नुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी मीमराठी संकेतस्थळ बंद ठेवून वीज वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर अनेक 'स्तुत्य प्रयत्न' अश्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यावर मी 'याचा उपयोग काय?' असा प्रश्न उपस्थित करून खूप लोकांच्या प्रामाणिक सद्भावना दुखावल्या असं वाटलं. उद्देश अर्थातच भावनांची टिंगल करण्याचा नव्हता, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा फोलपणा दाखवण्याचा होता. त्यावरील प्रतिक्रियांत 'तुम्हीच एक लेखमाला लिहा' असा सल्ला आला. म्हणून माझे विचार थोड्या विस्ताराने मांडून सर्वांना विचार करण्यास उद्युक्त करणं हा या लेखमालेचा उद्देश आहे.
सर्वसाधारणपणे काय लिहायचं आहे हे ठरलेलं असलं तरी या लेखमालेचा आकार नक्की काय असेल यावर फारसा विचार केलेला नाही. सौरऊर्जा कशी वापरता येईल (बेसुमार खर्च न करता) याविषयीच्या काही कल्पना मांडायच्या, व त्यामागचं गणित लोकांपुढे ठेवायचं या अनुषंगाने एक (किंवा दोन) लेख निश्चितच लिहीन. गणित व भावना हा जो मी फरक करत होतो त्यामागची भूमिका व माझी निरीक्षणं मांडेन. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी काही तांत्रिक मार्ग असतात. ते मार्ग डोळसपणे अवलंबण्याऐवजी 'म्या मूर्खाने हे प्रश्न निर्माण केले' असं म्हणून स्वत:ला शिव्या देण्याचं काम आपण वैयक्तिक जीवनातही करतो. तेच आपण मनुष्यजातीच्या पातळीवर करतो आहोत का, हे त्यातून बघायचं आहे. प्रत्येकच पिढीत विचारवंत 'हा अमुकतमुक महाभयानक, अशक्य प्रश्न आहे, व त्यातून विनाश अटळ आहे' असं वेगवेगळ्या प्रश्नांविषयी म्हणत आलेले आहेत (माल्थस वगैरे). मनुष्यजात अविरत कष्ट करून, नवीन तांत्रिक क्लुप्त्या वापरून ते प्रश्न सोडवते. ते प्रश्न जिवंत असताना त्यांच्याविषयी जितका हलकल्लोळ होताना दिसते, तितक्या प्रमाणात ते सुटल्याचा आनंद कोणी साजरा करत नाही. ते सोडवणाऱ्यांचा उदोउदो फार कमी वेळा होताना दिसतो. लोक नव्या भेडसावणाऱ्या 'महाभयानक, अशक्य' प्रश्नाकडे वळताना दिसतात. याची काही उदाहरणं मांडता आली तर पाहीन. सर्वसाधारण कॅटेस्ट्रोफ प्रेडीक्शन या नावाखाली जी भंपक गणितं केली जातात (चुकीची नव्हे, भंपक गृहितकांसहित) त्याविषयी एक चविष्ट लेख लिहिण्याची खूप दिवसांची इच्छा आहेच. मनुष्याच्या आत्मकेंद्री स्वभावाची विचारप्रवाहामध्ये उत्क्रांती कशी झालेली दिसून येते यावरही थोडं लेखन करावंसं वाटतंय. या सर्व फापटपसाऱ्यामुळे ऊर्जेची गणितं हे नाव कितपत सार्थ आहे हे माहीत नाही. पण आपण सुरूवात ऊर्जेच्या संदर्भात करतोय म्हणून व मला दुसरं नाव सुचलं नाही म्हणून हेच ठेवतो आहे. कोणाला जर अधिक चांगलं नाव सुचलं तर सुचवावं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर याच विचारधारांच्या कक्षेमध्ये सामावू शकणारे विषय सुचले तर तेही सुचवावेत.
