विनायक प्रभू
Offline
शेवटची नोंद: 11 आठवडे 4 दिवस
Joined: 14/02/2009
प्रकाशन:
.jpg)
दिली काडी लावून?
का, काही काम नव्हतं का? दिली काडी लावून? आता बसतो डोक्यात हाच किडा घेऊन.
कायद्याने व्याख्या केली आहे असा गुन्हा असं आत्तापर्यंतचं समाधान होतं. पण म्हणजे काय, हा प्रश्न आलाच. वैय्याकरणी किंवा कोणी आहे का रे?
श्रामो
वैय्याकरणी किंवा कोणी आहे का रे?
तुमी बी काडी लावली का. आमी काय लिवावं म्हून आमचा पेश्शल सबूद वापारला व्हय. गुन्याची डेपिनेशन वैय्याकरण काय डोंब्लं करनार ओ. कै च्या कैच. इथे यखांदा बालिष्टर होवा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हाहाहा...
नाय नाय... मालक ते ध्यानीच आलं नाही.
डेपिनेशनसाठी वैय्याकरण्याला नाही बोलावलं. कायदेशीर आणि गुन्हा या दोन शब्दांतून व्यक्त होणारा अर्थ परस्परविरोधी किंवा विसंगत वाटतो का, असल्यास तसे का वगैरेंची उत्तरं मिळावी म्हणून बोलावलं.
(स्वगत: च्यायला, या लोकांच्या नादी लागून आपलं लेखनही बिघडणार दिसतंय).
मुक्तछंद...
मुक्तछंद हा वैय्याकरणि गुन्हा आहे का? की तो काव्यशास्त्रीय गुन्हा आहे? की तो गुन्हाच नाही?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
चांगला प्रश्न
एखादी कृती गुन्हा आहे की नाही हे ठरविण्याआधी त्याची व्याप्ती ठरवावी लागेल. पुणेरी यांनी अन्य प्रतिसादात दिलेल्या उदाहरणानुसार, कायदा, नैतिकता आणि संस्कृती यांच्या संदर्भात गुन्ह्याची व्याख्या वेगवेगळी असेल मुक्तच्छंद हा गुन्हा आहे की नाही हे आपण कोणत्या संदर्भात तपासणार आहोत हे प्रथम ठरवले पाहिजे. पुणेरींनी काव्यशास्त्रीय गुन्हा आहे का असा प्रश्न विचारला आहे. आता काव्यशास्त्रासाठी आपण कोणते ग्रंथ्/पुस्तक प्रमाण मानणार हे ठरवले पाहिजे. नुकतेच मुटेसाहेबांशी गजलबाबत चर्चा झाली. माझा प्रश्न असा होता की एखादी कविता एखगैरमुरद्दिफ गजल ठरवण्यासाठी काफियांचे अस्तित्व पुरे आहे की याहून अधिक काही लागते. त्यावर त्यांनी सुरेश भट यांनी लिहिलेल्या गजलच्या व्याकरणाचा/बाराखडीचा उल्लेख केला होता. तिथेही माझा हाच प्रश्न होता. की हे व्याकरण सर्वमान्य आहे काय. माधव ज्यूलियन यांनी लिहिलेल्या काही गजला या गजलाच नाहीत असा त्यांच्यावर आरोप झाला होता. हाच प्रश्न काव्याबबतही विचारता येईल. त्यामुळे मुक्तच्छंद हा काव्यशास्त्रीय गुन्हा आहे की नाही याचे उत्तर देण्यापूर्वी श्री पुणेरी यांनी त्यांच्या काव्यशास्त्राचे आधार कोणते ते स्पष्ट केले तर बरे होईल.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
काव्यशास्त्र, व्याकरण....
यातले मला कळत नाही. पण मला जे कळते त्यानुसार काव्यशास्त्रानुसार छंदोबद्ध रचनेस काव्य म्हणतात. मुक्तछंदात तशी बद्धता येत नाही. त्या अर्थाने माझा प्रश्न होता.
कोणत्याही भाषेला सर्वकालीन व सर्वमान्य व्याकरण असते काय ही पण शंका मला आहेच.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
ह्म्म
काव्यशास्त्रानुसार छंदोबद्ध रचनेस काव्य म्हणतात. मुक्तछंदात तशी बद्धता येत नाही. त्या अर्थाने माझा प्रश्न होता.
बरोबर. पण छंद म्हणजे काय हे व्याख्यांनी बद्ध केले पाहिजे. काव्यात वृत्तांचे महत्त्व किती हे ठरवणे गरजेचे आहे. आता एखाद्या लयीशी तालाशी सुसंगत असलेली - त्यामुळे गेय असलेली- पण कोणत्याही वृत्ताचे बंधन न पाळणारी कविता तुम्ही मुक्तच्छंदातील म्हणणार का? की छंदोबद्ध रचनाच लय-तालाशी सुसंगत असू शकते असे तुमचे म्हणणे आहे?
कोणत्याही भाषेला सर्वकालीन व सर्वमान्य व्याकरण असते काय ही पण शंका मला आहेच.
मलाही. मुळात व्याकरणाचे प्रमणीकरण हे सुद्धा प्रमाणभाषेसाठी असते. बोलीभाषांचे काय. त्यांचे काव्य हे या व्याकरणाआधारे तपासता येईल काय? उदा. बहिणाबाईंचे काव्य हे प्रमाणभाषेतील वृत्तनियमांशी सुसंगत आहे का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
घासकडवी गुर्जींना बोलवा
घासकडवी गुर्जींना बोलवा कोणीतरी
पुष्करिणी
लय-तालाशी सुसंगत म्हणजेच काव्य काय?
सगळे आलाप, सगळे तराने, सगळ्या सरगमी काव्ये असतात काय!
काव्यात छंदोबद्धता आवश्यक नसेल तर गद्य आणि पद्य यात नक्की फरक कसा करायचा?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
मला गुलझार चं काव्य
मला गुलझार चं काव्य बर्याचवेळा प्रोझ पोएट्रीच वाटतं
पुष्करिणी
अरे वा
हे तर आमचे जुने प्रश्न.
सगळे आलाप, सगळे तराने, सगळ्या सरगमी काव्ये असतात काय!
आमच्या मते - आम्ही कोण म्हणुनी काय पुसता?... - आलाप, तराने, सरगम संगीताचा भाग होऊ शकतात, काव्याचे नव्हे. याचे मुख्य कारण म्हणजे काव्याचे व्यवच्छेदक लक्षण जे 'वर्ण्यविषय' तेच इथे नसते. काव्यासाठी वर्ण्यविषय प्रथम अस्तित्वात असावा लागतो. 'शद्बातून अर्थ उमलावा' हे अंशतः खरे आहे 'अर्थातून शद्ब यावा' हेच खरे. बाकी वृत्तव्याकरणाचा विचार नंतर. आता असे म्हणता येईल की मुक्तच्छंद आणि तुम्ही वर उल्लेखलेली उदाहरणे ही परस्परविरोधी आहेत, त्यामुळे त्यासंबंधी विचारले जाणारे प्रश्नही वेगवेगळे असतील. मुक्तच्छंद गेय असतील तर ती काव्ये आहेत का हा प्रश्न तर तराणे हे संगीत आहेत म्हणून काव्येही आहेत का हा दुसरा प्रश्न. पैकी दुसर्याचे उत्तर आम्ही आधीच दिले आहे. पहिल्याचे उत्तर अजूनही समाधानकारक देता येईल याची खात्री नाही
काव्यात छंदोबद्धता आवश्यक नसेल तर गद्य आणि पद्य यात नक्की फरक कसा करायचा?
मालक काव्यात छंदोबद्धता आवश्यक नाही असे आम्ही म्हटलेले नाही. आमचा प्रश्न असा होता की लयबद्धता असणे हे काव्याचे लक्षण/निकष मानणे शक्य आहे का? तसे असेल तर मुक्तच्छंद कायदेशीर काव्य आहे की नाही हे ठरविण्याचा निकष बदलू शकतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
काडी
नाही हो श्रामो.
एका लग्नाच्या हॉल मधे ही सुचना बघितली.
काय अर्थच लागत नाही बघा.
लग्न 'रजिस्टर' करायला ते सुद्धा लोकांना सुचना द्यावी लागते?
अरेरे.
गुन्हा
इथे धुम्रपान करणे कायदेशीर गुन्हा आहे.
बरोबर!
लग्न झाल्यानंतर ते लगेच 'रजिस्टर' न करणे कायदेशीर गुन्हा आहे.
चूक!
लग्न झाल्यानंतर ते लगेच 'रजिस्टर' न करणे सामाजिक व नैतिक गुन्हा आहे.
बरोबर!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
>>>लग्न झाल्यानंतर ते लगेच
>>>लग्न झाल्यानंतर ते लगेच 'रजिस्टर' न करणे सामाजिक व नैतिक गुन्हा आहे.
हे ही चुक आहे.
लग्न झाल्यानंतर ते लगेच 'रजिस्टर' न करणे ह्याला फार फार तर 'कमजोरी' म्हणता येईल.
बरं.. मग
बरं.. मग
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जी गोष्ट केल्यावर ( अथवा केली
जी गोष्ट केल्यावर ( अथवा केली नाही तर ) कायद्याने शिक्षा होउ शकते ती म्हणजे कायदेशीर गुन्हा, इतर गुन्हे हे Unethical /Immoral ह्या प्रकारांत मोडले जात असावेत...
पुष्करिणी
>>Unethical /Immoral कुठल्या
>>Unethical /Immoral
कुठल्या प्रकारचे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एथिक्स.....
एथिक्स आणि मोरॅलिटीमधे नक्की फरक काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
>>एथिक्स आणि मोरॅलिटीमधे
>>एथिक्स आणि मोरॅलिटीमधे नक्की फरक काय?
नक्की माहित नाही पण एथिक्स म्हणजे चार लोक म्हणतात म्हणुन तर मोरॅलिटी म्हणजे स्वतःच्या आत्म्याला जागुन असे काहीसे असावे.
जाणकार योग्यतो खुलासा करतीलच.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मलाही असंच वाट्तं Ethics =
मलाही असंच वाट्तं
Ethics = collective principles of community
Morals = personal values
पुष्करिणी
मग....
असोशल.... असामाजिक म्हणजे काय?
ननैतिक म्हणजे काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
असामाजिक म्हण्जे ज्या कृत्यान
असामाजिक म्हण्जे ज्या कृत्यान समाजाच्या हार्मनीत एक्प्रकारचा डिस्टर्बंन्स ( व्यत्यय ) निर्माण होइल..
Unethical आणि Immoral गोष्टी चूक वाट्ल्या तरी व्यत्यय नाही निर्माण होणार...
ननैतिक बद्दल मी फारशी क्लिअर नाहीये..
*( मला बर्याच शब्दांना योग्य मराठी शब्द आठवत नाहीत ...क्षमस्व )
पुष्करिणी
अनेथिकल....
