रवी

0
0

८८ साली सोलापुरातल्या वालचंद इन्सटीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजातल्या फर्स्ट इयर इले़क्ट्ऑनिक्स च्या वर्गात मास्तरानी प्रश्न विचारला होता की पुढे कोण काय करणार आहेत. एका उत्तरा मुळे मात्र सगळे चमकले होते, तो म्हणाला होता की मला आर.टी.ऑफीसर व्हायच आहे. तो होता रवी गायकवाड.

काळासावळा ,तरतरीत , बोलक्या डोळ्यांचा रवी एकदम लोकप्रिय होता.
कॉलेजा ला येताना बाइक फिरवणार्या काही मोजक्या मुलांमधे तो होता, यामाहा असलेला तो फर्स्ट इयर च्या मुलातला एकटाच असावा.
पहील्या वर्षी सी.आर झाल्यावर, तसच दुसर्या वर्षी मेगझीन सेक्रेटरी झाल्या वर व तिसर्या वर्षी जी.एस. झाल्या वर आख्या वर्गाला तो पिक्चरला घेवुन जायचा. तेव्हा, च्यायला याला कस हे परवडत बे ?ह्या प्रश्नाच उत्तर म्हणजे त्याचे वडील पाटबंधारे खात्यात इंजीनीयर होते हे कळल होत.
रव्या क्रिकेट उत्तम खेळायचा. कॉलेजच्या टीमचा कप्तान ही होता.त्याच क्रिकेट आणि बाईक वेड हे तेव्हांपासुनच च होत.
बी.ई.झाल्यावर तो काही महीने टेल्कोत होता.त्यानंतर काही वर्षानी कळल की त्याला जे व्हायच होत ते तो झाला होता.
आर.टी.ऑफीसर होवुन अंधेरीतली पोस्ट मिळ्वली होती आणि प्रंचड कमाई चालु आहे.
काही महीन्या पुर्वी दोस्ताशी बोलताना हाच विषय निघाला होता, तेव्हांच म्ह्टल होत की हे सगळ एक ना एक दिवस बाहेर येइलच.
आणि नेमक आय पी ल च्या कोची टिमच्या खरेदीदारा मधे त्याच्या भावाच नाव वाचल आणि लक्षात आल की भावाला नुस्त पुढ केल आहे, ह्या मागे तर रव्याच आहे.
१०० कोटीचा बाइक घोटाळा करुन सध्या रवी मेडीकल लिव्ह वर घरीच आहे,महाराष्ट्र सरकार ला आत्ता जाग आली असुन तुम्हाला निलंबित का करु नये अशी नोटीस पाठवली आहे म्हणे.
बघुयात आता रवी हे सगळ निस्तरुन नेतो की अडकतो ते.

सोलापुरचा गैकवाड काय हा??

1

सोलापुरचा गैकवाड काय हा??

तोच तो.

2

तोच तो.

बरं !

3

बरं !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अग्गाबाब्बोय! लै भारी दोस्त

4

अग्गाबाब्बोय!

लै भारी दोस्त दिसतोय तुमचा. हास्य
एकदम जिगरबाज.

लै भारीच श्टुरी!

5

लै भारीच श्टुरी!

(विषय दिलेला नाही)

6

Stare