आवडलेले काही...

0
0

दुर्गाबाईंचे व्यासपर्व... एक अप्रतिम पुस्तक. कधीही मूड लागला की हाती घ्यायचे कोणतेही पान काढून वाचायला सुरूवात करायची... काल असेच झाले. आणि नेमका हा परिच्छेद समोर आला... दुर्गाबाईंच्या कालातीत भाष्याला सलाम... सद्य परिस्थितीत तर अजूनच बोचले हे शब्द...

"विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे. बुद्धिवंतांची संवेदनक्षमता करवंडली की मग पाशवी बलाचाच आग्रह अनावर होतो. स्वत्;ची कीव करत भले भले बसतात आणि मग चळवळे, दुय्यम दर्जाचे लोक सामर्थ्याची सारी क्षेत्रे काबीज करतात. पण ती त्यांनाही फार काळ पेलत नाहीत. जागा मोठ्या माणसे लहान - असे उलटे गणित सुरू होते. हे उलट्या गणिताचे चक्र द्रोणाने युगापूर्वी फिरवले. अजून ते तसेच फिरते आहे."

- मोहरीतील ठिणगी, व्यासपर्व.

संदर्भ - द्रोणाने एकलव्य अर्जुनापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून कपटाने त्याचा अंगठा काढून घेतला.

मस्त!!! अगदी पटलंअसाच एक जणू

1

मस्त!!! अगदी पटलं
असाच एक जणू भविष्यच वाटावं इतका द्रष्टा परिच्छेद मी सध्या वाचत असलेल्या श्री. ना. पेंडसें यांच्या पुस्तकात टि़ळक आगरकर संवादात आगरकरांच्या तोंडी होता..
घरी गेलो की टंकतो


-ऋ

खरे आहे... महाभारतात सर्व

2

खरे आहे... महाभारतात सर्व प्रश्न सापडतात..
मार्ग म्हणा, उत्तरं म्हणा आपली आपण शोधुन घ्यायची...
आपला जसा वकुब, मगदुर असेल तसा.
उत्तर काढायला झेपत नसेल तर महाभारत किंवा महाभारतातील कथानकं, संदर्भ तथ्यहीन आहे असे म्हणुन सुटका करुन घेता येतेच... तसेही सगळेच जण सगळे प्रश्न सोडवु शकत नाहीतच, पळपुटे करणारे बरेच असतात. नाही का ?

दुर्गाबाईंच्या अभ्यासाला सलाम ! त्यांच्या १ टक्के जरी अभ्यास आपण करु शकलो तरी कृतार्थ! असो.

+ १ नाना १००% सहमत.

3

+ १

नाना १००% सहमत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+२

4

सहमत.
'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं' असे उग्गाच म्हटले जात नसावे.


-पुण्याचे पेशवे

अगदी..

5

दुर्गाबाईंचे व्यासपर्व... एक अप्रतिम पुस्तक. कधीही मूड लागला की हाती घ्यायचे कोणतेही पान काढून वाचायला सुरूवात करायची...
अगदी!!
मी ही कितीवेळा वाचलं आहे व्यासपर्व त्याची गणतीच नाही..
स्वाती

फारच छान

6

धन्यवाद बि का. एका परिछेदाने पुस्तक वाचावेसे वाटले.


- मोहन

उत्तम

7

परिच्छेद निवड. अर्थात इथे काय म्हटले आहे त्याबरोबर कुणी म्हटले आहे याचंही महत्त्व आहेच.

धन्यवाद बिका, परत आल्यावर हे

8

धन्यवाद बिका,
परत आल्यावर हे पुस्तक मिळवुन वाचायलाच पाहिजे.

दुर्गाबाईंना सलाम! शॉपिंग

9

दुर्गाबाईंना सलाम! शॉपिंग लिस्टमधे पुस्तक टाकलेलं आहे.

विद्यावंतांची बधिरता....

10

शाश्वत सत्य याहुन स्पष्ट शब्दात कोणीतरी कसं मांडणार? नमन दुर्गाबाईंना आणि हे परत वाचायला देणार्‍या तुम्हाला धन्यवाद!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

खूप ऐकलंय या पुस्तकाबद्दल..

11

खूप ऐकलंय या पुस्तकाबद्दल.. या सुटीत वाचायचा बेत आहे आता...
बाकी बिकांशी बाडिस!!!

महाभारत ज्याने जसा अर्थ लावावा तसे वेगवेगळ्या रूपाने समोर येते.. महाभारत-एक सूडाचा प्रवास वाचले,
तेव्हा पहिल्यांदा वरवर सरळ वाटणार्‍या घटनांची गुंतागुत समजून घेताना जाम त्रास झाला.... वाटलं, नक्की कोणतं महाभारत खरं??? गोष्टींच्या पुस्तकातून वाचले ते? की चोप्रांनी दाखवले ते.. की हे सूडाचा प्रवास दाखवतं आहे ते..????? Sad

महाभारत-एक सूडाचा प्रवास

12

महाभारत-एक सूडाचा प्रवास याच्या लेखकाची "पणशीकर शास्त्री" यांचे विचार बाईंना फारसे पटत नसावेत असे वाटते. शास्त्रींचा त्या विषयाबद्दल पुरेसा अभ्यास नव्हता असे बाईंचे स्पष्ट मत होते.
"जय नावाचा इतिहास" लेखक आनंद साधले यांना बाई "एक सुमार माणुस" असे संबोधायच्या. बाइंनी या वेडावाकड्या थेअरीज फार उत्तम प्रकारे मोडल्या, त्यांचे उपकार मानावे तेव्हडे थोडेच.

बर्‍याच लोकांनी व्यासपर्वातील

13

बर्‍याच लोकांनी व्यासपर्वातील उतारा दिला म्हणुन धन्यवाद दिले आणि व्यासपर्व वाचायची इच्छा व्यक्त केली. पण आपल्या मोडकांनी आधीच एक अतिशय सुंदर असा लेख लिहिला आहे व्यासपर्वावर. तो वाचूनच मला व्यासपर्व वाचायची प्रबळ इच्छा झाली होती. तो लेख इथे... http://www.misalpav.com/node/9443

धन्यवाद

14

दुवा आठवत होता, पण दिल्याबद्दल धन्यवाद.

स्फुट आवडले.