हे किती सत्य आहे ???

0
0

अब्राहम लिंकन व जॉन कैनेडी

ह्यांच्या जिवनात खरोखर एवढं साम्य होते ??
जर होते तर ह्याला काय म्हणावे फक्त योगायोग की अजून काही ??

{बर्‍याचदा अशी निरिक्षणं}

1

बर्‍याचदा अशी निरिक्षणं इपत्रातुनही आली आहेत.
आपल्याला तर बॉ काय कल्पना नाय!
हामेरिक्येतली मंडळी जर त्यांचा आब्यास आसंल तं सांगु शकत्याल बा...
तोवर वाईच जरा तंबाक द्ये रं भाऊ... हास्य

{राजे, जॉन एफ केनेडी च्या जागी}

2

राजे,
जॉन एफ केनेडी च्या जागी जॉन ऑफ केनेडी झालं का??

{कि फरक पेंदा विमोजी... जॉन एफ}

3

कि फरक पेंदा विमोजी...
जॉन एफ केनेडी ऑफ झालेलेच आहेत wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{राजीव गांधी और इंदिरा गांधी}

4

राजीव गांधी और इंदिरा गांधी

१. दोनो के नाम गांधी थे..
२. एक जवाहरलाल नेहरू की पुत्री तो दूसरा पोता था
३. दोनो की हत्या आतंकवादियोंने की
४. हत्या करनेवाले आतंकवादी अपने अपने देश में अपना खुदका अलग देश मॉंग रहे थे
५. राजीव अपनी पत्नी को युरप मे मिले तो इंदिरा अपने भावी पती को युरप में मिली.
६. इंदिरा की हत्या करनेवाले लंबे बालवाले गोरे पुरुष थे तो राजीव की हत्या करनेवाली छोटे बालवाली काली स्त्री.
७. ??

{(विषय दिलेला नाही)}

5

Laughing out loud

{७. दोनो प्राईम मिनिस्टर थे}

6

Laughing out loud
७. दोनो प्राईम मिनिस्टर थे

{(विषय दिलेला नाही)}

7

Laughing out loud

{तुमचा जोक कळाला मला नाही असे}

8

तुमचा जोक कळाला मला नाही असे नाही,

पण शक्यतो तुम्हाला माझा मुद्दा कळाला नसावा मी हा धागा का टाकला हे शक्यतो तुम्हाला उमजले नसावे.. असे जोक मी अनेक गोष्टीवर मारु शकतोच नाही असे नाही.. !

प्रत्येक गोष्टी मध्ये १०० वर्षाचा फरक ठळकपणे व्यक्त होत आहे.. काही नावे काही जागेंची नावे विचित्र पध्दतीने साम्य दाखवत आहे.. म्हणून हा धागा.

*

आंबे टाईपच्या धाग्यावर आपण ११० + प्रतिसाद मारु शकतो पण एखादा सती सारखा किंवा जागतिक संदर्भ असलेला अथवा जो विषय आपल्याला कळालाच नाही तेथे गप्प बसायचे नाही तर टिपी करायची... हा सर्व सामान्य नियम झाला आहे असे वाटत आहे.. असो.

*

मुख्य मुद्दा योगायोगाचा होता मला ते भाषांतर करुन येथे टाकता आले असते पण तसे न करता मी दुवा दिला कारण कष्ट वाचावेत हा माझा हेतू. तुम्ही वर राजीव गांधी व इंदिरा गांधीवरुन जोक मारला.. माझा तो उद्देश नव्हता तसा असता तर मी हाच धागा गप्पाटप्पा मध्ये टाकला असता व विनोदी पध्दतीने तयार करुन टाकला असता...

काही गोष्टी मानवी आकलना पलिकडील आहेत हे मी मान्य करतो म्हणून त्या दृष्टीने चर्चा घडावी म्हणून हा धागा होता.

असो,

समजले तर काही उत्तरे येतीलच नाहीतर.. आपोआप हा धागा इतिहासजमा होईलच.


Hope is a good thing...

{आंबे टाईपच्या धाग्यावर आपण}

9

आंबे टाईपच्या धाग्यावर आपण ११० + प्रतिसाद मारु शकतो पण

मुद्दा समजला... हास्य

{हुषार आहेस}

10

Oups

हुषार आहेस wink


Hope is a good thing...

