संस्कृत धडा २
मागच्या भागात आपण प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी वर्तमान कालाची रुपे पाहिली.जराशी उजळणी...
प्रथम पुरुषी
अहम् वदामि | आवाम् वदावः | वयम् वदाम: |
द्वितीय पुरुषी
त्वम् वदसि | युवाम वदथः | यूयम् वदथ |
आता आपण तृतीय पुरुषी रुपांचा विचार करु
रामः वदति - राम बोलतो
सीता वदति - सीता बोलते
बालकः वदति - बालक बोलतो
बालकौ वदतः - (दोघे) बालके बोलतात
बालका: वदन्ति - (ते सगळे) बालके बोलतात
कृष्ण: पठति - कृष्ण वाचतो (एक वचन)
कृष्णौ पठत: - (दोघे ) कृष्ण वाचतात (द्वि वचन)
कृष्णा: पठन्ति - (ते सगळे ) कृष्ण वाचतात (बहु वचन)
एष: लिखति - हा लिहितो
एतौ लिखतः - हे (दोघे) लिहितात
एते लिखन्ति - हे (सगळे) लिहितात
स: लिखति - तो लिहितो
तौ लिखत: - ते (दोघे) लिहितात
ते लिखन्ति - ते (सगळे) लिहितात
एषा लिखति - ही लिहिते
एते लिखतः - ह्या (दोघी) लिहितात
एता: लिखन्ति - ह्या (सगळ्या) लिहितात
सा लिखति - ती लिहिते
ते लिखतः - त्या (दोघी) लिहितात
ता: लिखन्ति - त्या (सगळ्या) लिहितात
एष:, एषा वगैरे जवळच्या निर्देशासाठी.
स:, सा वगैरे लांबच्या निर्देशासाठी वापरले जाते.
एषः अश्व: (अस्ति) - हा घोडा आहे.
संस्कृतमधे मराठी प्रमाणे क्रियापद दिलेच पाहिजे असे नसते. त्यामुळे एष: अश्वः येवढे पुरेसे असते.
एषः गज: - हा हत्ती आहे.
एतौ गजौ - हे दोघे हत्ती आहेत
एते गजा: - हे सगळे हत्ती आहेत
एषा शिक्षिका - ही शिक्षिका आहे
एते शिक्षिके - ह्या (दोघी) शिक्षिका आहेत
एता: शिक्षिका: - ह्या (सगळ्या) शिक्षिका आहेत
एतद् फलम् - हे फळ आहे
एते फले - हे (दोन) फळे आहेत
एतानि फलानि - हे (सगळे) फळे आहेत
सः गज: - तो हत्ती आहे.
तौ गजौ - ते दोघे हत्ती आहेत
ते गजा: - ते सगळे हत्ती आहेत
सा शिक्षिका - ती शिक्षिका आहे
ते शिक्षिके - त्या (दोघी) शिक्षिका आहेत
ता: शिक्षिका: - त्या (सगळ्या) शिक्षिका आहेत
तद् फलम् - तें फळ आहे
ते फले - तें (दोन) फळे आहेत
तानि फलानि - ते (सगळे) फळे आहेत
आता आपण थोडे संवाद बोलुया... अपेक्षा आहे की लक्षात येतील. महत्वाच्या शब्दांना बोल्ड केले आहे
एषः कः ?
एषः गजः
एतौ कौ ?
एतौ गजौ
एते के ?
एते गजा:
सा का ?
सा बालिका
ते के ?
ते बालिके
ता: का:?
ता: बालिका:
एतद् किम् ?
एतद् फलम्
एते के ?
एते फले
एतानि कानि?
एतानि फलानि
याप्रमाणे संवाद साधल्यावर अजुन विस्तृत पाहुया
एषः रामः किम् ?
आम्, एषः रामः
एषा सीता किम्?
आम्, एषा सीता
एतद् फलम् किम्?
आम्, एतद् फलम्
एषः कृष्णः किम?
न, एषः अर्जुनः
एषा शिक्षिका किम?
न, एषा गायिका
एतद् पुष्पम् किम?
न, एतद् पर्णम्
क्रमशः

.jpg)
वाचनखूण साठवली आहे. धन्यवाद.
वाचनखूण साठवली आहे. धन्यवाद.
+१
+१
+१ असेच म्हणतो
मी पण साठवली आहे वाचनखूण
धन्यवाद नाना... आवडेश
नियमीत संस्कृत शिकायला आवडेल तुमच्याकडून
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
चांगला धडा
आमचा ही सुसंस्कृत होण्याचा प्रयत्न:
अहम् वदामि, लिखामि, संगणकस्य सहाय्ये गणन-प्रणालि लिखामि च। (गणन-प्रणाली म्हणजे फक्त छोटासा प्रोग्रॅम!)
एषा प्रणालि किम् करोति?
-- एषा प्रणालि प्रतिमे पठति, ("काहीतरी" म्हणजे?) गणन करोति।
(स्वारी, थोड्या पुढच्या धड्यातलं कृ क्रियापद वापरलं)
एषः शिक्षकः, पाठः च अतीव उपयुक्त।
बुकमार्क केले आहे ,
बुकमार्क केले आहे , नाना.
जबरदस्त रे खुप दिवसापासूनची एक इच्छा पुर्ण होत अहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
मी पण .. मजा येत आहे शिकायला
मस्त...
+१ छान
थोडं समजत आहे.
चांगला धागा
तेवढीच संस्कृतची उजळणी होतीय.
संस्कृतभारतीचे का हो?
अवलिया...
तुम्ही संस्कृतभारतीचे का हो?
तसे असेल तर, 'नमो नमः | अहं पुण्यपत्तने कार्यं कुर्वन्नासम् | परं इदानीम् जपानदेशमागत: अस्मि| भवान् कुत्र कार्यं करोति?'
पुढला धडा मी आणि माझा नातु
पुढला धडा मी आणि माझा नातु एकत्र बसून शिकणार असं दिसतंय...
+ १ नाना ने गोळ्या दिल्या
- १
नाना ने सात भाग लिहले राव
http://mi-marathi.com/node/1465
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान लेखमालिका आहे.
छान लेखमालिका आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही