नथुराम गोडसे आणि खारे शेंगदाणे ~~ अंतिम इच्छेचे स्वरूप !!

0
0

(प्रथमच हे स्पष्ट करतो की, लेखाच्या शीर्षकावरून कुणी हा अर्थ काढू नये की याचे प्रयोजन "गांधीहत्या आणि गोडसे" असा काही आहे. बिलकुल नाही.)

बडोदा येथे काही कामानिमित्त आलो असताना मिसळपाव वरील एक सदस्यासामावेत इ-मेलिंग चालू होते, त्यावेळी त्यानी "आता बडोद्यात आला आहात तर तेथील प्रसिद्ध खारे शेंगदाणे जरूर खाणे जे नारळाच्या पाण्यात भिजवून करतात..." अद्याप शहरात गेलेलो नाही त्यामुळे हे खारे शेंगदाणे अजून लांबच आहेत. तरीही मेल मधील या उल्लेखाने ३० जानेवारी १९४८ हा दिवस आठवला आणि आठवली दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरात श्री. नथुराम गोडसे यांच्यासाठी "खारे शेंगदाणे" मिळविण्याची श्री. विष्णूपंत करकरे व श्री माधव आपटे यांची धडपड (किंवा धावपळ...!)

याचे वर्णन इंग्लिश साहित्यात खास आपल्या अशा शैलीमुळे सुविख्यात झालेले लेखक श्री. मनोहर माळगावकर यांनी त्यांच्या "गांधी हत्या" या विषयावर लिहिलेल्या "The Men Who Killed Gandhi" (The Lotus Collection, Roli Books, Pvt.Ltd., New Delhi, Edition 2008, Price Rs.395/-) या अतिशय गाजलेल्या पुस्तकात केले आहे. त्यातील दिनांक ३० जानेवारी १९४८ च्या घडामोडीवरील हे एक प्रकरण, ज्याचा मी शब्दश अनुवाद न करता स्वैर अनुवाद करीत आहे जो या लेखाचा विषय आहे.

गांधी हत्येच्या निर्णयाला अंतिम स्वरूप दिल्यानंतर यात प्रत्यक्ष सामील असलेल्या वरील तिघांनी २९ जानेवारी १९४८ रोजी अमृतसर एक्स्प्रेसने जुनी दिल्ली स्टेशन गाठले. तथापि त्या अगोदर बिर्ला भवन परिसरात झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची व गुप्तचर विभागाची दिल्लीतील सर्व प्रकारच्या यात्री निवासस्थानावर करडी नजर असल्याने या तिघांनी रात्र दिल्ली स्टेशनच्या गेस्ट रूममध्ये व ३० तारखेची सकाळ त्या नंतर रीटायरिंग रूम मध्ये तसेच प्लेटफॉर्मवरच पाकिस्तानातून "निर्वासित" बनून आलेल्या व तिथे गर्दी करून राहिलेल्या शेकडो प्रवाशांच्या समवेतच काढण्याचे निश्चित केले होते. बिर्ला भवन येथे गांधीजींची सायंकाळची प्रार्थना ठीक ५ वाजता सुरु होत असल्याने नथुराम यांनी ४ वाजेपर्यंतचा वेळ त्या प्लेटफॉर्मलगतच्या सेकंड क्लासच्या जनरल वेटिंग रूम मध्ये घालविण्याचा निर्णय घेतला होता व करकरे आणि आपटे हे दोघे अस्वस्थपणे इकडे तिकडे भटकत राहिले होते, तसेच अधून मधून शांतपणे विश्रांती घेत असलेल्या नथुराम यांच्याकडे येऊन त्यांना पहात होते. पुढे काय होणार आहे याची पक्की खात्री असल्यामुळे (नथुराम यांनी निर्णय घेतला होता की, गांधी हत्येनंतर आपण तिथून पळून न जाता तिथेच बेरेटा (पिस्तुल) समवेत पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे...) जणू काही आता नथुराम बरोबरची आपली शेवटचीच हे भेट आहे. बोलण्यासाठी काही तरी विषय काढावा म्हणून त्यांनी नथुराम यांना विचारले, "या क्षणी तुला काही प्यावेसे अथवा खावे असे वाटते काय?" विशेष म्हणजे त्यावेळी नथुराम John Fergusson या लेखकाचे Night in Glenzyle हे पुस्तक वाचत बसले होते, ते म्हणाले, "होय, मला आता खारे शेंगदाणे खावेसे वाटतात."

