक प्रगती झाली. त्यात मोठा वाटा भाषेच्या अभ्यासाचा होता. जसे माणसाला हात, पाय असतात, तसेच मेंदूमध्ये देखील भाषा शिकण्याचे, वापरण्याचे 'अवयव' असतात हे सिद्ध झालं. त्याविषयी हे पुस्तक आहे. परंतु नुसतं विरंगुळ्याचं म्हणून वाचता यावं इतकं छान लिहिलेलं आहे.

मी जर जगाचा हुकुमशहा झालो तर ही तीन पुस्तकं प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत असा फतवा काढेन, इतकी चांगली ती आहेत...

(अक्षयजी, पाच पाच वाक्यं झाली... तुम्हाला दहा हवी होती का? हा प्रतिसाद पुन्हा प्रकाशीत करू का?)

राजेश

पहिली दोन्ही पुस्तकं वाचायची

60

पहिली दोन्ही पुस्तकं वाचायची आहेत. दोन्ही लायब्ररीतुन आणली होती पण वाचणं झालं नाही. (ग्योडेल, एश्चर, बाख हे पुस्तक इथं कुठल्यातरी अभ्यासक्रमात आहे म्हणे त्यामुळे सहजासहजी मिळत नाही, मिळालं तर फार वेळ मिळत नाही. )

>>स्टीव्हन पिंकर
> ही साईट पाहिली आहे का? आवडेल. पि़ंकरच पेजः http://www.edge.org/3rd_culture/bios/pinker.html


-Nile

ग्योडेल, एश्चर, बाख +१

61

हे पुस्तक डग्लस होफ्स्टॅटर यांनी तरुणपणी ज्या प्रेरणेने, तळमळीने, वेडाने लिहिले आहे ते थक्क करणारे आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे असेच वाटते. त्यांचे अलिकडेच प्रकाशित झालेले 'आय अ‍ॅम ए स्ट्रेंज लुप' या पुस्तकाचाही उल्लेख करावासा वाटतो. 'गोडेल..' वर इतक्या वर्षानंतर केलेले हे आत्मचिंतनही तितकेचे वाचनीय आणि 'गोडेल...'मधल्या मूख्य सूत्रांना क्रिस्टलाइज करणारे.
(होफ्स्टॅटर प्रभृतींच्या मांडणीचा विरोध करणार्‍या जॉन सर्ल यांचे 'द मिस्टरी ऑफ कॉन्शसनेस' हेही या वाचायलाच हवे असे.)

डॉकिन्सच्या पुस्तकांबद्दलही (राजेशने इतरत्र दिलेल्या क्रमानुसार वाचतोय) सहमत. पिंकर अजुन वाचलेला नाही.

>>सुमारे १९६० ते १९९० मध्ये

62

>>सुमारे १९६० ते १९९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचाच भरणा अधिक आढळला. असं का? >>

व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याचप्रमाणे प्रत्येकाची आवड आणि ज्या प्रकारची पुस्तके उपलब्ध होत असतात, वाचायची इच्छा होते व वाचावीशी वाटतात, तेही. आपल्या आवडीशी प्रामाणिक रहाणं महत्वाचं आणि सुसंगतही. अमूक एक पुस्तक वाचलं किंवा वाचलं नाही ह्याची व्यक्तीसापेक्ष खूप कारणं असू शकतात किंवा एखादं पुस्तक फतवे काढण्याइतकं उत्तम आहे हेही व्यक्तीसापे़क्षच मत की हास्य

नापेक्षा उद्या टार्‍या चेतन भगतची पुस्तकं वाचायचा फतवा काढेल! आली का पंचाईत मग! ( हे माझं चेतन भगतच्या पुस्तकांबद्दल मत हास्य )

राजेश, तुम्ही दिलेल्या पुस्तकांच्या माहितीबद्दल खूप धन्यवाद.

नापेक्षा उद्या टार्‍या चेतन

63
नापेक्षा उद्या टार्‍या चेतन भगतची पुस्तकं वाचायचा फतवा काढेल! आली का पंचाईत मग!

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
साला , कोदांबरोबर आमची मार्केटिंगची डिल फिसकटली , अन्यथा आम्ही फतवाच काढणार होतो हास्य त्यानंतर अंतरजालावर जे महागुंगीचा आलम पसरला असता .. इन्शाल्लाह !!

- टारेश फतवेकाढी

आम्ही भगीरथेचे पुत्र - गो नी

64

आम्ही भगीरथेचे पुत्र - गो नी दांडेकर
शहेनशहा - ना.स.इनामदार
समांतर - सुहास शिरवळकर.
पडघवली - गो नी दांडेकर
स्पाउज - शोभा डे.
पवनाकाठचा धोंडी - गो नी दांडेकर
जैत रे जैत - गो नी दांडेकर
मंत्रावेगळा - ना.स.इनामदार


मी बरीच पुस्तके वाचते पण

65

मी बरीच पुस्तके वाचते पण लक्शात नाही राहात एवढे thinking .लेखक कोण नाव काय न ऑल Stare

पुढच्यावेळेपासून लिस्ट करुन

66

पुढच्यावेळेपासून लिस्ट करुन ठेवत जा गं हास्य आणि मग टाक इथे.

काही पुस्तके !!

67

वरील दिलेल्या यादीतील बहुतांश पुस्तके वाचुन झालीत...
त्या मुळे त्यातील देत नाही .ही माझी यादी ..

१) रन ऑफ द माईंड - विजेण्द्र राव ...

विजेंद्र राव ईन्डियन एक्स्प्रेस,डेक्कण हेरॉल्ड्,सन्डे मिड-डे मध्ये कधी बँगलोर,कधी मुंबई अ‍ॅज अ कॉलमनिस्ट म्हणुन,२००३ पर्यंत कार्यरत होते.त्यांच्याच ललित लेखांचा हा संग्रह..प्रत्येक लेख एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.त्यांचा एक लेख .' गॉड्स ओन कुजीन'..माझा सगळ्यात आवडता....

२) रेखा समेवर ये - निर्मला राजवाडे

ह्या पुस्तकाविषयी काय लिहु ?? शोधा आणी वाचा ..एक संस्थळ-मालक आपल्या माड्यांवरच्या कविकल्पना कुठुन चोरुन आणतात ते कळेल.एक स्त्री लेखिका, सत्तरीच्या दशकात, भाषा संभाळुन, असे काहीतरी लिहु शकते म्हणजे धन्य आहे ती !!

३) पॅलेस ऑफ ईल्युजन - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी

द्रौपदीच्या लेखी महाभारत ..नक्की वाचावे असे...

४) निदान - सुहास शिरवळकर
ग्रेट लेखक,दोन पिढ्यांचा, दोन औषधापचार करणार्‍या पध्दतीचा,पिता-पुत्राचा संघर्ष....जबरा !!!

५)द विजडम ऑफ द बुध्दा - जॉन बॉईस्लर

एका ईटालियन लेखकाने लिहीलेला 'बुध्द' ...तुम्ही म्हणाल काय विषेश आहे त्यात ...म्हणून सांगतो...त्या काळचे संदर्भ,शिल्पे ,पाली आणी अर्धमागधी भाषेतील लिखाण,पुस्तकात थेट नोंदविले आहेत...त्या करिता तो सौता कंबोडिया , अफगाणीस्ताण आणी संपुर्ण आशिया खंड , जेथे जेथे पुरावे सापडतील तिथे जाउन आलेला आहे ..

६) वास्तव - सुरेश वैद्य
एका कुरुप पुरुषाचे, एका रुपवतीवरच प्रेम असते. पण त्याला त्याची काय परतफेड मिळते हे वाचण्यासारखे आहे...मी सांगीतले तर वाचनातील मजाच निघुन जायची

पुस्तकांचा क्रम आवडीप्रमाणे लावला आहे असं नाही.

68

१. India after Gandhi: भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आपल्याला शाळेत शिकवला जात नाही, श्री. रामचंद्र गुहा यांनी त्याच इतिहासाबद्दल लिहीलं आहे. हे पुस्तक पूर्ण वाचून झालं नाही आहे, पण पहिले दोन धडेतरी आवडले.

२,३. Science and Religion: बर्ट्रांड रसलचा आणखी एक मास्टरपीस. (जेनेरिक) धर्माचा उल्लेख असला तरीही रसलच्या लिखाणात बरेचसे उल्लेख ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीचे असतात. अतिशय मुद्देसूद लिखाण, बिनतोड युक्तीवाद आणि लॉजिक, आणि सुंदर, सोपी भाषा यांच्यामुळे हे पुस्तक आणखीच जास्त वाचनीय आहे.
याप्रमाणेच Marriage and moralsही सुंदर

४. Conquest of happiness रसलचंच आणखी एक अतिशय व्यवहार्य पुस्तक. याच पुस्तकाचा एकदम जमलेला अनुवाद म्हणजे करूणा गोखल्यांचं 'सुखी माणसाचा सदरा'. साधारण शंभर वर्षांपूर्वी लिहीलेलं असलं तरीही पुस्तक पुढची शंभर वर्षतरी कालबाह्य होणार नाही, जरूर संग्रही असावं असं पुस्तक.

५. 'मी हिंदू झालो' हे डॉ. रविन थत्ते यांचं पुस्तक ज्ञानेश्वरीतले निवडक वेचे आणि स्वतःच्या आयुष्यातले छोटे छोटे अनुभव घेऊन लिहीलेलं आणखी एक "उपदेशपर" तरीही साधंसरळ पुस्तक.

