सव्यसाचि (अंतिम)

0
0

भाग -१

भाग -२

भाग -३

भाग -४

भाग -५

भाग -६

भाग -७

"कमॉन एग. येवढी चांगली ऑफर तुमच्या रशीयाला कधी वर्ल्ड बँकेनी देखील दिली नसेल ! एकाच वेळी "यु एस, चायना आणी आखाती देशांच्या ऑईल कंपन्यांचा संपुर्ण डाटाबेस घर बसल्या मिळतोय तुम्हाला ! वर एलिट आणी अनटचेबल्स सारख्या ग्रुपसना संपवल्याचे फुकटचे पुण्य वेगळेच; आणी त्याबदल्यात मला फक्त हवय ते रशियन नागरीकत्व, 'केजीबी'ची मदत आणी एफ बी आय पासून संरक्षण....."
---------

चारच दिवसात मी बोस्टनला रवाना झालो. आता खरी लढाई सुरु होणार होती. सगळ्या मोहरा आपापल्या जागी उभ्या होत्या आणी मी फक्त योग्य वेळेची प्रतिक्षा करत होतो.

"डायना मला कॅथ्रीनची गरज आहे, एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी."

"असे कोणते काम आहे जे फक्त तीच करु शकेल??"

"आपले पहिले टार्गेट आहे चायनीज कंपनी 'कोनाट' , आणी तीचा बोस्टन हेड हा सेक्सचा अत्यंत भुकेला माणूस आहे. दिवसातले ६/६ तास डेटिंग साईटवर पोरी शोधणे हा त्याचा आवडता उद्योग आहे. त्याला गळाला लावण्यासाठी कॅथ्रीन सारखी विश्वासु मासळी अजुन कुठे मिळणार ??"

"त्याला जाळ्यात फसवुन आपला काय फायदा पॅपिलॉन ??"

"मला त्याची गरज नाहिये डायना ! मला हवाय त्याचा लॅपटॉप. अलिबाबाची गुहा."

"हे सगळे जमुन आले तरी पण तो तिला भेटायला लॅपटॉप घेउनच येईल ह्याचा भरवसा काय?"

"नाही आला तर जागा फक्त बदलेल. हॉटेल रुमच्या ऐवजी त्याच्या घरातुन लॅपटॉपमधल्या डेटाची चोरी होईल. मी सगळी तयारी ठेवली आहे."

"जिनियस !"

"धन्यावाद. शेवटी चेला...."

अपेक्षेप्रमाणे पाचच दिवसाच्या आत बोस्टन हेड आमच्या गळाला लागला. आणी त्या दिवसापासुन 'कोनाट' आणी तीच्या उपकंपन्यांच्या प्रत्येक आत येणार्‍या आणी बाहेर जाणार्‍या इ-मेल्स, डेटा ह्यावर अनटचेबल्सची अदृष्य नजर रोखली गेली. पहिल्याच झटक्यात मोठे यश मी पदरात पाडून घेतले. आता अधिक वेळ घालवून उपयोग न्हवता...
--------------------

"वॉल्टर मी बोलतोय"

"काय सेवा करु ??"

"सेवा तर मी तुमची करायला फोन केलाय सर."

"ती तर तुला करावीच लागणार आहे, त्यासाठी तर तुला येवढी रक्कम मोजली आहे मी पॅपिलॉन!"

"माझ्या लक्षात आहे सर. पण आज तुम्हाला मी वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. तुमच्यासाठी माझ्याकडे एक पार्सल आहे, उम्म्म्म्म अनमोल आहे."

"मला शब्दांचे खेळ आवडत नाहीत पॅपिलॉन !"

"डायना ! हवीये??"

"तु शुद्धीत आहेस ?"

"चांगलाच ! आणी मला बेशुद्ध करेल अशी रक्कम तुम्ही मला ऑफर करत असाल तर तुम्ही बोस्टनमध्ये पाय ठेवल्यापासून ४ तासात मी डायनाला तुमच्या हवाली करायला तयार आहे."