दोघानाही (करकरे आणि आपटे) खूप बरे वाटले आणि "घेऊनच येतो" असे सांगत झटकन विश्रांती गृहातून बाहेर पडले. पण त्यांच्या दुर्दैवाने स्टेशनच्या परिसरात असे एकही दुकान नव्हते की जेथे खारे शेंगदाणे मिळू शकले असते. इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर निराश मनाने दोघेही परत फिरले. त्यांचे पडेल चेहरे पाहून नथुराम किंचित हसले आणि त्यांना बरे वाटावे म्हणून उदगारले, "मला माहित होतेच की तुम्हाला खारे शेंगदाणे इथे मिळणार नाही. कारण मागच्या फेरीत मी हा अनुभव घेतला आहे." थोडा वेळ गेला आणि जणू काही मृत्यू शय्येवर पडलेल्या नातेवाइकाशेजारी बसल्याची जाणीव आपटे यांना झाल्यामुळे त्यांनी करकरे यांना मानेने खूण केली आणि "आम्ही थोड्याच वेळेत परत येतो" असे नथुराम यांना सांगून ते विश्रांती गृहाच्या बाहेर पडले. त्या दोघानाही आता बिर्ला हाउसच्या परिसरात असलेली त्यावेळेची हालचाल पहायची होती म्हणून बाहेर आल्यावर लगेच एका टॅक्सीला हात केला. त्या गाडीने अकबर रोड बाजूने बिर्ला हाउसकडे गेले, हालचालींची पाहणी केली आणि इंडिया गेटकडून परत स्टेशनकडे गाडी घेण्यास चालकास सांगितले. त्या नुसार गाडी वळण घेत असतानाच करकरे यांनी अधीर आवाजात टॅक्सिवाल्याला गाडी थांबवण्यास सांगितले.

आपटे यांनी काळजीयुक्त स्वरात विचारले.... "का, काय झाले?"
"ते पहा" करकरे यांनी आपटे यांचे लक्ष इंडिया गेट जवळील एका जागेकडे वळविले. त्या ठिकाणी एक फिरता विक्रेता "खारे शेंगदाणे" विकत होता. उत्साहाने लागलीच शेंगदाण्याची खरेदी झाली आणि ३ वाजता दोघेही दिल्ली स्टेशनच्या त्या जागेकडे आले. खा-या शेंगदाण्याची पुडी करकरे यांनी नथुराम यांना देताच त्यांचे डोळे विस्मयाने चमकले, "म्हणजे? तुम्ही हे खारे शेंगदाणे आणण्याकरिता पुण्याला गेला होता कि काय?" एवढे बोलून नथुराम यांनी समाधानाने ते खारे शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली. "ती" ऐतिहासिक घटना घडण्यापूर्वी त्यांची काही तरी खास खाण्याची ईच्छा त्यांच्या मित्रांनी अखेर पुरी केली होती.

आता इथे मनात एक प्रश्न येतो, तो असा की, खरेच जीवनाच्या अशा "मृत्युदायक" निर्णयाच्या वेळी संबधित माणसाची काहीतरी विशेष खाण्याची जी इच्छा होते तिचे रहस्य काय असावे? माझ्या एका मित्राच्या आजीने तिच्या मृत्युच्या अगोदर एक रात्र, "तुला काय देऊ का?" असे विचारल्यानंतर खुणेने म्हणा किंवा पुटपुटत "सोलकढी" मागितली होती. घरातील लोकांना थोडे आश्चर्यच वाटले होते कारण ती आजारी पडण्यापूर्वी गेली कित्येक वर्षे त्या घरात सोलकढी कधी केली नव्हती, मग आजींना अचानक तिचीच आठवण का यावी? अर्थात याला तार्किक उत्तर असे काही लागलीच मिळत नाही. पण इच्छा पूर्ण करण्यासाठी संबधित नातेवाईकांची तसेच मित्र परिवाराची जी धावपळ होते तिला काय नाव द्यायचे किंवा त्याची काय तर्कसंगती असेल ?

आपल्यातील काही सदस्यांना असले काही अनुभव आले असल्यास ते चर्चेत यावेत ही अपेक्षा !

+ + = उगाच नंतर कोणाची

1

glass + gold +sing = उगाच नंतर कोणाची धावपळ नको... काय wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शेंगदाणे, फोल(पटं)पणा

2

आयुष्याचा एक दिवस बाकी असताना सगळ्याचाच फोलपणा जाणवत असेल का?

