देव - काय, कसा, हो/नाही, माहित नाही ...

0
0

१. (सदर लेखनाचा विषय सिनेमा असा दिला आहे कारण त्यात 'विचार' असा पर्याय नाही.)
२. काही ठिकाणी देव आहे का नाही, विज्ञानवाद का अध्यात्म, देवळं, श्रीमंती असे काहीसे विचार वाचले. मूळ धाग्यांचा विषय सोडून अनेक ठिकाणी चांगल्या चर्चा होत होत्या, त्या सुरू ठेवण्यासाठी एक वेगळा धागा काढण्याची सूचना आली, तिचे पालन करूनः
३. प्रस्तुत विचार हे सर्वस्वी माझे असून (मी धरून) कोणावरही लादलेले नाहीत. सदर विचार 'माझे' कसे झाले याचाही थोडा विचार लिखाणात आहे.
४. शेवटच्या परिच्छेदात देवाच्या जागी मन, आत्मा, पुनर्जन्म वगैरे वगैरे शब्द टाकले तरीही माझी हरकत नाही.

लहानपणी बर्‍याच लोकांनी ऐकलं असेल, ".... नाहीतर बाप्पा शिक्षा करेल." मी तरी हे वाक्य कधी ऐकलं नाही. लहानपणी देव म्हणजे फ्रिजवरच्या लाकडी फ्रेममधल्या धातूच्या छोट्या मूर्ती एवढीच देवाची ओळख होती. पुढे ही ओळख वाढली जेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारला असेल, "आज मी पूजा करू?". "कर, पण आधी तुझा गृहपाठ राहिला आहे तो पूर्ण कर आणि मग पूजा!" अभ्यास, खेळ, भाज्या खाणं, घरातली झेपतील तितपत कामं झाल्यावरही आईला मदत करायची असेल तर पूजा करायची एवढाच देवाशी माझा संबंध!
पुढे कधीतरी (तेव्हा) देवभक्त (का भोळ्या) मैत्रिणींच्या संगतीत देव म्हणजे काहीतरी मोठ्ठं प्रकरण वाटण्याचेही दिवस येऊन गेले. पण 'मोठं होण्या'चा तो दिवस, खरंतर रात्र, लख्ख आठवते. कॉलेजात असताना लेक्चर्स, प्रॅक्टीकल्सना शिरगणती झाली की इतर वेळात खगोलशास्त्राचा प्रचार नाहीतर याच कंपूबरोबर पिक्चर्स, ट्रेक्स, गप्पा असं चालायचं. एका रात्री अशाच गप्पांमधे विषयावर विषय निघत गेले आणि प्रश्न आलाच 'देव म्हणजे काय?' कधी रॅशनली या गोष्टीचा विचार केलाच नव्हता.

देव म्हणजे देवघरातल्या पितळी मूर्ती? हे धातू तर जमिनीतून आले, आणि तिथे आले मरणार्‍या तार्‍याच्या स्फोटातून! हे देव नाहीत, हे फक्त मूर्त रूप! पण कसलं हा प्रश्न सुटला नाहीच.

देव म्हणजे राम-कृष्ण-विठ्ठल का? देवांचा राजा इंद्र, पण तो असा व्यभिचारी, म्हणजे तो गेला गणतीतून! का कोण जाणे, माणसांपेक्षा वेगळे दिसणारे हनुमान, गणपती 'आपले' वाटलेच नाहीत. (आरत्यांचा गोंधळ आणि प्रसादातला खाऊ वगळता!) याही सगळ्या गोष्टीच. राम, कृष्ण खरंच होते का याचाही वस्तूनिष्ठ पुरावाच नाही. बरं असे लोकं अस्तित्त्वात होते तरीही त्यात 'देव' म्हणण्यासारखं नक्की काय होतं, आहे?

देव म्हणजे निसर्ग? पण यात काय कसली शक्ती, इच्छाशक्ती आली? पाण्याचं चक्र आहे, कार्बन-सायकल आहे, आपण कितीही त्यात ढवळाढवळ केली तरीही ती नगण्यच आणि शिवाय मूळ कार्बन, पाण्याचे गुणधर्म आपण थोडीच बदलू शकतो? बदललं तर पाण्याचं जड पाणी होईल, युरेनियमचं बेरियम आणि क्रिप्टॉन होतात तसेच. हे कोणी काही वेगळं करण्याची गरज नाही, हे तर साधं भौतिकशास्त्र आहे.

१३-१४ कोटी वर्षांपूर्वी एका बिंदूतून विश्व निर्माण झालं, काळ आणि अवकाश यांचा जन्म तेव्हाच झाला (केला हा शब्द मुद्दाम वापरला नाही आहे). या बिंदूच्या प्रसरणानंतर, प्रचंड काळानंतर (~काळ-१ कोटी वर्ष) एक सूर्य तयार झाला आणि त्याच्या एका ग्रहावर पृथ्वी तयार झाली आणि तिथे आपण तयार झालो ... पण यात कोणाचीही (देवाची!) इच्छाशक्ती येतेच कुठे? पन्नास वर्षांपूर्वी वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारणं माहित नव्हती, सापडलेली नव्हती तेव्हा हे सगळ कपोलकल्पित वाटत होतं, पण आज नाही. जर संपूर्ण विश्व हा एकच बिंदू होता तर त्यात इच्छाशक्ती येणार कुठून? (हबल स्थिरांकाचा विषय मागच्या चर्चांमधे निघाला होता आणि इथे साधारण तसं लिहीलं आहे म्हणूनः हबल स्थिरांक हा स्थिरच आहे, हबल पॅरॅमीटर हा काळाप्रमाणे बदलत जातो. हबल पॅरॅमीटरची सध्याची सर्वमान्य किंमत ~ ७१ किमी/से/पार्सेक आहे. त्यालाच Ho म्हणतात.)

देव म्हणजे काय? मला माहित नाही. ज्या गोष्टीची व्याख्या माहित नाही, जी गोष्ट अनुभवता (दिसत नाही, स्पर्श नाही, गंध नाही, इ.इ) येत नाही, शब्दकोषाच्याबाहेर एखाद्या गोष्टीचं अस्तित्त्व नाही तर ती आहे हे कसं मान्य करायचं? देव आहे का नाही यावर वाद घालणं माझ्या आवाक्याबाहेर आहे. (माझ्यापेक्षा वेगळ्या विचारांचा पूर्ण आदर राखून) मी देवाचं अस्तित्त्व मान्य करत नाही कारण देव म्हणजे काय हे मला माहित नाही, मला कळेल किंवा पटेल असं कोणीही मला ते समजावून सांगितलेलं नाही तोपर्यंत मी ते मान्य करणारही नाही.

प्रामाणिक आहे, कोणाचीही

1

प्रामाणिक आहे, कोणाचीही चेष्टा न करता केवळ स्वतःपुरतं सिमित ठेवून लिहिलं आहे... म्हणून आवडलं.

असेच म्हणतो...

2

असेच म्हणतो...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१

3

हे मात्र खरे. प्रामाणीक कथन वाटते. आवडले.

प्रामाणीक कथन वाटते +१ देव

4

प्रामाणीक कथन वाटते
+१

देव पटत नसेल तर मानु नये हेच उत्तम हास्य

देव अस्तित्वात आहे का? मला

5

देव अस्तित्वात आहे का? मला कुतुहल वाटत आहे की ह्या वादविवादाकडे एवढे लक्ष दिले जात आहे. अगदी अलिकडचे निरीक्षणानुसार जगातील ९०% लोक देवाचे अस्तित्व किंवा काही उच्च दर्जाच्या शक्तिवर विश्वास ठेवतात. तरीही जे देवाचे अस्तित्व मानतात त्यांच्यावर काही अंशी देवाचे अस्तित्व सिध्द करण्याची जवाबदारी येते. माझ्यासाठी, मला वाटते आजुबाजुला / सभोवती दुसरा काही मार्ग नसताना. तरीही, कोणी देवाचे अस्तित्व सिध्द करू शकत नाही अथवा ते खोटे आहे ही सिध्द करू शकत नाही. हे ज्याच्या त्याच्या विश्वासावर अवलंबून आहे असे माझे मत आहे.

सहमत

6

प्रामाणिक आहे, कोणाचीही चेष्टा न करता केवळ स्वतःपुरतं सिमित ठेवून लिहिलं आहे... म्हणून आवडलं.
सहमत आहे.
स्वाती

अदिती ...तुझ लिखाण नेहमी आवडत

7

अदिती ...तुझ लिखाण नेहमी आवडत ..अगदी भातशेती पासुन ....ते संमातर विश्व वगैरै.....पण का काय माहीत हा लेख मला तरी अपुर्ण वाटला........तुला बरच काही लिहीता आल असत........खास करुन सैंटीस्ट्-मोडमधे.......जार्गन्स आहेत म्हणुन लिहील नाही का ?

अवांतर ::: ईन्फीच्या मेल मध्ये आज दिवसभर हेच चालु होत.....तिकडुन ईकडे कसं काय आल ????...आज परत डॉन्याचा श्रध्दा ,संस्कार च्या निमीत्ताने डॉन्याने मांडलेला मनाचा विस्कळीतपणा आठवला.......

फिजिक्स.....अ‍ॅन्ड फिजीक......
वाश्या

+१

8

वाचल. प्रामाणिक आहे हे नक्कीच. कोणाचीही चेष्टा न करता केवळ स्वतःपुरतं सिमित ठेवून लिहिलं आहे हे उत्तम.

छान लिहिलय....

9

आवडलं लिखाण.

मी देवाचं अस्तित्त्व मान्य करत नाही कारण देव म्हणजे काय हे मला माहित नाही

हे पण मान्य.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

णम्र विनंती...

10

वरील सर्व उत्तरांसाठी कृपया दासबोध + दासबोध चिंतनिका, तुकाराम गाथा पूर्ण वाचावा/वी.....
नंतर हवे असल्यास आणखी पुस्तकांची माहिती देऊ.
वादासाठी वाद नसावा.......


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

माफ करा, पण हे उत्तर मला

11

माफ करा, पण हे उत्तर मला थोडंफार शशिकांत ओकांसारखंच वाटतं. त्यांचं जे म्हणणं, तुम्ही नाडीवर संशोधन करा आणि सिद्ध करा नाडीशास्त्र थोतांड नाही आहे हे!
देव आहे/नाही याने मला काहीही फरक पडत नाही. मी माझा रस्ता मुद्दाम वाकडा करून (पक्षी: आवड नसलेल्या किंवा महत्त्वाचे वाटत नसलेल्या विषयांवरची, जुन्या भाषेतली, जाड-जाड पुस्तकं वाचून) स्वतःला देव आहे का नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करणं मजेशीर वाटतं.

अवांतरः एखाद्या खगोलीय घटनेचं मॉडेलिंग करताना त्यात एक 'प्रायर' किंवा 'बायस' वापरतात. हा प्रायर/बायस थोडाफार चुकीचा असेल तरीही मॉडेल 'एरर'च्यापेक्षा जास्त बदलू नये अशी अपेक्षा असते. माझा देवासंदर्भात जो प्रायर/बायस आहे तो तसाच आहे का?

आपण देव (पक्षी कुठलीही गोष्ट)

12

आपण देव (पक्षी कुठलीही गोष्ट) मानत नाही म्हणजे नक्की काय करतो...???
मुख्यत्वे आपल्या कुटुंबात, समाजात असणार्‍या चाली-रुढींना पाहात मोठे होताना न पटणार्‍या रुढी, कारण मीमांसा न कळणार्‍या प्रथा यांना नकार देतो. जबरदस्ती असेल तर तरुणाईचा स्वभाव म्हणून बंड करुन पूर्ण गोष्टच नाकारतो.

देव मानावा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही काहीही सांगा आम्हाला जे करायचे तेच आम्ही करु असे जर असेल तर आपण करतोय तो उहापोह कशासाठी...???

जर खरेच बघायचे असेल तर एकदा मी सांगितलेले ग्रंथ उघडून बघा, नसेल तर तुमची मर्जी.
मागच्या एका प्रतिसादात मी म्हटले होते, की शालेय शिक्षण आणि त्यातील व्याख्या यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी जर १० वर्षे हा कालावधी निश्चित असेल तर संपूर्ण विश्वाचे मूळ अध्यात्मिक मार्गाने शोधण्यासाठी किमान थोडा प्राथमिक अभास आवश्यक नसेल का???

आपला शोध ज्या गोष्टीसाठी चालू आहे (गृहित धरतोय) त्यासाठी त्याच प्रकारच्या साधन सामुग्रीची गरज नाही का??
टेलिफोन नंबर शोधण्यासाठी डिरेक्टरीच लागेल. अध्यात्म, देव, परमार्थ याचा शोध ग्रंथातच घ्यावा लागतो.....

देव ही सर्वस्वी व्यक्तिगत अनुभवाची गोष्ट असल्याने हा व्याप करावाच लागेल.

आणि तुमचा प्रायर /बायस १००% चुकतोय ....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

देव ही सर्वस्वी व्यक्तिगत

13
देव ही सर्वस्वी व्यक्तिगत अनुभवाची गोष्ट असल्याने हा व्याप करावाच लागेल.

मान्य, १००% मान्य! आणि हा अनुभव घ्यायचा नसेलच तर? मेरी-गो-राऊंडमधे बसल्याशिवाय त्याचा अनुभव कळणारच नाही, पण त्यात बसायचंच नसेल तर? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण घोड्याला तहानच लागली नसेल तर??

आणि तुमचा प्रायर /बायस १००% चुकतोय ....

There you go! मी कितीही वाचलं तरी फरक पडेल असं नाहीच! आणि आधी सांगितल्याप्रमाणे, मारून-मुटकून, आवड नसताना, जुन्या (आणि त्यामुळे बोजड) भाषेतलं साहित्य वाचून काय फरक पडणार?

मला काय वाटतं, मी काय विचार करते हे मला महत्त्वाचं वाटत नाहीच (मी किंवा या एका आयडी/व्यक्तीच्या म्हणण्याने काय फरक पडणार आहे?), कारण माझा अभ्यास खूप कमी असेल. पण तुम्हाला काय वाटतं देव म्हणजे? तुमचं या विषयातलं खूप वाचन असणार, तुम्ही काय विचार करता देव म्हटल्यावर??

मला काय वाटतं यापेक्षा या

14

मला काय वाटतं यापेक्षा या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्ती काय म्हणतात ते पाहावे लागेल.
समर्थ रामदास देव चार प्रकारे सांगतात.
१. प्रतिमा- देवळातील, देव्हार्‍यातील, चित्रे इ.इ.
२. अवतार- कृष्ण, दत्त, विठ्ठ्ल, राम इ.इ.
३. ईश्वर - जगाचा नियंता, ह्याला बघता येत नाही, त्याचे कार्य दिसते,
४. ब्रह्म- संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान (ज्याच्या बेस वर सगळे आहे)

प्रतिमा- या अवतारांच्या असतात. आपण ध्यानासाठी, पूजेसाठी,स्मरण रहावे म्हणून वापरतो. (उदा.बायकोचा पाकिटात असलेला फोटो) सातत्याने आठवण म्हणून, त्याचे सतत आलंबन रहावे म्हणून.
अवतार- हे विशिष्ट काळात विशिष्ट कार्यासाठी स्वेच्छेने अवतरतात.
ईश्वर- नियंता, विश्व चालण्याची व्यवस्था करणारी शक्ती ज्यामध्ये ज्या त्या प्राण्याला त्याच्या त्याच्या कर्माने पुढच्या गोष्टी मिळत जातात.
ब्रह्म- विश्व असताना, नसताना असणारे (बेस) सगळ्या सुवर्णालंकारामधे सोने हा बेस आहे तसे... प्रत्येक जीवातील चैतन्य म्हणजे ब्रह्म....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

ठीक

15

लेख ठीक झालाय

१३-१४ कोटी वर्षांपूर्वी एका बिंदूतून विश्व निर्माण झालं

हे सिद्ध करता येईल काय? किंवा झाले आहे काय? का फक्त ही थेरी आहे?

चेतन
अवांतर: एका दुव्यातिल वाक्ये तशीच्या तशी चिकटवतोय
Big Bang Theory - What About God?
Any discussion of the Big Bang theory would be incomplete without asking the question, what about God? This is because cosmogony (the study of the origin of the universe) is an area where science and theology meet. Creation was a supernatural event. That is, it took place outside of the natural realm. This fact begs the question: is there anything else which exists outside of the natural realm? Specifically, is there a master Architect out there? We know that this universe had a beginning. Was God the "First Cause"? We won't attempt to answer that question in this short article.

अतिअवांतरः जर वादच घालायचा असेल तर मग हा बिंदुदेखील कुठुन आला...?

महाअवांतरः जर वरच्या थेरीवर तुम्ही विश्वास ठेवता तर मी ही देव आहे यावर विश्वास ठेवु शकतो कोणिही मला पटवुन द्यावे की देव नाही म्हणुन

१३-१४ कोटी वर्षांपूर्वी एका बिंदूतून विश्व निर्माण झालं

16

पूर्ण गणित आणि निरिक्षणं विचारत असाल, तर चुकीच्या माणसाला (पक्षी: मी) विचारत आहात. पण थोडक्यात उत्तर हवं असेल तर पुढचा प्रतिसाद वाचा:

आज बाहेरच्या दीर्घिका पाहिल्या तर त्या आपल्यापासून लांब जाताना दिसतात. याचा अर्थ एकेकाळी त्या सर्व दीर्घिका एकाच बिंदूत होत्या. १३-१४-१५ कोटी हा आकडा सध्याच्या निरीक्षाणांवरून काढलेला आहे. जसजशी निरीक्षणं जास्त अचूक होत जातील तसतसा हा आकडा आणखी रिफाईन (मराठी शब्द?) होईल.
अर्थात १३.७५ कोटी वर्षांपूर्वी काय झालं हे त्या काळात जाऊन कोणीही पाहू शकत नाही. पण पहिल्या १०^(-४६) सेकंदांनंतर काय झालं याचं गणित मांडता येतं आणि त्यातून काही गोष्टींचं अस्तित्त्व प्रेडीक्ट (मराठी शब्द) केलं, त्यातल्या काही गोष्टी आधीच शोधल्या आहेतः उदा, वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारण. काही गोष्टी अजूनही शोधल्या नाही आहेत कारण गणितांमधून जी एरर मिळते आहे ती सध्या खूप जास्त आहे. पण नवनवीन दुर्बिणींच्या मदतीने इतर गोष्टी बघण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज ना उद्या त्यांचं उत्तर मिळेल (हा माझा विश्वास आहे). आजचं गणित बरोबर आहे का चूक हे तेव्हा कळेल आणि त्याअनुषंगाने थिअरीज बदलतीत किंवा इव्हॉल्व्ह होतील किंवा आहेत तशाच रहातील.