"मी तुझ्यावर का विश्वास ठेवावा पॅपिलॉन ??"

"तुमचा मेल बॉक्स चेक करा, काही छान फोटो पाठवलेत मी. वाट बघतोय....."

काही क्षणाच्या शांततेनंतर अचानक वॉल्टरचा आतुर झालेला स्वर माझ्या कानात शिरला..

"पैसे कुठे पोचवायचे पॅपिलॉन"

"तुमचा एकेकाळचा परम मित्र आणी तत्कालीन मार्क-रॉबिन्सनचा मॅनेजर डेव्हिडच्या खात्यावर"

"यु आर सच बास्टर्ड पॅपिलॉन !! त्याचा तुझा काय संबंध ??"

"माझी सर्वात सुरक्षीत तिजोरी आहे ती. असो... आमच्याकडे एक छान म्हण आहे, "फळ खा, झाडे मोजत बसु नका !"

"मी ज्या कंपन्यांसाठी काम करतोय त्यांना माझ्यासाठी व्हिसा वगैरेची सोय करण्यात निदान २४ तास तरी नक्की लागतील ! साधारण परवा मी बोस्टनमध्ये असेन. येताना मी ब्रुसला देखील नक्की घेउन येईन. माझी अनोखी भेट त्याला नक्की आवडेल."

"मी वाट बघीन वॉल्टर....आणी हो, तु केनच्या संपर्कात आहेस हे आता उघड करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते..."

"गो अहेड !!"
----------

"आज सुट्टीच्या दिवशी अशी अचानक मिटींग बोलावण्याचे कारण ?"

"आपल्यात कोणीतरी एक फितुर असावा अशी डायनाला शंका आहे केन !"

"तु गप्प बसशील ? डायनाला काय ते बोलु दे ."

"केन तु वॉल्टरला कसा काय ओळखतोस??"

"STFU पॅपिलॉन "

"त्याच्यावर ओरडून तुझा गुन्हा लपणार आहे केन ? हि तुझ्या मोबाईलची कॉल हिस्टरी, तुला रोज कमीत कमी दोन वेळा वॉल्टरचे फोन येतात, आणी तेही रात्रीच्या वेळी. कशासाठी सांगु शकशील ?? "

"......."

"तुझा आणी वॉल्टरचा ज्यावेळी दुसर्‍यांदा फोन झाला त्याच्या दुसर्‍याच दिवशी बोस्टन हेडनी त्याचा पासवर्ड चेंज केला. ह्याला योगायोग म्हणायचे का? उत्तर दे केन..."

"ह्या पुढे आपल्याला केनची गरज आहे असे मला वाटत नाही" डायना शांतपणे म्हणाली आणी खोलीतुन बाहेर पडली.

केनचे प्रेत बागेत पुरुन सर्व व्यवस्था निट लावून झोपायला जायला मला आणी डग्लसला रात्रीचे दोन वाजले.
-----------------

"डायना.... सेव्ह मी, प्लिज..."

"कॅथ्रीन.. बेबी काय झालय ? तुझा आवाज असा का येतो आहे ?"

"वॉल्टर आणी ब्रुस बोस्टन मध्ये आलेत ताई. सध्या मी त्यांच्या ताब्यात आहे."

"...."

"हॅलो ब्युटीफुल ! तुझा जुना मित्र ब्रुस बोलतोय."

"कॅथ्रीनला सोडा. तीचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहिये."

"नक्की सोडणार ! तु आम्हाला 'युएस' सर्व्हर मध्ये घुसण्याचा रस्ता दाखवलास की आम्ही तीला लगेच सोडणार आहोत. 'हॉटेल हयात' रुम नंबर २८७. 'एकटीच ये' वगैरे सूचना तुला द्यायची गरज नाही, नाही का?"
-----------

"गुड आफ्टरनून ऑफीसर "

"मि. पॅपिलॉन, गुड मॉर्नींग. तुम्ही पाठवलेली भेट माझ्या बायकोला फार आवडली."