खुप मोठा प्रश्न विचारला आहे

3

खुप मोठा प्रश्न विचारला आहे तुम्ही राजेश साहेब,

खरोखर आपला अंत जवळ आलेला आहे हे कळल्यावर काय मनस्थीति होत असेल त्या व्यक्तीची तो काय विचार करत असेल तो जे जगला त्याचे रसग्रहण तो कश्यापध्दतीने करत असेल हे शोधणे नक्कीच रोचक ठरेल. जिवनभर राबराब राबून (थंड एसीमध्ये बसून नाहीतर दगडाची उशी व आकाशाची चादर करुन जगलेले दोन प्रकारच्या दोन्ही व्यक्ती) आपल्या संध्यासमयी ते कसा विचार करतील... काय कमवले काय गमवले ह्याचा होशोब कसा करत असतील ????


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

फोलाची पटं आणि सोलाची

4

फोलाची पटं आणि सोलाची कढी
ढोराची मेहेनत उशाशी दगडी
कूलाची एसी किंवा आकाशाची माडी
शेवटची घडी तरी राहिलीच कोडी...

फोलाची पटं....

5

सुरेखच !!!

तुमचे हे कडवे वाचताना का कोण जाणे, मला मेल मधून एका मित्राने पाठविलेली "काव्यविहारी" यांची "जगाचा न्याय" या कवितेतील खालील कडवे आठवले.

"मार्गावरि ठायी ठायी, हिंडतात गोगलगाई,
जग तुडवी त्यांना पायी, परि नाग विषारी फणा काढुनी डौलाने जायाचा"

आता हे का आठवले, त्याचे प्रयोजन काय इ. ची कारणमीमांसा करता येत नाही. आठवले हे खरे !


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

मला मोदक

6

मला मोदक

जब प्राण तनसे निकले

7

यावरून अनुप जलोटांनी म्हणलेल्या ओळी आठवल्या:

"इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले
गोविंद नाम लेले, तब प्राण तनसे निकले
...

उस वक्त जल्दी आना, नही शाम भूल जाना
राधे को साथ लाना, जब प्राण तनसे निकले

श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो
मेरा सावरा निकट हो, तब प्राण तनसे निकले..."

असे ऐकले आहे की भगतसिंग त्रयीने त्यांना फाशीच्या ऐवजी गोळ्या घालून मारा अर्थात वीर मरणाची मागणी केली होती. चाफेकरांनी हातात गीता ठेवून फाशीस जाणे पसंद केले. नथुरामची वरील गोष्ट मी पहील्यांदाच ऐकली आहे. त्याच्या कृत्याचे समर्थन अजिबात न करता देखील, तो पूर्णपणे जे काही करत होता त्यासंदर्भात "डिटरमिन्ड" होता असेच म्हणावेसे वाटते. त्यामुळे द्विधा मनस्थिती नव्हती... खारे दाणे काय आणि गांधीहत्या करून स्वतःच्या मरणाचे दार उघडणे काय, सगळेच सारखे वाटले असावे...त्याने फासावर चढवल्यावर पण कुठेच भययुक्त खळबळ न करता प्राण सोडले असे ऐकले आहे - खरे-खोटे माहीत नाही. तसेच अमेरिकेत (क्लिंटन) सरकारवरील राग काढायला म्हणून अमेरिकन उजव्या विचारांच्या तिमोथी मॅक्वे याने बाँबस्फोट घडवून (पाळणाघरातील) लहानमुलांसकट मोठ्यांना मारले, सरकारचे एक खाते उध्वस्त केले. तो अर्थात पळून गेला होता पण पकडला गेला. मात्र मरताना तो अतिशय शांतपणे आणि "संदेश" देत मेला... कारण परत तेच. स्पृहणीय नसले तरी डिटरमिनेशन.

बाकी म्हातारीचे मन कशात अडकले आहे, काय पुटपुटते म्हणून विचारून कान जवळ केलेल्या मुलाला मरणोन्मुख म्हातारीकडून ऐकायला मिळते की "अरे ती शेरडी केरसुणी खाते आहे, तीला बाजुला कर.." हास्य


विकास देशपांडे

"डिटरमिन्ड" ... !!

8

"...... नथुरामची वरील गोष्ट मी पहील्यांदाच ऐकली आहे."