आजची आपली निरीक्षणं पाहिली तर बिग-बँग (महास्फोट) नंतर बिग-क्रंच (मराठी शब्द?) होईल असं दिसत नाही. त्यामुळे १३-१४ कोटी वर्षांपूर्वी विश्व निर्माण झालं हे फक्त कागदावरचं (किंवा संगणकावरचं) गणित नसून त्याला थोडाबहुत निरीक्षणातून आलेला आधारही आहे.

तुमच्या अवांतराबद्दल: देवावर कोणी विश्वास ठेवायचा का नाही हा अतिशय व्यक्तीगत प्रश्न आहे, अमक्या माणसाने तमक्या माणसाशी (मनुष्यप्राणी या अर्थाने) लग्न का केलं हा जसा सर्वस्वी व्यक्तीगत प्रश्न आहे, तसाच देवावर विश्वास ठेवणं/न ठेवणंही.
माझ्या प्रकटनाच्या निमित्ताने आपापले विचार मांडायला एक धागा उपलब्ध होईल म्हणून मी प्रकटन लिहून प्रकाशित केलं.

निरीक्षणं

17

तुमची माहिती कदाचित चंगलि असेल पण

वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारण आणि आज बाहेरच्या दीर्घिका पाहिल्या तर त्या आपल्यापासून लांब जाताना दिसतात. याचा अर्थ एकेकाळी त्या सर्व दीर्घिका एकाच बिंदूत होत्या.

हा आधार यातुनच विश्व निर्माण झालं हे सिद्ध करण्यास अपुरा अहे असं वाटतं

अर्थात अतिअवांतरामध्ये मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ही दिलेत तर बर होईल (कदाचित आपण एकाच वेळेला टंकतोय)

चेतन

>> हा आधार यातुनच विश्व

18

>> हा आधार यातुनच विश्व निर्माण झालं हे सिद्ध करण्यास अपुरा अहे असं वाटतं <<
या दोन घटनांच्या उल्लेखावरून महास्फोटाचा सिद्धांत प्रत्यक्ष जॉर्ज गॅमॉसुद्धा सिद्ध करू शकणार नाही. गंमतीचा भाग वगळता, माझा या विषयाचा अभ्यास आणि जाण फार कमी आहे, त्यामुळे ज्यांना या गोष्टी समजतात असं इंप्रेशन (मराठी शब्द?) जे लोकं माझ्यावर टाकतात त्यांचं म्हणणं मी (शक्यतोवर ताडून घेऊन) मान्य करते.

अवांतराचं उत्तरः माहित असतं तर नक्कीच आत्ता मीमराठीवर (फुकट) टंकन करण्यापेक्षा पुस्तकं लिहून पैसे छापले असते! wink
माझ्या अभ्यास आणि माहितीच्या पलिकडची गोष्ट! पण डोक्याला किंचित ताण दिला तर काळ उणे होता तेव्हाचं काय हा प्रश्न गैरलागू आहे. काळ आणि अवकाश उणे असू शकत नाहीत, तेव्हा काळ = शून्य इथूनच सुरूवात झाली.
आता हे सर्व वस्तूमान एका बिंदूत कसं काय एकत्र होतं, तेव्हा पदार्थाची अवस्था काय होती, पदार्थ होता का फक्त ऊर्जा वगैरे प्रश्न माझ्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे हा बिंदू कसा आला हा प्रश्न त्याहीपलिकडचा आहे.

मला प्रश्न पडला आहे तो महास्फोट आणि देव यांचा संबंध काय? देव म्हणजे नक्की काय अशी तुमची कल्पना आहे?

आत्ता खरा प्रश्न आला

19

मला प्रश्न पडला आहे तो महास्फोट आणि देव यांचा संबंध काय? देव म्हणजे नक्की काय अशी तुमची कल्पना आहे?

आत्ता खरा प्रश्न आला....?माझी कल्पना

माझी देवा बद्दलची कल्पना एक अनाकलनीय शक्ती जी हा संपुर्ण पसारा चालवते.

आण्खी एक

पण डोक्याला किंचित ताण दिला तर काळ उणे होता तेव्हाचं काय हा प्रश्न गैरलागू आहे. काळ आणि अवकाश उणे असू शकत नाहीत, तेव्हा काळ = शून्य इथूनच सुरूवात झाली.

महाभारतात पुर्वी टी.व्ही वर पाहिलेले आठवते.. काळ आनादि आहे त्याला सुरवातही नसते आणि अंतही असो

या गोष्टी माझ्यातरी आवाक्याबाहेरच्या आहेत.

चेतन

अवांतराचं उत्तरः माहित असतं

20
अवांतराचं उत्तरः माहित असतं तर नक्कीच आत्ता मीमराठीवर (फुकट) टंकन करण्यापेक्षा पुस्तकं लिहून पैसे छापले असते.

हा हा हा! हास्य
आणि ते माहित नाही म्हणून ते देव किंवा आणखी कुठल्या शक्तीने केलंय हे मान्य करायचं का?

आणि ते माहित नाही म्हणून ते

21

आणि ते माहित नाही म्हणून ते देव किंवा आणखी कुठल्या शक्तीने केलंय हे मान्य करायचं का?

मी तरी करतो. (पण हे फक्त मी बोललेल्या अवांतराबद्दलच)

आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास

The law of conservation of energy states that the total amount of energy in an isolated system remains constant over time (is said to be conserved over time). A consequence of this law is that energy can neither be created nor destroyed, it can only be transformed from one state to another.

जर एनर्जी क्रिएट्च करता येत नसेल तर पहिल्यांदा ती आली कुठून (यातला पहिल्यांदा हा शब्द महतवाचा आहे कारण काळ शुन्यापासुन सुरु होतो का...?

कुठल्या शक्तीने केलंय हे मान्य करायचं का?

मी मान्य करतो

तुम्ही नसाल करतं

चेतन

काळ शून्यापासून सुरू होतो हे

22

काळ शून्यापासून सुरू होतो हे आता जवळजवळ सर्वमान्य आहे. फारच थोडे शास्त्रज्ञ स्थिरस्थिती सिद्धांताचे समर्थक आहेत. अर्थात ज्याने-त्याने आपल्याला कोणता सिद्धांत पटतो हे ठरवावं.

काल = शून्य असताना एका बिंदूत सर्व वस्तूमान होतं, पण त्या पदार्थाची अवस्था काय हे कोणालाही माहित नाही. काल = शून्य सोडा, कृष्ण विवराबद्दल, कृष्ण पदार्थ, कृष्ण ऊर्जेबद्दलही आपली माहिती आज शून्यच आहे.
पण वस्तूमान आणि ऊर्जा हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे E= mc2 मुळात हा बिंदू 'असला' की सगळंच काम भागतं.

अदिती तुझे मुद्दे मान्य असले तरि

23

अदिती तुझे मुद्दे मान्य असले तरि

>>काल = शून्य असताना एका बिंदूत सर्व वस्तूमान होतं, पण त्या पदार्थाची अवस्था काय हे कोणालाही माहित नाही.

नसेल माहितिही पण हा जो काही पदार्थ आहे तो कुठुन निर्माण झाला? मला नाही वाटत याचे उत्तर कोणि देऊ शकेल.

समजा हा पदार्थ क्ष पासुन तयार झाला तर 'क्ष' कशापासुन हा प्रश्न राहतोच? (हे कोंबडी आधि का अंड सारखाच प्रश्न आहे)

कदाचित तुला हा फालतु प्रश्न वाटेल पण मला हा प्रश्न आहेच... मी विज्ञानच्या विरोधात नाही पण हा प्रश्न पडला की मग वरच्या सगळ्या थेरी वरचा विश्वास उडतो.

हाकिंगच्या म्हणन्याप्रमाणेच एका बिंदुपासुन विश्व कस निर्माण झालं हे आपण सांगु शकतो पण तो बिंदु कोठुन आला हे नाही.

बघ hawking काय म्हणतोय

The idea is that we interpret the input from our senses in terms of a model we make of the world. One can not ask whether the model represents reality, only whether it works.

Although the singularity theorems of Penrose and myself, predicted that the universe had a beginning, they didn't say how it had begun. The equations of General Relativity would break down at the singularity. Thus Einstein's theory cannot predict how the universe will begin, but only how it will evolve once it has begun.

असो तु किंवा नाईल देव मानत नाही हे ठीकच आहे मी मानतो एव्हढच

चेतन

देव म्हणजे राम-कृष्ण-विठ्ठल

24
देव म्हणजे राम-कृष्ण-विठ्ठल का? देवांचा राजा इंद्र, पण तो असा व्यभिचारी, म्हणजे तो गेला गणतीतून!

आपले देव तरी ठीक पण ग्रीक मायथॉलॉजी वाचली तेव्हा झ्यूसचे काय किंवा इतर देवांचे कारनामे वाचून ह्यांना देव का म्हणायचे असा प्रश्न मलाही पडला. पण नंतर "history of science" नावाचं पुस्तक वाचलं. ग्रीसमध्ये वि़ज्ञानाची प्रगती का झाली ह्याचा उहापोह करत असताना ग्रीकांचे देव हे ही एक कारण लेखकाने सांगितलं आहे. इतर जग हे नैसर्गिक घटनांचा संबंध देवांच्या रागलोभाशी जोडत होतं. पण ग्रीक देव हे जवळजवळ माणसांएवढेच दुर्बळ होते. त्यामुळे ग्रीकांनी नैसर्गिक घटनांचा संबंध देवांशी न जोडता अधिक खोलात जाऊन विचार केला. असा एक तर्क मांडला आहे. त्याची लेख वाचून आठवण झाली.

मी देवाचं अस्तित्त्व मान्य करत नाही कारण देव म्हणजे काय हे मला माहित नाही, मला कळेल किंवा पटेल असं कोणीही मला ते समजावून सांगितलेलं नाही तोपर्यंत मी ते मान्य करणारही नाही.

सहमत.

रसलचं ना History of science?

25

रसलचं ना History of science? बरीच वर्ष झाली ते वाचून! बरी आठवण केलीस, लवकरच पुस्तक कुठे आहे ते शोधते! wink

आकाशातल्या तार्‍यांचे कंपू बनवून त्यांना तारकासमूह म्हणतात. त्यांना ग्रीकांनी आणि भारतीयांनी नावं दिली, त्यांच्या कथा रचल्या, त्या वाचल्या की 'काय लफडेल आहेत हे देव, राजे' असा विचार आल्याशिवाय रहात नाही.

अवांतर

26

>>> काय लफडेल आहेत हे देव, राजे
--- हं हास्य

(विषय दिलेला नाही)

27

Laughing out loud


-Nile

सहमत

28

मी देवाचं अस्तित्त्व मान्य करत नाही कारण देव म्हणजे काय हे मला माहित नाही
१००% सहमत. मी याच विषयावर 'देवाच्या शोधातील प्रश्न' असे लिखाण करीत होतो. पण पुरे झालेले नाही.
अस्तित्व मान्य करणे/न करणे यात अनेक गृहितके येतात. पहिले तुम्ही लिहिले त्याप्रमाणे 'देव' ही संकल्पना/शक्ती/व्यक्ती/मूल्य हे गुणविशेषाने निश्चित झाले आहे. तसेच ही व्याख्या - निदान प्रश्नकर्ता नि उत्तरदाता यांच्यापुरती तरी - स्थल-कालनिरपेक्ष आहे. त्यानंतर 'मान्य करणे' म्हणजे काय याचीही अशीच निरपेक्ष व्याख्या व्हायला हवी. आलेल्या उत्तराचा अर्थ्/मूल्यमापन हे प्रश्नकर्ता नि उत्तरदेणारा यांच्या साठी समानच हवा. यातून पुढे उपासना/व्याप्ती/कृती इ. संबंधी अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे देव मानणे न मानणे याबद्दल चर्चा करण्यापूर्वी त्या चर्चेचे मूल्यमापन्/व्याप्ती हे निश्चित करावे लागतील. आता निकष ठरवणारे आपणच नि वाद घालणारे आपणच असू तर निकष ठरवितानाच मोठे मतभेद होतील. असो. बाकी तपशील आमच्या आगामी लेखात (वाट) पहा.

हॅहॅहॅ

29
आता निकष ठरवणारे आपणच नि वाद घालणारे आपणच असू तर निकष ठरवितानाच मोठे मतभेद होतील. असो. बाकी तपशील आमच्या आगामी लेखात (वाट) पहा.

पघतो पघतो. वाट पघतो.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरेच्च्या, केलात ना तुमी

30

अरेच्च्या, केलात ना तुमी वांदा, आता तुम्हाला 'शुभस्य' शीघ्रम तरी कसे म्हणावे? wink

वाट पहातो आहे.


-Nile

आज देवांच(आभाळातल्या) काय खर

31

आज देवांच(आभाळातल्या) काय खर नाय..


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

गणपा, याचा अर्थ आकाशाखालीही

32

गणपा,
याचा अर्थ आकाशाखालीही कुठे तरी (आंतरजालावर?) देवाचं अस्तित्व तू मान्य करतो आहेस? या प्रश्नाचं उत्तर न दिल्यास तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील. Laughing out loud

भोचकराव, या प्रश्नाचं उत्तर

33

भोचकराव,
या प्रश्नाचं उत्तर माहित असहुनही विचारल्या बद्द्ल तुम्हाला चालअस्त्र फेकुन मारण्यासाठी देवाला (कुठल्या ते तुम्ही ठरवा आता) नवस बोललोय wink

असो चांगल्या धाग्याचा खफ होउ नये म्हणुन माझ्या कडुन यापुढे या धाग्यावर आवांतर प्रतिसाद बंद


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

अदिती छान लेख. मोकळं प्रकटन

34

अदिती छान लेख. मोकळं प्रकटन आवडलं. निराकाराच्या अथांग पोकळीत जन्मलेल्या मानवप्राण्याला कुण्या ईश्वरी सत्तेने बांधून ठेवलं असेल हे पटत नाही.

बाकी दासबोध, ज्ञानेश्वरी नि गाथा माझ्याही घरी आहे. मला त्यातली भाषा, कल्पना आणि काव्य आवडतं.

मला त्यातली भाषा, कल्पना आणि

35
मला त्यातली भाषा, कल्पना आणि काव्य आवडतं.

मला त्यातलं (काही) तत्वज्ञान आवडतं.


-Nile

अज्ञेयवाद

36

>>> देव म्हणजे काय? मला माहित नाही. ज्या गोष्टीची व्याख्या माहित नाही, जी गोष्ट अनुभवता (दिसत नाही, स्पर्श नाही, गंध नाही, इ.इ) येत नाही, शब्दकोषाच्याबाहेर एखाद्या गोष्टीचं अस्तित्त्व नाही तर ती आहे हे कसं मान्य करायचं? देव आहे का नाही यावर वाद घालणं माझ्या आवाक्याबाहेर आहे.

--- सहमत आहे. खास करून शेवटच्या वाक्याबद्दल. मात्र त्याचवेळी हिरीरीने ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी देवाचं अस्तित्व अमान्य करण्यात/खोडून काढण्यात काही हशील वाटत नाही (जोवर 'बाबा वाक्यं प्रमाणम्'ची सक्ती होत नाही तोपर्यंत). voyant trop pour nier, et trop peu pour m'assurer (Seeing too much to deny & too little to ensure) असं देवाच्या अस्तित्वाबद्दल म्हणणारा फ्रेंच तत्त्वज्ञ पास्कल (याने सतराव्या शतकात मांडलेली पास्कल्स वेजर ही संकल्पनाही या संदर्भात वाचनीय आहे) काय किंवा ब्रह्माच्या अनिर्वचनीयतेबद्दल अखेर 'नेति नेति' (हेही नाही, हेही नाही) म्हणणारी उपनिषदं काय, याच अज्ञेयवादाच्या निष्कर्षाला येऊन पोचतात.

सहमत. शंकराचार्यांची ही

37

सहमत. शंकराचार्यांची ही तात्विक मांडणीही त्याच निष्कर्षाशी जवळीक साधणारी असावी असे वाटते.

ऊं पूर्णमद: पूर्णमिदं, पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णामादाय, पूर्णमेवावशिष्य्ते ॥ ऊं शान्ति: शान्ति: शान्ति

त्या उं मुळे हे अगदी

38

त्या उं मुळे हे अगदी हिम्मेसभायने वेदपठण केल्यासारखे वाटते आहे...
wink

लिहु तित्के कमीच तरीही एक पिंक....

39

छान प्रकटन.
देव आहे की नाहि हा वाद आता बरीच शतके चालु आहे. एकूण जनमानसाची चार भागात विभागणी करता येईल
१. देव निश्चितपणे नाहि अशी खात्री पटलेले व तसे जाहिर सांगणारे
२. देव नसावा अशी खात्री नसली तरी असे वाटणारे, मात्र सहसा जाहिरपणे मत न देणारे
३. देव आहे की नाहि यावर कोणतेच मत न बाळगणारे
४. देव असावा अशी खात्री नसली तरी असे मानणारे, मात्र जाहिरपणे मत न देणारे
५. देव निश्चितपणे आहे अशी खात्री पटलेले व तसे जाहिर सांगणारे

यात १, ३ व ५ प्रकारात मोडणारे कमी आहेत व बहुतेक जनता २,४ मधे विभागलेली आढळाते (व ते समाजासाठी पोषकच आहे)

मी स्वतः २र्‍या गटातला (देव नसावा अशी खात्री नसली तरी असे वाटणारे, मात्र सहसा जाहिरपणे मत न देणारे) आहे. तरीही दुसर्‍या बाजूबद्दल उत्सुकता आहे. ती शमविण्यासाठी अनेक पुस्तकांचे वाचन चालु असते. ज्यात प. वि. वर्तकांच्या चमत्कारीक अनुभवांपासून, लोबसंग रांपा यांच्या तिबेटमधील चमत्कारांच्या - परकाया प्रवेशाच्या वगैरे कादंबर्‍या, जगन्नाथ कुंट्यांचे अनुभव, गुरु डिंग ले मी यांच्या चायनिज अध्यात्मावरील कादंबर्‍या वगैरे वाचल्या आहेत. तसेच दुसर्‍या टोकाच्या लेखकांपैकी डॉ. नारळीकर, दाभोळकर, वगैरे वाचले आहेत. तरीही असे अनेक प्रश्न मला पडतात ज्यांची उत्तरे ५व्या भागातील लोकांकडून कुठेही मिळालेली नाहित. मात्र दुसरीकडे पाहता काहि गोष्टींची उकल पहिल्या गटातील लोकांनी केली आहे व काहि प्रश्नांची उकल झाली नसली अश्या विषयात त्यांचा दृष्टीकोन मला अधिक नव्या कल्पना स्वीकारण्यास तयार असा वाटतो.