"हि तर सुरुवात आहे ऑफीसर माईक. तुम्ही अशीच मैत्री ठेवा, मी तुम्हाला मालामाल करुन टाकीन."

"खरच सांगतो मि. पॅपिलॉन मी ह्या नोकरीला अगदी कंटाळलो आहे. मला ह्या पोलिस दलातून सुटका हवी आहे."

"काळजी करु नका मि. माईक. तुम्हाला लवकरच राजेशाही नोकरी मिळेल असे वचन देतो मी तुम्हाला."

"धन्यवाद पॅपिलॉन. आज संध्याकाळी गुड न्युज देणार्‍या माझ्या फोनची वाट बघा."

"नक्कीच माईक. तुम्ही माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी नक्कीच तडा जाऊ देणार नाही."

"गुड बाय पॅपिलॉन"

"गुड बाय माईक. डाव्या दंडात एक गोळी.... विसरणार नाहीस ना?"
-----------------------

"चिअर्स ! ह्या अनपेक्षीत यशासाठी."

"आणी चिअर्स ह्या यशातील माझी निम्मी भागीदार कॅथ्रीनसाठी देखील."

"आय लव्ह यु पॅपिलॉन, लव्ह यु सो मच. ह्या येणार्‍या पैशात आपण जगातले कुठलेही सुख विकत घेउ शकु."
---------------

"मिस्टर डग्लस.."

"हुकुम करा मालक, एकाच शहरात असुन मला कॉलींग कार्ड वरुन फोन ?"

"सावधगिरी हा प्रत्येक यशाचा पाया असतो हे तुम्हीच शिकवलेत मला मि. डग्लस. माझी प्रवासाची व्यवस्था झाली ?"

"येस सर ! उद्याची संध्याकाळ तुम्ही आणी कॅथ्रीन मॅडम एका नविन भुमीत साजरी करत असाल."

"कॅथ्रीनला मी आधीच वरच्या प्रवासाला पाठवून दिलय."

"कायsss?"

"पैशासाठी जी स्वतःच्या बहिणीला धोका देते, तिच्यावर मी विश्वास ठेवावा असा सल्ला तुम्ही देखील मला दिला नसतात, नाही का गुरुजी?"

"ठरलेल्या ठिकाणी गाडी तुझी वाट बघत असेल पॅपिलॉन. हॅपी जर्नी."

"पार्सल तुमच्या घरी पाठवायची व्यवस्था केलेली आहे. हातात आलेला दोन्ही कडचा डेटाबेस विरुद्ध कंपन्यांना कसा विकायचा हे तुम्ही जाणताच मि. डग्लस. आलेल्या पैशाची तुम्ही योग्य गुंतवणुक कराल अशी मी आशा करतो."
----------------

"प्रत्येक मोठ्या आणी अचानक मिळालेल्या यशामागे एक गुन्हा लपलेला असतो" असे मी कुठल्याश्या कादंबरीत वाचले होते. असेल बॉ... मल तरी काही अनुभव नाही.

सध्या मी दुबईतल्या एका छोट्याश्या कृत्रीम बेटावर छानसा बंगला घेतलाय. माझा सगळा दिवस तिथेच जातो. तिथेच बसुन मी चार देशात केलेल्या माझ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवुन असतो. मि.डग्लस माझे प्रतिनिधी आणी कायदेशीर सल्लागार म्हणुन काम बघतात. ऑफिसर माईकला मध्ये एका झटापटीत गोळी लागली. त्यानंतर त्याने पोलिसाच्या नोकरीला कायमचाच रामराम ठोकला. सध्या तो माझ्याकडेच काम करतो, माझ्या सिक्युरीटीचा चिफ आहे तो.