चित्रा जी. सदरची गोष्ट पहील्यांदाच ऐकली आहे तर तुम्हाला हेही माहित नसेल की, नथुराम आणि माधव आपटे यांना "सिमला" येथे फाशी दिली गेली. होय, बाकीच्यांना अंबाला (पंजाब) येथील तुरुंगात ठेवले गेले तर या दोघांना फासावर चढविण्यासाठी सिमला येथे नेले. फाशीच्या सकाळीदेखील त्यांची मन:स्थिती अत्यंत शांत होती असे सरकार दप्तरी नोंद केले गेले आहे. पहाटेच्या वेळी नित्यनेमाने करीत असलेले गीता पाठ आटोपल्यानंतर दोघांचे स्नान झाले. धाकटे बंधू गोपालराव यांनी नथुराम यांना विचारले, "आण्णा, दाढी करणार आहेस?", तीवर नथुराम, गालावर हाथ फिरवीत उदगारले, "राहू दे, नाहीतर मला कुठे पार्टीला जायचे आहे." शेवटचा रिवाज म्हणून वार्डनसमवेत दोघांचा चहा झाला....आणि नंतर फाशी स्तंभाकडे त्यांना नेण्यात आले. त्यावेळी दोघांच्याही हातात "अखंड भारतमाते" चा नकाशा होता, तसेच भगवा झेंडा होता, गीतेची प्रत होती. उघड्यावर येऊन प्रथमच त्यांनी पहाटेच्या सुमाराचा सूर्य पाहिला. आपटे यांनी नथूरामचे लक्ष सूर्याकडे वेधले, त्याला पाहून नथुराम म्हणाले, "होय, मला नेहमीच सिमला येथील सूर्य आवडतो..."..... आणि स्तंभाकडे जाताना त्यांनी शेवटची घोषणा दिली : "अखंड भारत अमर रहे...!"


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

उप्स

9

योग्य तो बदल केला आहे त्यामुळे तुमचा प्रतिसाद काढला आहे.
व्यवस्थापक


विकास देशपांडे

पवार साहेब किस्सा आवडला.

10

पवार साहेब किस्सा आवडला.

सद्ध्यातरी जिवंतपणी कुठल्या अपेक्षा-इच्छा पुर्ण करायच्या आहेत इतकाच विचार आहे, (कुठल्या ते लगेच विचारु नका चार चौघात!) मृत्युसमयीच्या इच्छांचा आत्ता तरी विचार नाही, पण त्यावेळच्या बर्‍याच फँटसीज वाचलेल्या असल्याने त्या अनुभवायच्या व लिहायच्या अशी एक कल्पना बरेच दिवस मनात आहे. असो.


-Nile

एक कल्पना ....

11

जरूर लिहा.... तुमच्याकडे लिखाणाची जबरदस्त ताकत असल्याने जे काही लिहाल ते निश्चितच विलोभनीय असेल. (बाय द वे, हे "पवार साहेब" कोण? नाव ऐकल्यासारखे वाटते...! ते बारामतीचे तर नव्हेत ना?)


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

बोंबला च्यायला! अहो त्या

12

बोंबला च्यायला!

अहो त्या मृत्युशय्येवर अनुभवायच्या आणि तिथेच लिहायच्या असे म्हणतोय हो!

कप्पाळ आमच्याकडे लिखाणाची जबरदस्त ताकत आहे!! wink


-Nile

ताकत .....!

13

".... कप्पाळ आमच्याकडे लिखाणाची जबरदस्त ताकत आहे!!..."

यालाच मराठीमध्ये "विनयशील स्वभाव" असे म्हणतात !!!!!!


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

जब प्राण तनसे निकले

14

यावरून अनुप जलोटांनी म्हणलेल्या ओळी आठवल्या:

"इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले
गोविंद नाम लेले, तब प्राण तनसे निकले
...

उस वक्त जल्दी आना, नही शाम भूल जाना
राधे को साथ लाना, जब प्राण तनसे निकले

श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो
मेरा सावरा निकट हो, तब प्राण तनसे निकले..."

