लागा चुनरीमे दाग..

0
0

बॉलिवूडी सिनेमे पाहण्याचं फ्याड आता इथे चांगलंच रुजलं आहे. हिंदी शिनूमांच्या जर्मन डब्ड डीव्हीडी.. नव्हे डेफाउडे, हो जर्मन मध्ये डेफाउडेच! तर ह्या तबकड्या आता दुकानादुकानांतून दिसायला लागूनही जुन्या झाल्या. पण ह्यातलीच एखादी बया आपल्या घरात भेट द्यायला येईल असं मात्र कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण.. आमच्या एका फिरंगी मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला( बायको आणि दोन मुले वयं अनुक्रमे १४ आणि १८) राणीबाई फारच आवडायला लागल्या आणि 'लागा चुनरीमे दाग' नावाच्या सिनेमाची तबकडी आम्हाला चक्क भेट म्हणून दिली की त्यांनी.. आतापर्यंत लागा चुनरीमे दाग.. हे मन्नादांचं एक सुमधुर सेमीक्लासिकल अनेक अर्थछटा असलेलं एव्हरग्रीन गाणं आहे एवढंच माहित होते. आता या गाण्यातले शब्द सिनेटायटल मध्ये जाऊन बसलेत हेच मुदलात माहित नव्हतं आणि हे घोर अज्ञान आमच्या मित्राच्या फ्यामिलीसमोर दाखवणे हा शुद्ध मूर्खपणा झाला असता त्यामुळे, कित्ती कित्ती दिवस मी ही तबकडी मिळण्याची वाट पाहते आहे आणि नेमकी तीच तुम्ही आणून आम्हाला उपकृत केले आहेत असे भाव चेहर्‍यावर आणण्याचा प्रयत्न करून चेहर्‍यावर हसू कमावले.

येथल्या पद्धती प्रमाणे लगेच्च वरचे कव्हर त्यांच्यासमोर उघडले. (हो, येथे तुम्हाला दिलेली भेटवस्तू देणार्‍याच्या समोर लगेच्च उघडून वा, वा.. किती छान! मला हे हवेच होते, खूप आवडले.. इ. इ. म्हणण्याचा प्र-घात आहे)तर कव्हर उघडल्यावर राणीबाईंचे घडी केलेले दोन पोस्टर फोटो आणि एक चक्क पिक्चर पोस्टकार्ड टप्पकन खाली पडले. कित्ती क्यूट आहे ना र्रानी.. ज्यू आणि सि सुपुत्र चित्कारले. खोलीच्या भिंती फोटूंनी सजवण्याच्या वयात देखील मी कधी हे उद्योग केले नव्हते ते आता राणीबाईंना भिंतीवर टांगून काय उजेड पडणार होता? जर्मन कॉंप्लिमेंटला कॉप्लिमेंट म्हणून ज्युनियर आणि सिनियरला ते फोटो मी रिटर्न गिफ्ट म्हणून देऊन टाकले तेव्हाचे त्या दोघांचे प्रफुल्लित, उल्हसित वगैरे चेहर्‍यांचेच फोटो काढायला हवे होते असे राहून राहून वाटत होते.

