Nile
Offline
शेवटची नोंद: 2 आठवडे 3 दिवस
Joined: 13/10/2009
प्रकाशन:
.jpg)
आमचा
आमचा नाईल/नील एकदम शहाणा आहे...
विकास देशपांडे
हा हा हा
चांगल आहे..
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
तुम्ही म्हणता की येथे एप्रिल
तुम्ही म्हणता की येथे एप्रिल फुल केले जाणार नाही पण वर शिर्षकामध्येच तुम्ही फुल ठेवले आहे त्याचा व धाग्याचा संदर्भ जोडला तर एक नवीन प्रश्न निर्माण होतो की जे तुम्हाला करायचे नाही आहे ते तुम्ही सरळ लिहत आहात पण तुमचा मुळ उद्देश तोच आहे हे गाभ्यातून कळते म्हणजे बघा तुम्ही जे गाभ्यात लिहले आहे त्यातून तुमचा उद्देश स्पष्ट होतोच असे नाही पण शिर्षक तुमचा उद्देश दाखवून देतो व्याकरणाच्या दृष्टीने हे बरोबर जरी असले तरी लिखानाच्या नियमाच्या कुठेतरी थोडेसे किंचितसे विरुध्द आहे असे दिसुन येतो ह्याला आपण विरोधाभास म्हणू शकत नाही कारण वर भास नाही आहे जे आहे ते सांगायचा प्रयत्न केला आहे पण शिर्षक सत्य बोलून जाते म्हणून गाभाचा अर्थ बदलतो असे देखील नाही आहे तुम्हाला समजत आहे ना मी काय म्हणतो आहे ते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अरारारा
राजे परत ढगात गेले वाटतं.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हो अगदीच सोपं आहे समजायला...
तुम्ही लिहिलेला सगळा घोळ वाक्याच्या अगर विधानांच्या स्वताविषयी बोलण्याच्या क्षमतेमुळे येतो. त्यामुळे 'हे विधान खोटे आहे' यासारखे पॅराडॉक्स निर्माण होतात. पण भाषा ही अर्थवाही व शक्तीमान सांकेतिक व्यवस्था असल्यामुळे ग्योडेलच्या नियमाप्रमाणे तीत काही सिद्धताहीन सत्ये व असिद्धता शक्या नसलेली असत्ये ही असणारच. नाईल यांनी तसल्याच स्ट्रेंज लूपचा वापर करून वरील विधानसंचय रचला आहे.
खालील वाक्य सत्य आहे.
वरील वाक्य खोटे आहे.
प्रमाणे,
एप्रिल फूल (करणार)
एप्रिल फूल नाही करणार....
१ एप्रिल च्या ताज्या बातम्या!
१. चुचुतैंनी इथुन पुढे गप्पा टप्पा धागा न काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा सगळीकडुन जोरदार निषेध होत आहे.
२. छोटा डॉन ह्यांनी त्यांचे केस कापण्याच्या घेतलेल्या निर्णयाने समस्त केशकर्तनालयांमध्ये खळबळ माजली आहे.
३. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार व्यनीकाका इथुन पुढे एकही व्यनी करणार नाहीत असे कळले आहे.
४. व्यनी काकांचा हा निर्णय ऐकुन नंदनने इथुन पुढे एकही लिंक न डकवण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.
५. वरील दोघांना मनवण्यास ठाण्यातील उच्चस्तरीय समिती रवाना झाली असुन त्यांनी वीस रुपडे, चहाच्या किटल्या आणी बिड्याकाड्यांचा मुबलकसाठा बरोबर घेतला आहे.
६. मुसुंनी संपादक पदाचा मोह आता सुटला आहे असे नुकतेच जाहीर केल्याने पुर्वकिनार्यावर चढाओढ सुरु झाली आहे.
७. विकास यांनी इथुन पुढे दोन ओळींपेक्षा जास्त लांबीचा प्रतिसाद लिहायचे नाही असे ठरवले आहे.
८. प्रकाशकाकानी वापरायचा नाही असे ठरवले आहे.
९. अवलियांनी जर्कातातील काकांच्या सोबतीने 'ओबामा आणि हेल्थकेअर' यावर एक पुस्तक लिहण्याचा करार नुकताच केल्याचे वाचण्यात आले आहे.
पुढील बातम्या एका व्यावसायीक 'विश्रांती' नंतर.
-Nile
+
१०. निळ्याने कोणाशीही भांडण करायचं नाही असं ठरवलं आहे.
११. निखिल देशपांडे यांनी प्रश्न विचारायचे नाहीत असं ठरवलं आहे.
१२. खरडफळ्यावर अल्कोहोलयुक्त पेयांच्या गप्पा मारायच्या नाहीत असं राजेने जाहीर केलं आहे.
१३. अदितीने यापुढे कोणालाही खडूस उत्तरं न देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील बातम्या एका वर्षाच्या व्यावसायीक 'विश्रांती' नंतर.
