||श्री खरडोबाबा प्रसन्न ||
आम्हा पुणेकरांना कोणाही व्यक्तीचा सत्कार करायला सहसा सबळ कारण लागत नाही.मुलाचा पॉकेटमनी वाढविला की बापाचा सत्कार,पहिल्या मजल्यावरच्या पाडळेंची कोंबडी मेली की चौथ्या मजल्यावरच्या कुडाळेंचा सत्कार.आता हेच पहा ना, आयपीएलचा संघ येणार म्हणल्या म्हणल्या डॉन्यानी पुणेरी पाट्यांचा सत्कार करुन टाकला.पण ईथे धमालरावांचा सत्कार करायला सबळ कारण होते.त्यांनी अल्पशा कालावधीत आपली खरडवहीत येणार्या खरडींचे सहस्त्रक ज्या तर्हेने पुर्ण केले,त्याबद्दल त्यांचा सत्कार हा करायलाच हवा होता.
आता केवळ सत्कार कसा करायच म्हणुन त्यांचा सत्काराबरोबरच त्यांची एक प्रकट मुलाखत ही घ्यावी असे ठरले आणी तसा एक व्यनी बिका,राजे,डॉन,टिंग्या ई.ई.ईतरांना आम्ही पाठविला.दुसर्याच मिनीटात टिंग्याचे असे ऊत्तर आले " असल्या फालतुच्या क्रार्यक्रमाला आम्ही येणार नाही आणी ह्यापुढे असल्या प्रकारच्या चांभार चौकश्या करुन आमची संदेश-पेटी भरु नये,अन्यथा अपमान करण्यात येईल" हे वाचल्यावर माझे अवसान गळाले पण ईतर सर्वांनी होकार दिला.मग मला ही जरा हुरुप आला.मी धमालरावांना दुरध्वनी केला.त्यांनी नेहेमीप्रमाणे पहिले माझे संपुर्ण बोलणे एकुन घेतले.साधारण शभंर एक वेळा "हम्म्म.ब्वार !!" अस म्हणून झाल्यावर त्यांनी ह्या सगळ्या प्रकाराला शुध्द नकार दिला.
आता मी काय करावे ह्या विवंचनेतुन पुणेरींना फोन केला. पुणेरींनीही जोर लावुन पाहिला पण धमालरावांचा नकार ठाम होता.सरतेशेवटी वयोवृध्द रमतारमकाकांना मध्ये घालुन,दोन लार्ज टिचर्स,एक्स्ट्रा स्पायसी खिचडी कडी(कच्च्या हिरव्या मिरंच्या सकट) ईतक्या मध्ये आम्ही डिल पक्की केली.अर्थातच श्रामोंनीही ही प्रकट मुलाखत रेडियोवर प्रक्षेपण करुन देण्याच्या वचनाची साखरपेरणी ही केली.जवळपास सगळ काही ठरल. तारीख आधी गुरुवारची ठरली होती,पण त्याच दिवशी आनंदयात्रींची आणी निखील देशपांडेची डायटिशियन अॅन्ड स्लिमींग ट्रेनर बरोबर अपाँईटंमेंट होती.शिवाय टार्यालाही थोबाडं रंगवायला, आय मीन, त्याने कुंचल्याने रेखाटलेल्या व्यक्तीचित्रांच्या चेहर्यावर कलात्मक रितीने रंग भरायला जायचे होते(बर, पेन्टींग वर्कशॉपला जातया आजकाल, नाहीतर मुंबईच्या सर्व रेस्टारंटच्या बाहेर असलेल्या रोपट्यांच्या कुंड्या मोडल्या असत्या आतापर्यंत !!).आता ह्या तिघांशिवाय प्रेक्षक-वर्ग "भरीव" कसा दिसणार ? अश्या एका विचार-प्रवाहाचा धबधबा वाहता झाल्याने ती तारीख रद्द करावी लागली. नंतर मग शनीवारची तारीख धरली,तर त्या तारखेला बिपीनदांना,श्रेष्ठ दंतचिकीत्सक, केवळ डॉ.(म्हणजे प्रा.डा. नव्हे)दाढेंबरोबरची अंपाईंटमेंट होती(अर्थात त्याच निमीत्ताने ते पर्याचा कॅफेत बसुन नेत्रसुख घेणार होते हा भाग अलाहिदा).म्हणून मग, शनीवारही रद्द करावा लागला.
सरतेशेवटी, रविवारी जवळपास,सर्व सर्वसामान्य, आयटीकरांना सुटी असल्याने,एकदाचा कार्यक्रम ठरला.अर्थात हे सर्व मीच मॅनेज केल्यामुळे,मुलाखत घेण्यासाठी ,मुलाखत घेण्याच ,माझ्याच बोकांडी पडलं.श्रावण मोडकांचाही मुलाखतकार म्हणून विचार करण्यात आला होता.पण त्यांनी विचारलेले प्रश्नच असतील की उत्तरे ह्या कोड्यात सर्वजण पडले.
पुनममध्ये, दोन बाय पाचचा,अर्धा फुट ऊंच असा स्टेज उभारला गेला.स्टेजवर दोन,खाली वीस-एक खुर्च्या प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आल्या.एक-एक करत प्रेक्षक येत गेले खुर्च्यांवर बसत गेले.सर्वात लक्षवेधी खुर्ची होती ती म्हणजे डाव्या कोपर्यावरची.तिथे एक स्त्री पुस्तक वाचत होती.तिच्या शेजारच्या खुर्चीवर कोणीच नव्हते म्हणुन राजे तिथे गेला.बसु का ? म्हणुन विचारणा करणार,तितक्यात त्याला त्या रिकाम्या खुर्चीवर ठेवलेली खंडीभर पुस्तके दिसली. हिरमुसला आणी येऊन मराठमोळ्याशी मार्केटच्या गप्पा मारत बसला.
दर कट्ट्याप्रमाणे,महाराज अर्धा तास उशीरा उगवले.ब्राउन रंगाची कार्गो,त्यावर ब्राऊन कलरचा पोलका डॉटचा शर्ट, आल्या-आल्या,दरवाजातच.उजव्या हाताने, खिशातुन दुधाळ रंगाच मार्लबोरोच पाकीट बाहेर काढल.डाव्या हातात सिगरेट बाहेर काढली.सिगरेट तोंडात धरुन,मान पंचेचाळीस डिगरीत ऊजव्या बाजुला फिरवुन चकचकीत 'झिप्पो' खिशातुन बाहेर काढला.कट्..कररकरकर आवाज करीत पेटविला.परत कट असा आवाज करीत लाईटर बंद गेला .मुखातुन धुर सोडत, एक कटाक्ष,बसलेल्या प्रेक्षकांकडे टाकला,आणी लगेच सिगरेट विझविली.धम्याने जास्त आवाज करु नये म्हणुन मकने स्पेशली धमीलाही बोलावले होते(शेवटी एकदाचा गुपचुप खुर्चीत बसला ब्वा)
मी : या या धमाल राव (आल सालं लोकांच्यात काड्या सारायला असा काहीसा प्रेक्षंकांमधुन आवाज आला.)
धमालराव :(प्रेक्षकांमधुन आलेल्या आवाजांकडे तुच्छतेने दुर्लक्ष करीत)..जोहार मायबाप
मी : सर्वात पहिले आपले अभिनंदन आणी आपण वेळात वेळ काढुन ईथे आलात त्याबद्दल धन्यवाद
धमालराव : आपलेही अभिनंदन ,माझ्या खवत आपल्याही बर्याच खरडी आहेत.
मी : पण आपल्या खवत १००० च्या वर खरडी आहेत म्हणजेच आपण त्याही पेक्षा जास्त खरडी ईतरांना केलेल्या आहेत.