पण लेखनाचा सूर जरी टीकेचा झाला तरी ती टीका सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करेन. पर्यावरणाचा प्रश्न नाहीच अशी भूमिका माझी नाही. ग्लोबल वॉर्मिंग नाकारण्याचा हेतू नाही. त्यात काही अंशी मनुष्य जबाबदार हेही मान्य आहे. फक्त तो प्रश्न, त्याची व्याप्ती, त्याचे परिणाम व तो सोडवण्यासाठी येणाऱ्या खर्चातून मिळणारा फायदा हा इतर प्रश्नांच्या शेजारी ठेवून किती महत्त्वाचा आहे याचा विचार करायला लावण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे तोच खर्च इतर प्रश्नांवर करून जर जास्त फायदा मिळत असेल तर पर्यावरण विषयावर (आत्ता) तो खर्च करून आपण मानवजातीचं (व अंती पर्यावरणाचं) नुकसान करतो आहोत का, हा विचार मांडण्याचा प्रयत्न राहील. यात 'लोकहो, परिस्थिती तितकी वाईट नाही. पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. आपण बरेच प्रश्न सोडवले आहेत, त्याचप्रमाणे हाही सोडवता येईल. चला आपण काही करूया.' असं सांगण्याचा प्रयत्न राहील. त्यात कदाचित काही वेळा, 'हा प्रश्न सोडवण्याआधी जर हे इतर प्रश्न सोडवले तर ते अधिक फायद्याचं ठरेल' असाही संदेश येईल.
सद्यपरिस्थितीत पर्यावरणाचा मुद्दा हा अमेरिकेत ज्याला 'थर्ड रेल' म्हणतात असा आहे. (इथल्या ट्रेन्सना वीज पुरवण्यासाठी हा तिसरा रूळ असतो. त्याला स्पर्श करणं धोक्याचं असतं. त्यावर मुतू तर नयेच...) शांतपणे सगळे करतात त्याप्रमाणे पर्यावरण देवाला नमस्कार करायचा, त्याच्या पुजाऱ्यांना मुकाट्याने दक्षिणा द्यायची आणि पुढे जायचं ही 'महाजनो येन गत:' प्रथा आहे. मला या देवळाची पवित्रता नाकारायची नाही, पण त्याचं स्तोम प्रमाणाबाहेर माजणं हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा अधिक हानिकारक असू शकेल असा मुद्दा मांडायचा आहे. या देवळामुळे अनेक प्रश्न अस्पृश्यासारखे बाहेर राहिलेले आहेत. ही पुजाऱ्यांना मान व पैसा, व अस्पृश्यांना हीन वागणूक अशी तफावत कमी करावी असा विचार आहे. शेवटी सर्व माणसंच आहेत...
वाचक माझं म्हणणं विचारपूर्वक लक्षात घेतील व भावनिक प्रतिक्रिया देणार नाहीत अशी आशा करतो...
लेखमालेचे सहर्ष स्वागत!
लेखमालेचे सहर्ष स्वागत! क्षमतेनुसार लेखमालेत भर्/प्रश्न/उपप्रश्न्/कल्पनांची भर घालण्याचा प्रयत्न करेन.
-Nile
वाचते आहे.
वाचते आहे.
हं
वाचतोय.
बाकी लेखमाला संपल्यावर.
स्वागत.
स्वागत.
वाचतो आहे, तुमच्याकडून नक्कीच
वाचतो आहे, तुमच्याकडून नक्कीच काहीतरी नवीन शिकावयास मिळेल ह्याची खात्री वाटत आहे.. !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उत्तम लेख
पेला अर्धा भरलेला आहे हे उदाहरण सकारात्मक दृष्टांत आता गुळगुळीत झाला आहे. पेला अर्धा रिकामा आहे ही नकारात्मक भावना मानली जाती. खर तर पेला एकाच वेळी अर्धा रिकामा आहे व अर्धा भरलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण ती सुद्धा नकारात्मक मानली आहे. अर्धा रिकामा आहे याकडे दुर्लक्षच करायच व अर्धा भरलेला आहे याकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजे सकारात्मक.
मला यात ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त्ती असु द्यावे समाधान असा दृष्टिकोण वाटतो. ही भुमिका कधी आत्मबळ देते हे देखील मान्य आहे. हे अगदी श्रद्धेसारखे आहे. सश्र॑द्ध म्हणजे प्रतिगामी असे समीकरण उगीचच रुढ होतय कि कमालीच्या अश्रद्ध लोकांचा हा कावा आहे कुणास ठाउक?
अर्थ अवर मधे अर्ध्या तासाने काय फरक पडणार आहे? असा प्रश्न मनात येतोच. मला ती गोष्ट प्रतिकात्मक वाटते. काही वॅट तरी वीज वाजते. अर्थात वाया जाणार्या उर्जेच्या तुलनेने हा हिस्सा नगण्य आहे हे मान्य. एक नेहमीचा दृष्टांत आठवतो. एका समुद्रकिनार्यावर एक माणुस लाटेबरोबर आलेले काही जलचर जीव परत समुद्रात सोडत असतो. दुसरा माणुस ते पहात असतो. तो त्याला म्हणतो ," हजारो मैल हा समुद्र किनारा आहे लाखो जलचर असे लाटेने येउन किनारी पडतात व मरतात तुझ्या एवढ्याशा प्रयत्नाने काय फरक पडणार आहे." त्यावर तो माणुस म्हणतो," बाकीच्यांच माहित नाही पण त्याला फरक पडतो."
छोट्या गोष्टीने फरक पडत नाही असे जरी असले तरी छोट्या छोट्या गोष्टींच्या एकत्रित परिणामाने फरक पडतो.
एक जाहीरात आठवते. रेल्वे क्रॉसिंग वर ट्रक ड्रायव्हर बेदर कारपणे ड्रायव्हिंग करत असतो जेव्हा दुसरा छेडतो तेव्हा तो बेफिकिर पणे उत्तर देतो क्या फर्क पडता है! दुसर्या क्षणी जाहिरातीत हार घातलेला फोटो दाखवुन त्याच्या तोंडी वाक्य म्हटलय फर्क पडता है!
बाकी प्रतिक्रिया नंतर
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
नमन झाले आहे.
आपले म्हणणे नक्की विचारपूर्वक लक्षात घेऊ. फक्त असंय की काहि विषय असे असतात की त्यावरची मते चर्चाधिष्टीत न रहाता पक्की बनण्याकडे झुकलेली असतात (कारण आधी बरीच चर्चा झाली असते, लेख वाचले असतात वगैरे वगैरे) त्यामुळे आपल्या मुद्द्यांवर पुर्वग्रहाची व पक्क्या होत असलेल्या मतांची सावली न पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.. मात्र तसे होईलच याची खात्री देता येणे माझ्या कुवती बाहेरचे आहे.
असो. सुरवात तर करूया.. नमन झाले आहे
-ऋ
-ऋ
वाचक माझं म्हणणं विचारपूर्वक
वाचक माझं म्हणणं विचारपूर्वक लक्षात घेतील व भावनिक प्रतिक्रिया देणार नाहीत अशी आशा करतो...
वाचतोय..
अधे मधे काही प्रश्न नक्कीच उपस्थीत करेन
-निखिल
वाचतो आहे...
वाचतो आहे...
नक्की वाचू ... अधे मधे प्रश्न
नक्की वाचू ... अधे मधे प्रश्न नक्कीच विचारेन
समजा सगळ्या लोकांनी वीज वापर
समजा सगळ्या लोकांनी वीज वापर एक तास पूर्ण बंद केला तरी जनित्रे चालूच राहतील त्या जनित्रात जळणारे इंधन तर अगदीच वाया जाणार.
थोडे स्पष्टीकरण.
समजा
जनित्र नो लोड ला चालताना समजा ताशी ५००० ली तेल खाते. फुल लोडला ९००० ली तेल खाते.
जेव्हा ते फुल लोडला चालतंय तेव्हा आपण म्हणू शकतो की एवढा लोड पुरवताना एवढे तेल फुकट जळते. पण नो लोडला काहीच उपयोग न करता तेवडे तेल फुकट चाललंय.
हा प्रतिसाद फार सिरिअसली घेऊ नये.
उद्देश
लेखमालेचे स्वागत आणि शुभेच्छा! लेख चालू झाले की शक्यतितका सहभागी होईनच...
नुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी....उद्देश अर्थातच भावनांची टिंगल करण्याचा नव्हता, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा फोलपणा दाखवण्याचा होता.
या संदर्भात इतकेच म्हणावेसे वाटत आहे की नक्क अर्थ अवरचा उद्देश काय होता हे फक्त एकदा येथे त्यांच्याच संकेतस्थळावरून सांगत आहे:
थोडक्यात याचा संबंध हा लोकशिक्षणाशी होता. १२५ देश, ४००० ठिकाणी, आयफेल टॉवर पासून ते अमेरिकेतील अनेक स्कायलाईन्स, राजकारण्यांची अधिकृत निवासस्थाने, आदी तसेच स्थानिक आणि राज्य सरकारे जेंव्हा यात भाग घेतात तेंव्हा ह्या समस्येबद्दल एकत्र काम करायचा संदेश जगातील सर्वच राजकारण्यांना स्वतःच्या कृतीतून देतात जो नुसते सह्यांच्या मोहीमेपेक्षा मोठा आहे. किमान राजकारण्यांना पत्र पाठवण्यासारखीच पण एक अधिक सक्रीय मोहीम आहे. (आणि मुखत्वे, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहीतीत उर्जा किती वाचवली या पेक्षा किती लोकांपर्यंत ह्या प्रश्नाचे महत्व पोचले या बद्दलची माहीती आहे).
आता क्लायमेट चेंज कुणामुळे होतो हा मुद्दा जरी दोन बाजू मांडत असला तरी होतो आहे ह्या बाबत जास्त वाद नाही. "साक्षात" बुश साहेब तसेच अमेरिकेतील उजवे (राईटविंग) पण सुरवातीचा पवित्रा बदलून नंतर हे मानवनिर्मित आहे का नैसर्गिकचक्र आहे ह्याबद्दल वाद घालू लागले. इपिए आणि युएसजीएस च्या शास्त्रज्ञांवर बुश-चेनीच्या अधिकार्यांनी त्यांचा शास्त्रीय अहवाल बदलायचा दबाव आणला तो देखील याच कारणावर. तेंव्हा कुंपणाच्या कुठल्याही बाजूस असलो तरी हालचाली कराव्या लागणार आहेत हे वास्तव आहे असे वाटते. असो.
विकास देशपांडे
>>मुखत्वे, त्यांच्या अधिकृत
>>मुखत्वे, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहीतीत उर्जा किती वाचवली या पेक्षा किती लोकांपर्यंत ह्या प्रश्नाचे महत्व पोचले या बद्दलची माहीती आहे).
हाच मुद्दा मी माझ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला होता पण शक्यतो अयशस्वी ठरलो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वाट पाहतोय....
वाट पाहतोय....
लोकशिक्षण आणि रोजच्या जीवनात
लोकशिक्षण आणि रोजच्या जीवनात थोडी का होइना एकप्रकारची स्वतःला शिस्त लावणे हे आवश्यक आहे, पण काहीठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द फक्त कूल थिंग म्हणून अतिरेकी पध्द्तिन वापरला जातो....
गेल्यावर्षी मीही 'ग्रो युवर ओन' च्या फॅड न टोमॅटो आणि गाजराच पीक काढलं...०.८ पौंड ला १ गाजर आणि १ टोमॅटो पडला...कस जमणार हे..(या वर्षी त्यामुळ पीक बदललेल आहे
)
पुष्करिणी