पहिल्या गटातले व इतर काहि सदस्यांसारखे ५व्या गटातले आपापल्या भुमिकांवर ठाम असतात व असे दिसते की ह्या १ल्या व ५व्या गटातील मंडळींतही दोन गट आहेत. एका गटाला आपल्या भुमिकेवर विश्वास आहे मात्र ते सिद्ध करायची गरज वाटत नाहि; मात्र दुसर्‍या गटाला, आपली बाजु स्वतःपुरती ठाम ठेऊन भागत नाहि, तर २,३,४ मधील लोकांना आपल्याबाजूला करण्यात स्वारस्य असते. ते सिद्ध करणे गरजेचे वाटते कारण त्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात. आणि हे आर्थिक हितसंबंधच मला मुळ भुमिकेपेक्षा अधिक निंदनीय वाटतात.


-ऋ

माझा देव

40

मला कोणीतरी विचारलं होतं की तू देव मानतोस का? त्यावर मी म्हटलं की हे विश्व फिजिक्सच्या नियमांनुसार चालतं ही संकल्पना हाच माझा देव. लेखिकेनेही हीच विचारधारा मांडली आहे असं वाटतंय. त्यामुळे लेखातला "साधं भौतिकशास्त्र" हा शब्दप्रयोग खटकला. भौतिकशास्त्र साधं नाही. त्यात ही सगळी किमया कशी झाली याचं सार आहे...

देवाची रूढ प्रतिमा माझ्या मनात कधीच पाया धरू शकली नव्हती. पण मनातलं अर्धमूर्धं देखील देऊळ कोसळलं तो दिवस लख्ख आठवतोय. अगदी धनंजयनी आपल्या प्रसिद्ध लेखात स्व-जाणीव झाल्याचं वर्णन केलंय तसा. सेल्फिश जीनमधला रेप्लिकेटर्स हा भाग वाचला. त्यात रेणूंपासून सुरूवात करून सजीवांपर्यंत कसा प्रवास होतो याचा आराखडा दिलेला आहे. जीव, प्राणीमात्र, वनस्पती - सगळे आपोआप, निसर्गनियमांनी तयार होत असतील तर दुसर्‍या देवाची काय आवश्यकता? निसर्गनियम हेच देव. ते स्वयंसिद्ध आहेत, चराचर व्यापून आहेत, अणु-रेणीया तोकडे, व आकाशाएवढे आहेत. प्रत्येक घटितावर त्यांची सत्ता आहे. मानवाच्या प्रत्येक हालचालीला, विचाराला, विकाराला, जन्माला मरणाला तेच कारणीभूत आहेत.

(देव बघितलेला) राजेश

मीम

41

>>> सेल्फिश जीनमधला रेप्लिकेटर्स हा भाग वाचला.
--- (पीजे वॉर्निंग) मीमवर ह्या मीमबद्दल (meme) अधिक विस्ताराने लिहिलेत तर वाचायला आवडेल (/पीजे वॉर्निंग)

(पीजे वॉर्निंग) मीम्+हणतच

42

(पीजे वॉर्निंग) मीम्+हणतच होतो पण मीम्+ऊळचा उपक्रमीम्+हणून मीम आधी मीमबद्दल तिथेच लिहिलं आहे(/पीजे वॉर्निंग)

हॅहॅहॅ

43

मीजे


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

साधं भौतिकशास्त्र हा प्रयोग

44

साधं भौतिकशास्त्र हा प्रयोग एवढ्याचसाठी केला (बहुदा!) की माहिती मिळवायची असेल, समजून घ्यायचं असेल तर संदर्भ लगेच मिळतात. किंवा मला देव काय आहे यापेक्षा भौतिकशास्त्राचे नियम जास्त चांगले समजले आहेत (असा माझा समज आहे.)

तेच ते

45

म्हणजे तो तुम्हालाही दिसलाय. परीस शोधणार्‍या माणसाप्रमाणे तो टाकून देऊ नका.

देव आहे की नाही हे माहीत नाही

46

देव आहे की नाही हे माहीत नाही व ब्रम्हांडाबद्दलचे माझे ज्ञान म्हणजे शुन्यच जे काही आहे चित्रपट पाहून व सध्या वाचलेले The Theory Of Everything - Stephen Hawking & a Brief History of Time ह्या द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच समजले नाही, शुन्यातून अवकाश व उर्जा तयार झाली व त्यात कोठेतरी छोटाश्या कणावर आपण आहोत हे उमजले व मी मान्य देखील करतो.

पण,

कुठला तरी उर्जास्त्रोत्रच ह्याचा मागे आहे व कोणीतरी हे सर्व चालवतं ह्यावर माझा प्रचंड विश्वास होता देव नावाची एखादी शक्ती नक्कीच ह्या सर्वाच्या मागे आहे असे वाटायचं अगदी परवा परवा पर्यंत. पण अपघातानंतर घरी जेव्हा पडून होतो तेव्हा घरच्यांसोबत देव व धर्म ह्यावर वाद घालताना स्वतःच्याच विश्वासाला कुठेतरी तडा गेला व मी पुन्हा पुन्हा माझे मुद्दे तपासून पाहीले व त्यात मला जाणवले की प्रत्येक माणसाला वाईट काळामध्ये एका आधाराची गरज असते व तो आधार एखादा मानव / व्यक्ती पुर्णतः देईल अशी ज्यावेळी त्याला खात्री होत नाही तेव्हा मात्र तो एका अनामिक उर्जेला ( पंच महातत्वे ! ) देवत्व देतो व तो आपली सर्व अडचण दुर करेल ह्यावर विश्वास ठेऊन आपले कार्य पुढे चालू ठेवतो कालातंराने त्याची अडचण दुर होते व त्याला असे वाटते की त्याच्यावर श्रध्दा ठेवली म्हणून माझे कार्य पुर्ण झाले अथवा अडचणीतून बाहेर पडतो मग हे चक्र चालू होते.

देव ही संपल्पना लहानपणापासून झालेले संस्कारामुळे अथवा पिढ्यांपिढ्या चालत आलेले ग्रंथ व देवत्वाची कल्पना ह्यांच्यामुळे एखाद्या मानवाच्या शरिरात आत्माप्रमाणे भिनलेली असते त्याला कळत असतं की शक्यतो हे योग्य नाही आहे असे काही अस्तित्वात असू शकत नाही पण तरी ही तो आपल्या जोखंडातून बाहेर पडून शकत नाही, एखाद्याने असा प्रयत्न जरी केला तर समाजाकडून त्याला प्रचंड विरोध सहन करावा लागतो. त्यामुळे हे वेळोवेळी वाद निर्माण होतात.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे वा राजे, तू ही पुस्तकं

47

अरे वा राजे, तू ही पुस्तकं वाचलीस? मी Brief history वाचायचा प्रयत्न केला आणि सोडून दिलं. दुसर्‍या पुस्तकाला शिवलेही नाही. मोठी लोक मोठी पुस्तकं ... हौस असेल तर Stephen Weinberg चं The first three minutes पहा. ते हॉकिंगच्या पुस्तकांपेक्षा जास्त माणसात आहे.

खुप डोक्यावरुन जाते... कमीत

48

हास्य

खुप डोक्यावरुन जाते...

wink

कमीत कमी चार वेळा वाचले... आता कधी झोप येत नसेल तर कुठले ही पान उघडून वाचायला सुरवात करतो लगेच झोप येते Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मी ज्यांच्यावर राग आहे अशा

49

मी ज्यांच्यावर राग आहे अशा २-३ जणांना दिले ते गिफ्ट म्हणून.

तरीच.... त्या महाराजांनी मला

50

Laughing out loud

तरीच.... त्या महाराजांनी मला ही पुस्तक का दिली ते आता कळले.. त्या दिवशी (बद्रीकेदारनाथला) एका सन्यासी व्यक्तीला खुप छळले होते देव,धर्म व योग वरुन त्याने जाताना ही पुस्तके गिफ्ट दिली होती मला.. २००६ च्या आसपास.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे देव न्यायी आहे, दयाळू

51

राजे

देव न्यायी आहे, दयाळू नाही.(आपल्या चुका झाल्या किंवा आपण चुका केल्या तरी तो आपल्याला सांभाळूनच घेईल असे नाही.वाचलात ही सकारात्मक बाजू लक्षात घ्या) कर्माच्या सिद्धांतानुसार, ज्यात्या गोष्टीचा परिणाम जसा व्हायचा तसाच होतो.

चूक नसतानाही काहीही कारणाने जरी अपघात झाला असला तर याला प्राक्तन ह्याशिवाय उत्तर देता येत नाही उलट तसे करणे श्रेयस्कर ठरते. अन्यथा ज्याने अपघात केला त्याला 'बघून घेतो' ची भाषा आपल्या तोंडी येऊ शकते. त्यामुळे नवीन गुन्हा घडू शकतो.

आणि देव म्हणजे आधाराचा खांब हे म्हणणे म्हणजे आपली श्रद्धा कुठेतरी कमी पडते आहे असे वाटणे. आपण मोकाट सुटायचे आणि अडचण आली की फिल्मी स्टाईल 'खुश तो बहोत होगे तुम' म्हणायचे हे पटत नाही.

संतांच्या सांगण्यानुसार, जर जे जे देखिजे भूत्(माणूस आणि इतर सर्व जीवसृष्टी) ते ते मानिजे भगवंत हे असल्याने माणसामधे असलेला देवच आपले कार्य करतोय ना...?? सेवा करणारा, आधार देणारा माणूस हा तोच आहे असा विश्वास आपण दोन्ही बाजूने असावा (म्हणजे आपणही एखाद्याचे काम करताना)
प्रत्येकाच्या गुणानुसार(मोड्स) तो तो काम करत असतो. दारुच्या अमलाखाली माणसाचे वागणे बदलते तसे प्रत्येक मनुष्य ३ गुणांच्या तालावर वागत असतो. मोड ऑफ गूड्नेस्(सत्व), मोड ऑफ पॅशन(रज) आणि मोड ऑफ इग्नरंस्(तम)....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

सहमत

52
त्यात मला जाणवले की प्रत्येक माणसाला वाईट काळामध्ये एका आधाराची गरज असते व तो आधार एखादा मानव / व्यक्ती पुर्णतः देईल अशी ज्यावेळी त्याला खात्री होत नाही तेव्हा मात्र तो एका अनामिक उर्जेला ( पंच महातत्वे ! ) देवत्व देतो व तो आपली सर्व अडचण दुर करेल ह्यावर विश्वास ठेऊन आपले कार्य पुढे चालू ठेवतो कालातंराने त्याची अडचण दुर होते व त्याला असे वाटते की त्याच्यावर श्रध्दा ठेवली म्हणून माझे कार्य पुर्ण झाले अथवा अडचणीतून बाहेर पडतो मग हे चक्र चालू होते.

सहमत आहे. देव शोधण्या अगोदर माणुस शोधा! देव काय पायलीचे पन्नास आहेत. प्रत्येकात देव आहे. पण माणुस आहे का याबद्दल साशंक!
आम्हाला गाडगेबाबा यामुळे आवडतात


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वरील सर्व उत्तरांसाठी कृपया

53

वरील सर्व उत्तरांसाठी कृपया दासबोध + दासबोध चिंतनिका, तुकाराम गाथा पूर्ण वाचावा/वी.....
हे सगळं वाचण्याआधी माझं १०वी चं प्रगती पुस्तक वाच.. लगेच देव आहे ह्याची खात्री पटेल.


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

लेख,प्रमाणिक कथन आवडले.. माझे

54

लेख,प्रमाणिक कथन आवडले..
माझे विचार असेच होते वयाच्या साधारण २०एक वर्षांपर्यंत. नंतर ते कसे आपोआप बदलले हे मलाही समजत नाही. पण देव असू शकतो, असे नंतर वाटू लागले. वर लिहीले ते ग्रंथ देखील माझ्या वाचनात आले ,अजुनही जमेल तसे, आवडेल ते वाचत असते.
जशी अदिती कोणी देव आहे हे पटवून देईपर्यंत देव नाही असे मानते, तसंच मी देव नाही हे पटवून देईपर्यंत तो आहे असे मानते.

जशी अदिती कोणी देव आहे हे

55

जशी अदिती कोणी देव आहे हे पटवून देईपर्यंत देव नाही असे मानते, तसंच मी देव नाही हे पटवून देईपर्यंत तो आहे असे मानते.
अस्तित्वाला पुरावा लागतो, नास्तित्वाला नाही.
नाहीतरः मी तसा नाही हे कोणीतरी मला पटवून देईपर्यंत मी स्वतःला जगातील सर्वात बुद्धिमान माणूस समजतो.
(अंदर की बात: च्यायला मी थोडीच पटवून घेणार आहे मी तसा नाही म्हणून.)

माहित नाही. म्हणजे एखाद्याला

56

माहित नाही. म्हणजे एखाद्याला देव (म्हणजे ज्या 'क्लासिकल' पद्धतीचा देव मानतात) मानायचा असेल तर ते मलातरी खोटं पाडता येणार नाही.

काही लोकांनी देव हा मानसिक आधार असतो असं काही लिहीलं आहे. माझ्या विचार करण्यात फरक तेव्हा पडायला लागला जेव्हा मला समजलं की लोकांना विचारलं, त्यांच्याशी बोललं की बरं वाटतं, प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत होते. (खूप नाही पण अंमळ) वाईट वेळ आली होती तेव्हा आजूबाजूच्या माणसांनीच एवढी मदत केली की माणसांतच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील यावर माझा(तरी) ठाम विश्वास बसला.
खाली Nileने लिहील्याप्रमाणे उत्तर माहित नाहीत तर ती शोधा आणि कोणीच शोधली नसतील तर उत्तरं माणसाला कधीच मिळणार नाहीत हा ग्रह सोडा. उत्तरं मिळाली नाहीत तरी दिशातरी नक्कीच मिळेल.

लोकांना विचारलं, त्यांच्याशी

57

लोकांना विचारलं, त्यांच्याशी बोललं की बरं वाटतं, प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत होते. (खूप नाही पण अंमळ) वाईट वेळ आली होती तेव्हा आजूबाजूच्या माणसांनीच एवढी मदत केली की माणसांतच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील यावर माझा(तरी) ठाम विश्वास बसला.

Grade

फरक

58

अदिती आतापर्यंत 'देव मानणे' असा मुद्दा होता. भाग्यश्री यांनी 'देव आहे असे मानते' असे लिहिले आहे. यात 'अस्तित्वाचा' मुद्दा आहे. इथे देव ही केवळ मूर्त/अमूर्त संकल्पना राहिलेली नाही. प्रत्यक्ष अस्तित्वाला प्रत्यक्ष जगातला पुरावा हवा, नाही का?

सहमत. मी एखादी गोष्ट आहे असे

59

सहमत. मी एखादी गोष्ट आहे असे मानतो म्हणजे त्याचे अस्तित्व मला पटले आहे. जर ते मला पटले आहे तर ते मी दुसर्‍याला पटवुन देउ शकतो.


-Nile

हो मी देव आहे असे मानते. फक्त

60

हो मी देव आहे असे मानते. फक्त देव म्हणजे नक्की काय हे मलाही डिफाईन करता येणार नाही. माझा तेव्हढा अभ्यास नाही.
जसे सूर्य म्हणजे काय मला नक्की डिफाईन नाही करता येणार, पण आहे हे कळते, दिसते. खगोलशास्त्रातील लोकांना जसा तो डिफाईन करता येतो तसंच देवही एखाद्याला करता येईल डिफाईन. कदाचित काही लोकांनी केलाही असेल. पण त्यातील शास्त्रीय नसलेल्या भाषेने व वैयक्तिक अनुभवांवरच आधारित असलेल्या गोष्टींमुळे ती संकल्पना अजुन पटली नसेल. मला माहीत नाही.
मला पाणी दिसते, ते म्हणजे एचटूओ एव्हढं सोडलं तर फार काही सांगता येणार नाही. पण पाण्यावर शोधनिबंध लिहीलेलीही लोकं असतील, तसेच हे 'असावे'. तेव्हा लोकांना,मला कळलेले थोडेबहुत देवाचे अस्तित्व पटवून देणे हे माझ्या आवाक्याबहेरचे असल्याने मी ते करू शकत नाही. आणि म्हणूनच असे अनुभव,या गोष्टी वैयक्तिक अनुभव म्हणूनच सीमित राहतात.

तुम्हाला सुर्य आहे ते कळते,

61

तुम्हाला सुर्य आहे ते कळते, कारण तुम्हाला तो उमजतो. एखाद्या आंधळ्या व्यक्तीला सुर्याचे अस्तित्व आहे हे पटवुन देउ शकता का?


-Nile

तुम्ही आंधळे आहात का? असलात,

62

तुम्ही आंधळे आहात का?

असलात, तर सुर्य आपोआप दिसेल.
नसलात, तर काय फरक पडतो?

wink

- (काडीपैलवान) बिपिन कार्यकर्ते.

