एका अस्ताव्यस्त पसरलेल्या, शेवटचे आचके देत असलेल्या धाग्याच्या शेवटी कुठेतरी काड्या, नाड्या, माड्या वगैरेचा उल्लेख झाला. कवितक प्रणालीत ते यमके शब्द वापरून एक झ्याक कविता करावी अशी मी माझ्या शिष्यांना सूचना केल्यावर ते म्हणाले तुम्हीच करा. मी म्हटलं की मला संदर्भ नाही, अनुभूती नाही, व तीशिवाय कविता म्हणजे वांग्याशिवाय भरीत. 'तरी चालेल, पण तुम्हीच ते करा' अशी सूचना आली. (अर्थ - आम्हाला गृहपाठाचा कंटाळा आलाय) तेव्हा मी जे काय केलंय ते गिळा.
(मूळ कविता लिहिणाऱ्या प्रभूंपायी क्षमा मागणारी एक आरती वाहून)
ती येते, आणिक जाते
येताना कधी काड्या आणिते
अन् जाताना सारुन जाते
येणे जाणे काड्या सारणे
विक्षिप्त सवयी माझ्या 'पायी' असती म्हणते
तो येतो आणि न जातो
येताना खूप नाड्या आणितो
आणि घट्ट त्या आवळुन राहतो
येणे राहाणे, नाड्या पिळणे
असतो खेळ पण फासावर वाचक जातो
तो असतो आणिक गातो
असताना कधी माड्या बघतो
अन् गाताना कधी हाटेल चाल्वितो
गाणे गाणे, ठाणे देणे
सुंदरीसोबत खाणे पण कधी चप्पल देतो
तो लिहितो आणिक लिहितो
लिहिताना कधी 'पाट्या' छापितो
प्रतिसादांच्या जड पाट्या टाकितो
खरडी व्यनि केस धागे
नावाला स्वत:च्या अल्पहि कधी तो ना जगतो
(हे कवितकचं थोडं पुढचं पाऊल आहे. क्ष म्हणून एखादाच शब्द घेण्याऐवजी एखाद्या कवितेचा सांगाडा घ्यायचा व तीत आपली य (यमकं), व (विशेषणं), आणि च (चिमटे) घालायचे - हे थोडं विस्तार करून आम्ही विडंबक प्रणाली लिहायचा विचार करतोय)
गुर्जी पुन्हा एकदा प्रणाम
गुर्जी पुन्हा एकदा प्रणाम कबूल करा. असो. आम्हीही कधी ना कधी नक्की गृहपाठ करू तेव्हा पाचव्या ओळीला मुंहतोड जवाब मिळेलच!
आणि पहिल्याच कडव्यात स्थान दिल्याबद्दल आभार.
(विषय दिलेला नाही)
ह्या स्मायलीवर कॉपीराईट घेऊन
ह्या स्मायलीवर कॉपीराईट घेऊन ठेवावा म्हणतो आहे मी
बिका... लोळतो आहे... छ्या... कसे तरीच दिसतं बॉ
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आम्ही दिसणार नाही अशा बेताने
आम्ही दिसणार नाही अशा बेताने लोळतो म्हणलं...
बेष्ट
यात बिड्यांना काही स्थान दिले नाही.बिडी काडी हा काही लोक द्वंद्वसमास मानतात तर काही तत्पुरुष.
पुढील प्रेरणे साठी
गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुस्तीच काडी
म्हणायचा अन मनाशिच की या जागेवर बांधीन माडी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
=)) =)) =)) =)) =))
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
गुरुजी जबरा!!! ते विडंबक
गुरुजी जबरा!!!
ते विडंबक प्रणाली का काय ते पण येउद्या..
आमचा गृहपाठ तसाच राहिलाए...
-निखिल
आगोबाबय
ये ढिगं च्यां ढिच्यांग !! ढिगं च्यां ढिच्यांग !!
जबरा लिहता वो तुम्ही. वांग्यासिवाय येवढ भारी भरीत जमवलत.वांग असत तर काय ? याचाच विचार करतोय
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आग्गायायाया ...
थोर, एकदम थोर विडंबन !

प्रतिभा अगदी भरभरुन वहात आहे ...
