मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.'
त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची.
माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे. बाबांनी फंडातून बरेचशे पैसे काढले. एवढे काढले की त्यावेळी नॉर्मल मुंजीच्या खर्चापेक्षा ते नक्कीच जास्त होते. पत्रिका छापल्या गेल्या. आई बाबांसोबत बसून लिस्ट मधल्या सगळ्या पाहुण्या रावळ्या - मित्र मंडळींना पत्रिका पाठवल्या गेल्या. जवळच्या नातेवाईकांना पत्रे ही पाठवली.
सगळ्या नातेवाईकांसाठी कपडे घेऊन मुंजीचा बस्तापण बांधला गेला. माझ्यासाठी एक सुंदरसे पितांबर घेतले. एक लॉकेट , एक वळी घेतली. वर्षभरापूर्वीच माझ्या आतेबहिणीचे लग्न झाले होते, त्यात भावजींनी घातलेला जोधपुरी मला जाम आवडला होता. बाबांच्या मागे लागून मी तोही घेतला होता.
मुंजीच्या आदल्या रात्री पासूनच कार्यालय बूक केलं होतं. मावश्या आणी आत्या लोक २-३ दिवस आधीच घरी आले होते. अंगणात चुलीवर मोतीचूर लाडवाचे घाणे पडत होते. फुल्ल राजा होतो मी ते ५-६ दिवस.
मुंजीच्या दिवशी सकाळ पासून सगळ्यांची गडबडघाई चालू झाली. गुरुजींनी मंत्रोच्चार करताना नाव्ह्याला माझे चकोट करायला सांगितले. भोवर्यावर एक वाटी ठेवून तो चालू झाला. आंघोळ झाल्यावर लंगोट घालून वरून एक पंचा गुंडाळून यज्ञकुंडाजवळ बसवून ब्रम्हचर्याची दिक्षा देण्यात आली. भिक्षुकीची प्रॅक्टीस पण झाली. धुपाच्या/धुराच्या वासाने वातावरण भरून गेलं होतं. लहान असल्याने जास्त काही समजत नव्हतं , पण आपल्याला सगळे एवढा मान देतायत हे पाहून मस्त वाटत होतं.
सगळे विधी झाल्यावर मस्त श्रिखंड पुरीचे जेवण हाणलं शेवटच्य पंक्तीला..
संध्याकाळी घोड्यावर बसून मारूतदर्शन करून थोड्या वेळाने घरी आलो.
माझ्या सगळ्या मित्रांना टकलावरून हाथ फिरवायची हौस..जो तो येता जाता माझ्या टकलावर हाथ साफ करायचा. पुढे आमच्या वसाहतीत दोन तीनच मुंजे असल्याने आमची डिमांड वाढली. त्याबद्दल नंतर कधीतरी....
*जेवणासाठी मुंजा, बामण हवा असल्यास मला व्यनि ने संपर्क करावा
ही मुंज नाहीच
दंडात बेडूक भरायचा विधी झाल्याचा उल्लेख नाही त्यामुळे ही मुंज कायदेशीर नाही.
झाला ना तोपण...२ दिवस दंड
झाला ना तोपण...२ दिवस दंड दुखत होता....
मामाची मुलगी ?
काशीयात्रेला जाण्याची धमकी देऊनदेखील मामाने मुलगी ऑफर केली नाही.. अरेरे..
तू टार्याचा मित्र आहेस, हे मामाला माहिती होते का ?
- फुन्सुक
अरे सख्खा मामा नाही..चुलत
अरे सख्खा मामा नाही..चुलत मामाला तेंव्हा मुलगी नव्ह्ती तर ऑफर कुठून करणार?
मामाला तेंव्हा मुलगी नव्ह्ती
पिडीसी घ्यायचा रे.!
ओ ते काशीयात्रा, मामाची मुलगी
ओ ते काशीयात्रा, मामाची मुलगी वगैरे प्रकरण सोडमुंजीत असतं. म्हणजे ब्रम्हचार्यातून गॄहस्थ बनतो तेव्हा. आत्ता नाय ते.
-पुण्याचे पेशवे
याईक्स
सगळे क्रियाकर्म झाल्यावर मस्त श्रिखंड पुरीचे जेवण हाणलं शेवटच्य पंक्तीला..