धमालराव : ते काही का असेना, ते अभिनंदन आणी धन्यवाद गेलं बारा गडगड्यांच्या विहीरीत.
मी : आजही आपण अर्धा तास उशीर केलात पोहोचण्यास.
धमालराव : तुम्ही साले पुणेरी... (अचानक धम्याच्या लक्षात येत आपण घरी नसुन एका सार्वजनीक ठिकाणी आहोत.मग जरा संभाळुन) हे पहा ,हे अस वेळेवर पोहोचणं,ईतकच खाणं,अपॉईंटमेंट घेऊन आई-बापाला,दोस्तांना,आप्तस्वकीयांना भेटणं वगैरै गोष्टी करायला मी काय झग्यातुन नाही पडलो.तरी तुमची थोडी कदर करुन मी माफी मागतो.
मी : तुमचा मनमोकळा स्वभाव मला नेहमीच आवडतो.मध्यंतरी आपला अपघात झाला होता म्हणे.
धमालराव : हो म्हातार्यांना म्हातारचळ सुटलीय आजकाल,रस्त्याच्या मध्ये येऊन थांबतात लेखाचे.
मी : पण आपण तर कडेकडेने गाडी चालवता ना , मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आहे.
धमालराव : त्या दिवशीची वेगळी स्टोरी आहे.
मी : मग नका सांगु , सगळ्या स्टोर्या अर्धवट ठेवायची सवय आहे आपल्याला
धमालराव : काय आहे 'ती' चा असा 'अदभुत''विळखा' बसल्याने सर्व स्टोर्यांची 'माती' झाली आहे.शेवटी 'तुमचा खेळ होतो' आणी.....
हे एकल्यावर जवळपास माझ्यासकट सर्वांची मान खाली गेली.मान खाली गेल्याने माझ्या लक्षात आले की 'प्रकट मुलाखतीत' सर्व प्रश्न काही मुलाखतकाराने विचारायचे नसतात काही प्रश्न प्रेक्षकांमधुन ही यावे लागतात.....धमालराव ऊत्तरे देतीलच.
हा घ्या घम्या (चेहरा पाहिलात,हास्य पहा,आता हा लगेच कोणाची तरी खोडी काढणार आहे असा..असा हा धम्या)...
धमालराव अगदी राजबिंडे आहेत
धमालराव अगदी राजबिंडे आहेत
इश्श्श्य!
लाजलो मी लाजलो!

(स्वगतः नशीब, लग्नापुर्वीचा फोटो आहे. लग्नानंतरचा फोटो असता तर हीच चुचु..श्श्शीऽऽ...धम्या कस्सला रामागडी दिसतो असं म्हणाली असती.
)
प्रकाटाआ
प्रकाटाआ
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
क्रमशः लिहायला विसरलास का?
क्रमशः लिहायला विसरलास का?
सजून
अगदी सजूनच आलेत की धमालराव.
जेन
हाहाहाहाअ.
हाहाहाहाअ. फुटलो...
सुहाश्या.. अरे काय पेटलायस का काय? काय फोडाफोडी लावलीय अगागागागा.....
काही काही वाक्य एकदम खास... अजुन येउ देत
आणी हा धम्याचा फोटो कुठ्न आणलास? हहपुवा.....
वयोवृध्द रमतारमकाकांना मध्ये
वयोवृध्द रमतारमकाकांना मध्ये घालुन,दोन लार्ज टिचर्स,एक्स्ट्रा स्पायसी खिचडी कडी(कच्च्या हिरव्या मिरंच्या सकट) ईतक्या मध्ये आम्ही डिल पक्की केली.
च्यायचं हलकट. आम्ही झंडु का केसरी जीवन नियमित घेत असल्याचे श्री श्री सुहास यांना प्रत्यक्ष पुराव्याने शाबीत करून दिले होते. त्यामुळे आम्हाला साठ सालके जवान न म्हणता वयोवृद्ध म्हटल्याबद्दल णिषेद.