६. राम पटवर्धनांचं 'पाडस' .. आधीच एवढ्या लोकांनी मीमवर याबद्दल लिहीलं आहे. एकदा वाचून झालं की कोणतंही पान उघडावं आणि थोडा वेळ शांतपणे फ्लोरीडातल्या जंगलांमधे फिरून यावं.

७. खगोलशास्त्राच्या सुरूवातीसाठी प्राध्यापक मोहन आपट्यांची पुस्तकं: सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार, ब्रह्मांड, मला उत्तर हवंय. सोप्या भाषेत कठीण संकल्पना स्पष्ट करण्याच्या आपटेसरांच्या हातोटीला सलाम. त्यांचीच पुस्तकं वाचून माझ्या अभ्यासाची सुरूवात झाली म्हणायला हरकत नाही.
आपटे सरांची पुस्तकं डोळे मिटून विकत घ्यावीत. "मला उत्तर हवंय" या मालेत खगोलशास्त्र, संगणक, भौतिकशास्त्र ही पुस्तकंही आहेत.

१२.गिरीश कुबेर यांची 'एका तेलियाने' आणि 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या दोन पुस्तकांमधेही अगदी कंटेंपररी आणि सोप्या भाषेत खनिज तेलाचा इतिहास, अमेरिकन आणि पुढे युरोपीय कंपन्यांची अरेरावी, (माजी) सौदी तेलमंत्री, तारीक अब्दुल्ला आणि शेख झाकी यामानी, (माजी) सौदी राजे फैजल, इराणचे (माजी) पंतप्रधान मोसादेघ, लिबियाचे कर्नल गडाफी इ.इ. यांनी या कंपन्यांना दिलेला शह, अरब-ज्यू संघर्षाचा झालेला परिणाम इ.इ. सर्व गोष्टींवर लिहीलेली दोन उत्तम पुस्तकं. (मिपावर 'सुचेल तसं' यांनी या दोन पुस्तकांवर धागाच काढला आहे.)

१४. वीणा गवाणकरांचे एक होता कार्व्हर. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा कृष्णवर्णीय अमेरिकन कृषितज्ञ. गुलामगिरी ते कृषितज्ञ हा प्रवास थक्क करणारा. एकेकाळी स्वतःबद्दल डिप्रेशन येत आहे, आळशीपणा वाढत आहे अशा शंका यायला लागल्या की हे पुस्तक उघडून बसायचे. कोणत्याही पानावरून सुरूवात करायची, दोन तासात पुन्हा डिप्रेशन, आळशीपणा झटकला जायचा. वीण गवाणकरांनीच डॉ. खानखोजे, नाही चिरा ... हे चरीत्रही लिहीलं आहे. या क्रांतिकारक कृषितज्ञाचे ब्रिटीश राजवट उलथून टाकण्याचे प्रयत्न, तरीही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोसावे लागणारे कष्ट हे सगळंच स्फूर्तीदायी आणि डोळे उघडणारं!

राजेश, 'सेल्फिश जीन' यादीत होतंच, इतर दोनही टाकली आहेत.
सध्या इतकीच पुस्तकं आठवत आहेत, बाकी काही पुस्तकांबद्दल आधीच लिहील्यामुळे लिहीणं टाळत आहे.

खरं तर काय लिहायचे हा मोठा

69

खरं तर काय लिहायचे हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण कुठलंही पुस्तक असं हे मला आवडतं असं बाजुला करुन दाखवता येणं फार अवघड आहे. माझी अशी पुस्तकं निवडतांना निर्णयप्रक्रिया नसते कारण पहिल्यांदा वाचतांना पुस्तक मी शक्यतो वाचनालयातुनच आणुन वाचतो. कारणे अनेक १) सगळीच पुस्तके विकत घ्यायच्या लायकीची नसतात २) अनावश्यक पैसे खर्च होतात ३) काही पुस्तके असतील चांगली पण माझी त्यांच्याशी ट्युनिंग काही जमत नाही.

त्यामुळे वाचनालयातुन आणुन वाचायचे. आवडले आणि संग्रही ठेवावेसे वाटले तरच विकत घ्यायचे असा आमचा मध्यमवर्गीय खाक्या !

मला आवडलेली पुस्तके मनात येईल त्या क्रमाने -

१) वाल्मिकी रामायण (संस्कृत) - वाल्मिकी.

२) महाभारत (संस्कृत) - व्यास, वैशंपायन, सौती (परंपरेनुसार लेखक गणेश)

३) माझी जन्मठेप, १८५७ स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने (मराठी) - वि.दा.सावरकर

४) भारतीय मानसशास्त्र - पातंजल योग (मराठी)- कोल्हटकर

५) विवेकानंदांचे समग्र साहित्य

६) कादंबरी (संस्कृत) बाणभट्ट

७) राजा शिवछत्रपती (मराठी) - बाबासाहेब पुरंदरे

८) चाणक्याचे अर्थशास्त्र (मराठी) - हिवरगांवकर (अनुवाद)

९) दासबोध (मराठी) रामदासस्वामी

इतरही अनेक पुस्तकं आहेत. वाचल्यावर काही काळ आवडतात, पण नंतर कधी कधी त्यांच्यातलं काय नक्की आवडलं होतं हे सांगता येत नाही. मनाला भुरळ पाडणारी एखाद दोन वाक्ये यांपलीकडे त्यांचे काही मुल्य शिल्लक रहात नाही. किंचित काळ केलेली करमणुक आणि वाचन झाल्यावर उशीर झाल्याने आलेली हुकुमी झोप येवढेच यांचे कवतिक शिल्लक रहाते. आयुष्यात आवर्जुन उपयोगी पडेल असं काही नसतं. नुसताच पाचोळा असतो. अशा पुस्तकांचा नामोल्लेख हा वेळेचा अपव्यय. असो.

पुन:श्च एकवार उत्तम धाग्याबद्दल निर्मयीदेवींचे अभिनंदन.

कुणी कितीही नावं ठेवली तरी अधुन मधुन येणारे असे धागे पुस्तकांविषयी जनमानसात आस्था असल्याचे द्योतक आहेत. (आणि कदाचित अशा यादीत आपले सुद्धा नाव यावे अशी सुप्त इच्छा कुणाच्या मनात आली तर ते सुद्धा ह्या धाग्याचे फलितच चांगल्या अर्थाने !)

धन्यवाद.

खरं आहे...!!

70

".....कारण कुठलंही पुस्तक असं हे मला आवडतं असं बाजुला करुन दाखवता येणं फार अवघड आहे.>

खरंय !! नेमके याच वाक्याने मी माझ्या प्रतिसादाची सुरुवात केली होती.... पण तुम्ही केलेला उल्लेख हा प्रतिकात्मक असल्याने वेगळी सुरुवात केली.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

सध्या काय वाचतो ते सांगतो.

71

सध्या काय वाचतो ते सांगतो. एकावेळी अनेक प्रोजेक्टस चालू आहेत.
१. डॅन ब्राऊनचं - द लॉस्ट सिंबल वाचतोय. त्याच्या चिरपरिचित शैलीतच कथा आहे. टाईमपास म्हणून ठीक आहे. त्यातला नोएटिक सायन्ससंदर्भातला उल्लेख रंजक आहे.
२. फणिश्वरनाथ रेणु की सर्वश्रेष्ठ कहानियॉं- हा माणूस हिंदीतला 'श्रीना पेंडसे' असं समजायला हरकत नाही. प्रेमचंदोत्तर लेखक मंडळीत रेणुंचे योगदान फार मोठे आहे. बिहारमधील ग्रामीण जीवन त्यांनी तरलपणे मांडले आहे. चित्रदर्शी शैली हे एक वैशिष्ट्य.
३. प्रियंवद की कहानियॉं- ८० च्या दशकातील हिंदीतील महत्त्वाचा लेखक. २७ वर्षांत फक्त ४० कथा लिहिल्यात. पण त्या सगळ्या क्लास अशा आहेत. सुरवातीच्या दोन-तीन कथा वाचल्यात. त्यावरून त्यांच्या 'दर्जाचा' अंदाज येतो. मटाच्या दिवाळी अंकात त्यांची एक कथा अनुवादीत झाली होती, तेव्हा त्यांचा परिचय झाला होता.
४. बारोमासी- डॉ. ज्ञान चतुर्वेदी या लेखकाचे हे दुसरे पुस्तक. ही विनोदी कादंबरी आहे. बुंदेलखंडातील एका गावातील एक कुटुंब निवडून त्यांच्या आयुष्याच्या घटनांवर तिरकस भाष्य करत केलेलं कथन वाचनीय आहे. त्या भागातील जीवनपद्धती, भाषा, परंपरा यांची माहितीही या निमित्ताने मिळते. यांची पहिली कादंबरी नरक यात्राही गाजली होती. तीही विनोदीच आहे.
५. भारत का इतिहास-
६. अर्धीमुर्धी कहाणी- हे पुस्तक म्हणजे आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग आहे. त्यांची जडण-घडण कळायला मदत होते. बाकी पुस्तक फार वाचनीय नाही. पण गोस्वामींबद्दलच्या गुढामुळे वाचत गेलो.

आनंद...आनंद....!