अहो इथे तरी हा शद्ब नका वापरू. वाच्यार्थ बरोबर असला तरी ध्वन्यर्थ भलताच आहे हो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
विधी
मग विधी वापरा तरी तो तर लिखाणाची नैसर्गिक उर्मी टिकवुन ठेवतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
बदल केला आहे..
बदल केला आहे..
छान लेख
मस्तच आहे लेख.
माझ मन माझ्या भावांच्या मुंजीत गेला..खुप सुंदर..असतात हे सोहळे..
*जेवणासाठी मुंजा, बामण हवा असल्यास मला व्यनि ने संपर्क करावा Big smile
* विचार
हवा आहे पण जो नियमीत संध्या करतो असा वा ज्याला संपुर्ण संध्या येते असा....असल्यास व्यनि करा.
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
मला पूर्ण संध्या येते व मी
मला पूर्ण संध्या येते व मी संध्या करतो (अधून मधून).
-पुण्याचे पेशवे
मस्तच रे लेख ! छान लिहतोस
मस्तच रे लेख !
छान लिहतोस तु.. !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ह्याच्या भाच्याची (माझा भाचाच
ह्याच्या भाच्याची (माझा भाचाच ना
) मुंज आठवली. मामी म्हणुन काय भाव दिला होता लोकांनी
सगळीकडे एकदम लाइमलाइट मध्ये
सगळीकडे एकदम लाइमलाइट मध्ये हं तुम्ही
( होणारी ) मुलगी द्यायची कबूल केलं की काय ..
पुष्करिणी
अग काहिहि काय अजुन कशात
अग काहिहि काय
अजुन कशात काही नाही ग
आँ?
आँ?
+१
शी बै अच्रत
तो संस्कृतीरक्षक टिंग्या कुठाय?
त्याशिवाय का एवढा भाव?
त्याशिवाय का एवढा भाव? मामाला ( म्हण्जे भाच्याच्या मामाला हो ) विचारून घ्या...त्यांनी काही बाही वचन दिल असेल ...
पुष्करिणी
लिहीत रहा...!
मस्त लेख.
आठवणी
मुंजमुलाच्या टकलावर टप्पुचे फळ मारण्यासाठी चढाओढ लागायची. लांब दांडीला टणक गोळा असलेले हे फळ आजकाल कुठे दिसतच नाही. नागपूरला महाराजबागेत एक झाड होते.
मस्त लेख.
मस्त लेख...
मस्त लेख...
आमच्या मुंजीत भिक्षावळीचा
आमच्या मुंजीत भिक्षावळीचा कार्यक्रम झाला. वेगवेगळ्या लाडुंबरोबर काही रक्कमही हातात पडली होती. मी आणि माझा मावसभाऊ निखील आम्ही दोघांनी मिळून ती मोजली... सगळे मिळून काहीतरी २३ रुपये आणि काही पैसे जमले होते.
....
...
...
...
पुढच्या विधीसाठी घरातले सगळे मुंजा मुलाला (अस्मादिक) शोधताहेत. आणि अस्मादिक सोलापूरातील तत्कालीन विजापुर रोड फेमस पाकीजा व्हिडीओ सेंटरमध्ये "दी बिग बॉस" (ब्रुस ली) बघताहेत.
मग कुणीतरी डोके चालवले आणि आमचे काकाश्री आम्हाला शोधत शोधत पाकीजवर हजर. मग तिथून जी काही वरात निघालीय......
ऐन मुंजीच्या दिवशी शिव्या खाणारे जगात फक्त आम्हीच असू
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
नाही तुम्ही एकटेच नाही...
माझ्या एका परिचितांकडच्या मुंजीत साक्षात भटजी बुवाच मधल्या रिकाम्या वेळात तंबाखूचा बार मळत होते, अन बटूने मलाबी द्या थोडा म्हणून हात पुढे केला होता. :greenface पुढे काय झाले ते सांगायला नकोच.
ब्रम्हचर्याची दिक्षा देण्यात आली
किती वर्षं टिकली मग ती ?
_/|\_
_/|\_
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोण दीक्षा ? ती तर पहिल्याच
कोण दीक्षा ? ती तर पहिल्याच रात्री पळुन गेली असेल.... ह्याच्या कडक (!) ब्रह्मचर्यामुळे.
(विषय दिलेला नाही)
मुंज अर्धवट
अहो मात्रुभोजनाचा कार्यक्रम झाला नाही वाटत..मुंज अर्धवट च झाली कि