मधे जर कम्युनिटीच्या व्हॅल्युजचा संबंध असेल तर अनएथिकल कृत्यांनी पण समाजाच्या स्वास्थ्याला बाधा येऊ शकेल. अन नैतिकता जर कटाक्षानं व्यक्तीसापेक्षच असेल तर मग सामाजिक नीतीमत्ता वगैरेचे काय?
मला बर्याच शब्दांना योग्य मराठी शब्द आठवत नाहीत ...क्षमस्व
हरकत नाही हो. आपण इथे अक्षर साहित्य निर्मिती करतोय त्यामुळं भाषा हा निकष असु शकत नाही. (ह.घे.)
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
असोशल = जे एथिक्सला धरुन नाही
असोशल = जे एथिक्सला धरुन नाही ते.
ननैतिक = जे नैतिक नाही ते म्हणजेच IMMORAL
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मग...
अॅन्टीसोशल म्हणजे काय असेल बरे?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
प्रसंन्नादा आज काय समानर्थी X
प्रसंन्नादा आज काय समानर्थी X विरुद्धाअर्थी शब्द्छल करुन छळ करायच ठरवल आहे काय
आयला ते मास्तर काडी टाकुन गेले नी आपुन नुसतेच फुंकर घालुन धुर काडायले लागलो ना भौ.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
नाही रे भाऊ....
खरच इंटरेस्टींग विषय आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अँटीसोशल म्हणजे मला वाटत की
अँटीसोशल म्हणजे मला वाटत की मुद्दाम (जाणुन उमजुन) केलेल वाईट (समाजाने निषिद्ध केलेल कार्य).
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
अँटीसोशल....
आणि असोशल, इम्मॉरल आणि अनएथिकल यातला नक्की फरक कसा ओळखायचा?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
एथिकल म्हण्जे जनरली ज्याला
एथिकल म्हण्जे जनरली ज्याला आपण चांगल ( बरोबर ) वागण म्हणतो ते ...हे कायद्यासारख स्थळ्-काळ सापेक्ष असत
पण नीतीमत्ता ही नक्कीच वैयक्तिक आहे ...personal values सहसा function of time and place नसतात.
बर्याचदा ethics हा morals चा सबसेट असतो...आणि बरेच कायदे हे ethics चे सबसेट्स असत्तात..., काही वेळा जेन्व्हा हे समिकरण बदलत तेंव्हा कायद्याच्या अंमलबजावणीत कॉम्प्लिकेशन्स होत असावीत
पुष्करिणी
पण मग....
सामाजिक नितीमत्ता असा अनेकदा उल्लेख होतो ते नक्की काय प्रकरण असतं?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आपल्याकड ethics ला असा वेगळा
आपल्याकड ethics ला असा वेगळा शब्द नसल्यान सामाजिक नीतिमत्ता असा शब्द वापरत असावेत
पुष्करिणी
नीतीमत्ता (मॉरॅलिटी)....
आणि नीतीशास्त्र (एथिक्स) असे शब्द वापरता येऊ शकतील काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सहमत म्हणुनच मग न्यायमुर्तीना
सहमत म्हणुनच मग न्यायमुर्तीना पण लिव्हईन साठी पुराणातले 'दाखले' द्यायची पाळी येत असावी.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
पुराणे....
हे समाजजीवनाचे प्रतिक सार्वकालिक असते काय? त्यांचे दाखले हे शास्त्रशुद्ध वैचारिकता समजावी काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
नाही , पुराणातील वांगी
नाही , पुराणातील वांगी पुराणातच !
पण जेंव्हा केलेल्या कृतीसाठी ( घेतलेल्या निर्णयासाठी ) डायरे़क्ट जबाबदारी न घेता काहीतरी समर्थन द्यायच असत तेंव्हा असले दाखले उत्तम असतात्.....
पुष्करिणी
म्हणजे.....
पौराणिक दाखले देणं हे उत्तराधिकारीत्व नाकारणं असतं का?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
नाही...दाखले दिले काय किंवा न
नाही...दाखले दिले काय किंवा न दिले काय उत्तराधिकारीत्व नाकारता येत नाहिच ...दाखले देणं म्हणजे फक्त 'आम्ही फार वेगळं काही करत नाहीये , फार्फार पूर्वीपासून लोकं ( ही समाजमान्य कॅरेक्टर्स असली तर अतिउत्तम ) हे करत आलीच आहेत, आम्ही फक्त ती प्रथा रिवाइव्ह करतोय्, त्यामुळं विरोधकांनो गप्प बसा!' असं म्हणण्यासारखं आहे...
पुष्करिणी
पण....
'आम्ही फार वेगळं काही करत नाहीये , फार्फार पूर्वीपासून लोकं ( ही समाजमान्य कॅरेक्टर्स असली तर अतिउत्तम ) हे करत आलीच आहेत, आम्ही फक्त ती प्रथा रिवाइव्ह करतोय्, त्यामुळं विरोधकांनो गप्प बसा!' असं म्हणणं हेच स्वतःचं उत्तरदायित्व नाकारणं नाही काय? असे म्हणण्याने ते उत्तरदायित्व पुर्वासुरींकडे जात नाही काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
उत्तरदायित्व = जबाबदारी
उत्तरदायित्व = जबाबदारी ??
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही जी कृती कराल त्याला जबब्दार तुम्हीच, पण तुम्ही ह्या कृतीचे जनक कसे नाहित हयाच समर्थन करताना ही वानगी उपयुक्त आहे ( लोकाला सांगण्यासाठी आणि कधी-कधी सेल्फ टॉक म्हणूनही )
पुष्करिणी
मग.....