72

माझ्या अत्यंत आवडीचा - नव्हे जिव्हाळीचा- विषय आहे हा. मी घरच्या अशा वातावरणात वाढलो आहे की जिथे भाकरीच्या अगोदर "आज काय वाचलेस रे?" या प्रश्नाचे उत्तर मला माझ्या मामांना द्यावे लागत असे (आज मी कमावता झालो असलो तरी या नात्यात/रितीत कोणताही फरक पडलेला नाही, पडला असलाच तर पूर्वी फक्त वाचलेल्या पुस्तकाचे वा प्रकरणाचे नाव सांगायचे, आजकाल त्यांच्याबरोबर - खोलवर नसली तरी - वाचलेल्या, अथवा येऊ घातलेल्या पुस्तकांवर सविस्तर चर्चा करू शकतोय. जेवताना टेबलवर अन्य काही बोलू नाहे असा "मेडिकल" प्रघात आहे - असेलही - पण आमच्याकडे हा नियम लागू नाही. वाचन, गाणे, सिनेमा (विशेषत: इंग्लिश आणि अन्य परकीय भाषातील) हे विषय लोणच्यासारखे तोंडी असतातच.

त्यामुळे मला सांगताना आनंद होतो कि मी बारावीच काय तर दहावीला येईपर्यंत मराठी आणि इंग्लिश मधील जवळ जवळ १०० पेक्षा जास्त गाजलेली (सर्वार्थाने...) पुस्तके वाचून काढली होती. (त्यावेळी मला त्यातील कितपत कळले होते, हा प्रश्न गौण आहे.....पण मला वाचनाचे जबरदस्त व्यसन लागले ही जमेची बाजू निशिचीतच नजरेआड करता येणार नाही.)

महाविद्यालयीन जीवनातदेखील असेच झाले. पदवीसाठी "इंग्लिश" हाच विषय प्रथम वर्षीच निश्चित झाला असल्याने त्या भाषेतील वाचन सुरूच होते. सांगायची गम्मत म्हणजे पदवी आणि पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात ज्या कादंब-या, कविता, टीकात्मक, आदी लावण्यात आल्या होत्या त्यापैकी ७५ टक्क्यापेक्षा जास्तीचे वाचन शेवटच्या वर्षात प्रवेश करण्यापूर्वीच झाले होते, त्याचा निश्चितच फायदा मला झाला. शिवाय एखाद्याच्या वाढदिवसाला "पुस्तक" - नव्हे पुस्तक"च" - भेट म्हणून द्यायचे हा आमच्याकडे अलिखित नियम असल्याने या निमित्ताने नित्यनेमाने स्थानिक विक्रेत्याकडे जाऊन पुस्तके मनमुरादपणे हाताळतादेखील येतात हा मोठा फायदा. अशावेळी ज्याला पुस्तक द्यायचे ते घेतल्यानंतर आपली देखील सहज म्हणून एखादी दुसरी खरेदी होतीच. उलटपक्षी हा नियम मलाही लागू असल्याने माझ्या वाढदिवसालादेखील जे कोणी मित्र येतात ते तीन चार छोटी मोठी पुस्तके आणत होते....नंतर मात्र जागेच्या अडचणीमुळे (ही सर्वत्र भासणारी चिंता आहे, पुस्तकांच्या संग्रहाबाबत...) मी मित्रांना पुस्तकांची निवड "तुम्ही करू नका" अशे सूचना केली, कारण कित्येकवेळा माझ्या संग्रही असलेली प्रत देखील नव्याने येत असे. पण आता ठीक आहे, त्या दिवशी नसेल पण नंतर ते आणि मी पुस्तकाच्या दुकानी जाऊन मला हवे ते पुस्तक खरेदी करतो.

निर्मयी यांनी पुस्तकांची जी "जाचक" अट घातली आहे.... अगदी "भिक्कार" वाटले असले तरी.... ती काय मला पाळता येणार नाही, कारण त्या दृष्टीने मी पुस्तकाकडे कधीच पाहू शकणार नाही. (मित्र आणि पुस्तक - ह्या दोन्ही बाबी कायमच्या हव्याहव्याशा वाटणा-या आहेत, त्यामुळे त्यांचे मोल ही तितकेच थोर....अर्थात हे वैयक्तिक मत आहे....असो.)

(चला नमनालाच घडभार तेल जाळल्यावर पुस्तकांच्या यादीकडे वळतो. माझा (किंवा आमचा...) स्वत:चा असा संग्रह, जो खूप मोठा आहे; त्यातील स्थान मर्यादा भयास्तव सर्वच पुस्तकांची यादी देता येणार नाही, तरीही खालील यादीवर एक नजर :

. सर्वप्रथम अर्थातच : जी. ए. कुलकर्णी ~~ या नावावर व त्यांच्या साहित्यावर लिहिण्यासाठी मला किमान दहा पानांची सोय आपण मला देणे गरजेचे आहे, तरच मी त्यांना न्याय देऊ शकेन. अर्थात "मी मराठी"वरील सर्वच सदस्यांना या नावाची जादू माहित असल्याने यांच्या पुस्तकाबद्दल खोलणे सांगण्याची फार आवश्यकता आहे असे वाटत नाही.

२. भालचंद्र नेमाडे : "कोसला"....."बिढार"...."झूल"...."जरीला...." या चार कादंब-यांना मराठी शारदेच्या अंगणात जे स्थान आहे ते वादातीत आहे. "कोसला" वर जे काही लिखाण झाले आहे (अगदी ५० वर्षापूर्वीच्या प्रथम आवृत्तीपासून....) ते पाहता असे भाग्य एका "रणांगण" शिवाय दुस-या कोणत्याही कादंबरीच्या वाटेला आले असेल का याची शंका आहे.

३. आठवणीतल्या कविता - (संपादक : सर्वश्री महाजन, बारावे, तेंडूलकर, पटवर्धन...) चारही भाग : प्रत्येक मराठी माणसाच्या घरी "असलेच" पाहिजेत असा संग्रह. केवळ "आनंद" याशिवाय दुसरी उपमा या संग्रहाना नाही. घरात आजी आजोबा जर असतील तर या कविता त्यांच्यासमवेत "शेअर" करायला खूपच गम्मत येते. (हा अनुभव मी घेतला आहे....) काही कविता अशावेळी त्यांच्या तोंडून ऐकायला जी मजा येते त्याला तोड नाही.

४. "मर्ढेकरांची कविता" ~ मौज प्रकाशन : मराठी साहित्यातील हे एक अढळ अविस्मरणीय नाव.....वादाच्या भोव-यात....साहित्यामुळेही आणि खाजगी जीवनामुळेही....पण आज आपल्या राज्यातील एकही विद्यापीठ असे नसेल की जिथे "मर्ढेकर" अभ्यासक्रमात नाही. ५०-६० वर्षापूर्वी जे नाव, जो मान, तोच आजही....आणि हीच खरी जादू या जादुगाराची.

५. "कार्यरत" ~ अनिल अवचट : चाकोरीबद्ध जीवनापेक्षा आगळे वेगळे जीवन जगून, उपभोगुन, समाजासाठी समाजातच राहून कार्य करणारे ("कार्यरत").... पण ज्यांच्याबद्दल "ना कुठे चिरा ना कुठे पणती..." अशी अवस्था असेलेल्यांचा कार्यापट आपणासमोर आणून श्री. अवचट यांनी (त्यांच्या खास अशा लकबीत....भाषेकर प्रचंड हुकुमत असलेले हे लेखक आहेत... प्रत्यक्षात स्वत:ही कार्यरत...) जे कार्य केले आहे, तीबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत.

यादी खूप खूप मोठी होऊ शकते.....(शिवाय इंग्लिश साहित्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे...). शेकडो लेखक आहेत ज्यांचे जनामनातील स्थाल अढळ आहे, जे लोकप्रिय आहेत...पण असेही आहेत जे विस्मरणात गेले आहे, पण त्यांची एखादी रचना समोर आली कि, लख्ख उजेडाचा लोळ समोर प्रकटावा असा भास होतो. पण त्यांच्याविषयी नंतर ... !! तूर्तास इतकेच !

(सध्या डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र "लमाण" ~ दुस-यांदा ~ वाचतोय.)

धन्यवाद निर्मयी जी....एक सुंदर धाग्याबद्दल !