असे ऐकले आहे की भगतसिंग त्रयीने त्यांना फाशीच्या ऐवजी गोळ्या घालून मारा अर्थात वीर मरणाची मागणी केली होती. चाफेकरांनी हातात गीता ठेवून फाशीस जाणे पसंद केले. नथुरामची वरील गोष्ट मी पहील्यांदाच ऐकली आहे. त्याच्या कृत्याचे समर्थन अजिबात न करता देखील, तो पूर्णपणे जे काही करत होता त्यासंदर्भात "डिटरमिन्ड" होता असेच म्हणावेसे वाटते. त्यामुळे द्विधा मनस्थिती नव्हती... खारे दाणे काय आणि गांधीहत्या करून स्वतःच्या मरणाचे दार उघडणे काय, सगळेच सारखे वाटले असावे...त्याने फासावर चढवल्यावर पण कुठेच भययुक्त खळबळ न करता प्राण सोडले असे ऐकले आहे - खरे-खोटे माहीत नाही. तसेच अमेरिकेत (क्लिंटन) सरकारवरील राग काढायला म्हणून अमेरिकन उजव्या विचारांच्या तिमोथी मॅक्वे याने बाँबस्फोट घडवून (पाळणाघरातील) लहानमुलांसकट मोठ्यांना मारले, सरकारचे एक खाते उध्वस्त केले. तो अर्थात पळून गेला होता पण पकडला गेला. मात्र मरताना तो अतिशय शांतपणे आणि "संदेश" देत मेला... कारण परत तेच. स्पृहणीय नसले तरी डिटरमिनेशन.

बाकी म्हातारीचे मन कशात अडकले आहे, काय पुटपुटते म्हणून विचारून कान जवळ केलेल्या मुलाला मरणोन्मुख म्हातारीकडून ऐकायला मिळते की "अरे ती शेरडी केरसुणी खाते आहे, तीला बाजुला कर.."


विकास देशपांडे

"डिटरमिन्ड"....!!

15

...... नथुरामची वरील गोष्ट मी पहील्यांदाच ऐकली आहे."

विकासजी. सदरची गोष्ट पहील्यांदाच ऐकली आहे तर तुम्हाला हेही माहित नसेल की, नथुराम आणि माधव आपटे यांना "सिमला" येथे फाशी दिली गेली. होय, बाकीच्यांना अंबाला (पंजाब) येथील तुरुंगात ठेवले गेले तर या दोघांना फासावर चढविण्यासाठी सिमला येथे नेले. फाशीच्या सकाळीदेखील त्यांची मन:स्थिती अत्यंत शांत होती असे सरकार दप्तरी नोंद केले गेले आहे. पहाटेच्या वेळी नित्यनेमाने करीत असलेले गीता पाठ आटोपल्यानंतर दोघांचे स्नान झाले. धाकटे बंधू गोपालराव यांनी नथुराम यांना विचारले, "आण्णा, दाढी करणार आहेस?", तीवर नथुराम, गालावर हाथ फिरवीत उदगारले, "राहू दे, नाहीतर मला कुठे पार्टीला जायचे आहे." शेवटचा रिवाज म्हणून वार्डनसमवेत दोघांचा चहा झाला....आणि नंतर फाशी स्तंभाकडे त्यांना नेण्यात आले. त्यावेळी दोघांच्याही हातात "अखंड भारतमाते" चा नकाशा होता, तसेच भगवा झेंडा होता, गीतेची प्रत होती. उघड्यावर येऊन प्रथमच त्यांनी पहाटेच्या सुमाराचा सूर्य पाहिला. आपटे यांनी नथूरामचे लक्ष सूर्याकडे वेधले, त्याला पाहून नथुराम म्हणाले, "होय, मला नेहमीच सिमला येथील सूर्य आवडतो..."..... आणि स्तंभाकडे जाताना त्यांनी शेवटची घोषणा दिली : "अखंड भारत अमर रहे...!"


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

"कानात पुटपुटणे"....!

16

".......बाकी म्हातारीचे मन कशात अडकले आहे, काय पुटपुटते म्हणून विचारून कान जवळ केलेल्या मुलाला मरणोन्मुख म्हातारीकडून ऐकायला मिळते की "अरे ती शेरडी केरसुणी खाते आहे, तीला बाजुला कर.."