अश्या दाखल्यांना लंगड्या सबबी म्हणणे अधिक योग्य ठरेल काय? पण सगळे पौराणिक दाखले लंगड्या सबबी म्हणता येतील असे असतात काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
लंगडी सबब नाही म्हणता
लंगडी सबब नाही म्हणता येणार...
मी abc गोष्ट केली कारण xyz नं केली होती ..... ( ही सबब आहे )
मी abc गोष्ट केली, काय घोडं मारलय मी xyz नं पण अमूक अमूक वे़ळेस / ठिकाणी केली होती...( हे xyz च्या पाठीशी राहून माझ्या कृत्याच समर्थन आहे )
पुष्करिणी
कृत्याच समर्थन...
हे असमर्थनीय असतं का? कृत्याचं समर्थन करणं म्हणजे उत्तरदायित्व ढकलणं आहे का?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
समर्थन तेंव्हाच दिल जात
समर्थन तेंव्हाच दिल जात जेंव्हा एकप्रकारच अनशुअर फिलींग असतं...त्याचा जबाब्दारीशी संबंध नसावा
पुष्करिणी
नैतिक पाठिंबा
नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठि सहमती दर्शवली जाते त्याला काय म्हणायच?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
समर्थन....
सामाजिक स्वीकारार्हतेसाठी दिले जाऊ शकत नाही काय? एखाद्याने स्त्रिदाक्षिण्यासाठी जर मनुस्मृतीतल्या यत्र नार्यस्तु पुज्यंते (क्षमा करा माझे संस्कृत कच्चे आहे) चा दाखला दिला तर मग त्याचा अर्थ ती व्यक्ती स्त्रीदाक्षिण्याबाबत अनशुअर आहे असा लावता येईल काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अगदीच अन्शुअर नाही म्हण्ता
अगदीच अन्शुअर नाही म्हण्ता येणार, पण मनुस्मृती चा दाखला न देताही तो स्त्रिदाक्षिण्यान वागू शकतो...इथे मनुस्मृती चा दाखला देण हे ' मी नविन काही नाही करत, हे ऑलरेडी आहे मनुस्मृती त..., विरोधकांनो गप्प बसा'...असं आहे
पुष्करिणी
सहमत आहे
सहमत
मी-मराठि वाचक
--
यातलं एकही अक्षर मी तिरकसपणे लिहीत नाहीये हे मी कसं समजावून सांगू? असो.
, पुराणातील वांगी पुराणातच
, पुराणातील वांगी पुराणातच !
ओ तो शब्द वांगी असा नाहिय्ये....तो नक्की शब्द वानगी = उदाहरण वानगी दाखल उदाहरणार्थ या अर्थाने वापरतात.
पुराणात वांगी कोठून येणार
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
धन्यवाद, चूक लक्षात आणून
धन्यवाद, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल
पुष्करिणी
का विजुभौ पुराणातले लोक्स काय
का विजुभौ पुराणातले लोक्स काय नुसतच पुरण चापायचे का?
खात असतील तेही कधी तरी चव बदल म्हुणुन वांगी.
वांग्यावरुन झालेला जुना खल आठवला
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
गणपा लेका पुराणात फक्त
गणपा लेका पुराणात फक्त कच्चेपोहे आणि पायस या खाण्याच्या पदार्थांचा उल्लेख आहे.
त्या पैकी कच्चे पोहे महाभारतात सुदाम्या सोबत आले आहेत आणि
पायस रामायणात आले आहे. पण पायसाचा गुणधर्म मात्र जब्बरदस्त होता
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
यक्सकुज मी....
सोमरस विसरताय का भौ?
माफ करा
गंभीर विषयावरच्या धाग्यावर अवांतर चर्चा करू नये अशी विनंती करू का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
गंभीर
सोमरस प्राशनानंतर अनेक गंभिर मुद्द्यांची चर्चा उत्साहाने होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
गंभीर मुद्दे
म्हणजे मग गंभीर मुद्यांच्या चर्चेकरीता उत्साह यावा यासाठी सोमरस प्राशन करावे, असे म्हणता येईल का?
काका, सध्या पथ्य आहे, नावही
काका, सध्या पथ्य आहे, नावही काढू नका!
पथ्य
तुला कसलं पथ्य? आणि सगळ्या पथ्यांमध्ये सोमरस चालतो. फक्त सिपसिप आणि एक या दो बस्स ही मात्रा.
मी जे वर असामाजिक म्हणून
मी जे वर असामाजिक म्हणून लिहिल ते अँटीसोशल..
असोशल म्हण्जे तुसडेपणा आसावं ...
पुष्करिणी
जसे की देवळांत चप्पल घालून
जसे की देवळांत चप्पल घालून जाणे, बाबा घरात आहेत का अस फोन वर विचारल्यावर असूनही नाही अस सांगणे, एकाच वेळेस घरवाली आणि बाहरवाली असणे ( रितसर लग्न एकीशीच झाल आहे ) इत्यादी इत्यादी...
पुष्करिणी
देवळात चप्पल घालुन जाणे....
हे एथिकल गुन्ह्यात येईल की कायदेशीर? शांतताभंग होईल अश्या प्रकारे कुणाच्या भावना दुखावणे हा कायदेशीर गुन्हा आहे म्हणुन विचारतो. एकाच वेळेस घरवाली आणि बाहरवाली असणे हा नैतिक गुन्हा की सामाजिक गुन्हा की अनैतिकता?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
समजा तुम्हाला कोणी नाही पाहिल
समजा तुम्हाला कोणी नाही पाहिल चप्पल घालून देवळात्..किंवा इतकी मरणाची गर्दी होती की लक्षातही नाही आलं कोणाच्या...
आणि कोणाच्या लक्षात येउन दंगा झाला तर लोक आधी मारतिल मग तक्रार वगैरे..ह्या केस मधे तुम्हांला मारणार्यांनी नक्कीच कायदेशीर गुन्हा केला आहे....पण मला खात्री नाही की चप्पल घातली हा दखल्पात्र गुन्हा ठरेल
एकाच वेळेस घरवाली आणि बाहेरवाली हा नक्कीच आधी सामाजिक गुन्हा ..नैतिक्ता ही व्यक्तिसापेक्ष असल्याने काहींना अनैतिक वाटेल काहींना नाही..
गुजराथ मधे दारू पिणे आणि महाराष्टात दारू पिणे ..असे प्रकार मला फार इंटरेस्टिंग वाट्तात
पुष्करिणी
नैतिकता कायम व्यक्तीसापेक्ष असते काय?
आणि अनएथिकल म्हणजे असोशल काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
'रोल मे झोल'?
'रोल मे झोल'?
बहुतेक दोघांनी एकमेकांचे आयडी
बहुतेक दोघांनी एकमेकांचे आयडी एक्सचेंज करुन घेतले आहेत आज
सहमत
आयडी एक्सचेंज करुन घेतले आहेत आज
आय डी एक्स्चेंज करणे कायदेशीर आहे की गुन्हा आहे?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ते कुना घाटीला विचार ने,
ते कुना घाटीला विचार ने, आमाला काय विचारते?
ह्याला भुमिकेत शिरणे म्हणतात,
ह्याला भुमिकेत शिरणे म्हणतात, शंका असल्यास बिकांना व्यनी करा.
-Nile
लग्न झाल्यानंतर ते लगेच
लग्न झाल्यानंतर ते लगेच 'रजिस्टर' न करणे कायदेशीर गुन्हा आहे.
ह्यातल्या 'रजिस्टर' साठी पर्यायी मराठी शब्द अर्थ काय???
-निखिल
रजिस्टर....
पर्यायी प्रचलित शब्द नोंदणी. रजिस्टर्ड = नोंदणीकृत, नोंदविलेले.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
लिहितो सविस्तर वेळ मिळाला
लिहितो सविस्तर वेळ मिळाला की...
बाकी लई दिवसांनी दिसलात... काय कायदेशीर लफड्यात अडकला होता काय?
कलम १७७ मध्ये आत गेले असतील
कलम १७७ मध्ये आत गेले असतील
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धागा प्रभूमास्तरांनी टाकलेला
धागा प्रभूमास्तरांनी टाकलेला आहे त्यामुळे लग्न 'रजिस्टर' करणे याची नक्की व्याख्या काय हे कळल्याशिवाय टिप्पणी करणार नाही मी.
काय हे?
मास्तरांनी एव्हढा गुढ, गहन प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर एव्हढी गंभीर चर्चा सुरु आहे अन त्याला कसले वेगळे वळण देता बिका?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
म्हणले ना... धागा
म्हणले ना... धागा काढणार्याचे नाव वाचले म्हणून...
+१ म्हणुनच'रजिस्टर'चा
+१ म्हणुनच
'रजिस्टर'चा सामान्य मराठीतला अर्थ विचारला होता.
बाकी लग्न रजिस्टर न करणे कायदेशीर गुन्हा आहे तर मग मध्यंतरी सुप्रिम कोर्टाचे लिव्ह ईन संदर्भात म्हणने होते ते बेकायदेशीर आहे का??
-निखिल
हॅहॅहॅ
बिका मी लगेच केले होते हो लग्न 'रजिस्टर'
परबु म्हंजी किरिस्ताव तर नाय!
परबु म्हंजी किरिस्ताव तर नाय! मंग?
ते सोडा
मला एवढेच सांगा की " लग्नात धुम्रपान करणे हा कायदेशीर अथवा बेकायदेशीर गुन्हा आहे का ? "
बेकायदेशीर गुन्हा....
म्हणजे नक्की काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
जे कायदेशीरमध्ये येत नाही ते
जे कायदेशीरमध्ये येत नाही ते बेकायदेशीर ...
पण....
बेकायदेशीर गुन्हा म्हणजे काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
बहुतेक...
ज्या गुन्ह्याला कायदेपंडित आणि कायद्याचे प्रतिनिधी कायदेशीर ठरवू शकत नाहीत (पळवाटा, चिरीमिरी इ.इ.) असा गुन्हा बेकायदेशीर गुन्हा म्हणुन गणला जात असावा. अर्थात, हा निष्कर्ष कोणत्याही ठोस प्रयोग/पुराव्यांनिशी काढलेला नसल्याने तो तसाच असेल असं नाही. चु.भु.दे.घे.
अवांतरः 'जिस्म' चित्रपटातला एक डायलॉग आठवला. "गुनाह करो, गुनाह करना गुनाह नहीं, पकडे जाना गुनाह है|" इति जॉनबाबा अॅब्राहममहाराज.
मग नैतिक गुन्हा, सामाजिक गुन्हा....
अनैतिकता हे पण बेकायदेशीर गुन्हा या सदरात मोडते काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
नैतिक-अनैतिक हे सापेक्ष असते
नैतिक-अनैतिक हे सापेक्ष असते असे माझे प्रांजळ मत आहे.
एकुणच सर्वकाही सापेक्षच असते.