आम्ही सिनेमा पाहण्यापेक्षा त्यांचं समरसून सिनेमा बघणंच जास्त पाहतो (आणि हसत बसतो! ) ह्या आजवरच्या अनुभवाने तुमचा सिनेमा पाहून झाला की आम्हाला बघायला दे अशी आज्ञावजा विनंती आली. कव्हरवरच्या कलाकारांची जंत्री पाहून कचकडी, चकचकीत सिनेमात आणि एक भर हा अंदाज येऊन मी म्हटलं, "अरे, तुम्ही ही तबकडी घरी घेऊन जा, हवे तितके वेळा पाहा आणि सवडीने परत द्या. (नाही दिली तरी चालेल असं त्यांच्या प्रेमाच्या भेटीला म्हणता येत नव्हतं, सिनेमा टुकार असला तरी ' भावना महत्त्वाची'! ) पण त्यांनी आणलेली भेट असल्यामुळे त्यांनीच कसा आमच्याआधी पहायचा सिनेमा? असा कूटप्रश्न त्यांना पडला. दोन्ही मुलांचे (आणि त्यांचा बापही!)उत्सुक चेहरे वाचत सध्या निवांत वेळ नाही, आधी तुम्ही पाहा रे असं प्रकट आणि दुसरं करण्यासारखं काही नसेल तेव्हा पाहीन मी.. असं स्वगत म्हणून पाहिलं पण जेव्हा त्यांचं 'पहले आप, पहले आप' सुरू झाले तेव्हा ज्युनियरच्या हातात तबकडी आणि मित्राच्या हातात पेला चक्क कोंबला आणि विषय संपवला, तीन चारच दिवस मध्ये गेले असतील, नसतील.. ज्यू आणि सि दोघेही एक दिवस भारावून तबकडी घेऊन आले आणि भाराभर धन्यवादवून लवकर पाहा ग सिनेमा असा सल्ला देऊन गेले. तोंडदेखलं हो,हो म्हणत तबकडी आपली स्ट्यांडावर विराजमान!

मध्ये बरेच दिवस गेले पण मी काही अजून चित्रपट पाहिला नव्हता, ज्यु आणि सि दोघांनी वेगवेगळ्या वेळी फोन करून सिनेमा कसा वाटला अशी विचारणा केली. काहीतरी कारणं सांगून वेळ मारून नेली आणि पुन्हा त्या मंडळींचा फोन यायच्या आत लाजेकाजेस्तव तरी सिनेमा बघावा म्हणून शेवटी एके दिवशी मुहूर्त काढला सिनेमा पहायला.. बाहेर हिमनृत्य चालू झालं होतं. दार उघडण्यासारखी सुद्धा हवा नव्हती त्यामुळे ह्या तबकडीला गोषाबाहेर काढली. जर्मन, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतून उपरोक्त सिनेमा असून भाषा निवडण्याचे स्वातंत्र्यही असलेले पाहून क्षणभर अवाकच झाले. सिनेमा सुरू केला. हिंदीचा कंटाळा आला की जर्मन, जर्मनमध्ये बोअर व्हायला लागलं की विंग्लिश असा त्रैभाषिक सिनेमा बघणारी मीच असेन या भूतलावर बहुदा.. तर ते असो. पण खरी गोष्ट अशी की असे करत पाहिला म्हणून सिनेमाच्या शेवटापर्यंत जाऊ शकले, हास्य

आता चित्रपटाविषयी एवढे गुर्‍हाळ ऐकल्यावरही जर "ष्टूरी" ऐकायची असेल तर पुढच्या भागात..

स्वातीताssssई, तू पाहिलास का

1

स्वातीताssssई, तू पाहिलास का शिणुमा शेवटपर्यंत? म हा न आहेस! हास्य

खरच.....

2

असला सिनेमा पाहिला असेल तर महान आहातच. जरा पावलांचा फोटो स्कॅन करुन पाठवा. वॉलपेपर म्हणुन लावतो अन रोज आधी त्याला नमस्कार करतो.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

खरंच महान आहात... हा सिनेमा

3

खरंच महान आहात... हा सिनेमा पहायचा म्हणजे खूप धाडस लागतं म्हणे!

-अनामिक

खरच

4

हा सिनेमा तुम्ही पुर्ण बघितला? .. मग मानलं बा तुम्हाला Crazy

मूर्खजी...

5

राणी सुद्धा असले सिनेमे कसे काय करते कुणास ठाउक? तिच्या आडनावातला रफार एक अक्षर अलिकडे घेउन लिहायला पाहिजे !!

राणी सुद्धा असले सिनेमे कसे

6

राणी सुद्धा असले सिनेमे कसे काय करते कुणास ठाउक?

आदित्य चोप्रा!!!