च्यायला मी काय केले हो ?
असो, आज हे पाहुन आम्हाला आमच्या आद्य काकांची आठवण झाली.
खालील काही ओळी त्यांनाच समर्पित ...
( काव्य हा आमचा प्रांत नाही, मात्र काकांसाठी ह्या उगाच आमच्या ४ ओळी. ते यमक / वृत्त वगैरे ऑलरेडी फाट्यावर मारले आहे ह्याची नोंद घ्यावी )
- छोटा डॉन
कुर्निसात, पायलागू, साष्टांग
कुर्निसात, पायलागू, साष्टांग दंडवत.. सगळं एक्दम...
पुष्करिणी
राजेश भौ, जबरा कविता. तुमच्या
राजेश भौ,
जबरा कविता. तुमच्या प्रतिभेला
ट्ठॉ
लै भारी. चला मास्तरांना भरीला घातले ते बरे झाले. पुढचा पाठ पण आला कवितेबरोबर.
मूळ कविता लिहिणाऱ्या प्रभूंपायी
.... हां 'आरती प्रभू' होय. हां हां आटवलं.
प्रभूंनी कविता कधी लिहिली...
हां एक अनाहुत सल्ला. 'तिकडे' संबालून हां. इकडे फटाके उडवले आहेत, त्याने तिकडे आग लागू शकते.
(गृहपाठाचा कंटाळा असलेला विद्यार्थी) रमताराम
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
गुर्जी मुजरा
गुर्जी मुजरा स्विकारावा...
=))
=))
तुफान जमलय विडंबन
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हा हा हा लै भारी
हा हा हा
लै भारी
जबरा
जबरा
झक्कास. थोडक्या लिहीलेले
झक्कास. थोडक्या लिहीलेले असल्याने एका दमात वाचू शकलो. मस्तच.
-पुण्याचे पेशवे
अभ्यास
आंतरजालीयवयाच्या मानाने गुरुजींचा अभ्यास चांगला आहे.आंतरजालीय शब्द पाढर्या अक्षरात लिहिण्याची सोय नसल्याबद्दल मालकांचा णिसेद.
धमाल!
सक्काळी सक्काळी गुर्जींच असं हे बाळकडु मिळालं, यापेक्षा भाग्य ते कुठलं(शिष्यांचं)?
गुर्जींना शक्य तितके संदर्भ पुरवु असा वायदा (जुन्या जाणत्यांच्या)तर्फे मी इथे करतो!
-Nile
(जुन्या जाणत्यांच्या)तर्फे मी
(जुन्या जाणत्यांच्या)तर्फे मी इथे करतो
हा हा हा. स्वतःला जुना जाणता म्हणवायचा एक क्षीण प्रयत्न. असो.
-पुण्याचे पेशवे
(विषय दिलेला नाही)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अपेक्षित विरोध.
अपेक्षित विरोध.
-Nile
:-)
ग्रासस्टांझा लै भारी!!
बाकी राकोंनी युती करुन विरोधकांना बरोबर पेचात पकडलेले आमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले नाही.
...
अगायायाया!!
तुमी बी बिघडला जनु ह्या इडंबनापायी!!!
(इडंबनधर्माचा इज्जय असो) चतुरंग
जबराट कल्ला
जबराट कल्ला
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्त.
असतो खेळ पण फासावर वाचक जातो
हे तर लाजबाब.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
जल्ला हेच का ते
जल्ला हेच का ते 'टेरावॉट'वाले........???
लय भारी गुर्जी......
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
निःशब्द
निःशब्द!
(शब्द बरोबर लिहिला आहे की नाही याची खात्री नाही अशी पंचाईत झाली आहे हा धागा वाचून.)
बाबौ. आंतरजालीय 'अल्पवयीन'
बाबौ. आंतरजालीय 'अल्पवयीन' असूनही टिपलेली व्यवच्छेदिक लक्षणे पाहता, तुम्ही नक्कीच 'आंतर(जालीय)ज्ञानी' आहात, हा आमचा समज दृढ झाला आहे.
हा आमचा स्वभाव
=))
जबरदस्त!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(विषय दिलेला नाही)