हो! अंध व्यक्तीलाही एव्हढं

63

हो! अंध व्यक्तीलाही एव्हढं नक्कीच कळत असेल की दिवसा उष्णता जाणवते, व रात्री नाही. फक्त त्याने सूर्य पाहीला नसल्याने व कदाचित कोणी त्याला तसे सांगितले नसल्याने हे सर्व सूर्यामुळेच होते हे कळत नसेल.
कदाचित इश्वर्,देव इत्यादी बाबतींमध्ये तुमचे तसे होत असावे. हास्य

ठीक आहे, मी अंध आहे असे समजा

64

ठीक आहे, मी अंध आहे असे समजा आणि पटवुन द्या. हास्य


-Nile

माझे पण एक मत

65

देव हा अमुर्त आहे , असे मला लहान असताना सांगितले जायचे..
पण घरात मात्र मुर्ती पुजा व्हायची..
असो.. पण जर देव अमुर्त आहे हे जर सत्य मानले .. तर आदिती च्या प्रश्नाचे ऊत्तर मिळेल ..

एक मात्र नक्की की .. इंद्र हा देवांचा राजा मानला जातो आणी त्याचे ईतर जे सापेक्ष देव दाखवले जातात ..
माझ्या मते हे साफ साफ खोटे आहे..
असुरांना फसवुन अम्रुत पिनारे देव आहेत त्यांना का देव म्हणावे.. (जे दुसर्यांना फसवतात ते देव का??? हास्य )
असो.. जर हे खरे असेल तर मग ब्रम्हा, विष्नु आणी महेश हे कोण??

देव आहे हे सगळ्यांनी मानलेच पाहीजे.. फक्त ते कोणत्या रुपात हे ज्याचे त्यानी ठरवायचे आहे..
मी हे वरील वाक्य म्हणत आहे .. कारण मला खालील प्रश्नांची ऊत्तरे नाही सापडत..

प्रुथ्वि आणी अन्य ग्रह तारे यांचा उगम कुठुन व का झाला

आपण सगळे येवढे विज्ञान, भोतिक शास्त्र म्हनतो.. पण आज पर्यंत हेच विज्ञान ह्या
प्रुथ्वितला वरिल प्रचंड प्राणी मात्रांमधील एकाचे पण प्राण/मन/मेंदु/ह्र्दय किंवा कोणताही अवयव विज्ञान नाही
निर्मान करु शकले .. आणी सांगु पण नाही शकत की ते हे प्रुथ्वी वर काय करत आहेत.
बा़कीच्या ग्रहांवर जीव स्रुष्टी का नाही?

जर हे शरीर/ निसर्ग नश्वर आहे तर तो निर्मान का केला.. आणी कुनी केला.. तुम्ही आम्ही तर नक्कीच नाही ना?
विज्ञानाला ह्या प्रश्नांचे ऊत्तर माझ्यामते तरी कधीच सापडणार नाही हास्य

१ भोतिक शास्त्रा नुसार ..
ऊर्जा ही एका रुपा मधुन दुसर्या रुपात प्रत्यंतरीत होते.. आणी ती कधीच नष्ट होउ शकत नाही..
मग आपल्या मेंदुला/ह्रुदयाला/आणी ईतर अवयवांना चालवणारी पण एक ऊर्जा आहे.. आणी ती योग्य त्या प्रमाणात
योग्य त्या ठिकाणी निर्मान केली जाते.. अर्थात.. ती संयुक्त्/न दिसणारी आणी तंतोतंत मोजमाप असणारी ऊर्जा
आपल्यात का व कुठुन आली?? नक्कीच कुनीतरी ह्याची रचना केली असनार ना?? एक अद्रुष्य अशी शक्ती ????
मग कुठलाही प्राणी जेंव्हा मरण पावतो तेव्हा ती ऊर्जा जाते कुठे? आणी कोण ती ऊर्जा काढुन घेत?.. कशामुळे?
काहीच माहीती नाही Puzzled

२ प्रुथ्वी मधे गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे ती स्वता भोवती आणी सुर्या भोवती फिरते.. मग हे गुरुत्वाकर्षण बल आले कुठुन ?? ह्यांचा नक्कीच काहीतरी उगम(आदी अंत) असला पाहीजे?

३ हिमालय पर्वतावर "ओम" हेच का अक्षर कोरले जाते बर्फांनी?

असे असंख्य गहणी न पडणारे प्रश्न आहेत:?

म्हणून असा कुनीतरी अमुर्त असलाच पाहीजे की जो हे सगळे घडवतोय.. का हे त्याची तोच जाणे.. आपल्याला काय करायचे आहे
त्यानी मनुष्य जन्म दिला आहे त्यासाठी त्याचे शतश: आभार मानुयात .. आणी त्याचा आपाआपल्या परिने काहीतरी फायदा उचलुयात wink

प्रुथ्वितला वरिल प्रचंड

66
प्रुथ्वितला वरिल प्रचंड प्राणी मात्रांमधील एकाचे पण प्राण/मन/मेंदु/ह्र्दय किंवा कोणताही अवयव विज्ञान नाही

मानवाने कृत्रिम हृदयं बनवली आहेत, एकच नाही अनेक प्रकारची, ती सुधारत आहेत, त्यावर जगणारे लोक या जगात सद्ध्या आहेत.

ती संयुक्त्/न दिसणारी आणी तंतोतंत मोजमाप असणारी ऊर्जा
आपल्यात का व कुठुन आली??

खरंच?? जेवण, एटीपी वगैरे शोधा थोडसं गुगल वरती. सुरुवात म्हणुन हे पहा: http://en.wikipedia.org/wiki/Food_energy

गुरुत्वाकर्षण बल, भ्रुण निर्माण ह्यावर थोडेसे वाचलेत तर त्याची उत्तरे मिळतील. (आपल्याला माहित असलेल्या)परग्रहांवर सजीव सृष्टी नाही म्हणजे कुठेच सजीव सृष्टी नाही असे ठामपणे म्हणता येत नाही.

मग कुठलाही प्राणी जेंव्हा मरण पावतो तेव्हा ती ऊर्जा जाते कुठे?

ह्याचे उत्तर ९वी च्या शास्त्राच्या पुस्तकात होते असे मला आठवते.

हिमालय पर्वतावर "ओम" हेच का अक्षर कोरले जाते बर्फांनी?

हे म्हणजे त्या सबरीमलाच्या स्वर्गात जाण्यार्‍या ज्योतीसारखेच, किंवा अमरनाथच्या शिवलींगा सारखेच वाटते. असो.

असे असंख्य गहणी न पडणारे प्रश्न आहेत:?

प्रश्न पडतात हे चांगले, मला उत्तर माहीत नाही म्हणजे उत्तर अस्तित्वात नाही असा समज करुन घेतला तर मनुष्य उत्तरं शोधणारच नाही. इथेच वांदा होतो. माहित नसलेल्या उत्तरांना चमत्कार, देवाचे/पिशाच्चाचे रुप दिले जाते. (प्रथम भारतात धावलेल्या रेल्वेला, ओटीसच्या लिफ्ट ला दिले गेले तसे)

उत्तरे माहित नसतील तर आहेत का ते शोधा. उत्तरे माहित नसतील म्हणजे उत्तरे नाहितच हा ग्रह सोडा.


-Nile

....

67

प्रश्नाचे ऊत्तर द्या?
<<<मानवाने कृत्रिम हृदयं बनवली आहेत, एकच नाही अनेक प्रकारची, ती सुधारत आहेत, त्यावर जगणारे लोक या जगात सद्ध्या आहेत.>>>>

असा क्रुत्रीम मानव कुणाला तयार करता येईल का?? ज्या मन,भावना आहेत, त्या अंगी प्राण पण आहे हास्य .. आणी त्याचे शरीर हे .. मुलभुत पंचधातु पासुन बनवले आहे.. (बेट्री वर न चालणारे पण एका मिनीटांमधे बरोबर ७२ ठोके देणारे हृदयं बनवता येईल का??) ?? आणी हो ते मशीन श्वासोच्वासावरच चालायला पाहीजे हास्य

<<<<<
ती संयुक्त्/न दिसणारी आणी तंतोतंत मोजमाप असणारी ऊर्जा
आपल्यात का व कुठुन आली??
खरंच?? जेवण, एटीपी वगैरे शोधा थोडसं गुगल वरती. सुरुवात म्हणुन हे पहा: http://en.wikipedia.org/wiki/Food_energy
>>>>>>>>>>>>>>>

असे कोणते वेज्ञानीक मशीन तुमच्या किंवा कुणाच्या माहीतीत आहे का.. जे Food प्रोसेस करुन रक्त/ आणी ईतर पोषक बनवते ??
http://www.scientificamerican.com/article.cfm?id=how-do-scientists-make-ar

ह्याना फक्त रक्ताची रिप्लेसमेंट सापडली, पण ते रक्त सर्व काही नाही करु शकत
आणी हे बनवण्या साठी पण मानसाचेच रक्त लागते.. पुढे चालुन आजुन काही सुधारणा करतिल ही .. पण प्राणीमात्रां च्या मधे जे रक्त तयार होते ते बनने केवळ अशक्य

<<<<<<<<<<
प्रश्न पडतात हे चांगले, मला उत्तर माहीत नाही म्हणजे उत्तर अस्तित्वात नाही असा समज करुन घेतला तर मनुष्य उत्तरं शोधणारच नाही. इथेच वांदा होतो. माहित नसलेल्या उत्तरांना चमत्कार, देवाचे/पिशाच्चाचे रुप दिले जाते. (प्रथम भारतात धावलेल्या रेल्वेला, ओटीसच्या लिफ्ट ला दिले गेले तसे)
उत्तरे माहित नसतील तर आहेत का ते शोधा. उत्तरे माहित नसतील म्हणजे उत्तरे नाहितच हा ग्रह सोडा
>>>>>>>

काही अंशी मान्य.. पण ह्या निव्व्ळ अंधश्रद्धा होत्या त्या काळी .. आणी सर्व गोष्टी द्रुष्टि सद्रुष्य पण होत्या...
पण मला जे म्हणायचे आहे आणी हे ऊ.दा. एकमेकाला लागु पडत नाही

आत्ता तुम्ही म्हणाल .. ह्य ही गोष्टी कधी तरी अद्रुष्या होत्या.. पण ह्या गोष्टी च्या पदार्थां पासुन बनवल्या गेल्या आहेत .. त्या
कुणी आणी कुठुन आणल्या ?? नक्कीच हवेतुन तर नाही आल्या..

हे तर फक्त संशोधन मानवी जिवन सुलभ व्हावे म्हनुन हास्य

प्रश्न परत तिथेच येतो.. हे निर्मान केले कुणी.. आपल्याला त्याला सापेक्ष रुपात पाहायचे आहे? आणी पाहता ही येईल का?

असा क्रुत्रीम मानव कुणाला

68
असा क्रुत्रीम मानव कुणाला तयार करता येईल का??

अरे आत्ता तर हृदयावर गाडी अडली होती! हास्य का नाही येणार? नक्कीच येइल.

क्लोनींग ने सजीवाची प्रतिकृती बनवता येते ऐकले असेलच.
एका पुरुषाचे स्पर्म आणि एका स्त्रीची ओव्हरी प्रयोगशाळेत एकत्र करुन एका जीवा निर्माण करुन तिसर्‍या स्त्रीच्या गर्भात ते बालक वाढवता येते हे ऐकले असेलच. असो. कृत्रीम मानव बनवता येइल का पेक्षा तो बनवलेला दिसेलच.

जसे काही मिनिटा पुर्वी तुम्ही हृदयाबद्दल विचारत होतात, आता संपुर्ण मानवाबद्द्ल विचारत आहात तसेच उद्या तुम्ही अजुन काही विचाराल. हीच गोष्ट रक्ताबाबत. डोळ्यांवर बांधलेली पट्टी स्वत:हुन दुर केलीत तरच हे दिसेल.

मानवी भावभावना असलेला यंत्रमानव बनवणे सुरु आहे त्यात काही प्रमाणात यश आले आहे.

(बेट्री वर न चालणारे पण एका मिनीटांमधे बरोबर ७२ ठोके देणारे हृदयं बनवता येईल का??) ?? आणी हो ते मशीन श्वासोच्वासावरच चालायला पाहीजे

याला काही अर्थच नाही. (हे शक्य आहे का हे मला माहित नाही) पण माणसा सारखा यंत्रमानव करता आला तरी पुरे. तो जगतो कशावर हे महत्त्वाचे नाही.

उलट बोलायचं तर मग, आम्ही केलेल्या यंत्रमानवासारखा मानव तुमचा देव करु शकेल का?

मुळात अन्न हे इनपुट असेल तर यंत्र मानवात वीज इनपुट आहे. (तरी सुद्धा अन्न प्रोसेस करुन इतर पोषक द्रव्ये बनवने अशक्य नाही. ठराविक प्रकारच्या बॅक्टेरींयाच्या मदतीने हवे तसे द्रव्यं बनवता येइल.)


-Nile

निले, प्रश्न निर्मितीचा नाही

69

निले,

प्रश्न निर्मितीचा नाही तर 'नव'निर्मितीचा आहे. उपलब्ध साहित्यामधून (कच्चा माल असताना) नवीन गोष्ट निर्माण करणे म्हणजे एक प्रकारचे रुपांतरण आहे. अर्थात ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. मात्र मुळात ती गोष्ट निर्माण होणे हा प्रश्न राहतोच. काहीही नसताना एखादी गोष्ट निर्माण करणे माणसाच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही क्ष गोष्ट करतो/करु शकतो आणि त्याबद्द्ल क्रेडिट घेतो तर इतर असंख्य गोष्टी ज्या सुव्यवस्थित आहेत त्याबाबत क्रेडिट आहे ना कोणाचे तरी....
साधी पेशी घ्या एखाद्या अत्यंत सुनियोजीत शहराप्रमाणे तिची रचना असते. ती कशी झाली? माणूस म्हणे माकडापासून उत्क्रांत झाला. आज माणूस दिसतो, माकडेही आहेत. मग त्या उत्क्रांतीच्या मधल्या अवस्था दाखवणारा एकही सजीव का नाही दिसत...??? शाळेत शिकवल्या गेलेल्या तथाकथित थेअरीस आज अमेरिकेतूनही कालबाह्य झाल्यात.
आणि मानव आणि त्याचा मेंदू हा सुपर सुपर यंत्रमानव असताना आणखी काय निर्मिती हवी हो देवाची....???

प्रत्येक क्रिएशनला क्रिएटर असतो हे मान्य असेल तर विश्वाचा निर्माताही कोणीतरी असेलच की.....???
आकारमान शून्य, अनंत घनता आणि अनंत उर्जा ह्या अझम्शनवर विश्वास ठेवणारे तुम्ही अंधश्रद्धच ठरता.
बरे या अंधश्रद्धेने कुणाचे भले झाले आहे...???

आम्ही देव मानतो. एक सर्व शक्तिमान गोष्ट आहे असे मानतो. ठीक. चुकीचे आहे. त्याहून ठीक.
पण त्यामुळे होते काय....??? ( आपण आदर्श स्थिती लक्षात घेतोय हे ध्यानात घ्या.)
इतरांच्या हत्या करत नाही.( प्राण्यांच्याही) सगळीकडे तोच आहे असे म्हटल्याने कुणाचा द्वेष होत/करत नाही...
यशाने उन्मत्त होत नाही, अपयशाने आत्महत्या करित नाही(एकाही वारकरी शेतकर्‍याने आत्महत्या केलेली नाही)
या गोष्टी आम्हीही करतो हे तुम्ही म्हणालच.... छान!!!


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

सर्वप्रथमः तुम्ही देव माना

70

सर्वप्रथमः तुम्ही देव माना अगर नका मानू, काही तर्क चुकीचे वाटत आहेत म्हणून लिहीत आहे.

एक साधी पेशी ही सुनियोजित आहे म्हणून दिसते. ज्या रचना 'चुकल्या' त्या कालौघात नष्ट झाल्या. (नैसर्गिक गर्भपात होतात तसंच काहीसं) उत्क्रांतीच्या मधल्या टप्प्यातले सजीव दिसत नाहीत याची अनेक कारणं असू शकतात, अगदी मारामार्‍यांपासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत! पण त्यांचे सांगाडे मात्र मिळतात. दोन लांबच्या बिंदूंची रेघ हवेत ओढलेली नाही, हे निश्चित! डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पीसीज' नक्कीच वाचणेबल आहे. आज उत्तरं माहित नाहीत म्हणून ती देवावर ढकलली तर ही उत्तरं कधीच मिळणार नाहीत. आज डायनोसॉर आणि त्याचे बांधव का दिसत नाहीत? देव असेल तर त्यांचा जगण्याचा हक्क का काढून घेतला गेला?

>> शाळेत शिकवल्या गेलेल्या तथाकथित थेअरीस आज अमेरिकेतूनही कालबाह्य झाल्यात. <<
अमेरिका जे म्हणते ते प्रमाण मानायचं असेल तर मग वारकर्‍यांचं उदाहरण देऊ नका. ते लोकं ख्रिश्चॅनिटी आणि चर्च म्हणतं म्हणून डार्विनला डावलतात. अमेरिकेतल्या काही लोकांना या 'तथाकथित' सिद्धांतावर राग असेल म्हणून सर्व अमेरिकन्स ते मानत नाहीत हे सामान्यीकरण साफ अमान्य!

>> मानव आणि त्याचा मेंदू हा सुपर सुपर यंत्रमानव असताना आणखी काय निर्मिती हवी हो देवाची....? <<
मानवाचा मेंदू खरंच एवढा उबर पावरफुल असेल तर साधे साधे प्रश्न, उदा. कृष्ण पदार्थ, कृष्ण विवर, कृष्ण ऊर्जा, यावर्षीचा पाऊस कसा असेल असे प्रश्न का नाही सुटलेले?
मुळात मानवाचा मेंदू एवढा सुपर सुपर आहे यावर माझा विश्वास नाही आहे. भूकंपाच्या आधी पाळीव प्राण्यांना त्याची जाणीव झाल्यासारखं वाटतं, हे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे मग मानवी मेंदूला ते अजूनही का नाही समजलेलं?
अवांतरः मला "हिचहॅकर्स गाईड" आठवलं, सगळे उंदीर आपल्याला हाकत आहेत! wink

>> आकारमान शून्य, अनंत घनता आणि अनंत उर्जा ह्या अझम्शनवर विश्वास ठेवणारे तुम्ही अंधश्रद्धच ठरता. <<
शून्य आकारमान आणि अनंत घनता हे काल = शून्य या एका क्षणालाच होतं त्यापुढे नाही. पण अनंत ऊर्जा ही कल्पना चुकीची आहे. (माझ्या माहितीप्रमाणे) अनंत घनता (पहिल्या क्षणाचा अपवाद), अनंत ऊर्जा/वस्तूमान, अनंत काल या गोष्टी महास्फोटाच्या सिद्धांतामधे येत नाहीत.
जर या अनंताच्या संकल्पना अंधश्रद्धा आहेत तर त्यात अनंत काळ ही संकल्पना का घेतली नाहीत? स्थिरस्थिती सिद्धांत (विश्व आहे तसंच अनंत काळ होतं आणि अनंत काळ राहिल) यात विश्वाचं प्रसरण, दीर्घिकांचं एकमेकांपासून लांब जाणं हे एक्स्प्लेन करायला उणे उर्जा असा काही फंडा वापरला आहे. तो तुम्हाला अंधश्रद्ध वाटतो का?