साधं उदाहरण घ्या, आपण कोणाकडे गेलो, तर तिथे चहा-खाणे/जेवण ह्याचा आग्रह होतो त्यावर आपण "कशाला कशाला?" किंवा "नको हो, आत्ताच घेऊन आलोय" अशा प्रकारची उत्तरं देतो. त्याउलट जर एखाद्या अरबाकडे गेलात, आणि त्यानं दिलेला काहवा/खाणं वगैरे नाकारलं तर तो त्या यजमानाचा अपमान ठरतो.
आता,एका ठिकाणी निदान तोंडदेखला नकार देणं हे शिष्टसंमत, तर दुसरीकडं सरळ अपमान...घटना एकच, पण अर्थ मात्र सापेक्ष!
त्यामुळेच स्थलकाल,समाजपरत्वे नैतिकतेचे संदर्भ बदलत असावेत. एकच अशी व्याख्या, किंवा ठराविक असा साचा लाऊन गुन्हा आहे की नाही ते ठरवणेदेखील तसेच सापेक्ष ठरावे.
सहमत
ठराविक असा साचा लाऊन गुन्हा आहे की नाही ते ठरवणेदेखील तसेच सापेक्ष ठरावे.
अर्थात सापेक्ष आहे म्हणून तुम्ही त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. काहीवेळा तुम्हाला - तुमच्या मर्यादेत का होईना - गुन्हा आहे की नाही हा निर्णय द्यावाच लागतो.
खुद के साथ बांतां: असा प्रसंग आज प्रभू मास्तरांवर आलाय की काय. आपली चिंता इतरांच्या माथी मारून गुर्जी परस्पर उत्तर मिळावे अशी अपेक्षा ठेवून असावेत का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सत्य सापेक्ष असते. आणि सर्वजण
सत्य सापेक्ष असते. आणि सर्वजण सत्यासाठी झुंजत असतात.
-पुण्याचे पेशवे
कोणाच्या लग्नात?
असे विचारतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
कुणाच्याही लग्नात असे उत्तर
कुणाच्याही लग्नात असे उत्तर देतो.
शिवाय 'लग्नातल्या होमहवनाच्या धुरात शिग्रेटचा धुर वेग्ळा ओळखता येतो का ? ' असा उपप्रश्न विचारतो.
जाणकारांनी प्रकाश टाकावा !
पास
अनुभवाशिवाय याचे उत्तर देणे अप्रस्तुत होईल, सबब प्रश्न पास.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अरे!
बावन्न प्रतिसाद झाले पण. मास्तर रॉक्स!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आपल्याच आत्मशोधक तत्वशोधक
आपल्याच
आत्मशोधकतत्वशोधक वृत्तीचे फलीत आहे हे*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
नाय! नाय!!
मास्तरनी प्रश्नच तसा उपस्थित केलाय. कायदेशीर गुन्हा म्हणजे काय? असा!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आमच्या कडे लग्नात नवर्याचे
आमच्या कडे लग्नात नवर्याचे बूट लपवून ठेवतात आणि ते देण्यासाठी खंडणी मागतात.
वरातीत लिंबू खोचून तलवार हातात धरतात त्या तरवारीचे पाते ११ इंचाहून लांब असल्यास त्याची शस्त्र म्हणून नोंद असावी लागते.
असो.
'लग्नातल्या होमहवनाच्या धुरात शिग्रेटचा धुर वेग्ळा ओळखता येतो का
हो ....कारण तो होमापेक्षा अन्य ठीकाणहून निघत असतो म्हणून
एक प्रश्नः एखाद्याची बायको हरवली. हरवण्या अगोदर त्या दांपत्याला मुले आहेत हरवलेली बायको सात वर्षे सापडली नाही म्हणून ती मॄत घोषीत करण्यात आली. त्या नंतर नवर्याने कायदेशीर पणे रीतसर दुसरे लग्न केले. दुसरे लग्न केल्यावर चार वर्षानी या दांपत्याला मूल झाले. त्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी अचानक पहिली बायको अवतीर्ण झाली.
हे असे झाल्यास कोणते लग्न कायदेशीर मानावे. कोणत्या बायकोला /मुलाना कायदेशीर वारसाहक्क मिळतील.
जाणकारानी प्रकाश टाकावा
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
हे एक्दम त्या गुडिया केस सारख
हे एक्दम त्या गुडिया केस सारख झाल्...फक्त उलट
पुष्करिणी
मला वाटते....
दोन्ही विवाह कायदेशीर ठरतील. पहिली पत्नी मृत घोषित झाली तेव्हा विवाह विच्छेद झाला असल्याने दुसर्या विवाहाला बाधा येत नाही परंतु त्यानंतर पहिल्या पत्नीला कायदेशीर वारसा मिळणार नाही. दुसर्या पत्नीला आणि दोन्ही पत्नींपासुन झालेल्या मुलांना समान वारसाहक्क मिळतील.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
दंडवत
दंडवत आणि शरणागती. काही लिहावे म्हटले तर...
जाऊ द्या. शक्य नाही ते...
शंभर
शिशुपालाचे शंभर अपराध भरायची वाट पहात आहे. किती झाल्या रे प्रतिक्रिया!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
कर्मण्ये वा धिकारस्ते..
प्रतिसादकाने कर्म करत रहावे, काठावर बसुन कपडे सांभाळणारे मोजणी करत बसले असतातच...

थोडा संदर्भ चुकया
थोडा संदर्भ चुकया धमालपंत.
काठावर नव्हे झाडावर
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
कसल्या झाडावर?
हरभर्याच्या नको, लगेच तुटेल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
नै ना रे भौ...
झाडावर बसणारे वेगळे..
काठावर बसणारे वेगळे
झाडावरचे पॉपकॉर्न खाणारे निवांत असतात. काठावर असणारे लै ड्येंजार रे बाबा...