{म्हणून धागा गायब केलात}

11

म्हणून धागा गायब केलात नानासाहेब?

{ते महान कार्य}

12

ते महान कार्य मालकांचे..
मालकशाही मुर्दाबाद... Angry

{हा जोक नव्हता. ही योगायोग या}

13

हा जोक नव्हता. ही योगायोग या बाबतीतली टिप्पणी होती. तुम्हाला तो निव्वळ विनोद वाटला हे दुर्दैव. बऱ्याच वेळा विनोद करून एखादी गोष्ट अगदी थोडक्या शब्दात सांगता येते. तेच जर तांत्रिक भाषेत समजावून सांगायला गेलं तर भरमसाठ लिहावं लागत. पुलंनीसुद्धा खूप वेळा गंभीर गोष्टी सांगण्यासाठी विनोदाचा आश्रय घेतला होता. (माझी त्यांच्याशी तुलना नाही, पण...) त्यांच्याही बाबतीत लोक हसून बाकीचं विसरून गेले.

रिचर्ड डॉकिन्सने योगायोग या संकल्पनेचा विचार करताना (अनवीव्हिंग द रेनबो) एक संकल्पना मांडली आहे - Petwhac.

The book coins an acronymical term, Petwhac (Population of Events That Would Have Appeared Coincidental). This is defined as all those events that may be considered to be a 'coincidence' if studied casually, but are both possible and statistically probable.

उदाहरणार्थ - केनेडी व लिंकन हे दोघेही शुक्रवारी मारले गेले. जर तुम्ही खून झालेल्या दोन व्यक्ती घेतल्या तर एकाच वारी मारल्या जाण्याची शक्यता एक सप्तमांश आहे. पण योगायोग शोधताना एकाच वारी मारले जाणं, एकाच तारखेला मारले जाणं, एकाच महिन्यात मारलं जाणं, एकाच साली मारलं जाणं, एक १३ ला तर दुसरा ३१ ला, एक ११ ला तर दुसरा २२ ला असं वाढवत वाढवत कुठचाही 'योगायोग' या कॅटेगरीमध्ये आपण बसवू शकतो. या सगळ्यापैकी काहीतरी होण्याची शक्यता वाढत वाढत जाऊन १ च्या जवळ येते. मग अशा शक्यता असलेल्या घटनांची साखळी तयार केली की ती फारच प्रभावी वाटते.

उदाहरण द्यायचं झालं तर मी आत्ता तुम्हाला प्रतिसाद लिहितो आहे. तुमचं नाव राजे. माझं नाव राजेश. माझ्या एक्स्प्लोररच्या एका विंडोमध्ये कसलं चित्र आहे - शिवाजी'राजें'चं. मला आत्ता माझा मुलगा हाक मारतोय 'दाज्जेश' म्हणजे राजेश. त्यात माझा एक चांगला मित्र त्याचंही नाव राजे. त्याचा जर आत्ता फोन आला तर मी म्हणेन काय हा चमत्कार!

असा प्रभाव वाटण्यासाठी ट्रिक अशी असते की मुद्दामून साम्यं असलेल्या गोष्टीच शोधायच्या. एकदा ते शोधायला लागलं की कुठच्याही दोन व्यक्तींबाबत असे योगायोग सापडतात. जर आपण तीच साम्य नसणाऱ्या जोड्यांची संख्या बघितली तर ती अफाट असते. त्याहीपलिकडे जाऊन ज्या गुणधर्मात साम्य सापडू शकेल अशांची संख्या तर अगणित म्हणता यावी इतकी प्रचंड असते. म्हणजे राजे हे नामसाधर्म्य हे आत्ताच्या घटनेत शोधायचं, तर केनेडी व लिंकन यांच्या बाबतीत दुसरं काहीतरी शोधायचं.