आणि पडद्यामागे धम्याशी एवढ्या सगळ्याचे डील करताना आम्हाला आमचा कट् अजून पोचता झालेला नाही याबद्दल डब्बल णिषेद.
बाकी लेख एकदम हुच्च. ह. ह. पु. वा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आन ते.....
सुवर्णभस्म, परदेशातुन मागवलेल्या महागड्या गोळ्या वगैरेचे काय? तुमचे पैसे वाया गेले की काय? त्यापेक्षा आमचे वैदु बरे, २५ रुपयात जालीम दव्याची पुरचुंडी देतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हम्म
तुमचे पैसे वाया गेले की काय?
आता असेच म्हणायला हवे. आणि ते वैदू वगैरे नको रे ब्वॉ. लया जालीम अवषिद असतंय झेपत नाय आपल्याला.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अग्गागागागा....
सुटलेयत दोघंजण...

च्यायला, शशांक सामकांचा ४०नंतर... वाला कार्यक्रम लावता काय बोर्डावर?
अरेरे
आमच्या प्रामाणिक खुलाशाचा भलताच अर्थ लावलेला पाहून अंमळ दुखावलो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
काय विचार आहे?...
अरे धमालराव मी सुद्धा असाच बांधणी प्रिंट चा फेटा बांधला होता, माझ्या स्वतःच्या लग्नामधे!!
तुमचा काय विचार आहे?..की झालेय शुभमंगल आधीच?..
आवो
लग्नातलाच हाय हा फटू
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आयला धम्या, कुठली आणि कशाची
आयला धम्या, कुठली आणि कशाची तयारी बाबा?
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
आरारारा.....धुमडीच करुन टाकली
आरारारा.....धुमडीच करुन टाकली राव ह्या सुहाश्यानं!
नुसतं झग्यातुन नाय म्हणायचं, "राणीच्या झग्यातुन" किंवा "क्विन एलिझाबेथच्या झग्यातुन" म्हणायचं, मंग कसा सनसनीत झटका येतु ड्वायल्वॉकला
>>पण आपण तर कडेकडेने गाडी चालवता ना , मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आहे.

बाकी, स्टोरीवरुन गाडी भारीच वळवली हां बाकी टारगटांवर..हे आपलं..टारगेटांवर
>>तुमचा काय विचार आहे?..की झालेय शुभमंगल आधीच?..
आमच्या बकरीईद दिवशीचा फोटु आहे तो...कापले जाण्यापुर्वीचा!
>>आयला धम्या, कुठली आणि कशाची तयारी बाबा?
@श्रीकांत१९,
@विशल्याभौ,
आयला, का जखमेवर मीठ चोळताय राव
तरीच इतका सजवलाय तुला
तरीच इतका सजवलाय तुला
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
असो, धमालपंत वरील प्रतिसाद
असो, धमालपंत वरील प्रतिसाद योग्य जागी छापील आवृती मध्ये पोहचवला जाईल
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पुढे
पुढे?
थोडे
दिवस थांबा. पुढची बातमी मिळेल. (या पत्रकारांना सारख्या ब्रेकिंग न्यूज हव्या असतात)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
पुढे? >>> तला म्हण्ल नव्हत का
पुढे? >>>
तला म्हण्ल नव्हत का ह्या शब्दाच्या पूढे श्रामोंचा प्रतिसाद येणार नाही म्हणुन ...सारख सारख क्रमश कस लिहीणार....
श्रामो....जखमा कट्ट्यातल्या ऊघड्या होतील बर का ? बाकी आपली चारचाकी आयमीन ..बाकी आपली मर्जी,,,
मित्रांनो, पुढील लेख.....गाठीभेटी श्रावणसरीतल्या............
हाण्ण तिच्यायला!!! कडक!
हाण्ण तिच्यायला!!!
