वसंत व्याखानमाल कार्यक्रम पत्रिका

0
0

मी मराठीच्या वाचकांना पुण्यातील वसंत व्याखानमालेचा कार्यक्रम माहीती व्हावा या उद्देशाने कार्यक्रम पत्रिका देत आहे. तिकिट विक्री ही नाममात्र मुल्याने आहे. संपुर्ण कार्यक्रमाचा पास ही उपलव्ध असतो. १८७५ साली न्या. रानडे यांनी चालू केलेले हे ज्ञानसत्र आजतागायत चालू आहे.

वसंत व्याखानमाला १३६ वे ज्ञान सत्र स्थळ:- टिळक स्मारक मंदिर पुणे

 

 

दिनांक व वार

वक्ता

विषय

२१ एप्रिल २०१० बुधवार

द भि कुलकर्णी

ज्ञानेश्वरी एक नवे आकलन

२२ एप्रिल २०१० गुरुवार

श्री द महाजन

जीवसृष्टीची उत्पत्ती

२३ एप्रिल २०१० शुक्रवार

उल्हासदादा पवार

जयवंतराव टिळक

२४ एप्रिल २०१० शनिवार

 अरुण फिरोदिया

पुणे २०२०

२५ एप्रिल २०१० रविवार

ऎड विद्याधर शिंत्रे

मानवी हक्क व जनहित याचिका

२६ एप्रिल २०१० सोमवार

सुरेश शिर्के

नागरी पाणी पुरवठा

२७ एप्रिल २०१० मंगळवार

मनोज पाटील

पुण्यातील वाहतुक: समस्या आणि उपाय

२८ एप्रिल २०१० बुधवार

निनाद बेडेकर

प्रतापी बाजीराव

२९ एप्रिल २०१० गुरुवार

डॊ. राम ताकवले

शिक्षणाने समाज घडला बिघडला?

३० एप्रिल २०१० शुक्रवार

मिलिंद फाटक

मृण्मयी देशपांडे

मराठी मालिकातील कलाकारांची मुलाखत

१ मे २०१० शनिवार

प्रा एन डी पाटील

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र

२ मे २०१० रविवार

डॊ अमिता फडणीस

  आरोग्यपुर्ण वार्धक्यासाठी

३ मे २०१० सोमवार

मुरली लाहोटी

रंगरेषांची ओळख (प्रात्यक्षिकांसहित)

४ मे २०१०  मंगळवार

विवेक वेलणकर

समर्थ पुण्यासाठी

५ मे २०१० बुधवार

अचला जोशी

उद्योजिकेचे मनोगत

६ मे २०१० गुरुवार

ऎड नितिन आपटे

द्रष्टे सावरकर

७ मे २०१० शुक्रवार

डॊ अरुण निगवेकर

परदेशी विद्यापीठांच्या निमित्ताने

८ मे २०१० शनिवार

शैला दातार

संगीत मानापमान शताब्दी निमित्ताने

९ मे २०१० रविवार

खा. सुप्रिया सुळे

महिला सबलीकरण

१० मे २०१० सोमवार

रोहिणी निलकेणी

 

 

११ मे २०१० मंगळवार

श्री वा. ल .मंजुळ

संत साहित्याची नवी हस्त लिखिते

१२ मे २०१० बुधवार

डॊ कल्याणी नामजोशी

गीतारहस्य आणि कर्मयोग

१३ मे २०१० गुरुवार

प्राजक्ता चित्रे हेमा लेले मंगला आठलेकर उज्वला बर्वे

परिसंवाद मध्य लटपटीत स्त्री

१४ मे २०१० शुक्रवार

डॊ अपर्णा देवरे

फुले रानडे सावरकर

१५ मे २०१० शनिवार

न्या व्ही एस शिरपुरकर

बॆ वि म तारकुंडे

१६ मे २०१० रविवार

डॊ माधवी वैद्य

आनंदयात्री बोरकर

१७ मे २०१० सोमवार

सुधीर मोघे

किर्लोस्कर एक संस्कृती

१८ मे २०१० मंगळवार

युवा वक्तृत्व दिन

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र माझे मत

महाराष्ट्रात मराठीच

१९ मे २०१० बुधवार

डॊ यशवंत थोरात

Some thoughts on Indian agriculture credit

२० मे २०१० गुरुवार

 --------------

समारोप

 

{परिसंवाद मध्य लटपटीत}

1

परिसंवाद मध्य लटपटीत स्त्री>>>

पकाकाका ..हा काय विषय आहे ??

{ही भानगड काय?}

2

आमाला बी कळली नाई पण कार्यक्रम पत्रिकेत तसच लिवलय? विचारतो काय भानगड हाय. ल्वॉक चुकुन वाचायची कि मद्य लटपटीत म्हनन भानगड नको!


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{=))}

3

Laughing out loud

{ह हा हा !}

4

Laughing out loud

ह हा हा !


Hope is a good thing...

{फार हसलो. कितीतरी दिवसात असे}

5

फार हसलो. कितीतरी दिवसात असे हसलो नव्हतो.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{हॅह्लॅह}

6

ते मध्य लटपटीत हे गौरी देशपांडे च्या कथेचे नाव आहे अशी माहिती मिळाली. कथा संग्रह माहित नाही कोणता ते? नंदनला ईचारु या


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{जे कोणी जातील, त्यांनी}

7

जे कोणी जातील, त्यांनी व्याख्यानांचा आशय व एकूणच वृत्तांत लिहावा अशी विनंती.

{+ १ असेच म्हणतो.}

8

+ १

असेच म्हणतो.


Hope is a good thing...

{+२ जे कुणी कशाला... पकाकाका}

9

+२

जे कुणी कशाला... पकाकाका जाणारच... अशा कार्यक्रमांना ते जात असतातच.

आम्हाला आता फक्त पहायचे आहे की ते वक्ते म्हणुन कधी जाणार?

{धन्यवाद}

10

प्रकाशराव. आम्ही निगवेकर, शैला दातार यांच्या आणि बोरकरांवरील व्याख्यानाला हजेरी लावावी म्हणतोय. बघू या.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{उत्तम}

11

पकाकाका, रराराव - वृत्तांत अवश्य लिहा शक्य झाल्यास.

{मस्तच}

12

वर लोकांनी लिहल्याप्रमाणे ज्यांना यातले कार्यक्रम बघणे शक्य आहे त्यांनी वृत्तांत जरुर लिहावा.

प्रकाशकाका खरे भाग्यवान!

{+१}

13
ज्यांना यातले कार्यक्रम बघणे शक्य आहे त्यांनी वृत्तांत जरुर लिहावा.

असेच म्हणतो


-ऋ

{काल गेला होता काका ??? पुढील}

14

काल गेला होता काका ???

पुढील कार्यक्रमला जाणार असाल तर सांगा जमवू आपण.


Hope is a good thing...

{अरे माझ्याकडे निमंत्रितांचा}

15

अरे माझ्याकडे निमंत्रितांचा पास आहे. त्यामुळे जवळपास रोज जातो. काही लोकांना काही व्याखानांनाच यायचे असते. त्यांना नाममात्र मुल्य ५ रु प्रतिदिनी असते.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{ओह ! ठीक आहे. बघतो जमवतो.}

16

ओह !

ठीक आहे. बघतो जमवतो.


Hope is a good thing...