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

>>अर्थात मिपा वरील सर्वच

73

>>अर्थात मिपा वरील सर्वच सदस्यांन>>>> मीम करावे हास्य

नाना म्हणतो तसं खरंच अवघड

74

नाना म्हणतो तसं खरंच अवघड आहे, कालपासून काय लिहावे याचा विचार करतोय. पण मला हा प्रश्न माझं वाचन फार तोकडं असल्याने पडला आहे! हास्य तरी जी वाचली आणि मनापासून आवडली त्यांची यादी पुढीलप्रमाणे:

मला इतिहासाच्या पुस्तकांची आवड आहे. शाळेत असताना 'श्रीमान योगी' वाचलं होतं आणि तेव्हापासून मनात घर करून आहे अगदी. आजही कधीही ते पुस्तक घेऊन चालू करतो कुठलाही प्रसंग जगायला. (भारतात गेल्यावर. घरी आहे. आत्ता इथे माझ्याकडे नाही आहे.) तसंच बाबासाहेब पुरंदर्‍यांचं 'राजा शिवछत्रपती' देखील आवडलं. दहावीच्या वर्षाला दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाचा अभ्यास करताना दोन व्यक्तीं अतिशय भावल्या होत्या मला. तेव्हा आमच्या सरांकडून मिळवून 'माईन काम्फ' (अर्थातच इंग्लिशमध्ये) वाचलं. तेव्हा इतकी इंग्लिश वाचायची सवय नसल्याने मला ते झेपलं नाही. पण पुढे एकदा पुन्हा हे पुस्तक हातात पडलं योगायोगानं कुठूनसं आणि यावेळी पुस्तक वाचून होईतो खरंच हिटलर एक थोर सेनानी, नेता होता ही गोष्ट मनावर कोरली गेली. आणखी एका व्यक्तीच्या आयुष्याबद्दल वाचण्याची फार इच्छा होत होती - बेनिटो मुसोलिनी. पण त्याच्याशी निगडीत कुठलंच पुस्तक कुठे मिळेचना. शोध शोध शोधलं पण नाही! एका ग्रंथप्रदर्शनात एका पुस्तकावर सहजच नजर पडली. 'मुसोलिनी' नाव झळकत होतं त्यावर! मला अत्यानंद झाला. १५० रुपयांचं पुस्तक होतं ते. आदल्या दिवशीच एक सत्यनारायण उरकून आलो होतो. त्या कमाईतून लागलीच ते पुस्तक खरेदी केलं. मी माझ्या स्वतःच्या पैशांनी विकत घेतलेलं हे पहिलं पुस्तक! फार छान आहे हे पुस्तक, मदन पाटील अक्षरशः इटलीत/मध्य युरोपात नेऊन आणतात. मुसोलिनीचं आयुष्य फारच फार वैशिष्ट्यपूर्ण होतं, विशेषतः त्याचा अंत. मुसोलिनीसारख्या धगधगत्या व्यक्तिमत्त्वाचा अंत इतका करूण व्हावा ही गोष्ट आजही मनास चटका लावून जाते.
पुलंची एकजात सगळी पुस्तकं आवडली. त्यांचं ललित लेखनही मस्तच! काही ई-बुक स्वरूपात उपलब्ध असल्याने कधीही मूड रिफ्रेश करण्याकरता वाचता येतात! गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत यांनी अगदी मनात घर केलेलंच आहे. आज कधी वाटलंच तर सरळ वपुर्झा उघडून बसतो. मला तितकंस आवडलेलं नाही वपुर्झा - कदाचित पुन:पुन्हा वाचत राहीन तेव्हा आवडेल अशा विचाराने वाचतो परत परत! हास्य
बाकी लहानपणापासून घरात 'धार्मिक' वातावरण असल्याने धार्मिक साहित्य बरंच वाचलं! त्यातलं माझं आवडतं पुस्तक(?) म्हणजे 'इति ऋग्वेदीयनित्यविधि:' यात प्रातःसंध्या, मध्याह्नसंध्या, सायंसंध्या इथपासून षोडशोपचार पूजा, पुरूषसूक्त, श्रीसूक्त, अथर्वशीर्ष सर्व काही आहे! माझं अत्यंत आवडतं पुस्तक, किंवा ग्रंथ म्हणूयात! तसंच घरात हिंदुधर्मासोबतच क्रिकेटधर्माचेही पालन होत असल्यानं ते धार्मिक साहित्यही बरंच वाचलं. अजित तेंडुलकरचं 'द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर' मीच वाचलं तर सनीचं 'सनी डेज', संदीप पाटीलचं 'सॅण्डी स्टॉर्म' लहानपणी बाबांनी वाचून समजावलेली स्मरतात. हास्य

तसंच बीएस्सीचा अभ्यास करताना 'रिलेटिव्हीटी: द स्पेशल अ‍ॅण्ड द जनरल थिअरी' वाचलं. जरी अभ्यासाचं पुस्तक असलं तरी आवडलं. आईनस्टाईन साला बाप माणूस!! हास्य

बाकी वाचायला तशी सिडनी शेल्डनची काही वाचली. मला नाय मजा आली बा.. इन फॅक्ट कंटाळा आला.. सगळे म्हणत होते म्हणून चेतन भगत ची 'वन नाईट..' आणि ' फाईव्ह पॉईंट..' दोन्हीत काही मजा आली नाही. थोडी थोडीच पानं वाचली त्या पुस्तकांची.. कायतरीच..

सध्या 'टू द लास्ट बुलेट' वाचतोय.. बरं वाटतंय..

बाकी धागा मस्तच!! माझ्यासारख्या या प्रांतातल्या नव्या प्रवाशाला बरीच माहिती देणारा आहे! निर्मयीदेवींना अनेक धन्यवाद!! हास्य

"मुसोलिनी" हे वाचायचे आहे,

75

"मुसोलिनी" हे वाचायचे आहे, शोध घेत आहे कुठे मिळेल याचा.

मला पु.लं. ची सगळीच पुस्तकं

76

मला पु.लं. ची सगळीच पुस्तकं आवडतात पण प्रवासवर्णन जास्त आवड्तात..
पूर्वरंग आणि अपूर्वाइ

धर्मवादळ : समकालीन प्रकाशन , निळू दामले.
माणसाच धर्माशी असणारं नात, श्रद्धेची वेगवेगळी रूपं, धर्माच लोकांना होणार आकलन श्रद्धाळूंची आक्रमकता, स्त्री आणि धर्म यावरील अत्यंत सुंदर विवेचन. ९-११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या ' धर्माच्या नावावर केली जाणारी हिंसा ' या जागतिक चर्चेचा उहापोह .

प्रकाशवाटा : समकालीन प्रकाशन, डॉ. प्रकाश आमटे
स्वामी : रणजीत देसाइ
मधुशाला : डॉ. हरिवंशराय बच्चन
मौनांची भाषांतरे: संदीप खरे
इथे ओशाळला मृत्यू
व्यासपर्व, पैस, दुपानी: दुर्गा भागवत
फ्रॉम थर्ड वर्ल्ड टू फर्स्ट : ली कॉन यू , सिंगापूरच्या यशाची गाथा, एका द्रष्ट्या राष्ट्रप्रमुखामुळं कुठच्या कुठ पोहोचलेला देश.
एका तेलियाने आणि हा तेल नावाचा इतिहास आहे : राजहंस प्रकाशन , गिरीश कुबेर
द सेल्फिश जीन
डॉ. खानहोजे , नाही चिरा..( वाचतेय )

द अर्ग्युमेंटेटीव्ह इंडीयन : अमर्त्य सेन , वाचताना आवडल होतं पण आता बर्‍यापैकी सुपरफिशिल वाटत


पुष्करिणी

आँ

77

विग्रजी भाषेतील पुस्तके लिष्टमधी चालतात व्हय. आमाला वाटलं मराटी सं... सं... संस्थळ (जमलं) हाय तवा फकस्त मराटी पुस्तकांची नावंच लिवायची हाईत. आता जावं दे, पुन्ना नवी लिष्ट नको.
(जावं दे काय, च्यायला विंग्रजी वाचता येतंय काय रं मुडद्या तुला)

तुमच्याकडे मराठी व इतर

78

तुमच्याकडे मराठी व इतर भाषेतील कोणती पुस्तके आहेत तेही सांगा

ह्येहे वाहाचहल न्हाहाई काहा?

त्ये बी खरंच

79

शीर्षक घाईने वाचले त्यामुळे 'आणि इतर भाषा' हे वाचले नाही. आज जरा वेळ मिळाला तर इंग्रजी यादी टाकेन. हिदीची मात्र मारामार आहे. पुणे तेथे हिंदी पुस्तक उणे असे दुर्दैवाने - माझ्यासारख्या कट्टर पुणेकरालासुद्धा - मान्य करावे लागते.
त्यामुळे हिंदीची यादी शरदबाबूंचे 'शेषप्रश्न', 'चरित्रहीन'; प्रेमचंद यांचे 'गोदान', बंकिमचंद्रांचे 'आनंदमठ', बच्चन यांची मधुशाला, कुर्रतुलन हैदर यांचे 'निशांत के सहयात्री', भारतींचे 'सूरज का सातवं घोडा' आणि श्रीलाल शुक्ल यांची 'राग दरबारी' यात संपते.

पब्लिक लयी भारी भारी पुस्तक

80

पब्लिक लयी भारी भारी पुस्तक वाचतय राव.
आम्ही आपली जेव्हा वेळ होता तेव्हा नेहमीची लोकप्रिय पुस्तक वाचली आहेत.
आणि आता वेळ मिळत नाहिये. Sad
पुल: यांच जवळजवळ सगळ लेखन आवडल.
वपु: सुरवातीला खुप गारुड वाटायच. आता मध्ये तीनचार कथासंग्रह वाचले पण त्यात आधीची मजा येइना. पण पार्टनर बेस्ट अस अजुनही वाटत.
ऐतिहासिक कादंबर्‍या: ह्यात श्रीमान योगी, छावा हे दोन्ही आवडले होते.
संभाजी राजांवरच विश्वास पाटलांच पुस्तकदेखील आवडल.
शाळा: बोकीलांच आवडलेल पुस्तक. कदाचित माझे शाळेतील दिवस आठवत गेले म्हणुन.
सिडने शेल्डनच्या अनुवादीत रहस्यकथा/ कादंबर्‍या आवडल्या.
पॅपिलॉन (अनुवादीत) खुप आवडल होत. जिद्द आणि चिकाटी म्हणजे काय हे पुस्तक वाचुन कळत. ह्याचाच सिक्वल बॅंको मात्र तितकस आवडल नाही.
आता बरेच दिवस झाले पुस्तक खरेदी करुन. लिस्ट देखील करुन ठेवली आहे.
करेन लवकरच. हास्य

वाचनखूण

81

वाचनखूण म्हणून सर्वाधिक माप या धाग्याच्या पदरी पडलं असणार. माझ्या वाचनाचं खुजेपण दाखवणारा धागा. लक्ष ठेवून आहे याद्यांवर.