कडक!
आरं लिही
आमालाबी 'श्रावणभक्ती' करू दे की.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
टाक बे लवकर
टाक बे लवकर
धम्याच्या प्रसंगोत्पात
धम्याच्या प्रसंगोत्पात रूपकात्मक गावरान भाषेचा लहेजा छान पकडलाय. हे जरा समीक्षकी झालं असेल, तर मग....
खतरी लिवलंय.
1008 खरडश्री धम्याजींचा विजय असो.
बाकी धम्याच्या खरडींवरून जी प्रतिमा होती, त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात बराच वेगळा वाटला. (मनातली प्रतिमा, थोडा जाडसर, चेहरा, गोल मोठा, सावळा वगैरे)
हा आमचा स्वभाव
>>धम्याच्या खरडींवरून जी
>>धम्याच्या खरडींवरून जी प्रतिमा होती, त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात बराच वेगळा वाटला.
च्यायला! खरडवहीत फोटु हाय की लावलेला.
>>(मनातली प्रतिमा, थोडा जाडसर, चेहरा, गोल मोठा, सावळा वगैरे)

फोटोत अंमळ जास्तच काळा वाटतोय का?
संसाराग्नीत करपण्याची सुरुवात असल्यामुळे असेल तसं
संसाराग्नीत करपण्याची सुरुवात
संसाराग्नीत करपण्याची सुरुवात असल्यामुळे असेल तसं >>>
सुधरणार न्हाईस !!
कोण धम्या ? धन्यवाद
कोण धम्या ?
धन्यवाद
विषय संपला. धन्यवाद.
विषय संपला.
धन्यवाद.
हुच्च रे सुहास्या..
हुच्च रे सुहास्या..
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धम्याला आपलं श्री श्री श्री
धम्याला आपलं श्री श्री श्री धमाल पंताना प्रेक्षकांमधून एक प्रश्न
तुमच्या या सत्कारासाठी कोणाचे अनमोल सहकार्य लाभले ते सांगाल का....
( तुम्ही इथे संत एकनाथ संत ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज्,झालच तर पुल देश्पांडे यापेक्षादेखील या इथे सध्या यांपेक्षा हयात असण्यार्या व्यक्ती आयडींबद्दल ल्ह्याल /बोलाल ही अपेक्षा धरलेलेली आहे)
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
णिषेद णिषेद णिषेद
आता धमालपंतांचा सत्कार केला तर चुचुतैंचा का न्हाय म्हंतो मी. ह्ये काय बरं त्ये 'जेन्डर डिस्...डिस्..डिस्क्रेशान' का म्हंतो मी. आता असं न का समद्या खरडी 'कशी हायस', ज्येवान काय क्य्येल वैग्रे, पन वट्ट १००० खरडी तर हैत.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
डिस्क्रिमिनेशन हो रमा
डिस्क्रिमिनेशन हो रमा (रमताराम मामा)!
आस व्ह्य
आमाला फकस्त 'शान' म्हायती. गावाकडं या एकदा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
+ १
सहमत.
कुंदन, बिका किंवा नानाला द्यायची का ही सुपारी?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आत्ता चुचुकडे आजिबात जाऊ नका.
आत्ता चुचुकडे आजिबात जाऊ नका. गाजर हलवा-कालचा खायला लागेल.
धन्यवाद
सावध केल्याबद्दल धन्यवाद
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
(विषय दिलेला नाही)
खंगरी
लै भारी मुलाखत.
>>> श्रावण मोडकांचाही मुलाखतकार म्हणून विचार करण्यात आला होता.पण त्यांनी विचारलेले प्रश्नच असतील की उत्तरे ह्या कोड्यात सर्वजण पडले.
--- खी: खी: खी:, अंमळ सुरेश खर्यांची आठवण झाली
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
करेक्ट
WPTA
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
(विषय दिलेला नाही)
वा वा...
