संस्कृत धडा ४

0
0

मागील भागापर्यंत धातुचे वर्तमानकाली रुप पाहीले

धातु - वद् - बोलणे
प्रथम पुरूष - वदामि वदावः वदामः (अनुक्रमे एकवचन, द्विवचन, बहुवचन)
द्वितीय पुरुष - वदसि वदथः वदथ (--//--)
तृतीय पुरुष - वदति वदतः वदन्ति (--//--)

आता या भागात आपण भुतकाली रुपे पाहु.
संस्कृतात भुतकाळाची तीन रुपे असतात.
त्यातील प्रथम भुतकाळ आपण पाहु.
द्वितीय व तृतीय (ज्याची अनेक रुपे होतात) नंतर बघु

प्रथम भुतकाळ

प्रथम पुरुष

अहम् अवदम् - मी बोललो (होतो)
आवाम् अवदाव - आम्ही दोघे बोललो(होतो)
वयम् अवदाम - आम्ही सर्व बोललो (होतो)

द्वितीय पुरुष

त्वम अवदः - तु बोललास (तु बोलला होता)
युवाम् अवदतम् - तुम्ही दोघे बोललात
यूयम् अवदत - तुम्ही सर्व बोललात

तृतीय पुरुष

बालकः अवदत् - बालक बोलले
बालकौ अवदताम् - ती दोघे बालके बोलली
बालकाः अवदन् - सर्व बालके बोलली

पठ् धातु साठी हेच

अपठम् , अपठाव, अपठाम
अपठः, अपठतम्, अपठत
अपठत्, अपठताम्, अपठन्

असे होईल.

नमुन्यादाखल वर्तमान कालीन रुप आणि त्याचे प्रथम भुतकाळी रुप दाखवले आहे.
त्याचा नीट अभ्यास करा

रामः लिखति - रामः अलिखत्

सीता लिखति - सीता अलिखत्

बालकौ गच्छतः - बालकौ अगच्छताम्

तौ पठतः - तौ अपठताम्

ताः पठन्ति - ताः अपठन्

अहम् जयामि - अहम् अजयम्

यूयम् अर्चथ - यूयम् आर्चत

वयम् क्रीडामः - वयम् अक्रीडाम

आतापर्यंतच्या भागांमधे आलेले नामे आणि धातु अशा प्रकारे चालवुन पहा, वापरुन पहा

क्रमशः

मस्त! एक शंका आहे

1

मस्त! एक शंका आहे नानागुरूजी.

'वद्' धातुचे वकाद्विपुबव 'वदथ' आणि 'अर्च' धातुचे (धातु बरोबर आहे का?) वकाद्विपुबव 'अर्चत' अशी विसंगत का?
त्या त्या धातुंची प्रभूद्विपुबव रूपे अनुक्रमे अवदत आणि आर्चत विसंगत वाटत नाहीत.

'वद्' धातुचे वकाद्विपुबव

2

'वद्' धातुचे वकाद्विपुबव 'वदथ' आणि 'अर्च' धातुचे (धातु बरोबर आहे का?) वकाद्विपुबव 'अर्चत' अशी विसंगत का?

अर्च धातुचे वकाद्विपुब "अर्चथ" असेच होते 'अर्चत' नाही. (मी त टंकला होता, ती चुक होती, धन्यु)

>>>त्या त्या धातुंची प्रभूद्विपुबव रूपे अनुक्रमे अवदत आणि आर्चत विसंगत वाटत नाहीत.
प्र भु रुपे करतांना आधी अ लावला जातो. अर्च च्या आधी अ लावुन आर्च झाला म्हणुन आर्चत असे झाले.
अर्च ची भुतकाळी रुपे खालीलप्रमाणे

आर्चम् आर्चाव आर्चाम
आर्चः आर्चतम् आर्चत
आर्चत् आर्चताम् आर्चन्

धन्यु! मोठेपणा रे नाना तुझा!

3

धन्यु! हास्य

मोठेपणा रे नाना तुझा! हास्य असो. आत्मनेपदी धातुंसाठी वेगळा धडा काढतोयस काय?

आधी अजुन काही काळ (आज्ञार्थ,

4

आधी अजुन काही काळ (आज्ञार्थ, विध्यर्थ, भविष्य) घेईन.
मग गण, विकरण, पद यांचे विवेचन घेईन. म्हणजे नंतर फक्त रुपं दिली तरी प्राथमिक वापर माहित असेल.

मस्तच!! चालू दे~ समास वगैरे

5

मस्तच!! चालू दे~ समास वगैरे पण घे!! मजा येईल!!

आणि हो एखादी परीक्षा पण घे!! नुसतेच पाठ घेऊन काय साध्य व्हायचं नाही!! ज्यांनी ज्यांनी म्हणून नावनोंदणी केलीये, सगळ्यांना बसव परीक्षेला!! हास्य

नाना मी एक सुचवू का?

6

तुम्ही काही संस्कृत एस एम एस तयार करा व पाठवा, हळु हळू संस्कृतचा वापर वाढेल. बाकी संस्क्रुतप्रसारात टि आर पी मिसळलात की काम फत्ते होईलच!

मस्त लेखमाला.

7

मस्त लेखमाला.

जबरदस्त ..

8

जबरदस्त ..