काय श्रामो

82

माझ्या वाचनाचं खुजेपण दाखवणारा धागा
काय सक्काळ सक्काळ कोण भेटलं नाय वाट्टं तुम्हाला ! आं ? ;-)

ओ,

83

नाय मालक. लिहिण्यात काही चूक झाली का? तुम्ही असं लिहिलंत म्हटल्यावर उडालोय एकदम.
माझं वाचन खरंच इतकं नाहीये. इथं काहींच्या याद्या नुसत्या पाहिल्या तरी चकीत होतोय मी. त्या अर्थानं माझं एकूण वाचन खुजं आहे असं मी म्हणतोय. च्यायला राव, केवळ काही उदाहरणं देतो - मी रारंगढांग वाचलं तेव्हा चौथी आवृत्ती होती. माझं वय तेव्हा २४ होतं. यातून पुरेसं कळतं. व्यासपर्व आत्ता वाचलं सहा-आठ महिन्यांआधी. जी.ए. समग्र पूर्ण झालेले नाहीत अजून. श्री. दां.चा एकच संग्रह वाचला आहे. कुठला तेही आठवत नाही. तेंडूलकर तसे लांबच. खांडेकर एक-दोन. नावं आठवत नाहीत. मतकरी, दळवी मोजकेच. म्हणजे हे सारं वाचन कथा-कादंबऱ्या याकडंच जाणारं आहे. समीक्षा, कथनं जवळपास नाहीच.
शिवराम कारंत पूर्ण झाले नाहीत. भैरप्पांची दोन-तीनच. बाकी कानडी (म्हणजे अनुवादितच) लांबच.
लिखाणात चूक झाली असेल तर मात्र मनःपूर्वक दिलगिरी. दुरूस्ती सांगा. लगेच करतो.

भलताच 'तिढा' झालेला

84

भलताच 'तिढा' झालेला दिसतोय....

हाहाहाहा

85

हाहाहाहा... सोडवता?
जाऊ द्या. (इतर) पुस्तकांविषयी बोलू. wink

।। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी।।

86

मराठीतील सर्व पुस्तकांचा सार हा ज्ञानेश्‍वरीत आहे. इथूनच 'ज्ञा' ना ला सुरुवात होते. आणि पसायदानानेच याची सांगता.

मराठीतील अनेक पुस्तकं वाचली. इंग्रजीही वाचन होते.प्रत्येक पुस्तकातून भाषाशैली, शब्द संपदा, लेखनशैली
या सार्‍यांमध्ये एक वेगळेपण आपल्याला जाणवते. प्रत्येक साहित्य, मग ते कोणत्याही भाषेत असो, त्यातून ज्ञान मिळतेच. परंतु या ज्ञानाचा पाया मात्र एकाच ग्रंथात आहे. 'ज्ञानेश्वरी'

।। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी
एक तरी ओवी अनुभवावी।।

आनंदतनय

मी वाचलेल्यापैकी खुप पुस्तके

87

मी वाचलेल्यापैकी खुप पुस्तके इथे कव्हर झालीयत पंण मला सर्वात लक्षात राहिलेल पुस्तक म्हणाजे
"सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम बिरबल वे"---------मॅनेजमेंटच्या एकसोएक टीप्स आणि किस्से आहेत यात.

"नॉट विदाऊट माय डॉटर" पण जबरा पुस्तक आहे.

हो नक्किच

88

हो नक्किच..... नॉट विदाऊट माय डॉटर ... वाचायला घेतल तेवा वातल होत काही मजा दिसत नाहि... पन नन्तर एवद आवदल की सम्पौनच खाली थेवल हास्य

छान धागा

89

वा!!! धाग्याची वाचनखूण साठवली आहे. बरीच नावं आलेली आहेतच त्या यादीत वरातीमागून थोडीशी भर घालत आहे..
१. इसापनिती आणि पंचतंत्रः यातल्या काहि गोष्टी लहानपणापासून आपण वाचतो पण कितितर गोष्टी न ऐकल्या वाचलेल्या आहेत जरूर वाचाव्यात अशी पुस्तके
२. तीळ आणि तांदूळः गदीमांनि लिहिलेल्या सुंदर व्यक्तीचित्रांचे संकलन
३. मला निसटलच पाहिजे: लेखक विसरलो.. भाषांतरीत पुस्तक.. जेलमधून पळून सैबेरिया ते भारत असा चालत केलेला थरारक प्रवास
४. चिनीमाती, ग्रीकांजली, इजिप्तायन, मेक्सिकोपर्व, तुर्कनामा: मीना प्रभू.. मीनाप्रभु स्टाईल प्रवासवर्णनं.. खास पुस्तक लिहिण्यासाट्।ई जेव्हा कोणी फिरतं तेव्हा अनेक बारकावे टिपले जातात..म्हणून मला ह्यांचे लेखन आवडते, शिवाय निवडलेल्या प्रदेशाच्या नाविन्यामुळे मला ही अधिक आवडलेली पुस्तके आहेत
५.Inscrutable Americans: Anurag Mathur.. अमेरिकेत गेलेल्या भारतीयाचे अतिशय खेळकर आणि भयंकर विनोदी पुस्तक
६. माझे सत्याचे प्रयोगः मोहनदास क. गांधी .. याबद्दल मी काय लिहिणार हे फक्त वाचायचे

संग्रही पुस्तके:
यात वाचण्यापेक्षा संदर्भासाठी संग्रही असावित अशी पुस्तके
१. भारतीय पक्षी: सलीम अली (भारतात दिसणार्‍या पक्षांची सचित्र व रंजक माहिती)
२. डोंगर यात्रा: आनंद पाळंदे (सह्याद्रीतील प्रत्येक गड-किल्ला-डोंगराची माहिती)
३. आकाशाशी जडले नाते: जयंत नारळीकर


-ऋ

लाख टक्के सहमत

90

३. आकाशाशी जडले नाते: जयंत नारळीकर

लाख टक्के सहमत रे ऋषिकेशा. या सुंदर पुस्तकाला तोड नाही.


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

माझी आणखी भर ... तेरावा सुर्य

91

माझी आणखी भर ...
तेरावा सुर्य ... अमृता प्रीतम
सोलेदाद .. विलास सारंग
रीटा वेलिण्कर .. शांता गोखले
चुळ्चुळ मुंगी पळीपळी कंटाळा ... नरेश
भटक भहाद्दर भा. रा. भागवत.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

तेरावा सुर्य ... अमृता

92

तेरावा सुर्य ... अमृता प्रीतम

हे सध्या शोधतो आहे मी व त्याच बरोबर अस्वस्थ दशकाची डायरी.

आणि हे पण वाल्डन काठी

93

आणि हे पण
वाल्डन काठी विचारविहार..... दुर्गा भागवत (थोरो )


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

थोडी भर

94

१. मॅजेस्टिक प्रकाशनाचं 'मराठी कथा : विसावे शतक' हे के. ज. पुरोहित आणि सुधा जोशी यांनी संपादित केलेलं पुस्तक वाचण्यासारखं आहे. श्री. म. माटे, य. गो. जोशी, उद्धव शेळके इ. कथालेखकांची नावं ऐकून माहीत असतात, मात्र पुस्तकांच्या अनुपलब्धतेमुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे त्यांच्या कथा फारशा वाचनात आलेल्या नसतात. ती उणीव हे पुस्तक थोड्याफार प्रमाणात दूर करू शकेल. बाकी दि. बा. मोकाशी, गौरी देशपांडे, चि. त्र्यं. खानोलकर, चिं. वि. जोशी ह्या तुलनेने अधिक प्रसिद्ध लेखकांच्या कथाही यात आहेत. संग्रहाला लिहिलेली दीर्घ प्रस्तावनाही वाचनीय.

२. संस्कृतिसंगम - फ्लोरा सॅम्युएल
शनवारतेली म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी भाषक ज्यू समाजातील फ्लोरा सॅम्युएल ह्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या आणि मग इस्त्रायलमध्ये स्थायिक झाल्यावर तिथे आलेल्या अनुभवांवर लिहिलेलं पुस्तक. लेखनाच्या दृष्टीने फार असामान्य नसलं तरी वेगळ्या विषयावरचं. व्यवसायावरुन आलेली '-करान्त' आडनावं, मातृभाषा मराठीच इतपत अभिसरण झालेलं असलं तरी सबाथ पाळणं, कटाक्षानं मूर्तिपूजेचे प्रसंग टाळणं इ. तून दोन भिन्न सांस्कृतिक ओळखींतून होणारा संघर्ष दिसून येतो. इस्त्रायलमध्ये स्थायिक झाल्यावर तिथे भारतातल्या खुणा जपताना स्वस्तिक चिन्हामुळे होणारे गैरसमज, वैयक्तिक आयुष्यात आलेले आणीबाणीचे प्रसंग हा भागही रोचक.