तुम्हाला माझा मित्र डेनीस 'द एग' आठवतोय ? त्यानी आता एक छोटीशी सॉफ्टवेअर कंपनी रशियात चालू केली आहे. खुप सुखात आहे तो. पॅपिलॉन नाही पण निदान पॅपिलॉनच्या आई वडीलांना रशियात सुरक्षीत ठेवल्याचे बक्षिस दिलय मी त्याला कंपनीच्या रुपाने.

अरे हो जाता-जाता तुमच्याशी दोन महिन्यापुर्वी पेपरात आलेली एक गंमतीदार बातमी शेअर करीन म्हणतो.

दिनांक १९ मे :- आज शहरातील प्रसिद्ध अशा दोन हॉटेलमध्ये खूनाच्या घटना घडल्या. 'हॉटेल हयात' मधून दोन व्यक्तींचा खून करुन पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या एका स्त्रीला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तीने पोलिसांवरच गोळीबार केला, उलट गोळीबारात हि महिला ठार झाली. मृत झालेल्या तिनहि व्यक्ती ह्या एकेकाळी गाजलेल्या 'एलिट' ह्या हॅकर ग्रुपच्या सर्वेसर्वा असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.

ह्या हॉटेलपासून जवळच असलेल्या हॉटेल किंग मध्ये एका तरुण महिलेचे प्रेत सापडले असून तिचा विष पाजून खुन करण्यात आला आहे. सदर तरुणीच्या सामानाची व लॅपटॉपची तपासणी केली असता हि तरुणी 'पॅपिलॉन' ह्या नावाने हॅकिंग विश्वात प्रसिद्ध होती असे निदर्शनास आले आहे. वरिल दोन्ही घटनांचा काही परस्परसंबंध आहे का ह्याची शहर पोलिस तपासणी करत आहेत.

(समाप्त)

ज ब र द स्त..!!! भन्नाट... लइ

1

ज ब र द स्त..!!! भन्नाट... लइ आवड्या...वेगवान..

आला आला म्हणताना तो स्दिवस

2

आला आला म्हणताना तो दिवस उगवलाच....
कथानक वेगवान होतच. पण शेवट करायच्या नादात तो खुपच फास्ट झालाय.
एखाद्या सुंदर इंग्रजी चित्रपटाला शोभेशी कथा आहे.

मझा आ गया मी पॅपिलॉन...


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

+१

3

जबरदस्त कथा ... एकदम आवडेश ...
>>शेवट करायच्या नादात तो खुपच फास्ट झालाय
हो ना ...
अवांतर - या कथेचे जाणकारांनी पटकथेत रूपांतर केले तर लै भारी शिनेमा बनेल ...

गणपाशी बाडिस

4

ब-याच कलाटण्या, बरेच गुंते, खुप गोते आणि भरपुर झोल असुन ही कथा किचकट/रटळ/ अथवा बंपर वाटली नही हे विषेश.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मस्त कथा रे ... पुढची कथा कधी

5

मस्त कथा रे ... पुढची कथा कधी लिहितोस ???

च्यायला परा, जबरा लिहिलंय.

6

च्यायला परा, जबरा लिहिलंय. मस्त शेवट.

गणप्याशी सहमत. शेवट करायच्या

7

गणप्याशी सहमत. शेवट करायच्या नादात वेग अतीच वाढला आहे. पुन्हा एकदा वाचायला लागेल सगळी संगती नीट लागायला!

पण कथा मस्तच!

मस्तच!!!!!!!!!!!!

8

भारीच रे!!!!!!!!!!!!!!!!!!

वेगवान आहे पण पुर्ण केलास बाबा ,,,,, हास्य

केवळ भन्नाट.

9

..../\....
आपले अभिनंदन करावयास शब्द अपुरे पडत आहेत.
ब-याच दिवसांनि सुंदर कथा वाचायला मिळाली.

अभिज्ञ.

अवांतर :

प-या,
शेवटचा भाग इतका फास्ट का केलास? अजून १ दोन भाग सहज करता आले असते असे वाटून गेले.

अभिनंदन परा. सुंदर

10

अभिनंदन परा. सुंदर लिहितोस!!!!!!!!!!

