बॅक सिट

0
0

"व्हॉट डू यू फील व्हेन यू सी अ फिमेल ड्रायविंग विथ अ मेल ऑन बॅक सीट"?
माझा हा मित्र 'इ' मोशनल झाला का इंग्रजी मधुन बोलतो.
स्कुटर का कार?
"अर्थात स्कुटर"
चौकट स्पष्ट कर.
"म्हणजे"?
उदाहरणार्थः एक मुलगी आपल्या जन्मदात्याला स्टेशन वर सोडायला स्कुटर वर नेते त्यात काय वाटायचे?
"बायको नवर्‍याला किंवा एक तरुणी दुसर्‍या तरुणाला नेत असेल तर"?
(पहील्याचे काय झाले कुणास ठाउक?)
मला काहीही वाटत नाही.
"नक्की"?
नक्की. काय आहे ते नीट सांग.
" अरे एका लग्नाला गेलो होतो. ठाण्यातच होत. घ्ररचेच लग्न होते. सर्व खानदान हजर. मला जरा लवकर निघायचे होते.
बायकोने स्कुटर आणली होती. तीला म्हटले तु ये सावकाश. मला एक मिटींग आहे. मी निघतो. तर ती म्हणाली मी सोडते. हॉल च्या बाहेर पार्कींग मधे स्कुटर होती. मी दरवाजावर उभा. तीथे एक भाचा त्याच्या बायकोबरोबर निघायच्या तयारीत होता. बायको म्हणाली मी चालवते.. भाचा ते तेवढ अयकुन पटकन हॉल मधे पळाला. स्कुटर सुरु करुन दरवाजाच्या बाहेर येता येता जरा वेळ लागला. बघतो तर काय सर्व खानदान दरवाजात उभे. कुणी तरी शिट्टी वाजवली.
कुणी 'बेस्ट लक' म्हटले. "वेरी गुड नाईट अँड हॅव अ नाईस टाईम" वरुन खी खी खी. अगदी फुल वर्क्स"
हॅहॅहॅ
"आता ह्यात हसण्यासारखे काय?"
हे बघ, तु सर्वांना 'फँटसी लँड' मधे नेलेस त्याची प्रतिक्रिया दुसरे काहीही नाही.
"कै च्या कै"
तु मला विचारलेस मी माझे मत सांगितले.
तुमचे मत काय?

माझं मत: बिग डील? ज्यांना

1

माझं मत: बिग डील? ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलूदेत, ज्यांना स्कूटर चालवायची आहे त्यांना चालवू देत, ज्यांना पिलीयन रायडर बनायचं आहे त्यांना बनू देत.

मला स्वतःला वाहन चालवण्यापेक्षा मागे बसून, शेजारी बसूनच मजा येते ... मस्त रस्त्यावर इकडे तिकडे बघायचं, वाईट चालकांना शिव्या द्यायच्या वगैरे! ट्रेन, बससारख्या वहानातून (गर्दी नसेल आणि फार वेळ थांबायला लागणार नसेल तर) सुख नाही.

माझ्या मते हा नॉन इश्यु आहे.

2

माझ्या मते हा नॉन इश्यु आहे.

तुमचे मत काय?

3

भाच्याला समुपदेशनाची गरज असावी.

फक्तं भाच्याला नाही तर

4

फक्तं भाच्याला नाही तर अख्ख्या खानदानाला समुपदेशनाची गरज आहे.

"बीग डील!" असेच म्हणतो.

-अनामिक

अगदी! आख्ख्या खानदानाला

5

अगदी!

आख्ख्या खानदानाला समुपदेशनाच्या बरोबरच, टी.व्ही. बंद, वगैरे वगैरे जालिम उपायांची गरज आहे.

काय मास्तर ? वेळ जात नाहीये

6

काय मास्तर ? हास्य वेळ जात नाहीये का ? हास्य

आम्हाला लाँग रुट ला पुढे बसुन भण्णाट स्पिड ने बाईक चालवायला आवडते , तर एफ्सी,एम्जी रोड सारख्या ठिकाणी फिरती टेहेळणी करण्यासाठी मागे बसायला आवडते.

- विनाकारण फसू

तुमचे मत काय?

7

"व्हॉट डू यू फील व्हेन यू सी अ फिमेल ड्रायविंग विथ अ मेल ऑन बॅक सीट"?

त्यात मला काहीही वाटत नाही.

हॅहॅहॅ .. तेच ना .. जे काय

8

हॅहॅहॅ .. तेच ना .. जे काय वाटायचं ते त्या मेल-फिमेल ला वाटेल हास्य

- ईंग्रज

>>>एका लग्नाला गेलो होतो.

9

>>>एका लग्नाला गेलो होतो. ठाण्यातच होत. घ्ररचेच लग्न होते. सर्व खानदान हजर

ठाण्यातील लोकांना नितांत समुपदेशनाची गरज आहे.
काही अगदी मागासलेले आहेत तर काही वाह्यात चित्र न्याहाळत बसतात.

ठ्ठो

10

ठ्ठो

काही अगदी मागासलेले आहेत तर

11
काही अगदी मागासलेले आहेत तर काही वाह्यात चित्र न्याहाळत बसतात.

हॅहॅहॅ .. आणि काही पक्के हुकलेले असतात हा भाग अलहिदा हास्य

- अमोनिया

काय बी नाय कळाले....

12

काय बी नाय कळाले....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मला अर्थच नाही कळलाय.

13

thinking मला अर्थच नाही कळलाय.

मी तर

14

बॅक सिटचा खुप आस्वाद घेतला आहे wink आणि अजुन घ्यायला आवडेल मला. Party


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मला स्वतःला शहरात वाहन

15

मला स्वतःला शहरात वाहन चालवायचा प्रचंड कंटाळा+चीड आहे.. तेव्हा ते काम माझी बायकोच करते (आणि मी वहानानूसार मागे/बाजुला बसतो).
तेव्हा अदिती म्हणते त्याप्रमाणे हा मोठा प्रश्नच नाहि किंवा असलाच तर अगदी वैयक्तिक चॉइसचा प्रश्न आहे


-ऋ

स्टीरिओटाईप्स

16

मास्तर असे स्टीरिओटाईप्स नेहेमी वापरतात काही तरी चर्चेचा धुरळा उडवून द्यायला हास्य

"भारत हा एकाचवेळी अनेक शतकांत वावरत असतो" असे कुणीसे म्हंटल्याचे आठवते, अशाच चर्चा पाश्चात्य देशात साधारण ७५ वर्षांपूर्वी झाल्या असतील का ? हास्य

>>> अशाच चर्चा पाश्चात्य

17

>>> अशाच चर्चा पाश्चात्य देशात साधारण ७५ वर्षांपूर्वी झाल्या असतील का ?
--- हे माहीत नाही, पण मात्र बायकोने स्कूटरच्या मागच्या सीटवर बसल्यावर आपल्या नवर्‍याच्या खांद्यावर हात ठेवावा की ठेवू नये यावर काही वर्षांपूर्वी वाचकांच्या पत्रव्यवहारात जोरदार चर्चा झाली होती, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं wink

सी...समटाईम्स इ वुड सिट ऑन द

18

सी...समटाईम्स इ वुड सिट ऑन द बॅक सिट (तेव्हढाच चान्स wink )

कै च्या कै... असले विचारच करु

19

कै च्या कै...
असले विचारच करु नयेत...
आपल्याला जे पटतं ते कराव.. अजिबात लाजु नये.. wink