३. मौनराग - महेश एलकुंचवार
एलकुंचवारांच्या बहुश्रुत व्यक्तिमत्वाचा, एकाच वेळी ललित लेखनावरील प्रभुत्वाचा आणि त्यांच्यातील विचारी कलाकाराचा प्रत्यय देणारं पुस्तक. 'सगळ्या कलांना संगीत व्हायचे असते' ह्या विचाराभवती गुंफलेला एक लेख काय किंवा आविष्काराच्या माध्यमाचं कधी कधी कलाकाराला ओझं होऊ लागतं आणि फ्रेंच कवी रॅम्बोसारखा तो मौनाचा मार्ग पत्करतो याचा उहापोह करणारा लेख काय; ह्या संग्रहातले सारेच ललित लेख वेगळ्या वाटेवरचे. वाचनीय हे विशेषण फारच तोकडं, घासून गुळगुळीत झालेलं वाटावं असे.

बाप रे, "मौनराग" ... मी हे

95

बाप रे, "मौनराग" ... मी हे पुस्तक वाचायला घेतलं. झेपलं नाही म्हणून सोडून दिलं ते आजतागायत कपाटात सगळ्यात तळाशी पडून आहे. मला कोणीतरी मदत करा रे या पुस्तकात नक्की काय आहे ते समजून घेण्यासाठी!

आभार

96

मौनराग ला +१. इतर दोन पुस्तके वाचण्यात आली नव्हती. ओळख करून दिल्यबद्दल आभार.

मला देशील का ते वाचायला?

97

मला देशील का ते वाचायला? कधीपासून वाचायचं आहे.

आत्तापर्यंत अज्जिब्बात न आवडलेली पुस्तके

नातिचरामी आणि दॅट थिंग कॉल्ड लव्ह - बेक्कार! Sad

आणि काही शुभ्र काही

98

आणि काही
शुभ्र काही जिवघेणे.....अंबरीष मिश्र
आपले आपणासी अनोळखी...अनुवाद---.......कुमार
साँलिटरी क्रीपर्स...
एक झाड दोन पक्षी ... विश्राम बेडेकर
सोनेरी टोळी.....नाथ माधव


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

मस्त पुस्तकं निवांत

99

मस्त पुस्तकं निवांत हास्य

५ मे निमित्त पुस्तक खरेदी....!!

100

माझा एक पूर्वीपासून प्रघात आहे.... तो म्हणजे "बालकवी" स्मृतीदिनी पुस्तकांची खरेदी करायची. किती? याला खास असे काही उत्तर नाही, पण मस्तपैकी तीन चार तास "अक्षर" पुस्तकालय येथे जायचे... तेथील सर्वच मला ओळखत असल्याने मनमुराद गप्पा करायच्या.... नवीन पुस्तकांचे आगमन चेक करायचे....आणि खिशाचा सल्ला घेऊन पुस्तकांची खरेदी करायची.

आज ५ मे.... त्यामुळे खरेदी क्रमप्राप्त होती..... तेही श्रीमती निर्मयी यांच्या या "पुस्तक" धाग्यावर देण्यासाठी जरा ब-यापैकी खरेदी केली आहे, ती खालीलप्रमाणे :
१. "पुन्हा मर्ढेकर ~~ विजया राजाध्यक्ष ~~ "मौज" पठडीतील अत्यंत देखणे पुस्तक आहे..... मर्ढेकर संबधित घटना आणि मित्र, नातेवाईक यांच्या फोटोंची रेलचेल आहे. फारच सुंदर खरेदी झाली आहे असे वाटते.
२. "वैर्‍याची एक रात्र" ~~ मूळ लेखिका ओल्गा लेन्ग्येल ~ अनुवादक जी. ए. कुलकर्णी ~ विश्वमोहिनी प्रकाशन
३. "अमेरिका" ~~ अनिल अवचट ~ माजेस्तिक प्रकाशन
४. "नॉट गॉन विथ दि विंड" ~~ विश्वास पाटील ~ मेहता पब्लिशिंग हाऊस ~ खूप सुंदर पुस्तक, हॉलिवुड, इटालियन, फ्रेंच, ब्रिटीश अशा अनेक अभिनव चाको-यांचा लेखकाने घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा. निर्मिती अतिशय दर्जेदार आहे.
याच बरोबर या महिना अखेरीस शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले आमच्या सदनिकेमधील एक वाचनवेडे काका यांना या निमित्ताने भेट देण्यासाठी पु. ल. देशपांडे यांची खालील पुस्तके : (पु. ल. त्यांना खूप आवडतात ! ~~~ कुणाला आवडत नाहीत?)
५. अघळ पघळ
६. उरलं सुरलं
७. हसवणूक
८. असा मी असामी
९. बटाट्याची चाळ


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

सुंदर धागा! अजून न वाचलेल्या

101

सुंदर धागा!
अजून न वाचलेल्या पुस्तकांची यादी वाढते आहे!
कृपया चालू ठेवा...
धन्यवाद!

ही आणखी काही .... कोवळी

102

ही आणखी काही ....

कोवळे दिवस....व्यंकटेश माडगुळकर
एका कोळीयाने (अनुवादित)....पु. ल.देशपांडे
माणसे अरभाट आणि चिल्लर.....जी.ए. कुलकर्णी.
डोंबार्‍याचा खेळ... भाऊ पाध्ये़.
खुबसुरत काकू .... भाऊ पाध्ये.
कृष्णा .... नारायण धारप


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

सदर धाग्याला वाचनीय पुस्तके

103

सदर धाग्याला वाचनीय पुस्तके अशी लिंक मुखपृष्ठावरुन द्यावी अशी मिमव्यवस्थापनाला विनंती करत आहे. जेणेकरुन नवीन वा जुन्या सदस्याला लगेच उपलब्ध होईल.

हो.. अशी व्यवस्था लवकर

104

हो..

अशी व्यवस्था लवकर करण्यात येईल.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वाचनीय पुस्तके अशी लिंक.....

105

अत्यंत उपयुक्त (आणि म्हणून...स्वागतार्ह) सूचना आहे..... संपादन समितीकडून स्वीकारली जाईलच, पण तसे झाले तर हा धागा "कायम" जागृत ठेवणे तितकेच गरजेचे आहे.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

किमया आणि शाश्वताचे रंग

106

किमया आणि शाश्वताचे रंग मिळाले! हास्य))))))
Party

शाश्वताचे रंग

107

शाश्वताचे रंग बद्दल लिहिलेत तर फार आवडेल.

+१

108

असेच म्हणतो. हास्य

सर्वात वरती हा धागा

109

सर्वात वरती हा धागा कायमस्वरुपी रहावी अशी व्यवस्था केली आहे.

पुस्तक सूची नावाने वरील मार्गदर्शक ब्लॉक मध्ये ह्या धाग्याला स्थान दिले आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त !

110

मस्त ! हास्य

धन्यवाद राजे

111

झकास काम केलेत.

Cervantes च्या Don Quixote चा

112

Cervantes च्या Don Quixote चा मराठी अनुवाद बय्राच वर्षापुर्वी वाचल्याचे आठवते. पण पुस्तकाचे नाव व अनुवादक आठवत नाहीत.कोणाला माहीत असल्यास कळवावे... सुंदर पुस्तक...


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

ड्रॅगन जागा झाल्यावर... अरुण

113

ड्रॅगन जागा झाल्यावर... अरुण साधू
आनंदी गोपाळ...जोशी
अलकेमिस्ट .. अनुवादित.. पाउलो काउलो


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

माझी यादी:

114

माझी यादी:
१. जी.एं.ची सर्व पुस्तके
२. आर्थर हेली: फायनल डायग्नोसीस, हॉस्पिटल, एअरपोर्ट, मनीचेंजर्स, इन हाय प्लेसेस, हॉटेल, स्ट्राँग मेडीसीन

यात जी.एं, बद्दल या समुदायाला पुरेशी महिती आहे असं दिसतं. आर्थर हेलीच्या सर्व पुस्तकांची मराठी भाषांतरे उप्लब्ध आहेत. एकेका व्यवसायाची पूर्ण माहिती घेऊन त्यावर कादंबरी असा सगला थाट. नाट्यपूर्ण कथानक, सशक्त व्यक्तिरेखा, ओघवती निवेदन शैली ही खास वैशिष्ठ्ये. एकदा पुस्तक वाचायला घेतलं तर संपे पर्यंत हातातून खाली ठेववत नाही हा अनुभव. त्यामुळे सुटी गाठूनच वाचायला घ्यावं हा मैत्रीपूर्ण सल्ला.
-अशोक


आपला स्नेहांकित...
-अशोक

वा

115

आर्थर हेली: फायनल डायग्नोसीस+१
खास लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे दोन प्रतिष्ठित तज्ञांकडून परस्परविरोधी डायग्नोसिस मिळाल्यानंतर पॅथॉलॉजी लॅब च्या इनचार्ज समोर पडलेला तिढा, नि शेवटी त्यातील एक निवडताना वापरलेला तर्क/विचार. डॉक्टर, पोलिस वगैरेंबद्दल एकांगी मते बाळगणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा. एकुणच सुरेख कादंबरी.

व्वा!