"कथा लवकर संपव" असं सांगून

11

"कथा लवकर संपव" असं सांगून परावर शेवटला भाग अतिवेगवान करण्याची पाळी आणणार्‍या सर्वांचा तीव्र निषेध!

पण कथा मात्र अत्त्युच्च दर्जाची रे पराभौ!! एकदम रापचिक!

+१

12
"कथा लवकर संपव" असं सांगून परावर शेवटला भाग अतिवेगवान करण्याची पाळी आणणार्‍या सर्वांचा तीव्र निषेध!
पण कथा मात्र अत्त्युच्च दर्जाची रे पराभौ!! एकदम रापचिक!

+१, असेच म्हणतो.
कथा एकदम धन्यवाद भारी आहे पण हा शेवटचा भाग हाप्सिआत बसुन नाय झेपला !
अजुन एकदा शांतपणे वाचायला हवा ...

पराचे अभिनंदन, एकदम ताकदीची कथा लिहलीस बॉस !!!

+१

13

असेच म्हणतो.

रोलर कोस्टर..

14

भन्नाट वेगवान घडामोडींनी शेवटचा भाग खच्चून भरलेला आहे, कथा सॉलिड्ड्..पण वेगाच्या नादात थोडे डिटेलिंग कमी झाले आहे,(त्यामुळे गॅप्स भरायला पॅपिलॉन चा सिक्वल लिहायला हरकत नाही परा..) बाकी मस्तच..
स्वाती

त्यामुळे गॅप्स भरायला पॅपिलॉन

15
त्यामुळे गॅप्स भरायला पॅपिलॉन चा सिक्वल लिहायला हरकत नाही परा.

अगदी हजार टक्के सहमत.

-^- जबरी..............

16

-^-

जबरी.............. Grade

आणि हो सगळ्यात महत्वाच तु ही कथा पुर्ण केलीस. Beer

भारीच होती रे कथा.. पण शेवट

17

भारीच होती रे कथा.. पण शेवट अदिती नि गणपा म्हणतात त्याप्रमाणे जरा घाईघाईत केल्या सारखा वाटतोय..

आग्गगा ! लैभारी रे परा...

18

आग्गगा !

लैभारी रे परा...

जबरदस्त मालिका लिहलीस तु आवडली बघ... तुला लवकरच एक गिफ्ट देतो wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

परा... मस्त कथा. तुझी शैली पण

19

परा... मस्त कथा. तुझी शैली पण छानच. पण शेवटावर अजून थोडे काम करता आले असते. पण कथा उच्चच रे... एकदम वेगवान आणि खिळवून ठेवणारी.

पर्‍या आता ह्याचा सिक्वल आणे

20

पर्‍या आता ह्याचा सिक्वल आणे प्रिक्वल दोन्ही काढ.....

लै भारी..

प्रत्यक्ष

21

प्रत्यक्ष भेटीअंती बोलू!

तुमच्या प्रत्यक्ष भेटी 'बसून'

22

तुमच्या प्रत्यक्ष भेटी 'बसून' होत असल्यास आम्हालाही नक्की बोलवा. किमान त्याचा स्वाद 'चाखण्यासाठी' आम्ही नक्की येऊ.

हाहाहाहा

23

त्यात काय एवढं! तुम्ही या. आपण 'बसून' भेटूया. wink

प्रत्यक्ष भेटीअंती बोलू! परा

24

प्रत्यक्ष भेटीअंती बोलू!

परा तुला फोनच करणार होतो आज...

मी म. वरचे मारीओ पुझो

25

प्रत्येक मोठ्या आणी अचानक मिळालेल्या यशामागे एक गुन्हा लपलेला असतो" असे मी कुठल्याश्या कादंबरीत वाचले होते. असेल बॉ... मल तरी काही अनुभव नाही. >>>>>

जाहीर करण्यास आनंद वाटतो की परा हे मी म. वरचे मारीओ पुझो आहेत.
राजे ते "सत्कार" समारंभ वगैरे बघा हो जरा , कधी , कुठे , कसा......