१४. राजे, पुणेरी, श्रामो,
१४. राजे, पुणेरी, श्रामो, विमो, धम्या इ. सर्वानी पूनमवर बसून फक्त थम्सअप प्यायचे ठरवले आहे.
१५. अदितीने पूजा करायचे ठरवले आहे.
१६. आम्ही सिगरेट सोडली आहे.
-पुण्याचे पेशवे
पूजा नव्हे रे, अभिषेक!
पूजा नव्हे रे, अभिषेक!
मी समग्र विधीबद्दल बोलतो आहे
मी समग्र विधीबद्दल बोलतो आहे एका विशिष्ट विधीबद्दल नाही.
-पुण्याचे पेशवे
व्यक्तीगत प्रतिसाद, पास!
चांगला खुलासा केलात.
थोडा बदल, आम्ही थम्सअप ऐवजी
थोडा बदल,
आम्ही थम्सअप ऐवजी ओव्हलटीन प्यावं म्हणतोय. उतारवयात बरं असतं
सेरेलॅक चाललं काय?
सेरेलॅक चाललं काय?
-Nile
>>राजे, पुणेरी, श्रामो, विमो,
>>राजे, पुणेरी, श्रामो, विमो, धम्या इ. सर्वानी पूनमवर बसून फक्त थम्सअप प्यायचे ठरवले आहे.
हे बघा तुम्ही येथे चुकता आहात, संदर्भ चुकतो आहे असे म्हणत नाही आहे मी नावंचे क्रम चुकीचे असावेत असा माझा कयास, विज्ञान ह्यावर काय म्हणते ह्यावर विचार करावयास हवा व तसेच त्या सर्वांचे शरीर विज्ञान देखील सहाय्य करेल त्या गोष्टी साठी असे वाटत नाही उदा. ज्यांना रोज तुपाबरोबर पोळी खायची सवय आहे त्यांना अचानक एक दिवस भाकरी व कांदा दिला तर पोटात मुरड उठेल व त्याची अवस्था दैनीय होऊन जाईल. ह्याच नियम येथे पण लागू होतो थम्सअप हा फक्त मिक्स करण्यासाठी असतो त्याचा तुम्ही पेय म्हणून कसा काय वापर करु शकाल ? विज्ञान काय म्हणेल ? अल्कोहोल + थम्स अप सारखी पेय ह्यांच्या मिलनातून जो ग्लास भरला जातो त्याची चव वेगळीच असते व येणारी धुंदी देखील त्यामुळे चारीबाजूनी विचार केलाच पाहीजे. वरील लिस्ट मध्ये आपली नावे पाहून काही जणांना ओशाळल्यासारखं झाले असेल तर काहीजण दुख:ने बेजार होऊन परत दुपारीच बियर सदृष्य पेय घेऊन बसायचा विचार केला असेल. त्यामुळे क्रमतर चुकीचा आहेच पण पेय देखील चुकीचे आहे ज्यामध्ये मदिरा नाही असे पेय हे वरील जीव कसे काय पीऊ शकतील.
ह्यावर पुर्ण विचार व्हावा मगच अश्या आशयाची बातमी सर्वत्र द्यावी.
धन्यवाद.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
१७. राजे विचारवंत झाले.....
१७. राजे विचारवंत झाले.....
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
१७. ओकांनी नाडी सोडून
१७. ओकांनी नाडी सोडून इलास्टीक वापरायला चालू केले आहे.
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
विश्रांती मध्ये तुम्हा
विश्रांती मध्ये तुम्हा सर्वांनी(डब्बा) जाहिरातींचा(^^) लुत्फ उठवला असेलच. ह्या सगळ्या बातम्या ऐकुन समस्त आंतरजालावर 'हाहा'-कार माजला आहे. काही लोकांच्या प्रतिक्रीया खालील प्रमाणे
राजे: काय चाललेय मला काही कळत नाहीए पण मालक म्हणुन मी काहीतरी उत्तर देत सुटलोय. सद्ध्या तरी पळुन जावे की नाही ह्या डीलेमा मध्ये आहे.
धम्या: (ह्याला आमच्या वार्ताहराने झोपेतुन उठवले, दुपारी. ह्याला काय चालले आहे याची अजिबात कल्पना नसल्याने त्याने) "हॅत्तिच्यायला तुला दाखवुन राह्यलो हनमान अन तु बघुन राह्यलाय अंबाबाई असे" उत्तर झोपेतच दिले, सवय!
अदिती: मी चालले झाडावर...
चतुरंगः आत्मशोध कमी पडतोय या लोकांचा
बिका: आंतरजालाची पार माती केली या लोकांनी
परा: ते मरुद्या हो, समोरच ब्युटी पार्लर सुरु आहे का ते सांगा आधी (ते पहायला आमचा वार्ताहर आणि परा दोघेही गेलो तो अजुन पत्ता नाही)
श्रामो: हे लोक मोठे कधी होणार कुणास ठावुक?
पुन्हा भेटुयात एका विश्रांती नंतर...
-Nile
संपली की नाही?????
विश्रांती