घाशीराम
घाशीराम कोतवाल मधे गुन्ह्यांची यादी आहे.
.
.
.
सब गुन्हा आहे। रामा शिवा हरी मुकुंद मुरारी!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
आयल लै भारी चर्चा. आम्ही
आयल लै भारी चर्चा. आम्ही टेबलावर कोपर्यापली खुर्ची पकडून, समोर थम्पस्सपची बाटली, शेंगदाण्याची वाटी घेऊन बसलो आहोत. चालूद्या.
-पुण्याचे पेशवे
आयल ?
हे आयल काय असते ?
बाकी सगळ्याशी सहमत ..
- ( कोपर्यात बसलेल्या पुप्याला चर्चेत खेचणारा ) छोटा डॉन
आयल म्हणजे वंगण हे लै
आयल म्हणजे वंगण हे लै बुळबुळीत असते.
आयल म्हणजे तेल, जे फार ज्वालाग्रही असते.
आयल म्हणजे ऑलिव्हचे सुधा असू शकते. हे खाण्यात वापरतात.
आयल म्हणजे एक तेल जे पेट्रोलात मिसळतात.
असो.
खुप अर्थ सांगितले . ज्याला जसे भावतील तसे अर्थ घ्या.
-पुण्याचे पेशवे
च्यायला
हे सगळ आयल तर मग ऑईल म्हणजे काय? आयलचा बॉस की काय? कागदोपत्री सगळं श्रेय खाउन जाणारा?
चर्चेत आयल आले असल्यामुळे कायदेशीररित्या धागा पुन्हा घसरायला हरकत नसावी.
अवांतर - कायदेशीर गुन्हा = कायद्याप्रमाणे / कायद्यानुसार गणला जाणारा गुन्हा असाच अर्थ असावा असे वाटते.
खल्लास ...
>>चर्चेत आयल आले असल्यामुळे कायदेशीररित्या धागा पुन्हा घसरायला हरकत नसावी.
सहजरावांशी 'कायदेशीररित्या' सहमत.
'ऑईल' असे स्वच्छ कायदेशीर नाव असणार्या वस्तुचे 'आयल' ह्या नावाखाली बेकायदेशीर भांडवल करणारे पुपे हे त्याच आयलवरुन घसरुन पडो अशी प्रार्थना करतो आज सायंप्रार्थनेत !
तुमच्याप्रमाण भाषेत त्याला
तुमच्याप्रमाण भाषेत त्याला काहीही म्हणोत आमचा उस्मान गॅरेजवाला त्याला आयलच म्हणतो. मराठी भाषा तुमच्यासारख्या ढुढ्ढाचार्यांच्या जोखडातून मुक्त होईल तो सुदिन म्हणावा लागेल.
-(विद्रोही)
बच्काभर दाणेचावणे
-पुण्याचे पेशवे
ओ आयलवाले... तुमी ज्याला
ओ आयलवाले...
तुमी ज्याला रॉकेल म्हणता ना त्या शब्दाचा मूळ उच्चार रॉक ऑईल असा आहे. तुम्ही त्याला रॉकेल केलत.
आणि एक सांगा पास हा शब्द इंग्रजी असेल तर मग नापास हा शब्द कोन्च्या भासतला?
व्हता हे असूद्द्.....मग नव्हता हे सूद्द कसे?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
ए इजुभै ते आमाला काय विचारते
ए इजुभै ते आमाला काय विचारते ते कोनत्यातरी घाटिला विचार नी. तेने बोल्ले नै मला आयलाला ऑईल का कै ते बोलत्यात.
-पुण्याचे पेशवे
आज एकंदर सगळ्यांचाच शब्दांचा
आज एकंदर सगळ्यांचाच शब्दांचा कीस पाडायचा विचार आहे तर
ह्म्म्म चालुद्या.. आमी आहोत पॉपकॉर्न घेउन.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
कीस का खीस
बल्लवाचार्य नक्की शब्द कोणता हो खीस का कीस???
आणि कीस असेल तर कोणत्या
आणि कीस असेल तर कोणत्या भाषेतला?
माराठीतला कीस आणि विंग्रजीतला
माराठीतला कीस आणि विंग्रजीतला किस् वायला वायला.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
बरं पण मग मराठीतला असेल
बरं पण मग मराठीतला असेल नाहीतर इंग्रजीतला ... पण नाम का क्रियापद?
क्रियाच! पद फारसं आडवं येत
क्रियाच!
पद फारसं आडवं येत नाही. (अधिक खुलाश्याकरता भेटा: 'नाद' तिवारी)
+१ आणि वयही आडवं येत नाही.
+१
आणि वयही आडवं येत नाही.
-पुण्याचे पेशवे
शंभर
झाले का हो?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ह्म्म्म
कायदेशीररीत्या धाग्याचं तेरावं घालणा-या सर्व काफरांना अल्लाह उकळत्या तेलात टाको.....
+१
नानाशी बाडिस
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ह्म्म्म ए हैक हैक हैक
ह्म्म्म
ए हैक हैक हैक
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
दोन तासात १११ प्रतिसाद....
लय भारी धागा काढलाय मास्तरांनी. बघता बघता प्रतिसाद सेंच्युरी पार केली की!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
पण
सगळ्यात जास्त मजा फक्त दोघांनाच आली ना?
असं कसं?
