

शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव
आजकाल शाळांत मुलांना वेगवेगळे प्रकल्प करून आणायला सांगतात. लहान मुले हा प्रकल्प पुर्ण करूच शकत नाहीत. मग पालकांना हातातले काम सोडून ते प्रकल्प पुर्ण करावे लागतात.
उदा. अंध लोकांसाठी पैसे जमा करणे, खरी कमाई, एखादा सायन्स- विज्ञान प्रदर्शन मधला प्रकल्प, क्राफ्ट, पुठ्याचे घर बनवणे, चित्र काढणे आदी.
लहान मुलांना असली न जमणारी कामे ते का देतात ते समजत नाही. शाळेतच चुकीचे का होईना त्या मुलांनच ते प्रकल्प बनवू दिले तर ते जास्त फायदेशीर राहिल. पुन्हा असे सांगाचे वाटते की तो प्रकल्प पुर्ण न झाला तरी हरकत नाही, मुलांनी शाळेत त्यानी स्वत: प्रयत्न करणे महत्वाचे. आपण मदत करतो म्हणजे तो पुर्ण प्रकल्पच पुर्ण करून तो प्रकल्प मुले फक्त शाळेत पोचता करतात.
आता माझ्या मुलाला शाळेत 'उन्हाळ्यावरचे चित्र' काढून आणायला लावले होते. तो दुसरीत आहे. तो लहान लहान चित्रे काढू शकतो. जसे:पतंग, एखादे मुक्तहस्त वैगेरे. पण खुप बारकाईचे मोठे चित्र त्याच्या वयाच्या मुलाला मनाने काढणे शक्य नाही. मग त्याने माझ्या मागे लकडा लागून चित्र पुर्ण करवून घेतले. अर्थात त्या चित्राला बर्याच ठिकाणी त्यानेच रंगविले. तोच त्याचा सहभाग म्हणावा लागेल. ते चित्र खाली दिले आहे.

the summer season
मी आधी हे चित्र कंटाळ्यामुळे काढणार नव्हतो. पण नंतर मी ते त्याच्या पुस्तकात बघून काढले. (पहा: मी ही मदत घेवूनच चित्र पुर्ण केले ना.) चला या निमीत्ताने का होईना खुप वर्षांनी मी हातात पेन्सिल घेतली अन जुने दिवस आठवले हे काय कमी आहे का?
तुमचा अनुभव काय आहे? तुम्हालाही असला प्रोजेक्ट तुमची मुले देतात काय. जरूर कळवा.
आम्हाला शाळेत एकदा भरतकाम करायला सांगितलं होतं. वर्गातली मी एकटीच जिचं भरतकाम अर्धवट होतं. शिक्षिका मला शिक्षा वगैरे करायला लागल्या तर मी सरळ निषेध नोंदवला. "वर्गातल्या बहुतांश मुलांच्या आयांनी त्यांना भरतकाम करून दिलं आहे म्हणून त्यांना शिक्षा नाही आणि माझ्या आईला यासाठी वेळ नाही म्हणून मला शिक्षा करता का?" असं विचारलं. मग रवानगी थेट उपमुख्याध्यापिकेच्या केबिनमधे! आईने शिकवल्याप्रमाणे तिथेही (घाबरत, थरथरत) बाणेदारपणा दाखवला, "... तुम्ही मला ही असली नावडती कामं का देता? त्यापेक्षा चार गणितं जास्त द्यायचीत सोडवायला, माझी मी सोडवली असती."
(आगाऊपणा उपजतच असावा माझ्यात, इंग्रजीच्या बाईंना गणितं घालायला सांगायची, पीटीच्या सरांना स्पेलिंग्ज विचारायला सांगायची वगैरे!)
शिक्षातर झाली नाहीच पण शिवाय सगळ्यांना काय सरासरी मार्क /ग्रेड्स दिल्या होत्या त्या मलाही दिल्या.
लै भारी!
उगाच काही तरी लिहितीये म्हणून चुकीचं टाचण द्यायचं ठरवलं. तितक्यात -
(आगाऊपणा उपजतच असावा माझ्यात, इंग्रजीच्या बाईंना गणितं घालायला सांगायची, पीटीच्या सरांना स्पेलिंग्ज विचारायला सांगायची वगैरे!)
हे वाचलं आणि आता झक मारत सहमती दर्शवावी लागतीये.
हे हे हे ...
लेख सुंदर !!
एक दिवस पालकांनी शिक्षकांच्या जागेवर उभे राहून विचार करावा.......
