स्वर आले दुरुनी

0
0

(प्रेरना: सांगायलाच पाहिजे का?)
ईशेष सुचना:- हा धागा इरंगुळा म्हनुनी आहे
आमचा हा स्वर त्राग्यानी नाही पन काही संगीत घरानी आपलीच टिमकी वाजुन सोताचच नाव पुढे करतात. गायक आन घरानी यांचा परस्पर उपयुक्त सबंद असल्यानी ते परस्परांना कुरवाळतात. इतिहासात काही दुर्लक्षित गायक व घरानी आहेत. मंडळी ख्वॉट हाय का हे? आमच्या संगीत उत्खननात अशी एक नोंद आहे-
नजाकत अलि खाँ व कयामत अलि खाँ हे दोन जुळे बंधु. यकाला झाकावा आन दुसर्‍याला काढावा. यकदम रावळे जावळे म्हनाना. ते अध्यात्मिक असल्यानी फक्त तीर्थंकरांच्या सन्मानार्थ गातात. ते स्वतःही शास्त्रापुरते तीर्थंकर आहेत. त्यांची जुगलबंदी ऐकण्यासारखी असते. नी ध नी ध प ध नी ध नी ध प सा रे सा रे सा रे ध नी अशा स्वरांची पर्मिटेशन काँबिनीशन करुन त्यांनी वेगवेगळ्या रागांची नीर्मिती केली आहे असे जाणकार सांगतात. त्या स्वरांची मोहीनी त्यांच्यावर पडली आहे की त्यांना तो स्वर रोग झाला आहे याचे निश्चित निदान कोणाही संगीतवैद्यांना अद्याप झाले नाही. पण एक मात्र खरे कि त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे स्वर दिसतात. श्रोत्यांनाही त्या स्वरांची नको इतकी जवळीक झाली आहे. त्यांच्या कुठल्याही निर्मितीत त्यांना अभिप्रेत असलेला सूर वेगळा असला तरी श्रोत्यांना हेच स्वर सापडतात. मग सूर महत्वाचा कि स्वर महत्वाचा अशा चर्चा श्रोत्यांत होउन त्यांच्यात अंतर्गत वाद ही होतात. नवीन श्रोत्यांना संगीतात आनंद असतो या वादाशी त्यांना काहीही घेणे देणे नसते. पण त्यांना आपल्या गटात ओढण्यासाठी मग कंपुबाजी चालू होते. मग ठळक पुसट संगीत मैफिलींचे स्मृतीयुद्ध चालू होते.
काही अभ्यासकांच्या मते या बंधुंचा संगीत हा मूळ प्रांत नव्हेच. त्यांचा प्रांत ग्रहगोल ज्योतिष चिवडणे हा होता. त्यांचा छंदच तो. काही हितचिंतकांनी हा विषय चिवडण्यापेक्षा त्याची चटकदार स्वादिष्ट मिसळ करुन ती विकावी असा सल्ला दिला. चार पैसेही गाठीला मिळतील. तशीही त्यांनी संगीत बिनतारी च्या जलशातुन सहाय्यक कलाकार म्हणुन तत्वतिडिकेने स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. रोजी रोटी साठी त्यांना सहाय्यक कलाकार म्हणुन बिनतारी तुणतुणे वाजवावे लागे. ते जात पात धर्म पंथ मानीत नसत.देवा धर्माला ते आदरपुर्वक फाट्यावर मारीत. तुणतुण्यावतिरिक्त अन्य वाद्य वाजवुन ते जलशाला मदतच करीत. तुणतुण्याला कंटाळ्ल्यामुळे दुसरे वाद्याचा गणवेश घालून जरा पाहु म्हणुन जरा अंतरंगात लक्ष घालू लागले तर जलशाच्या प्रमुखाने अन्य वादकांद्वारा कुटील नीती आखुन त्याला परिघबाह्य केले. जलशाला सरकारी कोटा व अनुदान असल्याने जातीपातीचा अप्रत्यक्ष कट करुन त्यांचा पोपट केला. त्यांचे पंख छाट्ले. पंख छाटल्या पेक्षा आपली तत्व छाटली याचे दु:ख त्यांना जास्त झाले. तो पर्यंत त्यांनी काडी काडी जमवुन स्वत:चे एक घरटे केले. जलशा विषयी आदर व्यक्त करुन बिनतारी जलसा सोडला. घरट्यातुन जालावकाशात ते संचार करु लागले. एकदा त्यांच्या दिवंगत गुरुंचे शेजारी असलेल्या एका गायिकेचा वर्ज्य हास्यस्वर हा गुरुंविषयी आदर व्यक्त करण्याच्या भरात नकळत छेडला गेला.