विश्व हे क्रिएशन आहे का?

देव ही उपयुक्त संकल्पना म्हणून मला मान्य आहे. वारकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत, देवाच्या कोपाच्या भयाने तरी का होईना, भीमाशंकर आणि अशी अनेक जंगलं, आणि जंगली प्राणी अजून शाबूत आहेत. पण त्या संकल्पनेचा उपयोग मला तरी नाही. मी वर लिहीलेलं आहे त्याप्रमाणे माणूसच सगळे प्रश्न आज ना उद्या सोडवू शकतो यावर माझा विश्वास आहे म्हणून मला, स्वतःला, व्यक्तीशः देव या संकल्पनेची गरज वाटत नाही.

अदितीने बर्‍याच प्रश्नांची

71

अदितीने बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, थोडीशी भर.

तुम्हाला उत्क्रांती मान्य आहे तर. जर देव आहे, तर त्याला उत्क्रांतीची गरज का बरे पडली? थेट प्रगत सुसज्ज सजीव का नाही बनवले? (त्याप्रमाणेनच एकच युग का नाही?)

शाळेत शिकवल्या गेलेल्या तथाकथित थेअरीस आज अमेरिकेतूनही कालबाह्य झाल्यात.

ही माहीती चुक आहे, फक्त कट्टर कॅथलीक शाळेंमध्ये हे डार्विनचा उत्कांतवाद शिकवला जात नाही. अमेरीकेतुन हद्दपार झाला आहे हे म्हणजे सुतावरुन स्वर्ग!

मग त्या उत्क्रांतीच्या मधल्या अवस्था दाखवणारा एकही सजीव का नाही दिसत...???

हे ही चुक आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यातील काही सजीव आहेत. काही अवयव आहेत.जे कालबाह्य झाले ते जगण्यास (काला-तपमान-वगैरे-नुसार) लायक नव्हते, म्हणुनच नाहिशे झाले.

प्रत्येक क्रिएशनला क्रिएटर असतो हे मान्य असेल तर विश्वाचा निर्माताही कोणीतरी असेलच की.....???

गरज नाही. अनेक केमीकल रीअ‍ॅक्शन्सने क्रीएशन्स होतात (मेंदु असलेला, सर्वावर कंट्रोल असलेला) क्रीएटर हा आवश्यक नाही.

आणि मानव आणि त्याचा मेंदू हा सुपर सुपर यंत्रमानव असताना आणखी काय निर्मिती हवी हो देवाची....???

मानवाच्या मेंदु इतकी गणितं/सेकंद करण्याची क्षमता असलेला संगणक पुढच्या वर्षी तयार झालेला असेल. हास्य


-Nile

विश्वनिर्मिती का झाली याचे

72

विश्वनिर्मिती का झाली याचे उत्तर देता येत नाही. त्याचे उत्तर अध्यात्मामधे 'एकोहम बहुस्याम' अशी मूळ प्रेरणा हे देण्यात येते. 'मी एकटा आहे आता बहु होतो' हा संकल्प आणि त्यातून विश्व निर्मिती झाली असे मानले गेले आहे. (माझा बिग बँग अथवा इ. थेअरीचा तितकासा अभ्यास नाही मात्र म्हणून आपली उत्तरे बरोबर असे ठरत नाही)

उत्क्रांति म्हणजे एकपेशीय प्राण्याच्या शरीरातून मानवी शरीरापर्यंतचा प्रवास (मानवाची मूळापर्यंत जाऊ शकण्याची क्षमता असल्याने त्याला शेवटचा टप्पा ठरवले आहे)
ती मानावी लागतेच. आणि मूळ प्रेरणा जर तशी असेल तर रेडिमेड प्रॉड्क्टपेक्षा उत्क्रांत होत होत असे होणे स्वाभाविक ठरते.

अदितीच्या प्रतिसादातही आल्याप्रमाणे, जर असे सांगाडे सापडले असतील (मानवाच्या उत्क्रांतिच्या अवस्थातील) तरी ते एका विशिष्ट काळातच सापडले आहेत. हल्लीच्या काळात असा पुरावा मिळाल्याचे दिसत नाही आणि त्यामुळे ते संशयास्पद आहे. इतर कुठल्याही प्राण्यामधे एका प्रजातीतून दुसर्‍या प्रजातीमधे बदल झालेला दिसत नाही.आपल्या माथी मारल्या गेलेल्या अनेक गोष्टीपैकी ही एक असे मी मानतो. जर माणूस आणि माकड दोन्हीही असतील तर मधली अवस्थाच फक्त नामशेष झाली असे म्हणणे सयुक्तिक ठरत नाही.

श्री निले: देव म्हणजे काय या उत्तरामधे मी अदितीला सांगितलेल्या व्याख्या कृपया वाचा. यात ईश्वर ही संकल्पना अथवा व्यवस्था आहे. मेंदू असलेला कंट्रोलर असे कुठेही म्हटलेले नाही.

तसेच मूळ कच्चा माल कोठून आला याबद्दल प्रश्न उरतोच.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

उत्क्रांति म्हणजे एकपेशीय

73
उत्क्रांति म्हणजे एकपेशीय प्राण्याच्या शरीरातून मानवी शरीरापर्यंतचा प्रवास

चुक. Evolution is the change in the inherited traits of a population of organisms through successive generations.

इतर कुठल्याही प्राण्यामधे एका प्रजातीतून दुसर्‍या प्रजातीमधे बदल झालेला दिसत नाही

पुन्हा चुक.

त्याशिवाय, प्रजाती म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे?

जर माणूस आणि माकड दोन्हीही असतील तर मधली अवस्थाच फक्त नामशेष झाली असे म्हणणे सयुक्तिक ठरत नाही.

यावर विचार आणि अभ्यास करावा लागेल. पण कुठल्याही(जातीच्या, त्यामुळे कुठल्या जातीच्या ते मला पहावं लागेल, ती आहे का हे पहावं लागेल) माकडापासुन उत्क्रांत होउन मनुष्य बनला नाही. तसेच नीअँडदरथल मानवाचे सांगाडे सापडले आहेत. ह्या उत्क्रांतीचे टप्पे स्पष्ट करणारी चेन आहे.
(त्याशिवाय ३ फुटी मानवाचे सांगाडे सुद्धा सापडले आहेत). त्यामुळे ते सबळ पुराव्यानिशी आज तरी सिद्ध आहे.


-Nile

काय भाऊ, तुम्हाला जिवंत

74

काय भाऊ, तुम्हाला जिवंत अ‍ॅस्ट्रालोपिथेकस, नीअँडरथल मॅन वगैरे पाहिजेत ... इथे 'प्रगत' जगात तिबेटी लोकांचे जगण्याचे वांदे होत आहेत, ज्यू लोकांचे झाले होते ... !
असो. माणसांतही वेगवेगळे प्रकार दिसतात, आफ्रिकेत साधारणतः माणूस काळा असतो, युरोपात धप्प गोरे असतात, अ‍ॅडॅप्टेशनसाठी उत्क्रांती वगैरे बदलतरी मान्य आहेत ना तुम्हाला?
>> माझा बिग बँग अथवा इ. थेअरीचा तितकासा अभ्यास नाही मात्र म्हणून आपली उत्तरे बरोबर असे ठरत नाही <<
हा हा हा ... माझ्यावर विश्वास ठेवू नकाच; पुस्तकं वाचा, गणितं पहा, संशोधन प्रसिद्ध करतातच लोकं, हवं असेल तर ते पहा. पण अभ्यास नसेल तर माझं म्हणणं तुम्ही खोडूनही काढू शकत नाही.
पण विश्वनिर्मितीचा अभ्यास करणार्‍या लोकांना (मी नाही!) तुम्ही "अध्यात्मात पहा काय लिहीलं आहे, तेच बरोबर" हे कसं काय बुवा सिद्ध करून दाखवणार?

असो. कोणाचं वाक्य आहे आठवत नाही, पण चांगलं वाक्य आहे: भौतिकशास्त्र 'कसे' या प्रश्नाचं उत्तर द्यायला आहे 'का' याचं नाही.

का...?? माकडं आहेत की

75

का...??
माकडं आहेत की जिवंत....

>>>पण विश्वनिर्मितीचा अभ्यास करणार्‍या लोकांना (मी नाही!) तुम्ही "अध्यात्मात पहा काय लिहीलं आहे, तेच बरोबर" हे कसं काय बुवा सिद्ध करून दाखवणार? <<<

>>>हा हा हा ... माझ्यावर विश्वास ठेवू नकाच; पुस्तकं वाचा, गणितं पहा, संशोधन प्रसिद्ध करतातच लोकं, हवं असेल तर ते पहा. पण अभ्यास नसेल तर माझं म्हणणं तुम्ही खोडूनही काढू शकत नाही.<<<<
इन द सेम लाईन....
... माझ्यावर विश्वास ठेवू नकाच; ग्रंथ वाचा. अनुभव घ्या. नंतर बोला.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

>> माकडं आहेत की जिवंत.... <

76

>> माकडं आहेत की जिवंत.... <<
नाही हो, माकडांपासून माणसं नाही झालेली. (तुमच्याच भाषेत) तुम्ही एकदा 'ओरिजिन ऑफ स्पीसीज' वाचाच डार्विनचं!
माकडांमधेही एप, चिपांझी, गुरिल्ला वगैरे असतात माहित आहेत ना? त्यातल्यात्यात चिंपाझी आपल्या जवळचे म्हणता येतील. आणि सगळ्याच "माकडां"ची माणसं झाली नाही. जी नैसर्गिक बदलांना सामोरी जाऊ शकली तीच 'नॅचरल सिलेक्शन'मधे टिकली. जी 'अनफिट' होती ती मेली. नैसर्गिक गर्भपात होतो तो त्याच कारणासाठी!

>> ... माझ्यावर विश्वास ठेवू नकाच; ग्रंथ वाचा. अनुभव घ्या. नंतर बोला. <<
ते मी विश्वनिर्मितीबद्दल बोलत होते. देवाचं अस्तिस्त्व शोधणं वगैरे काही मला महत्त्वाचं वाटत नाहीच, हे मी कालच लिहीलं आहे. त्यामुळे उद्या कधी आवड बदलली तर मी ही पुस्तकं वाचेनही... पण मत आणि माहिती यात फरक असावा नाही?

ठिक आहे..... आय अ‍ॅग्री टू

77

ठिक आहे.....

आय अ‍ॅग्री टू डिस अ‍ॅग्री....

मला मत नाही..... आपण जिंकलात.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

उत्क्रांती

78

उत्क्रांती म्हणजे एकपेशीय 'प्राण्या'पासून नव्हे तर अणू-रेणूंपासून ते सजीवांपर्यंतचा प्रवास. वस्तु वरून खाली पडावी तितक्याच नैसर्गिकपणे व तितक्याच अपरिहार्यपणे घडणारा.

प्रजातीत होणारा बदल हा लाखो पिढ्यांनतर दिसतो. पण तरीही कुत्र्याचं उदाहरण देता येईल. नैसर्गिक निवडीची प्रक्रिया इथे खूप वेगवान केल्यामुळे काहीशे वर्षातच एका लांडग्यासारख्या प्राण्यापासून आज शेकडो जाती झालेल्या दिसतात.

उत्क्रांतीसाठीचा कच्चा माल म्हणजे अणू रेणू. ते कुठून आले इतकाच प्रश्न राहाणे हेही उत्तराच्या प्रगतीचं चिह्न आहे. इतकी वर्ष देवाची गरज प्राणीमात्राच्या अस्तित्वाचं कारण म्हणून होती. आता त्याचं कर्तृत्व फक्त कच्चा माल तयार करण्याचं राहिलेलं आहे.

प्रतिसाद आवडला. खालचा फुन्सुक

79

हास्य

प्रतिसाद आवडला. खालचा फुन्सुक यांचाही प्रतिसाद आवडला, संपूर्ण पटला नाही तरीही!

प्यारे, प्रश्न जिंकण्या-हरण्याचा नसून (माझ्याच नाही प्रत्येकाच्या बाबतीत) "माझी ही मतं आहेत, ती या-या कारणांमुळे अशी आहेत आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे. पण कोणी मला पटेलसं स्पष्टीकरण दिलं तर मी माझी मतं बदलायला तयार आहे!" असा काहीसा मुद्दा आहे.

मते ठाम आहेत हे कळाले. पण

80

मते ठाम आहेत हे कळाले. पण 'मला पटेलसं' स्पष्टीकरण इथे गोची होत आहे.
कितीही स्पष्टीकरणं मिळाली/दिली गेली तरी 'माझे सोडा हो. मी तुम्ही म्हटला तरी काही करणार नाही' आणि मुळात देव ही व्यवस्था, संकल्पना अत्यंत व्यक्तिगत आहे आणि 'आम्ही' याबाबत काहीही करणार नाही आहोत. मग पटणार कसे?

त्याउप्पर विश्वनिर्मिती म्हणा अथवा उत्क्रांति म्हणा अगदी आपण म्हणता त्याप्रमाणे झाली असे मानले (तसेच आहे! हो ना...???) तरी त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम होणार आहे...???

एका बाजूला आपण वैज्ञानिक सिद्धांत आणि प्रयोग या मार्गे मूळापर्यंत जाणार आहोत त्याला किती वेळ लागेल ते ठाऊक नाही. मात्र दुसर्‍या बाजूला वेदांत ठासून सांगतोय की हे सत्य (त्याला आम्ही देव, ब्रह्म, इ.इ. अनेक नावानी ओळखतो)आम्हाला गवसले आहे आणि तुम्ही या मार्गाने गेलात तर तुम्हाला निश्चित यश मिळेल. (आपण त्याचा अभ्यास करणारच नाही असे म्हणतोय.) कुणाचे ऐकणार...??? कमी श्रम कशात आहेत? प्रत्येक वेळी पाय चे मूल्य ३.१४ हे काढत बसणार की त्यावर 'बाबा वाक्यं प्रमाणम' म्हणून तीच किंमत घेणार....??? फक्त हा अनुभव वैयक्तिक असेल.
एक उदा.:वेदांत 'माये'ला 'सतासतविलक्षणअनिर्वचनीय' म्हणजे 'आहे पण नाही पण त्यामुळे न सांगता येण्यासारखे म्हणतो. कुठलीही गोष्ट 'असू पाहते' असे म्हणतो. हाच संदर्भ आपण वेव्ह लेंग्थ थेअरीला वापरतो ना....??? (एकदा मॅटर आणि एकदा एनर्जी हे स्वरुप)

इथे एक लक्षात घ्या की मी वेदांत म्हणतोय. उपनिषदे कोणी रचली हे कुणाला ठाऊक नाही. त्यावर मार्गदर्शन करणारे बहुतेक सर्व संत ( रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, शंकराचार्य इ.) कुठलीही वैयक्तिक प्रॉपर्टी केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी ऐकायचे का हा प्रश्न निकालात. येथे कोणतीही फसगत नाही. स्वतःच्या फायद्यासाठीच हा खटातोप आहे हो.....
खरा अध्यात्मिक/परमार्थी खरा 'स्वार्थी' असतो. स्वतःचा फायदा बघणारा... तोही शाश्वत. कारण एकदा हे कळाले की परत परत सुखी व्हावे लागत नाही. आपण सुखरुप होउन जातो.

कुठल्याही गोष्टीचे आपण अनेक प्रकारे परसेप्शन करत अस्तो आणि त्यावर आपला निष्कर्ष काढतो.
प्रत्यक्ष, अनुमान, तर्क, प्रयोग इ. प्रकार आहेत. त्यापुढे ध्यान हा ही एक टप्पा आहे. आणि तिथेच विज्ञान आणि अध्यात्म याची फारकत होते. प्रत्यक्ष अनुभव घेणारा वेगळा नाही काढता येत.

आपल्याला तत्वापर्यंत पोचायचय का तपशीलात अडकायचय...??? आम खाने है या पत्ते गिनने....???


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

आम तो खानेही है, पण ते बोरीक

81

आम तो खानेही है, पण ते बोरीक पावडर (का कसलेसे केमिकल) टाकून घाईगडबडीत पिकवलेले नको आहेत. मला सगळी उत्तरं (माझ्या आयुष्यात) न मिळालेली चालतील पण असले शॉर्टकट्स, ते ही विज्ञानाच्या बाबतीत, नकोच. तपशीलच चुकीचा असेल तर तत्त्वाला तत्त्व म्हणायचं का मिथ्या?

वेव्ह (लेंग्थ नव्हे) थिअरीमधे प्रकाश तरंगस्वरूपात असतो असं म्हणतात, पण प्रकाश किंवा इलेक्ट्रोमॅग्नेक्टीक वेव्हज द्वैती स्वरूपात (डुएल नेचर) असतात. आपला जसा डिटेक्टर, जसा प्रयोग तसंच स्वरूप आपल्याला दिसणार. कधी कॉम्प्टन इफेक्ट दिसेल कधी फोटोइलेक्ट्रीक परिणाम! यात सतासतविलक्षणअनिर्वचनीय (म्हणजे नक्की काय?) याचा काय संबंध ते मला कळलेलं नाही.