116

आपल्याला आवडलेलं पुस्तक दुस-या कुणालाही तितकंच आवडलेलं पाहून ते पुस्तक परत वाचल्या इतका आनंद झाला रमतारामजी!
आता जी.एं च्या 'रमलखुणा" मधील "इस्किलार" बद्दल कोण काय म्हणतंय ते ऐकायला मी उत्सुक आहे
-अशोक


आपला स्नेहांकित...
-अशोक

त्याबद्दल

117

आता जी.एं च्या 'रमलखुणा" मधील "इस्किलार" बद्दल कोण काय म्हणतंय ते ऐकायला मी उत्सुक आहे
त्याबद्दल आपल्या 'इस्किलार'लाच विचारू, कसे?
बाकी जी. एं. बद्दल सन्जोप राव ( हे त्यांचे जालीय नाव आहे) यांनी त्यांच्या अनुदिनी वर लिहिले आहे ते इथे पाहता येईल.

"इस्किलार...." कथा

118

डॉ. अशोक कुलकर्णी जी... आणि श्री. रमताराम....

"इस्किलार" बद्दल तुम्ही इतके चांगले बोलता हे वाचून अतिशय आनंद झाला. या कथेविषयी किती बोलु असेच मला नेहमी वाटत असते. अर्थात "जी. ए. कुलकर्णी" हा विषयच जादुमय आहे. जादुगार जसा आपल्या पोतडीतुन एका पाठोपाठ कुतुहलाच्या गोष्टी काढुन लोकांना मंत्रमुग्ध करतो, नेमकी तीच अवस्था जी.एं.च्या कथा वाचताना होते.... ही घेऊ की ती.... ही वाचु की ती.... ती सांगू की ही दुसरी !! त्यातही इस्किलार, प्रवासी, दूत, रत्न, यात्रिक,...... अन्... अन्...."विदुषक....". मराठी साहित्यातील ही लालभडक माणकेच.... निव्वळ हाताळायची म्हटले तरी ओरखडे पडतील.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

+१

119

इस्किलाराच्या कथासूचीला +१. याशिवाय 'स्वामी', 'कळसूत्र', 'बळी' 'ऑर्फियस', 'अंजन' आणि 'ठिपका' या मला आवडलेल्या कथा.

'कळसूत्र', 'बळी'

120

आपल्या यादीतील केवळ "बळी" जी. एं.च्या "मिथक" परंपरेतील नाही.... पण कथा आहे जबरदस्त.

"कळसूत्र" या क्षणी आठवते तुम्हाला ? असेल तर ती कथा जी. एं. नी कोणत्या व्यक्तीला नजरेसमोर ठेऊन लिहिली असेल याचा अंदाज करू शकाल ?


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

जे.कृष्ण्मूर्ती यांची

121

जे.कृष्ण्मूर्ती यांची पुस्तके,प्रामुख्याने,
' परस्परसंबंध ' , 'हिंसावृतीच्या पलीकडे ' , आणि ' परंपरा व परिवर्तन '
इतकं तर्कसंगत व बुध्दीवादी ( ह्या दोन्ही शब्दाबद्दल मला माफ करा कृष्ण्मूर्तीजी...)माझ्या तरी वाचनात आलं नाही.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

कृष्णमुर्ती

122

बरीच पुस्तके वाचली आहेत. कृष्णमुर्तींच्या लिखाणात मला मात्र अजिबात तर्कसंगती आढळली नाही.

अक्षयजी.. जे. कृष्णमूर्ती

123

अक्षयजी..
जे. कृष्णमूर्ती यांची विचारसरणी मुळातच पारंपारिक विचारसंस्कारांना धक्का देणारी आहे.त्यामूळे आपणास तसे वाटणे सहाजीकच आहे.माझ्यापुरते बोलायचे झाले तर त्यांच्या पुस्तकांची भेट झाली आणि माझा वाचनाचा शोध त्यांनी संपवला.
आपल्या शंकेचे निराकारण व्हावे असे मला मनापासून वाट्ते. डेव्हिड बोहम ह्या पदार्थविज्ञान शास्त्राच्या प्राध्यापकांशी त्यांचा झालेला संवाद मानवतेचे भवितव्य ह्या नावाने पुस्तकरुपात प्रसिध्द झाला आहे. आपण तो जरूर वाचावा. शक्यता आहे,आपल्याला आपल्या शंकेचे उत्तर मिळेल.
तसेच इथे मी.म.वर बरेच जे. कृष्णमूर्ती वाचलेले असतील.त्यांनी सुध्दा इथे प्रतिसाद द्यावा ही विनंती.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

डेविड बोहम यांच्याशी झालेला

124

डेविड बोहम यांच्याशी झालेला संवादही वाचलेला आहे. कृष्णमुर्तींचे विचार अपारंपारीक आहेत पण त्याचवेळी विचार न करणे, वर्तमानातच राहणे या गोष्टी माझ्या आकलनाच्या पलिकडे आहेत. मी विनयाने 'आकलनाच्या पलिकडे'हा शब्दप्रयोग करतो आहे. माझ्या इतर कृष्णमुर्ती अभ्यासकांशी झालेल्या चर्चांमधुन त्यांना (कृष्णमुर्तींच्या लेखनाला) काहीच अर्थ नसावा, असा अहंकारी विचारही मनात येतो. एका अडचणीच्या काळात कृष्णमुर्तींचे लिखाणाने खूपच आत्मिक बळ दिले, हेही प्रांजळपणे नमुद करावेसे वाटते.

बर्नार्ड शॉचे (अ‍ॅनी बेझंट व शॉ काही काळ प्रियकर-प्रेयसी असावेत) आत्मचरित्र मध्यंतरी वाचनात आले. त्यात कृषमुर्तींचे वर्णन 'जगातील एक सर्वात सुंदर माणुस' असे करतो. पण त्यापलिकडे फारसे वर्णन नाही.

जे. कृष्णमुर्तींचे विचार

125

जे. कृष्णमुर्तींचे विचार पुस्तके मी वाचली आहेत. जड लेखन आहे पण मुळापासून विचार करायला भाग पाडते. त्यांच्या "creative discontent" ह्या विचाराचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी काही वर्षापुर्वी (१०-१२ वर्षे झाली असतील) त्यांच्य कोटेशनचा/विचारांचा मला लागलेला अर्थ असे काही लेख स्वतःसाठी माझ्या डायरीत लिहिले होते, ती डायरी हरवली - पण वेळ मिळाल्यास मी लिहीन थोडेफार, मला जमेल तसे जे. कृष्णमुर्तींंवर.

अवश्य लिहावे....

126

अवश्य लिहावे....


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

मी सुध्दा जे कृष्णमुर्तीं एका

127

मी सुध्दा जे कृष्णमुर्तीं एका मानसिक अपघातानंतर विशिष्ट मनस्थितीत वाचले.आणि माझासुध्दा अनुभव आपल्यासारखाच... परंतू ..
एका अडचणीच्या काळात आत्मिक बळ देणाय्रा लिखाणाला काहीच अर्थ नाही हे कसे?


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

एका अडचणीच्या काळात आत्मिक बळ

128
एका अडचणीच्या काळात आत्मिक बळ देणाय्रा लिखाणाला काहीच अर्थ नाही हे कसे?

त्या काळात पुस्तकातील प्रत्येक विधानाचा अर्थ समजावून घ्यावा असा अट्टाहास नव्हता. त्यामुळे कदाचित नसलेला अर्थही लागण्याची शक्यता आहे.

इतरदा तेव्हा वाचलेल्या पुस्तकांतल्या बर्‍याच गोष्टींचा अर्थ मला लागत नाही.

इस्किलार

129

जीएं ची "इस्किलार" कथा दिवाळी अंकात आली अणि आमच्या औरंगाबाद्च्या "नाट्यरंग" ने राज्य नाट्य स्पर्धेत त्याचं नाट्यरुपांतर करायचं ठरवलं. माझा मित्र कै. कुमार देश्मुखनं नाट्यरुपांतर केलं मुख्य अड्चण जीएंच्या परवानगीची. संस्थेचा सचीव या नात्यानं मी त्यांना पत्र पाठवलं त्यात संस्था कशी हौशी आहे, स्पर्धे साठी नवीन संहिता कशा लागतात असं बर्ण्च भारूड लिहिलं. उत्तर येइल की नाही साशंकता होती. पण त्यांच्या मोत्या सारख्या अक्षरात उत्तर आलं. परवानगी मिळाली होती. पण आधी सर्व रुपांतर बघायला मागितलं होतं. मागणी रास्त्च होती. आम्ही रुपांतराची स्क्रिप्ट पाठवली. काही दिवसात परत सविस्तर उत्तर आलं. त्यांना रुपांतर आवडलं होतं ! फक्त त्यातल्या अर्नास या पात्रचं नाव "अनीस" झालं होतं. अर्थात ही कुमारची चूक नव्हती, दिवाली अंकाची होती. पत्रात जी.एंनी प्रयोग पहायला येइन असं लिहिलं होतं. पण ते आले नाहीत (ते असं कुठेच जात नाहीत हे खूप नंतर कळलं) नाट्काचा प्रयोग मुंबैला झाला. अनेक मान्य्वर आले होते. काहींनी तर जी. एं नी तुम्हाला परवानगी कशी काय दिली हे विचारून घेतलं (त्यातल्या एकाला त्यांनी स्वच्छ शब्दात परवानगी नाकारली होती)
प्रयोगाच्या निमित्तनं ही कथा परत परत वाचली. प्रत्येक वाचनात नवीच गोष्ट कळते. त्यांच्या कथातली उत्कृष्ठ कथा कोणती यावर वाद होतील. पण इस्किलार ती इस्किलार !
यानंतर मी जी.एंचा फ्यन झालो तो कायमचा! यातला मद्यागाराचा प्रसंग तर मास्टरपीस म्हणावा असा...
-अशोक


आपला स्नेहांकित...
-अशोक

इस्किलार म्हणजे काय? पात्राचे

130

इस्किलार म्हणजे काय? पात्राचे नाव आहे काय? तुम्ही किंवा आपले कोलापूरचे इस्किलार यांनी उत्तर दिले तरी चालेले. (ते पात्र असेल तर त्या इस्किलारचा अन आपल्या कोलापूरच्या इस्किलार चा स्वभाव वैगेरे एक आहे काय?)