हा हास्यस्वर किंबहुना आगंतुक व फालतु श्रोतेचे गायिकेला वर्ज्य आहे हे लक्षात आल्यावर बिचार्‍यांनी क्षमस्व म्हणुन माफि ही मागितली. पण गायिकेचा स्वर तीव्र. कोमल व मध्यम स्वरांना स्थान नाही. जाणकार श्रोते जुने. आतापर्यंत अनेक नवीन जुन्या गायकांनी श्रोत्यांचा/शी संवाद खेळीमेळीनी केला होता. त्या पार्श्व भुमीवर अन्यही श्रोत्यांना स्वरात तुच्छता जाणवु लागली. फक्त ओळखीचे श्रोत्यांनी मान डोलावली तरच गायिका आदरपुर्वक तुच्छतेने दाद देउ लागल्या. मग बंधुंनी आपली ज्योतिषचिवडणुक जरा बाजुला ठेउन स्वरडिवचणुक शिकून घेतली. शिकून कशाला घेतात? पाण्यात पडल्यावर काहींना पोह्ता येत तस आपोआप आली. बंदुंचा नसलेला इगो उफाळुन आला. आता हे बंदु जीवन शिक्शन मंदिरात शिकल्याले. या शिक्षनातुन स्वरांना नाडीनी बांदुन ठेवायच्या ऐवजी विल्याष्टिक वापरल तर काय होईल असा विचार करुन एक संगीत क्षेत्रात एक राग आळवला. झालं ल्वॉकांना नव काही तरी हवच असत. लोकांणी बी उचलून धरला. आता गंमत म्हंजी त्या गायिकेला आपली संगीत स्थळाची आय्डी बदलन्याची दुर्बुद्दी सुचली. बर सुचली त सुचली नेम्की जीवन शिक्शनातील मूलभुत स्वर त्यात आले.म्हंजी आदुगरच मर्कट आन त्यातुन मद्य प्याला वानी झालं. बंदु गांबीर्याने लिवायचे तर ल्वॉक लक्ष द्यायचे नाय पन सहज म्हनुन गुनगुनायचे तर लॉव्क लगीच माना डोलवायचे.गर्दी करयाचे वा! वा! माशाल्ला माशाल्ला! गायिका चिडल्या. त्यांनी संगीत संयोजकांवर ताशेर झाडले. बंदुंवर ताशेरे झाडले. श्रोत्यांवर ताशेरे झाडले. व्यनीगायनीच्या कळा व स्वरडवहींचा वापर करुन स्वरकल्लोळ माजवला. संयोजकांच स्वरमिसळीच हाटेल असल्यानी प्रत्येक गायकाची दखल घेन भाग होत. त्यांनी बंदुंना विचारना केली बंदु म्हन्ले आमची त काईच तक्रार नाई. संयोजक म्हनाले तुमची नसन काई तक्रार पन तुमच्या विरुद्द तक्रार आहे त्याच काय? बंदु म्हणाले आमाला स्वरनाड्या विल्याष्टिक बांदुन देनारी दुकान ठावं हायेत. हा घ्या पुरावा आन कोंच्याकडुनबी तपासुन पघा. स्वरनिर्मिती ही कोनाचीच मक्तेदारी नाई. आमची बी नाई. स्वरसाधर्म्य सापडले त्यात आमचा दोष काय? स्वर सात आन मान्स कोट्यावधी. कोंचे ना कोंचे स्वर सारखे असनारच. बारा राशीची मान्स नाईका कोट्यावधी मधे विभागली. आता आमची वृषभ रास हाये म्हनुन दुसर्‍याची ती असुच नये का? चक्क मला बैल म्हणण्यात आले आहे असे म्हणुन कांगावा करु लागलो तर ते लोक आम्हालाच कांगावाखोर म्हणतील. बंदु भावनांपेक्शा विचारांना जास्त महत्व देत. त्यामुळे त्यांचे प्रतिसाद हे सावकाश पाटमांडे असत. संयोजकांना त्यांचे म्हणणे पटले आणि कालांतराने तर साक्षात अनुभुतीच आली.
स्वरडवह्या व व्यनीगायनीच्या कळांच्या माध्यमातुन गायिकेने आक्रंदन केले.बंदुंना एकटे पाडण्यासाठी काहींशी स्वरमैत्री केली .परंतु बंदु स्वरांपेक्षा शब्दांना अधिक मह्त्व देत असल्यानी शब्दांच्या अडकित्त्यात स्वरसुपार्‍या कातरुन काढत. स्वरडवह्य़ातील स्वरांना व्यनीगायनीचे स्वर म्हणुन गायिकेने एकदा स्वरधाग्यात अज्ञान दाखवले. बंदुंनी लगीच आपले शब्दाडकित्त्याचे हत्यार काढुन त्यावर 'प्रहार' केले. मग गायिकेने काही हुकुमी स्त्रीस्वर आळवुन काही स्वरमित्रांना आपलेसे केले. त्यांना व्यनीगायनीच्या कळा आळवण्यास उद्युक्त केले. या स्वररंग, स्वरोधरा , पीतस्वर इ. ना बंधुंची पारदर्शकता व इतिहास माहित होता. त्यांनी दबकत व्यनीगायनीच्या कळा आळवुन पाहिले. पण बंदुनी स्वरांच्या कालानुक्रमे शब्दपट्टीका तयार केल्या होत्या. त्या उत्तरादाखल पाठवल्या जेणेकरुन माग काढणे सोपे जावे. त्यांना स्वरांच्या कालनुक्रमिकेचा बारकावा माहित नसल्यानी त्यांनी आळवुन पाहिले होते.