या उदाहरणावरून असाच एक किस्सा आठवला >> माझे मामा वर्ग-१ सरकारी अधिकारी आहेत व त्यांची नोकरी ही बरीचशी फिरत्या स्वरूपाची, (ऑडीट टाईप) असल्याने या गावाहून त्या गावी, तेथून पुढे, मागे, त्यामुळे सतत प्रवास. पाच लोकांची टीम आणि गाडीचा चालक असा कारभार. साधारणात: तीन वर्षापूर्वी त्यांच्या सहाय्यकाला प्रवासात सौम्य अटॅक व बेशुद्ध अवस्थेत त्यांना कोल्हापूरला आणले गेले. रीतसर रिपोर्टीन्ग झाल्यानंतर एका स्पेशॅलिस्टकडे पेशंटला अ‍ॅडमिट करण्यात आले. त्यानंतर ते सहकरी तीन आठवडे जगले, व त्यांचा दवाखान्यातच मृत्यू झाला. शेवटचा आठवडा माझे मामा सतत त्याच्या बेडजवळ बसून होते, कारण गेली २० वर्षे दोघांनी एकत्र काम केले होते त्यामुळे कार्यालाबाहेर देखील त्यांचे नाते मित्रत्वाचे राहिले होते. सदरचे महोदय त्या शेवटच्या आठवड्यात मामांना बोटाने खूण करून बोलावून घेत आणि त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटत. त्यांचे थोरले चिरंजीव व मी एकाच महाविद्यालयात शिकलो असल्याने त्यांचाशी घरोबा होताच, व त्यामुळे मी ते "कानात पुटपुटणे" प्रसंग तीन चार वेळा पाहिला होता. साहजिकच मला उत्सुकता लागून राहिली होती की जगताप काका (त्यांचे नाव) यांची नेमकी शेवटची इच्छा काय असावी. मृत्युनंतरचे सारे सोपस्कार आटोपल्यानंतर एके दिवशी सहज मामांना "त्या" कानात पुटपुटण्याबाबत विचारले, तर मामा म्हणाले, "अर्रे, खुद्द मीदेखील गोंधळात पडलोय. जगताप मला सांगून गेले की, सर, नलिनीला सांगा की बरे वाटल्यानंतर आपण नक्की मथुरा व्रीन्दावनाला जाऊ या !" मी विचारले, "मग यात गोंधळात पडायचे कारण काय?" त्यावर त्यांनी उत्तर दिले, "होय, कारण काही नाही, पण ही "नलिनी" कोण याचा मलाच काय पण त्यांच्या घरातील कुणालाच पत्ता नाही. या नावाची वा टोपणनावाची मुलगी, तरुणी, बाई, नात्यातील, पै पाहुण्यातील, कार्यालयातील वा परिचयातील, कुणीही, कुठेही नाही, सगळीकडे चौकशी केली. आता त्यांच्या घरातीलच नव्हे तर माझ्याही मनाला ही गोष्ट लागून राहिले आहे की, कुठून ही नलिनी शोधून काढायची."


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

आयुष्याचा एक दिवस बाकी असताना

17

आयुष्याचा एक दिवस बाकी असताना सगळ्याचाच फोलपणा जाणवत असेल का?

नक्की ह्यांचे उत्तर तो व्यक्तीच देऊ शकतो.
सर्वसामान्य लोकांचे तत्वज्ञान खुप लवचिक असते व त्यांचे विश्व हे घरापुरते मर्यादित, त्यामुळे त्या क्षणी त्यांना काही फोलपणा जाणवण्यापेक्षा चिंता लागून राहत असेल, की माझ्यानंतर ह्यांचे काय होणार इत्यादी. पण जे एका उंचीवर पोहचले आहेत ( मोठा नेता, आध्यात्मिक गुरु इतर) त्यांना नक्कीच फोलपणा जाणवत असेल कारण तो क्षण येऊ पर्यंत, त्यांने निर्माण केलेल्या तत्वांची हेटाळणी / गैरवापर त्याच्याच समर्थकांकडून सुरु झालेली असेल अथवा होणार हे कळलेले असते.

श्री सर्वसाक्षी, ह्यांचे आभार http://www.mimarathi.net/node/4027 त्यांच्या ह्या लिंकमुळे हा सुरेख लेख व प्रतिसाद वाचावयास मिळाले.

आभारी आहे.

आयुष्याची आता झाली उजवण येतो

18

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडे गोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंज-याचे दार उघडावे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

असावीस पास जसा स्वप्नं भास
जीवी कासावीस झाल्याविन
संधीप्रकाशात अजून को सोने
तो माझी लोचने मिटो यावी

तेव्हा सखे आन तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेलेल त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे

संधीप्रकाशात अजून को सोने
तो माझी लोचने मिटो यावी

वाळल्या ओठां दे निरोपाचे फुल
भूलीतली भूल शेवटली
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

असावीस पास जसा स्वप्नं भास
जीवी कासावीस झाल्याविन
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर बाकीबाबांची ही कविता आठवली..

शब्दच नाहीत

19

Grade Grade Grade


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/