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

इस्किलार....!!

131

अर्थ मीच देतो ~~

"इस्किलार" ही जी.ए. कुलकर्णी यांची एक प्रदीर्घ कथा (जी "रमलखुणा" या संग्रहात घेतली आहे...). ही कथा थोडीशी ग्रीक वळणाची असून कथेचा काळदेखील तोच "मिथक" परंपरेतील आहे. इस्किलार हे कुठल्या पात्राचे वा प्रसंगाचे नाव नसून तो जादूटोण्यातील एक संस्कार आहे. त्याचा थोडक्यात अर्थ असा की, कथेतील जमातीच्या परंपरेत एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे प्रेत दहन करून झाल्यानंतर त्या चितेभोवती पिठाच्या पाचसहा छोट्या बाहुल्या लावून ठेवतात. मध्यरात्रीनंतर तो अतृप्त आत्मे त्या जागी येतात आणि प्रेताचे रक्षण करीत असलेल्या त्या "इस्किलार" बाहुल्यांना खाऊन टाकतात. म्हणजेच दुसर्‍या बाजुने ते "इस्किलार" रक्षणाचे काम करतात असे म्हणू या. (थोडेसे भीतिदायक वाटते, पण तुम्ही ती कथा वाचाल तर फार प्रभावित व्हाल.)

मी ते नाव घेतले त्यावेळी अर्थातच या कथेच्या पार्श्वभुमीवर घेतले नव्हते. मला जी.एं.च्याच दोन कथापैकी ("प्रवासी" किंवा "यात्रिक") एक नाव घ्यावे असे वाटत होते, पण तेव्हा कळले की, प्रवासी या नावाने इथे त्यापूर्वीच कुणीतरी सदस्यत्व घेतले आहे, तेव्हा यात्रिकही गेले असेल म्हणून त्याऐवजी मग इस्किलार घेतले. बाकी काही हेतू नव्हता.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

हो पण एका दुसर्‍या

132

हो पण एका दुसर्‍या संस्थळावरचे नाव येथे उपलब्ध होते ना? तेच घ्यायचे होते.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

खूप चांगली माहिती मिळत आहे,

133

खूप चांगली माहिती मिळत आहे, इथे लिहिणार्‍या सार्‍यांचे आभार हास्य राजे, हा धागा सतत डोळ्यांसमोर राहील अशी व्यवस्था केलीत, ह्याबद्दल धन्यवाद. ह्यावेळी ही खरेदी केली -

आपले मराठी अलंकार - डॊ. म वि. सोवनी
मनातलं अवकाश - सुनीता देशपांडे
शाश्वताचे रंग - विद्याधर पुंडलीक
किमया - माधव आचवल
मण्यांची माळ - सुनीता देशपांडे
वारी - व्यंकटेश माडगूळकर
पुण्याचे पेशवे - अ रा कुलकर्णी
बहिणाईची गाणी - बहिणाबाई चौधरी
कबीराचे दोहे
कवितेच्या वाटेवर - अरुणा ढेरे
माणदेशी माणसं - व्यकंटेश माडगूळकर
चकवा चांदण:एक वनोपनिषद - मारुती चितमपल्ली
कुमार माझा सखा - डॉ. रेळे
A thousand splendid Suns - Khaled Hosseini

ह्यातील काही पुस्तकांवर लिहिते मग सावकाशीने.

'किमया' आणि "जास्वंद"

134

किमया - माधव आचवल
या पुस्तकाच्या खरेदीबद्दल आनंद झाला..... आचवलांची दोन्ही पुस्तके ~ 'किमया' आणि "जास्वंद" ~ या धाग्यात सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्यांने आपल्याकडे ठेवली पाहिजेत असे माझे मत आहे.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

समग्र सुहास शिरवळकर मी

135

समग्र सुहास शिरवळकर मी मराठीच्या ई-खरेदी दालनामध्ये उपलब्ध करुन देण्याचे कार्य चालू झाले आहे. १०-१२ पुस्तके आहेत आता सुहास शिरवळकरांची.

अजून कुठले राहीले असेल तर त्यांची सुची द्यावी.

ही विनंती.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अगदीच न नावाजलेले लेखकांची

136

अगदीच न नावाजलेले लेखकांची नावे अन पुस्तके दिसत नाही. म्हणजे जाहीरातीचा परिणाम होतो का?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पाषाणभेद, तुम्ही लिहा अन असे

137

पाषाणभेद, तुम्ही लिहा ना असे काही लेखक आणि पुस्तकं माहिती असतील तर.. जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

अमुक ऐक चे स्वातंत्र नावाच्या

138

अमुक ऐक चे स्वातंत्र नावाच्या पुस्तकाविषयी ऐकले आहे.(लेखक शशांक ओक... नाडी वाले नसावेत)कुणाला काही माहीती आहे ?


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

एका काडातून क्रांती एका जपानी

139

एका काडातून क्रांती एका जपानी पुस्तकाचा अनुवाद आहे. लेखक अनुवादक आठवत नाही. मला कोणी सांगेल का?


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

सापडला का कोण आहे प्रकाशक

140

सापडला का कोण आहे प्रकाशक ?
मी गेली दोन दिवस झाले प्रकाशक शोधत आहे.

परिसर प्रकाशन चे नाव दिसत आहे काही जागी पण त्यांना विचारले तर ते नाही म्हणत आहेत Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

>>एका काडातून क्रांती आवडले

141

>>एका काडातून क्रांती

आवडले मला हे पुस्तक.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझी यादि

142

* अ बेटर ईनडिया अ बेटर वल्ड - आर. एन. नारायन मूर्ती अनुवाद : चित्रा वाळिम्बे

जरूर वाचावींत अशी तीन पुस्तके

143

कष्ट आणि जिद्द .मह्त्वाकांक्षा यांच्या जोरावर आपलं नाव कमावण-या असामांन्याची कहाणी
१) कहाणी लंडनच्या आजिबाइंची- सरोजिनि वैद्य
अशिक्षित ,इंग्रजी भाषा माहित नसतांनाही लंडनमध्ये खाणवळीचा व्यवसाय करून लंडनची आजिबाइं
अशी आपली ओळख निर्माण करण-या आजीची सत्यकथा
२)हि श्री ची इच्छा -श्रीनिवास ठाणेदार
एका
मराठी माणूस ते अमेरिकेतील उद्योजक असा प्रवास
३) माझंही एक स्वप्न होतं-वर्गीस कुरियन
धवल क्रांन्तीचे जनक वर्गीस कुरियन ,आणंद सारख्या खेड्यात आपली कर्मभुमी करणारे,अमुल द टेस्ट ....अशा अमुची निर्मीती करणारे वर्गीस कुरियन यांची कहाणी
तीनही पुस्तके जरूर वाचावीं नाउमेद माणसाच्यात उमेद निर्माण करण्याची ताकद या पुस्तकांत आहे.

हे पुस्तक ईथे असायलाच हवे..

144

हे पुस्तक ईथे असायलाच हवे..
१९८४ (अनु) अशोक पाध्ये ..जार्ज ओरवेल


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

अरे वा

145

यावरून प्रसिद्ध 'अ‍ॅनिमल फार्म' आठवले. नॅशनल बुक ट्रस्ट्ने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. एक नंबर पुस्तक.

अ‍ॅनिमल फार्म म्हणजे अर्क आहे

146

अ‍ॅनिमल फार्म म्हणजे अर्क आहे अर्क.. मस्त आहे.. खुप दिवसानी विषय निघाला.. आज वाचतोच..

Brief History of Time हे

147

Brief History of Time हे स्टीफन हॉकिंग्ज यांचे गाजलेले पुस्तक.त्याचा मराठी अनुवाद "काळाचा छोटासा इतिहास" या नावाने श्री वि.शं. ठकार यांनी केला आहे.विश्वाची उत्पत्ती आणि त्याचे भवितव्य याची कहाणी सांगणारे हे उत्कॄष्ठ पुस्तक. आवर्जून वाचावे असे.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

+१ सहमत

148

मस्त पुस्तक आहे. माझ्या संग्रहात हे पुस्तक आहे याचा मला आनंद आहे... जेव्हा कधी ज्ञानपिपासा जागृत होते तेव्हा तेव्हा हे पुस्तक आवर्जून वाचतो... विज्ञानात रस असणार्‍यांसाठीच हे पुस्तक आहे एवढे मात्र नक्की...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

the theory of everything

149

the theory of everything हास्य

उपलब्ध आहे देऊ का पाठवून

मला गाढ झोप लागते.. २-३ पानं वाचली की Big smile


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

रस हवा

150

इंग्रजी नाही मराठी अनुवाद आहे माझ्याकडे... स्पेस सायन्स मराठीतून (मातृभाषेतून) समजायला सोपे जाते
विषयात रस नसेन तर झोप येणारच राजे wink

अवांतरः फुकट पाठवणार असाल तर मला आनंदच आहे wink हा हा हा Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/