"मी माझं मत तेव्हाच बदलेन जेव्हा तुम्ही मला पटेल असं स्पष्टीकरण द्याल", या मतावर मी अजूनही ठाम आहेच. मी मुद्दाम होऊन काही नावडत्या प्रकारची पुस्तकं वाचणार नाही, आवड बदलेल तेव्हा जरूर विचार करेन.
तुम्ही बोलणार महास्फोटाबद्दल, पण त्याची माहिती नाही असं म्हणणार. तुम्ही डार्विनच्या उत्क्रांतीवादाला चुकीचं म्हणणार पण त्याची तुम्ही दिलेली कारणं (फारसा अभ्यास नसताना) मी सुद्धा खोडून काढू शकते. तुम्ही "बाबा वाक्यं प्रमाणम्"चं उदाहरण म्हणून पायच्या किंमतीचं उदाहरण देणार. पण मी (सुद्धा) एखाद तासात टेलर सिरीजचा (बरोबर ना, का सिरीज चुकीची आठवते आहे मला? असो, गुगलून सापडेल!) प्रोग्रॅम लिहून पायची किंमत पाच-सहा आकड्यांपर्यंततरी काढू शकेन. (अर्थात प्रत्येक वेळी चाक नव्याने शोधायची गरज नसते) कसं जमणार हो?

असो. (बर्‍याचशा) शास्त्रज्ञांना बेकार करण्याचा डाव असणार्‍या प्यारे यांचा निषेध! (माझ्याकडून विषय बंद, चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.)

अवांतरः काल माझ्या नवर्‍याला पडलेला प्रश्न, जर विश्वाचा निर्माता आहे तर निर्मात्याला कोणी बनवलं?

निषेधाबद्दल शतशः

82

निषेधाबद्दल शतशः आभार.....!!!

बाय द वे प्रयोगाच्या 'नावडत्या' निष्कर्षानाही तुम्ही नाकारता का....??? याला विज्ञान नाहीत म्हणत माझ्या माहितीप्रमाणे...
'मला वाटले तर, आवड असेल तर आणि अमुक कंडीशन नुसारच....' -चालू द्या. आपली आपली समज......

आणि नवर्‍याला सांगा ज्या प्रकारे तो 'बिंदू' (महास्फोटा आधीचा) बनला ना तसाच विश्वनिर्माता बनला.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

>> ज्या प्रकारे तो 'बिंदू'

83

>> ज्या प्रकारे तो 'बिंदू' (महास्फोटा आधीचा) बनला ना तसाच विश्वनिर्माता बनला. <<

मी एकच क्लिष्टता कमी केली, विश्वनिर्माता बनलाच नाही ... बिंदू होता.

ग्रंथात सापडेल-वैयक्तीक आहे

84

ग्रंथात सापडेल-वैयक्तीक आहे ह्याचा काहीही उपयोग नाही (वादापुरते खरे मानले तर).

जर हे ज्ञान सर्वांना कळणार नसेल(वैयक्तीक असल्याने) तर त्याचा काहिच उपयोग नाही. जर हे ज्ञान मला कळल्यानंतर मी दुसर्‍याला सांगु शकेन तर उपयोग. वेदांचा काळ कुठला? (लेटेस्ट उपक्रमावरील चर्चा वाचलीत तर किमान ४००० वर्षांपुर्वीचा)

४००० वर्षांत कीती जणांना कळले? ते त्यांनी कीती जणांना समजावुन सांगितले? आज कीती जणांना माहित आहे? ते समजावुन सांगु शकतात का?


-Nile

नो कमेंट्स.....!!! आधीचा

85

नो कमेंट्स.....!!!

आधीचा प्रतिसाद (तुमचाच) वाचा....

तुम्ही स्वतःला कळून घेऊ इच्छीत नाही. ज्या गावाला जायचेच नाही..... कशाला???


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

....

86

<<< उलट बोलायचं तर मग, आम्ही केलेल्या यंत्रमानवासारखा मानव तुमचा देव करु शकेल का? >>>
देवाने.. मानवाला बनवले आहे त्याचे काय हास्य

रेफरंस काय? मानव असा आहे तो

87

रेफरंस काय?

मानव असा आहे तो आहे. पण मानव जे करु शकतो ते सगळे करु शकणारा यंत्रमानव बनवला म्हणजे मानवाची प्रतिकृती बनली.

निसर्गात जसा हाडामांसाचा मानव आहे तसा मानव बनवता येइलही कदाचित. पण सद्ध्या धातु-वीज इ. (जे मानवाला सहज बनवता येते) त्या पासुन यंत्र मानव बनवला आहे याचे महत्त्व कमी होत नाही.

एखादा रोबो बनवुन पहा, अंदाज येइल.


-Nile

उत्तरे

88

उत्तरे माहित नसतील तर आहेत का ते शोधा. उत्तरे माहित नसतील म्हणजे उत्तरे नाहितच हा ग्रह सोडा.
हीच गोष्ट देवाच्या बाबतीत.

नेहमीप्रमाणे आउट ऑफ कंटेक्स्ट

89

नेहमीप्रमाणे आउट ऑफ कंटेक्स्ट वाक्य घेउन काही तरी सिद्ध करायचा निष्फळ प्रयत्न.

वरती त्यांचा दावा होता की विज्ञानाला उत्तरं माहित नाहीत कारण हे सगळे देवाने बनवले आहे.

असे असंख्य गहणी न पडणारे प्रश्न आहेत:?

म्हणून असा कुनीतरी अमुर्त असलाच पाहीजे की जो हे सगळे घडवतोय.. का हे त्याची तोच जाणे.. आपल्याला काय करायचे आहे

देवाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तरांची अपेक्षा आहे. (विज्ञानाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले आहेत उत्तरे सस्पष्टीकरण आहेत, कुणीही समजु शकतो, समजल्यावर दुसर्‍याला पटवु शकतो)

कृपया पुर्ण चर्चा न वाचता प्रतिसाद देउन पुन्हा तेच टंकायला लावु नये ही विनंती. (पुर्ण चर्चा वाचली असतीत तर पुन्हा तोच प्रश्न आला नसता)


-Nile

आउट ऑफ कंटेक्स्ट

90

आउट ऑफ कंटेक्स्ट कसं?

देवाचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही, म्हणून देव नाहीच हे कसं मानायचं?
बाकी याआधीही वेग-वेगळ्या चर्चांमधून हे म्हटल गेलेलं आहे की तो एक अनुभव असतो.

"देव आहे" ह्याचे साक्षात्कार कसे घडले हे शब्दात मांडण्यास मी नालायक आहे हे मी नमुद करतो, तेवढीच माझी मर्यादा.
श्री डॉन म्हणतात त्याप्रमाणेच माझी आणि इतर बर्याच जणांची भावना असेल.
या गोष्टी शब्दात वर्णन करणं मलातरी शक्य नाही.

कंटेक्स्ट

91

कंटेक्स्ट, किशोर यांचे म्हणणे होते की असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाहीत.

माझं वाक्यं त्या संदर्भात होतं. (त्यांनी विचारलेले)प्रश्न आहेत, (त्यांची)उत्तरे ही आहेत.

तुम्ही फक्त एकच वाक्यं उचललं, म्हणुन ते आउट ऑफ कंटेक्स्ट.

प्रश्न पडतात हे चांगले, मला उत्तर माहीत नाही म्हणजे उत्तर अस्तित्वात नाही असा समज करुन घेतला तर मनुष्य उत्तरं शोधणारच नाही. इथेच वांदा होतो. माहित नसलेल्या उत्तरांना चमत्कार, देवाचे/पिशाच्चाचे रुप दिले जाते.

उत्तरं शोधा हे आहेच. पण यावरुनच पुढचा मुद्दा/विचार मांडला आहे.

आता तुम्ही म्हणता तसेच देवाबद्दल. पण देवा बद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यातले काही इथे उपस्थित केले आहेत. उत्तरे आहेत का? विचारले आहे. माहित असतील तर सांगा. कुठे मिळतील ह्याचे उत्तर द्या. (नुसतंच ग्रंथ वाचा चालणार नाही, कारण त्याच ग्रंथावर (अभ्यासकाने) उलट मत असल्याची उदाहरणं आहेत, म्हणजे नुसता ग्रंथ वाचुन चालणार नाही त्याचं स्पष्टीकरण हवं, जे सर्वसामान्याला पटायला हवं इ.)

सगळ्यात महत्त्वाचं, जे अस्तित्वातच नाही त्याचं अस्तित्व कसं शोधणार? तुम्ही जेव्हा खात्रीने सांगता उत्तर शोधा, तेव्हा तुम्हाला ही खात्री कशी?

असो, तुमचाच प्रश्न तुम्हाला, भुताचं अस्तित्व सिद्ध करु शकता का?

"देव आहे" ह्याचे साक्षात्कार कसे घडले हे शब्दात मांडण्यास मी नालायक आहे हे मी नमुद करतो, तेवढीच माझी मर्यादा.
श्री डॉन म्हणतात त्याप्रमाणेच माझी आणि इतर बर्याच जणांची भावना असेल.
या गोष्टी शब्दात वर्णन करणं मलातरी शक्य नाही.

हे ठिक, पण एकीकडे तुम्ही देव आहे हे ठामपणे कसे सांगता?


-Nile

अज्ञाताची पूजा!

92

माहित नसलेल्या उत्तरांना चमत्कार, देवाचे/पिशाच्चाचे रुप दिले जाते. (प्रथम भारतात धावलेल्या रेल्वेला, ओटीसच्या लिफ्ट ला दिले गेले तसे)

<<

दादा कोंडकेंच्या पांडू हवालदार मधे 'देवळात'(!) पादुका धुणे अन नमस्स्कार करणे असा एक सीन आठवला... अज्ञाताची नेहेमीच भिती अन नंतर त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा झालेली आहे.


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

हे वाचुन माझ्या मनातला गुंता

93

हे वाचुन माझ्या मनातला गुंता अजुन वाढला आहे.
देव आहे का? काही गोष्टींची उत्तरं विज्ञानात मिळत नाहीत अश्या वेळेला वाटतं की या पलिकडे कोणीतरी आहे ज्याला कदाचित देव म्हणत असावेत. पण लगेच असंही वाटतं की आपण उत्तरं शोधायचे जास्त कष्ट घेत नाही आणि लगेच निष्कर्ष काढुन मोकळे होतो.

नक्की काय खरं आणि काय खोटं???????????????????

नक्की काय खरं आणि काय खोटं

94

मानवाने येत्या काही काळात .. समजा १००० वर्षांमधे .. काहीतरी शोध लावला..
कसलीतरी विचीत्र गणिते मांडली.. आणी सांगितले .. हे घ्या विश्वनिर्मिती चा
फोर्मुला.. अमुक एक रिअ‍ॅक्शन तमुक एका पदार्थाशी ईतक्या काळापर्यंत झाली की .. विश्व निर्मान होते..
मग तेव्हाची पिढी स्वता:ला देव समजेल? आणी ती पिढी.. या अंनंतात गुढ असलेल्या म्रुत्यु नंतरचे काय या रहस्याबद्दल जाणू शकेल.. ?? आणी जाणलेच तरी त्यावर मात करता येईल ??

असो.. प्रश्न हा ऊरतोच की .. आज जे आपल्याला दिसते हे सर्व येवढ्या सुसंगतरित्या मांडले कुणी..??
उ.दा. चंद्राचे प्रुथ्वि भोवती भ्रमण, त्याचा .. समुद्रा वरती होणारा परिनाम .. , फक्त आणी फक्त प्रुथ्विवरच मनुष्य जीवन का
एवढे सुलभरित्या उपलब्ध व्हावे? ..
एक साधेच उदाहरण घ्या.. आपल्याला जगण्यासाठी प्राणवायु लागतो.. तो फक्त ईथेच का निर्माण झाला असेल, पाणी ते फक्त ईथेच का? सुर्याची अतिनील किरणे आपण सहन नाही करु शकत , त्याकरता.. फक्त प्रुथ्वि भोवतिच ओझोन्चे कवच का??

ऊत्तर एकच आहे .. जीव स्रुष्टीला पोषक असा आधार मिळावा म्हनुन..
आता काही लोक परत विज्ञान आणी भोतिक शास्त्र मधे आणतील आणी सांगतील १००००००० कारणे ह्या गोष्टि साठी.. आणी सांगतिल देव नाही .. ह्या मागे सायन्स आहे म्हनुन हास्य..

पण त्यांना एक साधी गोष्ट उपजत नाही .. की .. ह्या जीवस्रुष्टीचा एक निर्माता असलाच पाहीजे ... ज्याने हे येवढ्या
व्यवस्थीतरित्या ब्रम्हांड रचले.. आणी करोडो प्राणीमात्रांचे जीवन चालवत आहे हास्य

असं म्हणता? बरं आमच्या दोन

95

असं म्हणता? बरं आमच्या दोन चार शंका सोडवा की.

सर्व येवढ्या सुसंगतरित्या मांडले कुणी..??

१. कुणी मांडले? कधी मांडले? कसे मांडले?

या अंनंतात गुढ असलेल्या म्रुत्यु नंतरचे काय या रहस्याबद्दल जाणू शकेल.. ??

२. मृत्यु नंतर काय रहस्यं असतात?

आपल्याला जगण्यासाठी प्राणवायु लागतो

३. सजीवाची निर्मिती प्राणवायुच्या वापराला गृहित धरुन झाली असे तुम्हाला वाटते का? (त्या उलट सजीव प्राणवायु वापराला 'अडाप्ट' झाले नाहीत कशावरुन?) नायट्रोजन नंतर सर्वात मुबलक असलेला ऑक्सीजन. (नायट्रोजन केमीकली बराच इनर्ट आहे, का ते त्याच्या इलेक्टॉनीक कॉन्फीगरेशन पाहिल्यास कळेल, असो.)
४. प्राणवायु शिवाय जगणारे सजीव नाहीतच का?

५. ओझोन केव्हा तयार झाला?
६. ओझोन च्या आधी सजीव होते का?
६.अ. जर नसतील तर ओझोनची निर्मिती तुमच्या देवाने फक्त मनुष्यासारख्या काही सजीवांकरीता केली का?

७. देव पांगळे-लुळे का जन्माला घालतो?

ह्या जीवस्रुष्टीचा एक निर्माता असलाच पाहीजे ... ज्याने हे येवढ्या
व्यवस्थीतरित्या ब्रम्हांड रचले.. आणी करोडो प्राणीमात्रांचे जीवन चालवत आहे

८. रोज लाखो लोक अपघातात मारण्याचे काम देव करतो का?
८अ. हो, तर का?
९. अनेकांना दरिद्री आयुष्य का देतो?

तुर्तास इतक्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, त्यानुसार पुढील प्रश्न विचारेन.


-Nile

....

96

मी काही साधु महाराज नाहिये आणी.. सायन्टीस्ट तर नक्कीच नाही Party

वरील प्रश्नांची ऊत्तरे माहीती असती तर तुम्हि मलाच देव म्हणाला असता Laughing out loud

(स्वगतः जल्ला आमाला हे जमत

97

Grade Grade Grade

(स्वगतः जल्ला आमाला हे जमत न्हाय ............)


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

हा हा हा.. देव नाही तर नाही

98

हा हा हा.. देव नाही तर नाही आईनस्टाईन तरी नक्की म्हटलो असतो.
Grade Grade Grade


-पुण्याचे पेशवे

अरेच्चा, तुम्हाला काहीच माहित

99

अरेच्चा, तुम्हाला काहीच माहित नसताना इतकी ठामपने विधानं कशी करता हो! कमाल आहे.


-Nile

४. प्राणवायु शिवाय जगणारे

100
४. प्राणवायु शिवाय जगणारे सजीव नाहीतच का?

प्राणवायूशिवाय जगणारे जीव आत्ताच सापडले आहेत. हे पहा.

तो प्रश्न मुद्दाम त्यांना

101

हास्य

तो प्रश्न मुद्दाम त्यांना विचारला होता (कारण त्यांचे गृहितक असे वाटले की, प्राणवायु देवाने सजीवांकरता बनवला) .


-Nile

हॅहॅहॅ

102

हे सायंटिस्ट कैच्याकै शोध लावतात. हे ग्रंथात सापडल्याशिवाय मी मान्य करणार नाही. (ह. घ्या हो. माझा विमा एक्स्पायर झालाय)

किशोरभाऊ, तुम्ही जे प्रश्न

103

किशोरभाऊ, तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत ना, त्यातल्या बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरं "साध्या" भौतिकशास्त्राने देता येतात. त्यासाठी क्लिष्ट देव-संकल्पनेची गरज नाही.

उदा: पृथ्वी-सूर्य-चंद्र यांना विशिष्ट जागी वगैरे, वगैरे कोणी ठेवले?
विचार करा, की जिथे या गोष्टी अशा नाही आहेत तिथे जीवसृष्टी नाही. असा सगळा मामला जमलेला आहे असे किती तारे आहेत, आणि किती ठिकाणी हे जमलेलं आहे? आपल्याला आत्तापर्यंत अशी एकही तारा-ग्रह जोडगोळी आपल्याला सापडलेली नाही. म्हणजे अशी अंतरं, तार्‍याचं वस्तूमान, इ.इ.इ. घडण्याची शक्यता खूप कमी आहे. ती घडली म्हणून आपण जन्माला आलो, नसतं झालं तर जन्माला आलो नसतो. आपण (जीवसृष्टी) कोणी विशेष आहोत असं काही मला वाटत नाही, की कोणी असेलच देव बिव तर त्याने कष्ट घेऊन आपल्यासाठी सूर्य, चंद्र, पृथ्वी, गुरू, शनी जागच्याजागी ठेवावेत. (जीवसृष्टी निर्माण होऊन जगण्यासाठी हे सगळे ग्रह, चंद्र आणि सूर्य कसे महत्त्वाचे आहेत यावर कधीतरी नंतर लिहेन.)
भौतिकशास्त्राचा विचार केलात तर त्यांची वस्तूमानं अशी आहेत की त्यांच्या याच जागा असणार. इकडे-तिकडे केलंत (करता आलं तर) तरीही ते पुन्हा याच जागी येऊन स्थिर होतील.

देव/निर्माता असेल तर मग एकच ग्रह का? एकच प्राणी एवढा प्रगत का? १००००००००००० (एकावर अकरा शून्य) एवढे तारे आहेत आपल्या दीर्घिकेत, इतर ठिकाणी का नाही? असतील तर त्यांचा आपल्याशी संपर्क का नाही?