माझाही मुख्य मुद्दा योगायोगाचा होता मला ते अशा कंटाळवाण्या भाषेत लिहून येथे टाकता आले असते पण तसे न करता मी विनोदी पद्धतीने डेमो दिला कारण कष्ट वाचावेत हा माझा हेतू. तुम्ही वर तो उद्देश न समजून माझ्यावर टीपीचा आरोप केला.. माझा तो उद्देश नव्हता तसा असता तर मी हाच प्रतिसाद एक लेखमाला करून टाकला असता व अधिक सविस्तर, तर्ककठोर पध्दतीने तयार करुन टाकला असता...

हा वरचा तिरकस परिच्छेद व तुम्ही लिहिलेला यात किती साम्य आहे पहा. काय हा योगायोग...

राजेश

{हेच्यावरुन एक जोक आठव्ला}

14

हेच्यावरुन एक जोक आठव्ला बॉ.
पण हिथ नगो. राजा माझ अकाऊंट उडवल... Big smile

{माझी व्यनी सुविधा व खरडवही}

15

माझी व्यनी सुविधा व खरडवही चालू आहे Shy

* बाकी लोक संपादक / व्यवस्थापक / मालक ह्यांचा प्रतिसाद एवढा सिरियस का घेतात समजत नाही .. नाही म्हणजे ह्या लोकांनी प्रॉक्टिकल जोक केला तर काय बिघडले.. फार फार तर एक आयडी उडेल Laughing out loud


Hope is a good thing...

{हे किती सत्य आहे ह्याची मला}

16

हे किती सत्य आहे ह्याची मला कल्पना नाही. तसेच अब्राहम लिंकनच्या पत्राबाबत आहे. मूळ इंग्रजी पत्र आणि त्याचे त्याहूनही आवडलेले वसंत बापटांनी केलेले मराठी भाषांतर खूपच छान आहे. तरी देखील त्याचा अधिकृत दुवा कधीच मिळाला नाही. आता काही स्थळे दिसतातजी अभारतीय आहेत पण कुणाची ते माहीत नाही. काही वर्षांपुर्वी शोधले तेंव्हा ते पत्र केवळ भारतीयांच्या संकेतस्थळावरच दिसायचे. अर्थात अब्राहम लिंकनने ते पत्र लिहीले असले तर अजिबातच आश्चर्य वाटायला नको कारण त्याच्यात तसे लिहीण्याचे सामर्थ्य आणि विचार दोन्ही होते.


विकास देशपांडे

{राजे, आता तो दुवा नीट वाचला.}

17

राजे,
आता तो दुवा नीट वाचला. मला तरी वाटतं की हा निव्वळ योगायोग आहे.

{अजून एक गोष्ट... भले हे साम्य}

18

अजून एक गोष्ट...

भले हे साम्य असले तरी लिंकन आणि केनडीमधे सर्वार्थाने जमीन-अस्मानाचे अंतर होते. त्यामुळे केनडीच्या अनेक गोष्टी चांगल्या असल्या/वाटल्या तरी देखील, लिंकनची तुलना केनडीशी न केलेली बरे असे वाटते.


विकास देशपांडे

{>>>लिंकन आणि केनडीमधे}

19

>>>लिंकन आणि केनडीमधे सर्वार्थाने जमीन-अस्मानाचे अंतर होते.

पुढचे वाक्य वाचून तुम्हांला केनेडी-लिंकन असे म्हणायचे असेल असे वाटते...
ह.घ्या. हो!!

{"वन-टू-वन कॉरसपॉन्डन्स" अथवा}

20

"वन-टू-वन कॉरसपॉन्डन्स" अथवा "रिस्पेक्टीव्हली" हे प्रयोग टाकायचे झाले तर तुमचे म्हणणे शतशः बरोबर आहे! हास्य


विकास देशपांडे

{एक चूक तरी मिळाली लिंकनचा}

21

एक चूक तरी मिळाली
लिंकनचा खुनी १८३८ मध्ये जन्मला आणि केनेडीचा खुनी १९३९ मध्ये जन्मला.

सौजन्य विकिपिडिया.

बाकी शोधण्याचे कष्ट घेतले नाहीत.

नितिन थत्ते

{राजे, इथे याबद्दल अधिक वाचता}

22

राजे, इथे याबद्दल अधिक वाचता येईल -
http://www.snopes.com/history/american/lincoln-kennedy.asp