एव्हढी प्रबुद्ध चर्चा झाली. अर्थात प्रश्नच तसा होता म्हणा. पण तरीही कुणीच फारसं अद्वातद्वा, वाईट्-वंगाळ बोललं नाही. बरंच विचारमंथन झालं. कुणाला विचारमंथन करुन मजा आली, कुणाला झाडावर बसुन पाहण्यात तर कुणाला थम्प्सपची बाटली अन शेंगदाण्याची वाटी घेऊन टेबलावर बसण्यात. एकुण काय तर बर्याच जणांना मजा आली.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सहमत. पण अजून एक सांगू का?
सहमत. पण अजून एक सांगू का? मला तर संपूर्ण चर्चेतून नैतिक, अनैतिक, सामाजिक, असामाजिक, Moral, Immoral कोणत्याच शब्दाचा स्पष्ट अर्थ कळला नाही. कोणी (पक्षी: प्रसनदाच) खुलासा करेल का? कारण प्रत्येक प्रतिसादात त्याने असे होईल का तसे होईल म्हणून मला जो अर्थ थोडाफार कळत होता त्याला वेगळेच वळण दिले आहे.
असो.
-पुण्याचे पेशवे
इतकं झालं पण प्रभूजींचा
इतकं झालं पण प्रभूजींचा प्रश्न सुटला की नाही ...
)
( हा धागा टाकून एक गुन्हा तर नाही ना केला असं वाटत असेल का?
पुष्करिणी
असो!
आता समारोपाचं भाषण कोण देतंय ते बोला!
मास्तरांनाच बोलवा की
मास्तरांनाच बोलवा की
डान्रावांना बोलवा. त्यांचा
डान्रावांना बोलवा.
त्यांचा प्रतिसाद हा नव्या धाग्याची सुरूवात असेल!
नको! ते समारोपाच्या भाषणात
नको!
ते समारोपाच्या भाषणात आणि "गल्लत होते आहे मालक" म्हणुन कुणाच्या तरी धोतराला हात घालतील!
मग समारोप नको पण भाषण आवर असं होईल त्या धोतरधार्याला
असो!
असो!
आमाला बास ... हे इथले
आमाला बास ...
हे इथले काँग्रेसी लोकं परत्येक जनहिताच्या कार्यात पण राजकारन आनत असल्याचे निशेधार्थ आम्ही 'सभात्याग' करत आहोत.
इन्किलाभ झेंडाबाद !
अहो, हे सगळं करावं लागतं!
अहो,
हे सगळं करावं लागतं! इरोधी पक्षाच्या बाकड्यांवर बसुन फुकटच्या आरुळ्या ठोकाय तुमाला काय जातं?
लोकशाहीच्या मार्गानं वाटचाल करत सर्व्यांचं अबिव्यक्तीस्वातंत्र्य जपनं ह्ये आमचं
यंदा कर्तव्यआद्यकर्तव्य हाये.लै वरडु नगा...न्हायतर राजेउद्दिन अली अहमद ह्यान्ला इनंती करुन आनिबानी लागू करुन तुमचा मोरारजी देसाई करुन टाकू!
बसा खाली!
बघा सांगितलं नाही, डान्राव
बघा सांगितलं नाही, डान्राव आले की नवी चर्चा सुरू होणार म्हणून!
-- राको. अ.अ.पा.
च्यायला ३३%च्या! आता ह्यान्ला
च्यायला ३३%च्या!
आता ह्यान्ला खाली बसा म्हनता यायचं न्हाई!
डानरावांच्या यका प्रतिसादातच त्यांचं सगळं आरक्षण संपुन जातं! ह्यांचं काय करावं?
हस के लिया तैतीस टका, 'लडके'
हस के लिया तैतीस टका, 'लडके' लेंगे पचास टका!
बोंबला... >हस के लिया तैतीस
बोंबला...
>हस के लिया तैतीस टका,
तिथंसुध्दा नापास? पुर्ण ३५% नाहीच का?
(आता पळा तिच्यायला...स्वयंघोषित इस्त्रीमुक्तीच्या मुक्तीवाहिन्या येऊन तांडव करायला येतील...ए झाड कुठंय रे....घावलं घावलं..)
अरे झाड कसलं शोधतोस. लपायला
अरे झाड कसलं शोधतोस. लपायला गुहा चांगली असते नै?
-पुण्याचे पेशवे
तुला कळणार नाही रे अजून!
तुला कळणार नाही रे अजून! गुहेत वाघिणपण असते, वाघाची बायडी!
कोण? मिसेस वाघ? त्या हल्ली
कोण? मिसेस वाघ? त्या हल्ली गुहेत काय करतात?
व्यक्तीगत प्रश्न ... तुम्ही
व्यक्तीगत प्रश्न ... तुम्ही त्यांनाच विचारा ना!
पेशवे: अजून दूधच पिता, मोठे व्हा!
पेशवे: अजून दूधच पिता, मोठे
पेशवे: अजून दूधच पिता, मोठे व्हा!
वाघाची बायडी एक टांग वर करुन दूध देत असेल तर का न प्या?
-पुण्याचे पेशवे
नको ... इथे नाही लिहीत मी!
नको ... इथे नाही लिहीत मी!
नशिब!!
नशिब!!
इतक्यातच थांबलीस ते.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मग वाघिणीचे दूध प्यायचीही सोय
मग वाघिणीचे दूध प्यायचीही सोय झाली.
-पुण्यशास्त्री दुधपिणकर
-पुण्याचे पेशवे
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
गुड मॉर्निंग राजे
सुप्रभात
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
एक उलट एक सुलट
इथे धुम्रपान झाल्यानंतर ते लगेच 'रजिस्टर' न करणे कायदेशीर गुन्हा आहे.
लग्न करणे कायदेशीर गुन्हा आहे.
हे असे उलट सुलट झाल्यास कायदेशीर गुन्हा होईल
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते