काही बाही...

0
0

कधी कधी एखादं पुस्तक समोर असलं तरी अथपासुन इतिपर्यत वाचुन होत नाही.

कारणं अनेक असतात. अशा वेळेस आमचे परममित्र बिकाशेट यांच्या सारखं कुठलंही पान काढुन वाचायचं ही पद्धत मी अवलंबतो.

काल असंच झालं. एक पुस्तक काढलं आणि मधूनच वाचायला सुरवात केली. अर्ध मुर्ध पान झालं की जा पुढे नाही तर मागे. असं करता करता काही वाक्य समोर आली. बिकाशेटनी आवडलेलं काही.. असं कधीतरी लिहिलं होतं. म्हटलं आपण पण लिहावं. आता हे तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही. म्हणुन काही बाही हे नाव ठेवलं.

वाचा....

"(सत्तेने मदांध) राजा लोक विद्वानांच्या विषयोपभोगाला त्यागुन विद्याभ्यासात रममाण होण्याला वेळेचा व्यर्थ उपयोग असे समजुन उपहास करतात. वृद्धांच्या उपदेशाला म्हातारचळातली बडबड असं समजुन दुर्लक्ष करतात. मंत्र्यांच्या सल्ल्याला राजाच्या बुद्धिचा तिरस्कार समजतात. राज्याच्या हिताचे बोलणा-याला रागाने पहातात.

(हे राजा लोक) सदैव त्याचेच स्वागत करतात, त्यालाच जवळ बसवतात, त्यालाच पुढे करतात, त्याच्याच बरोबर सुखाने रहातात, त्यालाच धन वगैरे देतात, त्यालाच मित्र समजतात, त्याचाच सल्ला मानतात, त्याच्याच धनाची वृद्धी करतात, त्यालाच मानतात, त्यालाच विश्वासपात्र समजतात जो आपली सगळी कामे टाकुन, हात जोडून दिवसरात्र उपास्य देवतेची करावी तशी त्यांची स्तुती करत असतो आणि गुणगान गात असतो."

संदर्भ - बाणभट्टाच्या कादंबरीतील एक प्रसंग. शुकनास नामक मंत्री आपल्या राज्याच्या युवराजाला भावी आयुष्यात कसं वागावं याचा उपदेश करतांना बेजबाबदार वागणं कसं असतं हे समजावुन सांगत असं तु वागु नकोस असा सल्ला देतो.

हे आवडलं असेल तर असंच काही बाही अधुन मधुन येत राहिल.

:)

ह्म्म्म्म सुचक भाष्य हास्य



-ऋ

येत राहू दे

असच काहीबाही...!

येऊ दे अजून... मस्त रे.

येऊ दे अजून...

मस्त रे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तच रे नाना असं छानसं मधून

मस्तच रे नाना असं छानसं मधून मधून लिहीत राहा. आम्हाला पण नवीन माहीती कळते.



-पुण्याचे पेशवे

:-)

मस्त रे नाना!

मस्त रे नाना...!

वाचतोय...! अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

आयला

आयला म्हटले आमचे काहीबाही अचानक अवलिया नावावर कसे झाले !
असो.

अवलिया अजुन वाचायला आवडेल, येउद्या.

हॅ हॅ हे !

हॅ हॅ हे !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

समयोचित आहे एवढेच

समयोचित आहे एवढेच म्हणतो.
बाकी नान्याबाच्या टायमिंगबद्दल आम्ही काय बोलणार बॉ ?

छान आहे, असेच मधुन आधुन वेचन येऊद्यात. नवी माहिती कळते आहे !

- डाणभट्ट

(विषय दिलेला नाही)

हास्य हास्य हास्य

डान्याशी सहमत.

डान्याशी सहमत.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

शीर्षक

इतक्या अर्थपूर्ण आणि इतिहासाच्या कोण्त्याही पातळीला चपलखपणे बसणार्‍या बाणभट्टांच्या या विवेचनाला "काहीबाही" असे पिझ्झा संस्कृतीतील शीर्षक अशोभनीय वाटते. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.... बदलण्याबाबर आग्रह नाही...)



~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

पुस्तकाचे नाव काय आहे पण?

पुस्तकाचे नाव काय आहे पण?




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

दिले आहे ना. बाणभट्टाची

दिले आहे ना. बाणभट्टाची कादंबरी.

पुस्तक - कादंबरी
लेखक - बाणभट्ट

वा वा... पण काहीबाही अस हाफ

वा वा...

पण काहीबाही अस हाफ बाह्याचं नको बाबा... जरा फुल्ल बाह्याचं मोठं येउदे की..