असं म्हणतात पहिलं प्रेम , पहिली खरेदी ,शाळेचा पहिला दिवस ,पहिल्या पगारातून आणलेली वस्तु आपल्याला कधिही विसरता येत नाही.आमच्याकडे तांब्यापितळ्याच्या खूप वस्तू होत्या. मी माझ्या वडिलांना अनेक वेळा म्हटलं आपण त्या वस्तू मोडीत देऊ .तांब्याचे पिंप देऊन स्टीलचे पिंप घेऊ पण वडील याला तयार होत नव्हते.ते म्हणाले आपल्याकडे काही नसतांना मी या वस्तू घेतल्यात .माझ्या पगारातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून वस्तू जमवल्यात.वडिलांचे बोलणे मनावर फारसं न घेता मी एक दिवस सर्व जुन्या वस्तू बाहेर काढल्या.त्यामध्ये मला माझ्या लहानपणीचा छोटा तांब्या सापडला.मी या तांब्याशिवाय कधी पाणी प्यायलो नाही .माझा तांब्या कुणी घेतलेला मला आवडायचे नाही.हा तांब्या नसेल तर मी जेवत नसे.माझ्या लहानपणीच्या आठवणी त्या तांब्याने जाग्या केल्या.तो तांब्या मला खूप प्रिय होता वडीलांच मन मला त्या घटनेनंतर कळल होतं.माझ्याकडे मी घेतलेली पहीली बाईक जपून ठेवलेली आहे.आपल्याही असतील अश्या काही आठवणी.एखादी गाडी ,आवडती पँन्ट,चादर ,शाल चला शेअर करु या !
प्रगतीच्या वाटेवर जात असतांना मागे वळून पाहिल्यावर या आठवणी किती-किती गोड वाटतात ना
न आवडणारे/कंटाळा आलेले दागिने
न आवडणारे/कंटाळा आलेले दागिने मी जपुन ठेवते, मोडुन नविन वैगरे करत नाही. बाकी जुन्या वस्तु नाही बाई मी ठेवल्या. आणी जुन्या आठवणी आहेत बर्याच पण त्या आता आठवाव्या लागतिल.
असे आहेत तरी किती दागिने
असे आहेत तरी किती दागिने तुझ्याकडे चुचुतै?
पहिलं पुस्तक - यज्ञ - भा द खेर आणि शैलजा राजे ह्यांची वीर सावरकरांवरील कादंबरी
खुप आहेत ग.
फारच कंटाळा आला असेल तर द्या
फारच कंटाळा आला असेल तर द्या माझ्याकडे ठेवायला...
पुष्करिणी
कात्रण व पुस्तक जपतो. हल्ली
कात्रण व पुस्तक जपतो. हल्ली त्याचा कंटाळा येतो. काय काय जपणार? माणस ही जपण जमत नाही. मग स्मृती जपतो.
गावाकडे माळा होता मोठा त्यात अडगळीच्या वस्तु खुप होत्या. अगदी जुन्या जुन्या. आता घर ही नाही व शेत ही नाही. स्मृती मात्र आहेत. कधी फोटो जपलेल्या
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
कात्रण व पुस्तक जपतो. हल्ली
कात्रण व पुस्तक जपतो. हल्ली त्याचा कंटाळा येतो. काय काय जपणार? माणस ही जपण जमत नाही.
खरे आहे. एक एक माणुस साथ सोडुन जातो... घरातली म्हातारी माणसं जातात.. जाणारच असतात. दुःख होतं पण विसरलं जातं. कर्ते सवरते मित्र मंडळीत एखादं तरारलेलं पान अवचित गळतं आणि जाणवतं मृत्यु दोन पावले आपल्याच जवळ आला आहे. काही करण्याचा उत्साह नष्ट होवुन जातो. पण जगरहाटी चालुच रहाते. तटस्थता वाढत जाते.
जुन्या वस्तू जपणे मला शब्दशः
जुन्या वस्तू जपणे मला शब्दशः आवडत नाही कारण त्या बरोबर खुप आठवणी देखील मनात घर करुन राहतात
पण तरी ही एक वस्तू आहे माझ्याकडे १८०८ चे एक ताब्यांचे नाणे गेली १७-१८ वर्ष झाली माझ्याकडे आहे !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
स्मरणरंजन आवडत असले तरी वस्तु
स्मरणरंजन आवडत असले तरी वस्तु जपण्याकडे कल नाहि.