सत्कार नको हो.. सत्कार म्हटले

26

सत्कार नको हो.. सत्कार म्हटले की मला थेट सरकारनामा मधलाच सत्कार आठवतो....

अहो म्हणून तर लिहिले ना कधी

27

अहो म्हणून तर लिहिले ना कधी कुठे कसा?...
बरे जाउ द्या पुरस्कार म्हणा. नाय तर परा भौ उगवायचे च नाही त्या समारंभाला.

+१

28

आणि या कथेला सुसंगतच अर्थ आहे तो

छानच कथा!

29

सगळ्यांनी घाई केल्यामुळे शेवटला भाग एकदम बुंगाट सोडावा लागला तुला. Sad आणखी एखादा भाग नक्कीच चालला असता. असो, पुढल्यावेळी.
संवाद, प्रसंगांची वर्णने, वळसे, क्लृप्त्या, तांत्रिक डीटेल्स एकदम हुच्च!!
तुझं नाव हॅडलीकथेतील चेसकुमार ठेवायला हवं!! wink

+१

30

असेच म्हणतो. वेगवान, हुच्च कथा!

सही

31

मागच्या थोड्याशा शांत भागानंतरच हे वादळ आवडलं

कथा मस्तच्

चेतन

परा @ हिज बेस्ट

32

खुप दिवसानी वाचलेली भन्नाट लेखमाला.. कथा जबरी आहे एकदम हॉलीवुड स्टाईल. द बोर्न सिरीज चा पुढचा सिक्वेल तुच लिही.

वेगवान

33

कथा, वेगवेगळ्या वळणांनी वाचकाला चक्रावून टाकणारी. आवडली. शेवट पुन्हा एकदा वाचायला लागेल.

केवळ संवादातून सर्व चित्रण केल्यामुळे माणसं तितकीशी नीट डोळ्यापुढे उभी राहिली नाहीत. नक्की कोण कोणाला गंडवतो आहे या बाबत गोंधळ निर्माण करायला त्याचाही हातभार लागला...

बऱ्याच जणांनी सीक्वेल लिहायला सांगितलं आहे, मी म्हणेन हीच कथा थोडी खोलात जाऊन वेग थोडा कमी केला तर अधिक परिणामकारक होईल. (म्हणजे उदाहरणार्थ बिकांची सूचना ध्यानी घेतलीत - बेडरूम सीनची ववगैरे.. हास्य )

भारी

34

वरील सर्वांशी सहमत आहे.

कथानक एकदम मस्त पण ह्या कथेवर पुन्हा तुझ्या सवडीने काम करुन अजुन भारी बनव!!!

रोलर कोस्टर राईड

35

वा संपूर्ण कथा एकत्र वाचून कथेचा इतका भन्नाट फील आलाय म्हणून सांगु...
ही गोष्ट म्हणजे एकदम रोलर कोस्टर राईड आहे.. लय लय लय लय भारी!!!

ह्या जब्बरदस्त कथे बद्दल आभार आणि तुझ्या पुढच्या "पुस्तकाची" वाट पाहतोय


-ऋ

अद्भुत पुस्तकाची का रे???

36

अद्भुत पुस्तकाची का रे??? हास्य

:)

37

मस्त रे पर्‍या.....मजा आली सगळे भाग वाचुन हास्य

पराशेट तुमी जनू बांडे बघा

38

पराशेट तुमी जनू बांडे बघा आमचं. कथा कालपरवाच वाचली व्हती. पन प्रितीक्रीया द्यायाची राहून ग्येली. काय भन्नाट हाय कथा. लई दिसांनी मजा आली.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

प रा तुम्चे ८ हि लेख मि आज

39

प रा तुम्चे ८ हि लेख मि आज वाचले.....लै भारी मस्त................

प रा तुम्चे ८ हि लेख मि आज

40

प रा तुम्चे ८ हि लेख मि आज वाचले.....लै भारी मस्त................