त्यांची नाही म्हणली त्यांची पंचाईत झाली. परंतु सह अस्तित्वातुन निर्माण झालेल्या नैतिक अधिकाराला बंदुंची मान्यता असल्यानी शब्द ठळक व स्वर पुसट यांच्यातील ठळक पुसटाची तडजोड करुन अदलाबदल केली. स्वरकर्कशा, स्वराकांडतांडविका, स्वराक्रस्तळीका अशी विशेष दुषणे काही अतृप्त श्रोत्यांनी बंधुंच्या सहभागाशिवायच दिली. तर असे हे बंधु स्वरकूजनातुन गायक झाले. 'मी गायक नाही मी गायक नाही ' असे त्यांनी ओरडुन सांगितले तरी लोकांचा त्यावर विश्वास बसेना. लोकांना तो गायनाचा एक नवीन अविष्कार आहे असे वाटुन ते अधिकच प्रसिद्ध पावु लागले. बंधु शांतपणे काठाला बसले तरी लोक नवीन रागाच्या निर्मितीसाठी त्यांचे स्वरचिंतन चालु आहे असे समजु लागले. काही लोकांच्या कुंडलीतच अकारण प्रसिद्धी असते ब्वॊ! बंधुंना झुंडशाही हे दुधारी अस्त्र आहे याची कल्पना होती. ते फारसे कोणाच्या अध्यात मध्यात नसत. संगीत वा शब्द जालावर कुणी कुणाचा कायमचा मित्र वा शत्रु नसतो ही त्यांची ठाम धारणा होती. एखादा संक्षिप्त अपवाद वगळता या प्रकरणात त्यांना सर्वांनी गुणदोषासकट स्विकारले होते. त्यांना नावडतीचे मीठ कधीही अळणी नव्ह्ते. गायिकेच्या आत गुण दोषा सहित माणुस आहे हे त्यांना पक्के माहिते होते.स्व्च्छतेच्या बैलाला हो~~ अशी तळी त्यांनी स्वतः वृषभ राशीचा असुन उचलली होती. मराठी शब्द चित्रांच्या मेळाव्यात स्वरात स्वर, शब्दात शब्द. सुरात सुर मिसळून स्वत:हुन कौतुक केले.
तर असे हे नजाकत अलि खाँ व कयामत अलि खाँ हे बंधु. यांची गायकी घराणी मात्र वेगळी आहेत. एकाचे किराण घराणे तर दुसर्‍याचे भुसार घराणे. कोणाचे कोणते घराणे याविषय़ी भल्या भल्या तज्ञात मतभेद आहेत. ते जाहीरपणे बोलून दाखवत नाहीत पण स्वरमैफिलीं मधे ते स्वरांमधुनच तसे व्यक्त करतात. काही तज्ञ कलिंगडा रागाची निर्मिती ही बंधुंनी धपकन कलिंगड खाली टाकले व त्यातुन जे स्वर निर्माण झाले यातच झाली आहे असे क्षीण स्वरात सांगतात. खुद्द पाटमांडे याला साक्ष आहेत. रामभाउ व मिराशी बुवा यांनी हा उल्लेख चलाखीनी टाळला आहे. श्रेयाच्या राजकारणात बिचार्‍या बंधुंचा मात्र बळी गेला.
एक जगन्मित्र विश्वासु कार्यकर्ता कोप‍र्‍यात बसुन म्हणतोय अरे हे नजाकत अलि खाँ व कयामत अलि खाँ हे वेगळे नाहीतच मुळी. एकाच व्यक्तीची आभासी जुळ्या प्रतिमा आहेत.संमोहन उपचारानी हा पॆराडॊक्स रिमूव्ह करता येतो. आता हे संमोहन श्रोत्यांवर करायचे कि बंधुंवर याविषयी संमोहन तज्ञ संभ्रमित आहेत. कोणी करायच हा मुद्दा तर पुढचा आहे.बंधु आता विरक्त आहेत, नीर्विकार आहेत. किमान त्यांची तशी धारणा आहे. बंधुंना या विषयी विचारल तर मंद हॅहॅहॅ करीत ते संत पकोबा रायांचा दाखला देतात. संत पकोबाराय म्हणतात
पका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी ||

..

1

..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वेळ जात नाहीये

2

वेळ जात नाहीये म्हाता-याचा.... व्हीआरएस घेतली की असं होतं... बसला असता मुकाट खर्र खुर्र हेलो ओव्हर बिनतारी करत आणि बिनपाण्याने साहेबाकडुन करुन घेत.. पण नाही... कीडे कीडे ते हेच आणि असेच

स्वरनाडी

3

याची उत्तरे आम्ही आता स्वरनाडीत शोधणार आहोत. यासाठी नाडीकांत ठोकांची मदत घेणार आहोत


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तिच्यायला.....

4

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

काय पकाकाका, आज "ऐन दुपारी, शबरीतिरी"च का? wink

काय बुंगाट सोडलीये गाडी....
असो.

बाकी, काही स्वर वर्ज आहेत ते लागताहेत, कुठे कोमल हवे तिथे कोमल नाहीत. कुठे सुर उग्र हवा,पण स्वर कोमल हवे, तिथे नेमकं उलटं होतंय.. ...... .....
(बोंबला तिच्यायला! मी काय लिहिलंय, मलाच कळेना. Big smile )

उग्र नव्हे रे तीव्र, तीव्र!!

5

उग्र म्हणे!! हॅ हॅ हॅ!!! Laughing out loud Laughing out loud

आपल्याला संगीतातलं काही

6

आपल्याला संगीतातलं काही शष्पही कळत नाही हे सगळ्या दुनयेला माहितीये की राव wink

बळंचकर त्यातलं इकडुन तिकडुन ऐकलेलं काहीतरी वचकतोय ना...अशी भर भाषणात चड्डीची नाडी नाय ओढायची राव. (मनगटाने नाक पुसतानाची स्मायली!)

लेख *ट कळला नाय... पण

7

लेख *ट कळला नाय... पण प्रतिसाद वाचून अंदाज आला... आज पकाशास्त्री भर दुपारीच शास्त्राभ्यासास बसलेले दिसताहेत...

अवांतरः मला कळवलं असतं तर मी पण आलो नसतो... !!! हास्य

हॅहॅहॅ

8

हा आपला स्वरंगुळा! यकदा सवसांचा स्वरपरिहार झाला पाहिशेल हाय


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तारीख ठरवावी

9

तारीख ठरवावी! इतकीच प्रतिक्रिया या वाचनानंतर उमटली!

बाबौ

10

लय म्होट्टा लेक. बैजवार वाचून लिवतो नंतर. जाताजाता एक शंका
नी ध नी ध प ध नी ध नी ध प सा रे सा रे सा रे ध नी म्हंताव म्हंजी 'गम' वर्ज्य म्हना की. कोन्चा राग म्हनाव हा.

गम वर्ज्य नव्हता हे खरे पण तो

11

गम वर्ज्य नव्हता हे खरे पण तो काही खास श्रोत्यांसाठी राखीव होता. त्यामुळे तो अनवट गम मैफलीत लागला की आमच्यासारखे सामान्य श्रोते गमन करीत तर काहि निष्णात वादक वाद्ये २न्ही बाजूनी वाजवायला सुरुवात करीत. प्रस्तुत कयामत खाँनीतर तानपुरादेखील २न्हि हाताने एकाच वेळी वाजवल्याचे ऐकले आहे. असो. होते एकेक प्रतिभावान गायक.
मर्मज्ञ श्रोते आणि टिमकीवादक प्रकाशजी यांच्या लेखणीतून ही गोष्ट सुटावी हे त्यांच्या टिमकीचे यश का लेखणीचे अपयश?


-पुण्याचे पेशवे

ते फक्त

12
प्रस्तुत कयामत खाँनीतर तानपुरादेखील २न्हि हाताने एकाच वेळी वाजवल्याचे ऐकले आहे.

ते फक्त तीर्थंकरांच्या मैफिलीत. विरजणकारांनी हे नीरिक्षण या आगोदरच नोंदवले आहे. दुर्देवानी तो दस्त ऐवज जालसंगीताच्या राजकारणात उडवला गेला. विरजण कारांच्या खाजगी ग्रंथसंग्रहात तो उपलब्ध आहे.
आता राहिला मुद्दा टिमकीचा या विषयी गुंडोपंतांनी जालावर काही लिहिले आहे.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नी वादी

13

नी वादी आणि संवादी दोन्ही. म्हणजे हा खास घाटपांडे घराण्यातला राग आहे.

- फुन्सुक

खरेतर

14

वादी असला तरी विवादी. Big smile . हे म्हणजे मेकाल्योत्तर संगीताच्या (http://mimarathi.net/node/1047#comment-1870) उलटे झाले की.

कुटील कुटील

15
वादी असला तरी विवादी.

हीच ती विंग्रजांची कुटील नीती. मेकाल्योत्तर संगीताच्या विश्लेषकांनी संवादी स्वर ठळक करुन तो विवादी केला. या विश्लेषकाच्या कंपुबाज समर्थकांनी त्याचे समर्थन फारच चलाखीनी दिले आहे. ते म्हणतात की स्वरांना शब्दाच्या कुंपणात बांधताना लेखन तंत्राच्या असलेल्या या मर्यांदा आहेत.
सा रे म्हणताना शब्दार्थानी सर्वजण होतात. त्यातील कोमल स्वर हे पुसट शब्दांनी मध्यम स्वर साधारण शब्दांनी तर तीव्र स्वर हे ठळक शब्दांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न होतो. कोमल स्वर हे लक्षवेधी करण्यासाठी ठळक करण्याची गरज नसते. पुसट केले तरी ही लक्षवेधी होतात.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अगायाया

16

काका मला वाचवा.
मी चुकलो...मी चुकलो...मी चुकलो...मी चुकलो...मी चुकलो...मी चुकलो...(कोपिराईट धमु)
मी पुन्हा संगीताबद्दल (पक्षी: मूजिक, हा खुलासा बिकांसाठी) लिहिणार नाही. (इथे कान पकडले आहेत अशी स्मायली कल्पावी)

चूक चूक

17

काही तज्ञ कलिंगडा रागाची निर्मिती ही बंधुंनी धपकन कलिंगड खाली टाकले व त्यातुन जे स्वर निर्माण झाले यातच झाली आहे असे क्षीण स्वरात सांगतात. खुद्द पाटमांडे याला साक्ष आहेत. रामभाउ व मिराशी बुवा यांनी हा उल्लेख चलाखीनी टाळला आहे.

चूक चूक. तो 'कालिंगडा' ('आ'कार लक्षात घ्या). 'कलिंगडापासून निर्माण झाला तो कालिंगडा'. जसे 'रघू' चा पुत्र तो 'राघव', शंतनूचा पुत्र तो 'शांतनू', धृतराष्ट्राचा पुत्र तो 'धार्तराष्ट्री' तसा कलिंगडापासून 'कालिंगडा'. काय राव आमचे सोडा, पण मिराशीबुवांची चूक काढताव काय?

पोटभेद

18

आमच्या मते बंधुंना श्रेय द्यायचे नसल्यानी हा पोटभेद आपण करत आहात, आकारांताने अनर्थ घडतो मान्य. म्हणजे राम आणी रम . एक पाद्य पुजनीय तर दुसरे औष्ठ्यपुजनीय पण पुजनीय तर आहे ना?
आता कलिंगडा च्या मूळ धाग्यावर अजुनही कलिंगडा असे स्पष्ट व्याकरण दिसत आहे. संस्कृतातील पाठभेद आपण स्वराच्या पोटभेदा मधे मोठ्या चलाखीनी आणत आहात. कलिंगडाच्या आकारावर आमचे लक्ष आहेच


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

च्

19

च् च्.
आता कलिंगडा च्या मूळ धाग्यावर अजुनही कलिंगडा असे स्पष्ट व्याकरण दिसत आहे.
अहो आम्ही 'कलिंगडा'वरचा धागा काल्ढा हो. तुम्ही कलिंगड आपटून झाला म्हंता तो 'कालिंगडा'. आमी तेच्याबद्दल लिवलच नाय वो.

उन्हांतानात... गर्मी मुळे जीव

20

उन्हांतानात... गर्मी मुळे जीव जायची वेळ आली व तुम्ही त्या कलिंगड्याबरोबर खेळत काय बसलाय... आना तो इकडे.. कापू व वाटून खाऊ wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काही म्हणा

21

मोठा मन लावुन सूर आळवला आहे. संगीत इतिहास लिहणे चाल्लेय वाटतं नविन बॅचच्या श्रोत्यांकरता