संस्कृत धडा ५

0
0

मागील भागापर्यंत धातुचे वर्तमानकाली रुप आणि भुतकाली रुप पाहीले

धातु - वद् - बोलणे
वर्तमान काल

प्रथम पुरूष - वदामि वदावः वदामः (अनुक्रमे एकवचन, द्विवचन, बहुवचन)
द्वितीय पुरुष - वदसि वदथः वदथ (--//--)
तृतीय पुरुष - वदति वदतः वदन्ति (--//--)

भुतकाल

प्रथम पुरूष - अवदम् अवदाव अवदाम (अनुक्रमे एकवचन, द्विवचन, बहुवचन)
द्वितीय पुरुष - अवद: अवदतम् अवदत (--//--)
तृतीय पुरुष - अवदत् अवदताम् अवदन् (--//--)

आता या भागात आपण भविष्यकाली रुपे पाहु.

प्रथम पुरुष

अहम् वदिष्यामि - मी बोलेल
आवाम् वदिष्याव: - आम्ही दोघे बोलु
वयम् वदिष्यामः - आम्ही सर्व बोलु

द्वितीय पुरुष

त्वम वदिष्यसि - तु बोलशील
युवाम् वदिष्यथः - तुम्ही दोघे बोलाल
यूयम् वदिष्यथ - तुम्ही सर्व बोलाल

तृतीय पुरुष

बालकः वदिष्यति - बालक बोलेल
बालकौ वदिष्यतः - ती दोघे बालके बोलतील
बालकाः वदिष्यन्ति - सर्व बालके बोलतील

पठ् धातु साठी हेच

पठिष्यामि पठिष्यावः पठिष्यामः
पठिष्यसि पठिष्यथः पठिष्यथ
पठिष्यति पठिष्यतः पठिष्यन्ति

असे होईल.

नमुन्यादाखल वर्तमान कालीन रुप आणि त्याचे भविष्यकाली रुप दाखवले आहे.
त्याचा नीट अभ्यास करा

रामः लिखति - रामः लेखिष्यति

सीता लिखति - सीता लेखिष्यति

बालकौ गच्छतः - बालकौ गमिष्यतः

तौ पठतः - तौ पठिष्यतः

ताः पठन्ति - ताः पठिष्यन्ति

अहम् जयामि - अहम् जेष्यामि

यूयम् अर्चथ - यूयम् अर्चिष्यथ

वयम् क्रीडामः - वयम् क्रीडिष्यामः

आतापर्यंतच्या भागांमधे आलेले नामे आणि धातु अशा प्रकारे चालवुन पहा, वापरुन पहा

बरेचसे नेहमीच्या वापरातले धातु आणि त्यांची रुपे इथे मिळतील, त्यांचा वापर करुन पहा.

क्रमशः

भलतीच फाश्ट चालली आहे गाडी

1

भलतीच फाश्ट चालली आहे गाडी Sad आधीचं सगळं वाचून पण नाही झालय...
वाचनखूण साठवते.

मस्त रे नाना.. झकास्स

2

मस्त रे नाना.. झकास्स चाललंय!! हास्य

वाचतोय !!

3

मागचा पण राहीलाय अजुन ...

फार सुरेख चालू आहे शिकवणी..

4

फार सुरेख चालू आहे शिकवणी.. मी नोट्स काढत आहे. खूप उपयोग होतोय. ८वी तले संस्कृत सगळे हळूहळू आठवू लागले आहे! हास्य प्लीज ही लेखमाला कंप्लीट कराच!

असेच म्हणते...

5

सुरेख चालली आहे शिकवणी!

छान आहे... हा

6

छान आहे... हा उपक्रम.....

मस्त वाटत आहे एवढी चांगली लेखमाला मीमवर चालू आहे हे पाहून.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुढचा लेख कधी?

7

पुढचा लेख कधी?

+१

8

असेच म्हणतो.. वाट पाहतोय रे नाना!

होमवर्क पण द्या!

9

होमवर्क पण द्या!


पुष्करिणी