ऑप्शन पण छान दिले आहेत, प्रकल्प शाळेत करून घ्यायला काही हरकत नाही पण ५० मुले आणि एक शिक्षक या रेशोला जमेल का ??
>>एक दिवस पालकांनी शिक्षकांच्या जागेवर उभे राहून विचार करावा.......
+ १ असेच म्हणतो...
कालच पेशव्याच्या घरी ह्या विषयावर चर्चा झालेली आठवली.
आमच्याकडेही हिच तरहा आहे. माझ्या मुलाला रात्री ११:३० वाजता आठवण येते की उद्या टिचरने स्नो-मेन, कंदिल, बुक्-मार्क, वगैरे बनवून आणायला सांगितले आहे म्हणून. मग काय? करा धावपळ्.....त्यातपण अर्धवट झोपेत चिरंजीव सांगतात " अगं टिचरने असं नव्ह्तं बनवलं; आता मी नाही नेणार हे. तू परत बनव्."
एकदा तर हद्द्च केली होती. त्यांना शाळेत पर्यावरणाच्या तासाला एक फुलांचं झाड लावून आणायला सांगितलं होतं. त्याचबरोबर ते कसं लावलं, त्याची निगा कशी राखली हे पण समजवून द्यायचं होतं. नेहेमीप्रमाणे रात्री लेकाने मला सांगितला हा प्रकार समजावून. मी म्ह्ट्लं "ठिक आहे. आपण एक छानसं झाड लावूया उद्या"
सकाळी उठुन आपणच एक कुंडी शोधुन आणली. त्यात माती भरली. मला म्हणाला "आता लाव झाड" मी आपला विचार केला धणे पेरुयात म्हणजे जरा लवकर रुजतील. कुंडीत पाणि घालुन झालं. लेक एकदम खुश. सगळ्यांना सांगून आला कि, त्याने कोथिंबीरीचं झाड लावलय आणि त्याला खुप मोठी कोथिंबीर येणार आहे. त्याचा हा उत्साह पाहून माझं मात्रुह्र्दय भरुन आलं.
(पण मला माहित नव्ह्तं कि माझा फार लवकरच भ्रमनिरास होणार आहे ते.
)
लेक तासाभराने आला आणि विचारतो कसा," मम्मा अजून झाडं कसं आलं नाही?
किती वेळ लागेल त्याला बाहेर यायला? मी स्कूलमध्ये जायच्या आधी येईल ना ते?"
) आता सगळ्यांना मार्क मिळणार ... मलाच टिचर पनीश करणार्...मी नाही शाळेत जाणार....
"
"
मी: "अरे पण हो....जरा धीर धर की. आत्तच लावलयस ना ते? मग लगेच कधी झाड उगवतं का? ४-५ दिवसाने येईल ते."
लेकः "४ दिवसानी येऊन काय फायदा? माझी एक्झाम तर आज आहे आणि टिचरने सगळ्यांना कुंड्या घेऊन आजच बोलावलं आहे. (रडणं सुरुहोऊन आवाज टिपेला पोहोचला होता एव्हाना
मी: "हे तुला टिचरने काल सांगितलं नसणार? हो ना?"
लेकः "हो. लास्ट विकमध्ये सांगितलं होता......पण मी विसरलो....काल परत रिमाईंडर दिलं तेव्हा आठ्वलं...(माझी अवस्था मात्र
तोपर्यंत सगळे शेजारी-पाजारीपण जमा झाले आमचा गोंधळ पहायला. (आमची ८ खोल्यांची एकच गेलेरी आहे.)
मग एकेकाचे सल्ले चालू झाले. सगळे लेकाने धुड्काऊन लाव्ले. मला सुचतं नव्ह्त की काय करु? तेव्हढ्यात शेजारच्या आजी म्हणाल्या की त्यांनी तुळशित झेंडु पेरले होते, त्याची छोटी रोपं आली आहेत तीच लाव त्या कुंडीत."
लेकाला समजावले कि झाड कसे लावायचे ते. तो पाठ करत होता " मेरीगोल्ड्चे फ्लावर तोडुन कुंडीत टाकले, त्याला रोज पाणि घातले. मग त्याचे झाड झाले...
"
संध्याकाळी स्वारी एकदम खुशित घरी आली. टिचरने त्याला ८/१० मार्क्स दिले होते. (मी अगदी धन्य्-धन्य झाले.
)
परिजा
******
आयुष्याच्या गणिताची समिकरणे सोडवताना ... तू कधी वजा झालास हे कळलेच नाही
तुझ्या आठवणिंचा हातचा धरुन ... मी कधी पुढे गेले कळलेच नाही.....