देवाने किंवा कोणीतरी हे जग, विश्व असंच निर्माण केलं हे खूप सोपं किंवा पलायनवादी उत्तर नाही का या क्लिष्ट जंजाळाच्या आकलनाचा विचार करता?

>>१००००००००००० (एकावर अकरा

104

>>१००००००००००० (एकावर अकरा शून्य) एवढे तारे आहेत आपल्या दीर्घिकेत, इतर ठिकाणी का नाही? असतील तर त्यांचा आपल्याशी संपर्क का नाही?

ह्यामुळेच म्हणतो की युफओ आहेत... बाकी चालू द्या/


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अहो इतर जीव हुशार

105

अहो इतर जीव हुशार आहेत....

कशाला त्यंच्या विचार करु शकणार्‍या अवयवाला ताप म्हणून पृथ्वीशी संपर्क करत नाहीत झाले...... Sexy


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

हे उत्तर मलाही मान्य आहे. जर

106

हे उत्तर मलाही मान्य आहे.

जर इतर ग्रहांवर सजीव असतील तर:
१. ते आपल्याला सापडण्याएवढी आपल्या दुर्बिणींची प्रगती झाली नाही आहे.
२. ते हुशार (इंटेलिजन्ट!) असतील तर आपल्याकडे सिग्नल्स पाठवत असतील, पण आपण सिग्नल्स गेले ५० वर्षच रिसीव्ह करू शकतो आहेत. आपला (पृथ्वीचा) नाद नेमका त्यांनी ६० वर्षांपूर्वीच सोडला असेल तर?
३. ते अगदी प्राथमिक अवस्थेतले, अमीबा, जीवाणू. विषाणू अवस्थेतले असतील तर आपल्याला किमान १०० वर्ष लागतील ते सापडायला
४. आणि ते हुशार असतील तर कशाला आपल्यासारख्या मंद प्रजातीशी संपर्क करतील? wink

अवांतरः
जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी अणूंच्या मोठ्या साखळ्या (चेन्स) तयार होणं आवश्यक असतं. त्यासाठी कार्बन आणि सिलिकन ही दोनच मूलद्रव्य उपयुक्त आहेत. आपण (पृथ्वीवरचे सर्व सजीव) कार्बन-बेस्ड आहोत. सिलिकनचं प्रमाण कार्बनपेक्षा कमी आहे (संदर्भ गुगलवर सापडेल, आत्ता निश्चित आठवत नाही आहे.) त्यामुळे आपल्याला सापडणारी जीवसृष्टी, सापडली तर, कार्बन/सिलिकन बेस्डच असेल.
आपण एकटे आहोत असं मला वाटत नाही, आपण स्पेशल आहोत असा माझा समज नाही. पण आपल्या दीर्घिकेचं वय, कार्बन्/सिलिकनचं प्रमाण, जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी लागणार्‍या सर्व घटना आणि त्यांची शक्याशक्यता, त्या जीवसृष्टीने आपल्याशी संपर्क करणं आणि आपल्याला ते कळणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला हे सध्यातरी कठीण वाटतं. याबद्दल कधीतरी नंतर (नक्की!) लिहेन.

मी म वरील सर्वात वाचनिय असा

107

मी म वरील सर्वात वाचनिय असा हा धागा.. सर्व संबधित प्रतिसाद कर्ते व धागा लेखिका ह्यांचे अभिनंदन...

बाकी चालू दे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

टिआरपीवृद्धीप्रयत्नशील

108

टिआरपीवृद्धीप्रयत्नशील प्रतिसाद असल्यामुळे चुकीचे असे टाचण दिले आहे!

राजे काही काही काय सगळेच

109

राजे काही काही काय सगळेच प्रतिसाद वाचनिय आहेत.

दोन्हीबाजूंनी... काही प्रतिसाद खूपच छान लिहिले आहे म्हणून वाचनिय... तर (परत दोन्हीबाजूंचे) काही प्रतिसाद अगदीच हास्यास्पद अथवा बाळबोध म्हणून वाचनिय.

सहमत. बाकी डॉन्रावांच्या एका

110

सहमत. बाकी डॉन्रावांच्या एका संकेतस्थळावरील याच विषयाच्या धाग्याची या निमित्ताने आठवण झाली. नवनवी मंडळी चर्चेत सहभागी व्हायला हवी हीच अपेक्षा

माझे मत ...

111

>>डॉन्रावांच्या एका संकेतस्थळावरील याच विषयाच्या धाग्याची या निमित्ताने आठवण झाली.
माझ्या त्या विवीक्षित धाग्याचा वारंवार उल्लेख होतो आहे म्हणुन हा प्रतिसाद.

माझ्या त्या धाग्यात व अजुन एका तत्सम चर्चेत मी खालील मुद्द्यचा उहापोह केला होता :
१. देवाची सगुण आणि निर्गुण उपासना, त्याला चढवले जाणारे भोग वगैरे
२. श्रद्धा, संस्कार, धर्म वगैरे ...

पण ह्यात कुठेही मी "देव आहे का?" असे त्यच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह उभे केले नव्हते.
"देव आहे" ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे.
मात्र त्याचे अस्तित्व पटवुन देणे अथवा अस्तित्व नाकारण्यासाठी काही टेस्ट्स अथवा कसोट्या पाहणे ह्याला मी शुद्ध "नालायक" आहे असे मानतो. माझा तेवढा अभ्यास नाही आणि तयारीही नाही.

बाकी आत्तापर्यंतच्या जिवनात कधीही मला "देव नसावा" हा साक्षात्कार देणारा एकही प्रसंग घडल्याचे आठवत नाही व तेवढे कारण माझ्यासाठी वैयक्तिकरित्या देव मानण्यासाठी पुरेसे आहे.
अर्थात ह्याच अनुषंगाने "देव आहे" ह्याचे साक्षात्कार कसे घडले हे शब्दात मांडण्यास मी नालायक आहे हे मी नमुद करतो, तेवढीच माझी मर्यादा.

बाकी चालु द्यात !

- ( 'देव' ह्या संकल्पनेवर विश्वास असणारा ) छोटा डॉन

अवांतर : बिटवीन 'देव म्हणजे नक्की काय?' हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो. माझीही देवाबद्दल काही गॄहीतके आहेत, पण इथे देवाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह उभे करणारी आमच्या मर्यादेबाहेरची चर्चा चालु असल्याने ती इथे लिहणे अप्रस्तुत आहे.
लिहु कधीतरी पुन्हा विषय निघाल्यावर ...
तुर्तास तुमचे चालु द्यात !

'देव म्हणजे नक्की काय?'

112

आता मुद्द्याला हात घातलात. ह्या चर्चेत खरी मजा आहे. त्यामुळी इथे झालेली चर्चा ही ह्याची पार्श्वभुमी आहे.

देव या संकल्पनेची गरज आहे असे माझे मत आहे. का ते तुम्ही लिहल्यावर बोलु.


-Nile

खरे आहे ...

113

'देव म्हणजे नक्की काय?' ह्या चर्चेतच खरी मज्जा आहे हे मान्य.
जी काही संकल्पना असेल ती असेल पण देव ह्या संकल्पनेची गरज आहे ह्या मताशी मी सहमत.

लवकरच ह्यावर सविस्तर एक वेगळा लेख टाकेन.
मात्र सध्या इतर काही बाबींमध्ये बिझी असल्याने लगेच जमणार नाही, किमान ३-४ दिवसांचा वेळ हवा आहे. मग त्यानंतर बोलु. क्षमस्व !

बाकी इतर कुणी ह्या चर्चेची सुरवात केल्यास त्याला आमची ना नाही.
होऊन जाऊ द्यात.

मान्य आहे. डान्राव, तुम्ही

114

मान्य आहे.

डान्राव, तुम्ही ३-४ महिने लावलेत तरी चालेल, पण नक्की लिहा.

देव आहे ...

115

बघा बरं देव आहे की नै.
तुम्हाला आम्ही किमान ३-४ दिवस म्हणत निदान ३-४ महिन्यांनीतरी हा लेख लिहु असा विश्वास वाटला ह्याहुन अजुन देवाच्या करणीचे अस्तित्व पटवणारे कोणते उदाहरण हवे आहे ? wink

जोक्स अपार्ट, नक्की लिहतो !
येणार्‍या सोमवारी लेख बोर्डावर असेल.

मात्र

116

त्याचे अस्तित्व पटवुन देणे अथवा अस्तित्व नाकारण्यासाठी काही टेस्ट्स अथवा कसोट्या पाहणे ह्याला मी शुद्ध "नालायक" आहे असे मानतो. माझा तेवढा अभ्यास नाही आणि तयारीही नाही
सहमत.
"देव आहे" ह्याचे साक्षात्कार कसे घडले हे शब्दात मांडण्यास मी नालायक आहे हे मी नमुद करतो, तेवढीच माझी मर्यादा.
सेम हियर.
पुन्हा सहमत

देव ही संकल्पना आहे... राम ,

117

देव ही संकल्पना आहे...
राम , कृष्ण ही त्याला मानवाने दिलेली रुपे आहेत . काही अध्यत्मिक इ. लोक सोडले तर सर्वसामान्य माणसाला उपासने साठी मूर्त रुप हवे असते मग ती एखादी सोन्याची मुर्ती असेल किंवा शेंदूर फासलेला दगड. ईश्वर हा सर्व चराचरा मधे आहे असे शिकवणारे सुद्धा देवळे आणि मठ बांधून पुजा अर्चा करताना दिसतात (अर्थात हे म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान ... असा प्रकार आहे कि लोकमानस अचूक ओळखून त्याचा उपयोग (/दुरुपयोग्)करुन स्वतःची उन्नती साधण्याचा प्रयत्न असतो हा एक स्वतंत्र विषय आहे)
पण मला वाटते जेथे सौंदर्य , शुचिता, आणि पवित्र्य आहे तेथे देवाचे अस्तित्व असते. अथवा जे कही सुंदर, पवित्र असे आहे ते म्हणजे देव.
त्या मुळे देव आपल्याला अनेक प्रसंगी आणि विविध रुपात भेटु शकतो.

मुद्दे पटले.

118

मुद्दे पटले.

मनीषाताई, तुमचे विचार मान्य

119

मनीषाताई, तुमचे विचार मान्य नसले तरीही त्याबद्दल संपूर्ण आदर आहे. Though I do not accept your thoughts I can appreciate!

देवांच्या "लीला" आणि "बनवेगिरी"....

120

अतिशय सुंदर आणि वैचारिक विषयावरील चर्चा वाचून मन आनंदाने भरून आले आहे. विषय गंभीर असूनही जवळजवळ प्रत्येकाने खेळकर रीतीने घेतल्याने यातील वाचनाची खुबी खूपच वाढली आहे. असो. मी स्वत: विषय सुरुवात करणा-या अदिती यांचा मताचा आहे आणि इतरत्रही याच विषयाबाबत कित्येकवेळा अत्यंत कडवटपणाला सामोरे जावे लागले आहे. लिखाणात असे प्रसंग टाळता येतात पण प्रत्यक्ष संभाषणात ही सुविधा नसते. तथाकथित देवांच्या "लीला" आणि "बनवेगिरी" वाचल्यानंतर असाही प्रश्न पडतो की मग यांचे `देवपण` नेमके आहे तरी कशात? `समुद्रमंथाना` पासून हा घोळ चालू आहे. रामाने दुस-याच्या सागण्यावरून सीतेचा त्याग करणे याला देव्पानाचे उदाहरण म्हणत असतील तर मग प्रश्नच मिटला. शूर्पणखेचे नाक कापून तिला विद्रूप करणे कोणत्या देवनीतीत बसते? गीता सांगणारा कृष्ण आणि महाभारतात अन्यत्र वागणारा कृष्ण या व्यक्ती एकच असतील, तर त्यांच्यात सुसंगती दिसत नाही. दुर्योधन गांधारीकडे निघाला असता त्याला नग्न जाऊ नको तर किमान कमरेभोवती फुलांची माळ घालायला सांगणारा, ब्रह्मास्त्र अजात गर्भावर सोडायला सांगणारा व नंतर अश्वत्थ्याम्याने तसे करताच त्याला शाप देणारा कृष्ण हा देव कि एक पक्का मुरलेला राजकारणी आहे? आता युद्धात सारेच क्षम्य असते असे मानले तर ठीक आहे. पण मग त्यावेळी प्रतिपक्षाने तशाच मार्गाचा आधार घेतला, तर तो मानण्याचीदेखील तयारी ठेवली होती का? आपण सोडून इतरांनी धर्मयुद्ध करावे हा अनाठायी आग्रह होय.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

ब्रह्मास्त्र अजात गर्भावर

121

ब्रह्मास्त्र अजात गर्भावर सोडायला सांगणारा व नंतर अश्वत्थ्याम्याने तसे करताच त्याला शाप देणारा कृष्ण हा देव कि एक पक्का मुरलेला राजकारणी आहे?
पण त्याच अजात गर्भाचे संरक्षण करणार कृष्ण दिसला नाही काय हो?
पण मग त्यावेळी प्रतिपक्षाने तशाच मार्गाचा आधार घेतला, तर तो मानण्याचीदेखील तयारी ठेवली होती का? आपण सोडून इतरांनी धर्मयुद्ध करावे हा अनाठायी आग्रह होय.

असा कुठे आग्रह दिसला नाही हो. उलट कृष्णाने तेव्हा कुठे गेला राधासुता तुझा धर्म असा प्रश्न विचारलेला दिसतो. अधर्माचा मुकाबला अधर्माने करा हाच संदेश श्रीकृष्ण चरित्रातून दिसतो. आता शिवाजी महाराजांनी अफझलखानाला फसवून जावळीच्या खोर्‍यात आणून मारले ते काय चूक केले का? रांझ्याच्या पाटलाचे, खंडोजी खोपड्याची चौरंगी केली तो काय अधर्म होता का?
असो. असाच एक न संपणारा वाद.


-पुण्याचे पेशवे

कृष्ण

122

हा देव कि एक पक्का मुरलेला राजकारणी आहे?
दोन्ही.

एव्हढी खात्री कशी? स्पष्टीकरण

123

एव्हढी खात्री कशी? स्पष्टीकरण द्यावे.


-Nile

किती लिहिलय! काही प्रतिसाद

124

किती लिहिलय! हास्य
काही प्रतिसाद खरंच छान आहेत, देवाच्या बाजूने बोलणारे आणि विरुद्ध बाजूचेही. वाचायला आवडले. पण मी काय म्हणते, कामं करा रे, कामंही करा थोडीफार! लिहितच कितीवेळ बसणार? wink

हॅ हॅ हॅ ... ते सोडून काहीही

125

हॅ हॅ हॅ ... ते सोडून काहीही बोला मॅडम! wink

लिहिणार्‍याने

126

लिहिणार्‍याने लिहित जावे वाचणार्‍याने वाचित जावे
वाचता वाचता वाचणार्‍याने लिहिणार्‍याचे पेन घ्यावे !

(किंचित कवी) ररा कविताकर

'रम्ता कविताकर' असे देखील

127

'रम्ता कविताकर' असे देखील चालले असते.


-पुण्याचे पेशवे

१००

128

हाबिणंदण

१०१

129

"हे कसे घडते", जे मला (सध्या) माहिती नाही, ते सर्व 'देव' करतो म्हणून, असा माझा समज आहे.

दिवसेंदिवस माझा देव कमी कमी होतो आहे.

पण तो कधी शून्याला पोहोचेल असे वाटत नाही. कारण लिमिट मध्ये "अ‍ॅज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी" म्हणतात तसे आहे. एक्स डज नॉट रीच इन्फिनिटी, एव्हर.

- फुन्सुक

कृष्ण.... शिवाजी..... !!!

130

".....असाच एक न संपणारा वाद..."

श्री. पेशवे जी ~ प्रथमच सांगतो की मी जी उदाहरणे दिली आहेत ती आदितीन्च्या `देव आहे/नाही` या विषयाला अनुसरून. जर `देव` सर्वसामान्य मानवासारखे वर्तन करीत असेल तर मग त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही का? कृष्ण हा देव व कर्ण हा मर्त्य मानव, त्यामुळे दोघांच्याही वागणुकीत काहीतरी फरक हा गृहीत धरलाच पाहिजे. पाण्डवावरील त्याचे (पक्षी कृष्णाचे...) हे मान्य करू या, म्हणून कौरवांनी केले ते सर्व वाईटच हे तर्कशास्त्र कितपत बरोबर आहे? युद्धापूर्वी झालेल्या `कृष्ण शिष्टाई` प्रसंगात त्याने दुर्योधनाकडे किमान पाच भावांसाठी पाच गावांची मागणी केली होती; पण दुर्योधन त्यास असे म्हणाला की, "प्रथम ते पाच आमचे भाऊ आहेत हे सिद्ध करावे लागेल, ते कुंतीपुत्र वा माद्रीपुत्र असू शकतील, पण पांडुपुत्र आहेत का?" वकिली भाषेत हा बिनतोड मुद्दा होता. पण `देवपण` स्वीकारलेल्या कृष्णाने तो उडवून लावला आणि पुढे युद्ध व्हायचे ते झालेच. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की जिथे कृष्ण हे स्वरूप देवाचे नसून मर्त्य मानवाचे आहे. अर्थात कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी `अंतिम विजय` ही एकच बाब कायमपणे स्वीकृत होते व शेवटी तीच सत्य म्हणून सामान्यत: ओळखली जाते. हा विषय फार दीर्घ रीतीने चर्चिला गेला तरच विचारात काहीतरी सुसंगती आणता येईल.

आता `देव` विषयात शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास या दोन्ही बाबी पूर्णत: भिन्न आहेत. त्यामुळे या विषयावर जास्त काही लिहिणे निदान मला तरी सयुक्तिक वाटत नाही (मात्र तुम्ही त्यांच्याबाबत लिहिलेल्या मजकुराशी मी विनातक्रार सहमत आहे कारण तो आपला इतिहास आहे.) तिथेही `भवानी माता` व तिने महाराजांना दिलेली तलवार या बाबी ख-या तसेच वैज्ञानिक कसोटीवर कितपत सत्य मानाव्यात या बाबतहि बराचसा काथ्याकुट होऊ शकतो. काही बाबी केवळ त्या `मोठ्या`नी सांगितल्या म्हणून सत्य मानायच्या असतील तर मागे एकदा महात्मा गांधी यांनी बिहारात भूकंप झाला तेव्हा ते म्हणाले होते की आपल्या देशात पाप फार माजले असल्याने त्याचा हा परिणाम ! तर विनोबा उदगारले की, बिहारात पूर आणि भूकंप झाला याचा अर्थ असा की या निमित्ताने ही भूमी भूहीनाना दान करून टाका असा संदेशाच जणू ईश्वराने आपण सर्वाना धाडला आहे. काय उत्तर द्यायचे अशा वक्तव्यावर ?