मात्र अल्बम्स नि पुस्तकं मात्र नीट जपून ठेवतो.. अजूनही बहुदा पहिली हातात पडलेली अंकलिपी आहे
-ऋ
हम्म
ई. २ री मधे असताना रू.२ चोरी केले होते.. घरातुन..
सरांनी सांगितले.. जोपर्यंत तु पेढे आणत नाहीस तोपर्यंत निकाल नाही देणार..
आजी/ आजोबा दोघेही शाळेत .. घरी आलो आणी ..पेटीची चावी आजोबा कुठे ठेवत ते माहीती होते.
मग २रू.. काढले.. पेढे घेतले आणी मास्तरला दिले..
आजी पण त्याच शाळेत शिक्षिका होती.. मास्तरनी तिला पेढे दिले.. आणी सांगितले .. खा तुमच्या नातवानी दिलेत..
तिला आधी वाटले.. आजोबांनी दिले असतील.. घरी येऊन सगळ्या गोष्टीचा ऊलगडा झाला...
लाईफ.. पहिल्यांदाच ईतका मार खाल्ला असेल.. आजोबांनी ओढत ओढत मिठाई वाल्या च्या दुकानाकडे नेले..
त्याला विचारले.. किती रू. चे पेढे दिले.. त्याला काहिच आठवेना.. तो म्हणाला. आज निकाल आहे गुरूजी..
खुप जण येऊन पेढे घेऊन गेले.. परत तिथे पण मार खाल्ला.. (लाज वाटत नाही वै.. वै.. ऐकले)..
तो आयुष्यातला पहिला आणी शेवटचा दिवस चोरीचा.. त्यानंतर कधीच नाही..
आता आजोबा नाहीत.. शाळा पण पडली..
...
पण माझा राग पाहुन तो प्लॅन टाळला तिने)
पण ती पेटी मी आजुन जपून ठेवली आहे.. (आई म्हणाली फेकून देऊयात..
त्या पेटी कडे पाहिले की तो निकालाचा दिवस आठवतो.. १ मे १९९१
अजून एक सांगायचे राहीले माझे
अजून एक सांगायचे राहीले माझे दोन आयडी याहू चे.
raj0nly & raj_777in हे पहिले आयडि माझे
आज ही वापरात आहेत !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
माझा एक फोटो आहे. आईने फार
माझा एक फोटो आहे.
आईने फार हौसेने काढुन घेतलेला. १९८२ सालातला.
मी त्यात बराच छान दिसत होतो.
ह्म्म.. प्रत्येक मातेला व
ह्म्म..
प्रत्येक मातेला व स्वतःला आपण छान दिसतो असा गोड गैरसमज असतोच असो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हॅ हॅ हॅ. राजे वाक्यात भुतकाळ
हॅ हॅ हॅ.
राजे वाक्यात भुतकाळ आहे.
आमचा एक जुना टेबल फॅन होता
आमचा एक जुना टेबल फॅन होता वाड्यात राहात असतानाचा. जाम आवाज करायचा. पण त्याच्याशिवाय झोपही येत नव्हती आणि अभ्यासही होत नव्हता. मला खूप आवडायचा. अगदी थंडीतही त्याचं तोंड दुसरीकडे ठेऊन झोपायचो.
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
अगदी थंडीतही त्याचं तोंड
अगदी थंडीतही त्याचं तोंड दुसरीकडे ठेऊन झोपायचो.
दुसरीकडे म्हणजे नक्की कुठे?
दुसरीकडे म्हणजे नक्की कुठे?
भिंतीकडे
भिंतीकडे
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
माझी १ शाल आहे
माझी १ शाल आहे लहान्प्णीची,आत्ता ईत्कि फाट्लीए पण तरी टाकुन द्यावीशी वाट्त नाहीए
लग्नानंतर सासरी पण घेउन आले
तसच १ली ते १०वी पर्यन्तची शाळेचीप्रगतीपुस्तक पण अजुन ठेवली आहेत जपुन
>>>लग्नानंतर सासरी पण घेउन
>>>लग्नानंतर सासरी पण घेउन आले
हुंड्यात काय काय दिलं जातं आजकाल... काहीच ताळमेळ नाही.
ह्म्म्म हुंड्यात फक्त हेच
ह्म्म्म
हुंड्यात फक्त हेच घेउन गेले होते, बाकी काही नाही
अरेरे.... लैच स्वस्तात गटले
अरेरे.... लैच स्वस्तात गटले म्हणायचे की नेने साहेब.