(स्वगत - बरेचसे संदर्भ डोक्यावरून गेले. पण वा वा म्हणायला काय जातंय?)
खंग्री!!!!!!!
सर्वप्रथम खरडश्री धमालचंद्रजी साहेब यांचे मनापासुन अभिनंदन.
श्री श्री सुहासजी यांनी माननीय धमालचंद्रजी साहेब यांचा जो हा इथे जाहीरपणे केला आहे त्याबद्दल धन्यवाद.
नमोगती श्रामो यांची पण लगे हाथ .. त्याबद्दल डब्बल धन्यु!
आता माननीय धमालचंद्रजी साहेब यांना प्रश्न
१) तुम्ही दरवेळी मेकप लावूनच फोटो काढता का चेहरा अंमळ स्तुतीसुमने ऐकून गोरामोरा झालाय?
२) चित्तरंजन कोल्हटकर यांच्यावर सिनेमा निघतोय त्यात त्यांची भुमीकेसाठी अभिनेत्याचा शोध चालू आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही म्हणजे हुबेहुब तर दिसताच पण कोणतरी म्हणाले तळिरामचा रोल पण.....
पुन्हा एकदा श्री श्री सुहासजी यांच्या सुत्रसंचालनाबद्दल त्यांना गरिबांचे सुधीर गाडगीळ हा किताब देण्यात यावा अशी नम्रपणे मागणी करतो.
सहजराव
तुम्हीपण नवीन आहात का हो? मागणी कुठे नम्र असते का, नम्र विनंती असते. आपल्याइथे एक सोडून दोन पत्रकार आहेत, विचारा बरं त्यांना. कदाचित त्यांच्या कडे अशा वाक्यांचे ब्लॉक तयारच असती, पुन्हा पुन्हा जुळणी करायलाच नको.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
धमालरावांना आमचे काही
धमालरावांना आमचे काही प्रश्न.
१. नागीण म्हणजे काय?
२. डायटची व्हिस्की काय असते?
-पुण्याचे पेशवे
मस्त...!
मुलाखत देणार्यांचे अन् घेणार्याचेही अभिनंदन!
=)) 
हुच्च.... लेख आणि त्यावरचे
हुच्च....
लेख आणि त्यावरचे प्रतिसाद...
बाय द वे,
धम्सची तो नेहमीचा "झेंड्याचा" प्रतिसाद आला नाय अजुन???
अतिशय
अतिशय भयंकर हसलो.. हसतो आहे


=))
सुहास तुला शि.सा. __/\__
बाकी वयोवृद्ध हा एक मराठी शब्द नेमका सुचला ब्वॉ तुला
अरे हो! खरडश्री धमालपंतसाहेबजी यांना कुरन्री.. क्रुनी...कुरनिसात !
अवांतरः लग्नाआधि पहा कसा नजरेला नजर देऊन बोलायचा
-ऋ
सुहास - झक्कास मुलाखत
एकच वादा - धमाल दादा
लगेच परत तेवढ्याच आवाजात
एकच वादा - सुहास दादा
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
@!#!#!@ नो....
लेक हुच्च झालाय रं, पन पुड्च्या टायमाला नाय बोलवार तर एकेकाच्या घरी येऊन लई भारी 'युनिक-कोदा'मधे लिवलेले निबंद वाचूण दाखवेल...हां! सांगून ठिवतो....
सुहासचे जोरदार फटके...
बाकी माननिय धमालराव यांना सादर प्रणाम आणि खरडींचे सहस्त्रक पुर्ण केल्याबद्दल शुभेच्छा..
सुहास आणखी कोणाकोणाच्या
सुहास आणखी कोणाकोणाच्या मुलाखती बाकी आहेत बॉ?
अन धमाल राव तर लईच खुशीत दिसत आहेत. अन बाकीचे लग्नाचे फोटो काही दिसत नाही लिंक मध्ये.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छॅ.....
फालतु धागा!