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

आस्तिक विरूध्द नास्तिक

131

आस्तिक विरूध्द नास्तिक ही लढाई चालू आहे का ईथे.. हास्य
जर ती असेल तर त्या साठी स्वतंत्र लेखनाचा धागा ओपन करुयात ...
ज्या अर्थी प्रत्येक जण ईथे .. एकमेकांला काय आहे आणी नाही हे पटवुन द्यायचा प्रयत्न करतोय.

मला काल अचानक साक्षात्कारच झाला.. ..
श्री .. नीले.. यांनी वरती ज्या काही पोस्ट टाकल्या त्या वाचल्यावर.. मनामधे .. असे काही वादळ निर्मान झाले..
रोज सकाळी न चुकता मी देव पुजा करत असे. पण आ़ज देवांसमोर(मुर्तीसमोर) दोन्ही हात जोडले आणी
श्री .. नीले
यांची खालील वाक्ये डोक्यात घुमली
"देव पांगळे-लुळे का जन्माला घालतो?
रोज लाखो लोक अपघातात मारण्याचे काम देव करतो का?
हो, तर का?
अनेकांना दरिद्री आयुष्य का देतो?"

हे प्रश्न मी त्या देवाला विचारले.. नेहमी प्रमाणे. ते काहीच बोलले नाहीत..
शेवटि त्या अमुर्त आणी माझ्या अंतरात असणार्या देवाला मी विचारले.. पण त्या कडेही याचे ऊत्तर सध्या तरी नाही..

पण नंतर श्री .. नीले यांच्याच म्हणन्यानुसार..

प्रश्न पडतात हे चांगले, मला उत्तर माहीत नाही म्हणजे उत्तर अस्तित्वात नाही असा समज करुन घेतला तर मनुष्य उत्तरं शोधणारच नाही. इथेच वांदा होतो. माहित नसलेल्या उत्तरांना चमत्कार, देवाचे/पिशाच्चाचे रुप दिले जाते.

ह्याची ऊत्तरे कोण शॉधणार? ह्या जगात कूनाकडे कडे काही प्लैन्स आहेत का?

असो. पण देव पुजा मनापासून नाही झाली.. आणी एक दिवसासाठी मी नास्तिक झालो Sad

किशोर (आणि त्या अनुषंगाने

132

किशोर (आणि त्या अनुषंगाने बरेच लोक जे या प्रश्नानी गोंधळतात.)

याचे उत्तर 'कर्मविपाक' असे आहे. वर अदितीला दिलेल्या उत्तरामध्ये देव या संकल्पनेमधे ४ प्रकार समर्थ रामदासांनी सांगितले आहेत असे मी म्हटले आहे. त्यात ईश्वर ही व्यवस्था आहे. ती व्यवस्था सर्व 'जीवांचे' (माणूस आणि इतर सगळ्या जीवसृष्टीचे) कार्यकारण बघते.
तसेच प्रत्येक गोष्टीचा विपाक म्हणजे एखादी गोष्ट परिणाम करण्याइतपत सिद्ध होणे.
या मध्ये एक लक्षात घ्यावे लागते की देव न्यायी आहे मात्र अकारण दयाळू नाही. मी काहीही केले तरी मला त्याचे चांगलेच फळ द्यायला तो बांधील नसतो. आपण कधीतरी केलेल्या कर्माचे फळ म्हणून आपल्याला तसा परिणाम भोगावा लागतो. यासाठीच हिंदू पुनर्जन्म मानतात.( यात संचित- आधीच्या जन्मातील बाकी फळ, प्रारब्ध- या जन्मातील बाकी फळ आणि क्रियमाण- वर्तमान आणि भविष्य या मधे आपण करु त्या गोष्टी. अर्थातच आपण आपले पुढ्चे प्रारब्ध घडवत असतो )
आज काही केले नाही तरी माझ्या वाट्याला हे का....??? याचे उत्तर आपल्याला यात मिळते. मात्र मग आंधळाच का, लंगडाच का इ. 'तांत्रिक' गोष्टी आधीच्या कर्मानुसार ठरतात.

मागे घाटपांडेना दिलेल्या प्रतिसादामध्ये माझा एक प्रतिसाद होता.....
आज लावलेल्या आंब्याच्या रोपाला ठराविक काळाने फळे येतील आणि ती 'आंब्याचीच' येतील हे सामान्य ज्ञान (मराठीत कॉमन सेन्स) आहे....
आज जगताना कुठलाही विधीनिषेध न पाळता जगणे म्हणजे रोप लावणे असेल तर नंतर त्याची 'तशीच' फळे नाही का मिळणार....????

आपण एखादी गाडी चालवतोय आणि अपघात केला. एखादा माणूस दगावला. तेव्हा कुणी बघितले नाही असे वाटून आपण पुढे गेलो, गाडी बदलली...ती चालवत पुढे निघालो...
पोलिस गाडी मागून आली आणि पोलिसाने आपल्याला पकडले...
आपला युक्तिवाद.... 'दुसर्‍या' गाडीने अपघात केला आहे..... मी दोषी नाही...
पोलिस काय करेल हे मी सांगायला नको.....

हे लुळे, पांगळेपण त्या त्या कर्माची फळे म्हणून आहेत हे समजून किमान नवीन काही वाईट आपण करणार नाही.

याच प्रमाणे आपण अत्यंत बुद्धीमान, सुंदर गोष्टीबाबत म्हणू शकतो.
एखाद्या जीवाचा एक देह पडल्यानंतर, त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार आणि वासनानुसार नवीन देह, मिळतो. एखाद्या माणसाला त्याच्या त्याच्या कुवतीनुसार आणि इच्छेनुसार मिळणार्‍या नोकरीप्रमाणे हे सगळे आहे असे म्हणता येईल. (यात वशिला मात्र लावता येत नाही.)

त्यामुळे देवाला हात जोडताना, 'तो' याला कारणीभूत नाही हे पक्के ध्यानात ठेवा.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

".....आपण कधीतरी केलेल्या

133

".....आपण कधीतरी केलेल्या कर्माचे फळ म्हणून आपल्याला तसा परिणाम भोगावा लागतो."
चला थोडा वेळ मानू या की कर्माचे फळ म्हणून आपल्याला तसा परिणाम भोगावा लागतो, मग अंगारकी संकष्टी दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील आठ वर्षाचा एक गोंडस मुलगा त्यांच्या नजरेसमोरच समुद्रात बुडून मृत्यू पावतो, त्यावेळी गणेशाने त्या कुटुंबाला (मागे कधीतरी केलेल्या) कर्माचे फळ म्हणून ती शिक्षा केली असे मानू या का ? तसे असेल तर मग त्या कर्त्याला शिक्षा होणे गरजेचे होते, बिचा-या फुलासारख्या दिसणा-या त्या मुलाचा जीव का जातो हा प्रश्न नजरेसमोर येतो.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

थोडेसे अजुन. ह्या जन्मात

134

थोडेसे अजुन. ह्या जन्मात शिक्षा मागच्या जन्माची. पण मागच्या जन्मात का? सुरुवात तर कोर्‍या पाटीने झाली ना?

कर्ता करवीता जर तो असेल तर मग हे पाप-कर्म कुठुन आली? तोच करवतो ना सगळं?


-Nile

जन्म घ्यावा लागे वासनेचे

135

जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे.....तुकाराम

जन्माची प्रेरणा हीच वासना म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दलची इच्छा (फक्त कामवासना नव्हे) आहे. ही इच्छा आली त्याबरोबर मी सुखी असावे ही वासना असते. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आले मग त्याचे परिणाम आले आणि मग चक्र सुरु होते. मूळ प्रेरणा कुठून आली...?? जिथून तो बिंदू आला ना तिथूनच.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

सृष्टीच्या कर्त्याला ह्या

136

सृष्टीच्या कर्त्याला ह्या वासनेचे उत्तर सापडले नाही? वासनेशिवाय बनवता आली नाही?


-Nile

अरे बाबा तीच तर मजा

137

अरे बाबा तीच तर मजा आहे.....

एकटा होता त्याला बोअर झाले म्हणाला टाईम पास करुया....
एकोहं बहुस्याम ही वासना त्याची..... 'मी एकटा आहे आता बहु होतो....'


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

वा! हे बरंय! वासना तुमच्या

138

वा! हे बरंय! वासना तुमच्या देवाची आणि भोगायचे मनुष्याने??


-Nile

अरे वा, महास्फोटावर तुमचा

139

अरे वा, महास्फोटावर तुमचा फारच जीव दिसतो आहे. (हा आमचा महास्फोट, आमचा याच्यावर फार जीव! wink )

पण बिंदू आला तिथूनच मूळ प्रेरणा आली हे कशावरून? मुळात बिंदू कुठून, कसा हे जरा समजावता का? मला नाही समजलेलं ते!
मुळात पहिली वाईट कृती का घडते? का C भाषेत i=-1 टाकून उत्तर मिळवायचं? wink

इथे शिक्षा गणपती देत नाही. ती

140

इथे शिक्षा गणपती देत नाही. ती त्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळतेच असे आहे. चोरी केली गेली तर पकडली जावो न जावो तिची शिक्षा 'हे' कोर्ट देतेच.

इथे कुठल्याही प्रकारे, 'ह्याची' शिक्षा 'त्याला' वगैरे प्रकार नसतो. अर्थात आई वडलाना मुलगा गेल्यावर होणारा त्रास त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कर्मफळानुसार असतो. त्या गोंडस मुलानेच पूर्वी कधीतरी केलेल्या (त्याच्या पूर्वजन्मी) कर्माचे फळ म्हणून ही शिक्षा असेल. सकारात्मक विचार करायचा झाला तर त्याचे कर्मफळ भोगून झाल्यामुळे तो पुढच्या कुठल्या तरी चांगल्या घरात जन्म घेणार असेल. ( त्याची जेल ची टर्म संपली म्हणा...)

तसेच प्रत्येक कर्माचे फळ असतेच. +५-४ =१ असा प्रकार नसतो. प्रत्येकाची वेगळी शीट असते. -४ चे नकारात्मक आणि +५ सकारात्मक फळ मिळणारच. त्यामुळे मी आता चांगले वागतो आहे मला चांगले'च' फळ मिळावे, सगळे छान'च' असावे अशी अपेक्षा बाळगता येत नाही.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

"आपल्या सगळ्या कर्माची फळे

141

"आपल्या सगळ्या कर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात"...असे म्हणतात अन "हे पूर्वीच्या जन्मीचे फळ आहे" असेही म्हणतात ...विसंगत वाटत नाही काय?

कर्मफळानुसार......

142

".......आई वडलाना मुलगा गेल्यावर होणारा त्रास त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कर्मफळानुसार असतो. "
सर.... तुम्ही म्हणता तसे असेलही ~ माझा प्रश्न असा आहे की, त्यावेळी मी तेथे (गणपतीपुळे) येथे हजर होतो व बघ्या लोकांनी आरडओरड केली म्हणून धावत जाऊन समुद्रात उडीही घेतली (मी पट्टीचा पोहणारा आहे) ~~ बराच वेळ झाला होता व ते फूल पूर्ण कोमेजून गेले होते. मी स्वत: त्याचे प्रेत बाहेर काढले. कुटुंब माझ्या ओळखीचे नव्हते मात्र आई वडिलांचा (व विशेषत: थोरल्या बहिणीचा - जी १५-१६ वर्षाची असेल) आकांत पाहून त्या पूर्ण भिजलेल्या अवस्थेतही मला रडे आवरेना कि ते प्रेतही हातातून सोडवेना. या गोष्टीला आज वर्ष होत आले, पण हा प्रसंग माझ्या हृदयावर एखाद्या शिक्षेसारखा कोरला गेला आहे. मग येथे मी असे मानावे का की माझ्या मनी ठसलेली एक प्रकारची वेदना ही माझ्या गतजन्मीच्या कर्माची फळे आहेत?


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

तुमच्या मनी ठसलेली वेदना

143

तुमच्या मनी ठसलेली वेदना तुमच्या भावनांचा, विचारांचा परिणाम आहे. तुम्ही तुमच्या परीने १००% प्रयत्न केले होते पण यश आले नाही. इतर एखाद्या 'तशाच' प्रसंगात मूल वाचलेही असते पण तसे नाही झाले हाच प्रारब्धाचा, संचिताचा भाग आहे..... आणि असे मानणे हा शहाणपणा ठरतो. नाहीतर तुम्ही अपराधी भावना/वेदना बाळगून जगाल जिचा तुमचा खरोखरी संबंध नाही. (१००% प्रयत्नानंतर हे म्हणण्याचा अधिकार आहे हे ल़क्षात घ्या)

अदिती,निले,
विज्ञान याला काय उत्तर देते...???
का झाले त्याचे उत्तर नकोय, काय झाले असते हे ही नकोय, झालंय त्याला सामोरे जायचे आहे..... काय उत्तर आहे...???

आपल्या दु:खात सहभागी....Sad

प्यारे


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

>> विज्ञान याला काय उत्तर

144

>> विज्ञान याला काय उत्तर देते...? <<
विज्ञानाचं माहित नाही, मी या विषयाचा अभ्यास करत नाही. मला माझं व्यक्तीगत मत विचाराल तर, दुसर्‍याचं दु:ख पाहून स्वत:ला दु:ख होणं हे माणूस आणि माणूसकीचं लक्षण आहे. आत्ताच चीनमधे भूकंपाने लोकं मेली, बेघर झाली; कोण, कुठली माणसं त्यांच्यासाठी वाईट वाटणं ही माणूसकी नाहीतर दुसरं काय?
एखादी दु:खद घटना आपल्या डोळ्यांसमोर घडली, अवेळी एखादा जीव गेला तर त्याचं आणखी जास्त वाईट वाटतं, जे इस्किलार यांच्या बाबतीत झालं आहे, आणि त्याचा परिणाम जास्त वेळ रहातो. माणसामाणसाप्रमाणे, त्याच्या "रिसेप्टीव्हीटी"प्रमाणे, याचा कमी-जास्त त्रास होतो.

'का' याचं उत्तर भौतिकशास्त्र देत नाही, 'कसं' याच्या उत्तरासाठी भौतिकशास्त्र आहे. पण तुमचा प्रश्न काय आहे ते मला कळलं नाही.

का व कसं

145

बर्‍याच वेळा कसं चं उत्तर दिल्यावर का हा प्रश्न निरर्थक ठरतो. तेव्हा पुन्हा, फक्त भौतिकशास्त्र म्हणू नये असं वाटतं.

मान्य! पण इतर विषयांचा

146

मान्य! पण इतर विषयांचा (काहीच) अभ्यास नसताना त्याबद्दल कसं बोलणार, म्हणून फक्त भौतिकशास्त्राबद्दल (ज्याच्याबद्दल किंचीत माहिती आहे) बोलले.

घासकडवी धन्यवाद. मी 'विज्ञान'

147

घासकडवी धन्यवाद.

मी 'विज्ञान' काय उत्तर देते हा प्रश्न विचारलाय....

एकच परिस्थिती असताना, एकीकडे कोणी वाचतो आणि कोणी दगावतो याची कारण मिमांसा कशी करते विज्ञान....???
वाचतो तो का वाचतो, मरतो तो का मरतो...???

विज्ञानाने (मुख्यत्वे तंत्रज्ञानाने) केलेली प्रगती, तिची उपयुक्तता, व्यवहारातील वापर सगळे सगळे मान्य आहेच, त्याचाच वापर करुन आपण हा संवाद साधतोय पण म्हणून बाकी सगळ्याच गोष्टी नाकारणार का.....???


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

>> एकच परिस्थिती असताना <

148

>> एकच परिस्थिती असताना <<
हे किती खरं?

>> एकीकडे कोणी वाचतो आणि कोणी दगावतो <<
हे खूपच सरलीकरण नाही का? प्रत्येकाची तब्येत, प्रतिकारशक्ती,इ.इ. गोष्टी वेगळ्या असतात...

>> पण म्हणून बाकी सगळ्याच गोष्टी नाकारणार का.....??? <<
म्हणजे आपल्या मते नक्की काय नाकारलं जात आहे?

का व कसे...

149

सर्व परिस्थिती एकच आहे हे वरवर दिसणारं सत्य आहे. त्या दोन्हीमधला फरक जर विज्ञानाने दाखवला, तर मरणारा कसा मरतो व वाचणारा कसा वाचतो या उत्तराने, हे का होतं? यामागे कोणा नियंत्याची इच्छा आहे का? वगैरे प्रश्न नष्ट होतात असं मला म्हणायचं होतं. भौतिकशास्त्र हे मी जवळपास विज्ञान या अर्थानेच वापरत होतो.

बाकी सर्व परिस्थिती एकच असताना वेगळे परिणाम दिसले असतील तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

अहो विज्ञान म्हणजे काय

150

अहो विज्ञान म्हणजे काय शंकराचा तिसरा डोळा आहे का? की गेले हवे तिथे डोकावायला?

विज्ञान परिस्थितीचा अभ्यास करतं. इथे तसा अभ्यास करायला काही आहेका?

ते विज्ञान वगैरे नंतर पाहु, आधी त्यांचा प्रतिसाद नीट वाचुयात. ते म्हणतात,

त्यावेळी मी तेथे (गणपतीपुळे) येथे हजर होतो व बघ्या लोकांनी आरडओरड केली म्हणून धावत जाऊन समुद्रात उडीही घेतली (मी पट्टीचा पोहणारा आहे) ~~ बराच वेळ झाला होता व ते फूल पूर्ण कोमेजून गेले होते.

ते पट्टीचे पोहणारे आहेत, अश्या परिस्थितीत सेकंदही कीती महत्त्वाचा आहे हे तेच सांगतील, त्यांच्या भावनेचा प्रसंग असल्याने अधिक लिहित नाही.


-Nile