-अनामिक

आता या गाण्यातले शब्द

7
आता या गाण्यातले शब्द सिनेटायटल मध्ये जाऊन बसलेत हेच मुदलात माहित नव्हतं आणि हे घोर अज्ञान आमच्या मित्राच्या फ्यामिलीसमोर दाखवणे हा शुद्ध मूर्खपणा झाला असता त्यामुळे, कित्ती कित्ती दिवस मी ही तबकडी मिळण्याची वाट पाहते आहे आणि नेमकी तीच तुम्ही आणून आम्हाला उपकृत केले आहेत असे भाव चेहर्‍यावर आणण्याचा प्रयत्न करून चेहर्‍यावर हसू कमावले.

Laughing out loud
=))

ताई,
_/\_ महान आहेस. Laughing out loud
तु तुझ्या अश्या खास इश्टाईल मधे लिहीणार, तेव्हा मी ह्या सिनुमाची श्टुरीदेखील वाचु शकतो.. येऊदेत ष्टोरी

-ऋ


-ऋ

अक्षरशः!!! हा चित्रपट

8

अक्षरशः!!! हा चित्रपट 'दोघी'ची भ्रष्ट कॉपी आहे... बेसिक थीम एकच असली तरी हा सिनेमा दोघीच्या आसपासदेखील पोचत नाही..

स्वातीताई, तू "... "ष्टूरी"

9

Laughing out loud Laughing out loud

स्वातीताई, तू "... "ष्टूरी" ऐकायची असेल तर..." असे प्रश्न कसे विचारूच कसे शकतेस? लिही!

मी हा पिच्चर पाहिला होता. थिसीस लिहीतानाच्या, किंवा लिहून झाल्यावर व्हायव्हाच्या आधी हा पिच्चर माझ्या काँप्यूटरवर आला होता. तेव्हा असल्या गोष्टींसाठी चिक्कार वेळ असल्यामुळे मी हा पिच्चर पाहिला होता. मला त्यातली एक-दोन गाणीही आवडली, आणि कुणाल कपूरपण ... त्यामुळे मी पाहिला आख्खा पिच्चर ... हिंदीतच!

>>स्वातीताई, तू "... "ष्टूरी"

10

>>स्वातीताई, तू "... "ष्टूरी" ऐकायची असेल तर..." असे प्रश्न कसे विचारूच कसे शकतेस? लिही!

लिही!

अरे वा इतका देशभक्तीप्रद

11

हास्य

अरे वा इतका देशभक्तीप्रद चित्रपट तुम्ही पुर्ण पाहीलात वाचून आनंद झाला.
वर देव पण खुष झाला असेल शेवटी राणीचा तो चित्रपट कोणीतरी पुर्ण पाहीला तरी म्हणून Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

स्वातीताइ तुम्ही किती सहनशील

12

स्वातीताइ तुम्ही किती सहनशील आहात हो...तो सिनेमा अत्याचार, प्रेक्षकांच्या मानवी हक्कांची गळ्चेपी या सदरात मोडणारा आहे.

पण श्टोरी लिहाच!


पुष्करिणी

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.....

13

लै भारी!!

बरे झाले हा पिक्चर पाहिला

14

बरे झाले हा पिक्चर पाहिला नाही ते..
असो स्वाती ताई तु स्टोरी लिहिच गं..


-निखिल

काय दिवस आले आहेत...

15

एके काळी जर्मनीत आपण अजब न्याय वर्तुळाचा व घाशीराम कोतवाल अशी नाटकं नेली होती... आता चुनरीमें दाग...

पण ष्टुरी आली नाही तेव्हा चुकचुक वाटली एवढं मात्र खरं.

राजेश

तर तर

16

पुढचा भाग आलाच पाहीजे हास्य

लागा चुनरी में दाग? हा कोणता

17

लागा चुनरी में दाग?

हा कोणता शिणुमा बरं? च्यायला, कधी नावपण नाय ऐकलं आम्ही! Big smile

बाकी, स्वातीताई, कमाल आहे हां तुझी. एव्हढा तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करणं काय सोपं आहे?

ष्टुरी आहे तरी काय ते तरी कळुद्या आम्हा पामरांना हास्य

अवांतरः "ही आमची राणी मुखर्जी, हिच्यावर आमचा भारी जीव" असं म्हणायचाही काळ सरलाच म्हणा आता Big smile

मस्त लेख..अजून येउद्या...

18

मस्त लेख..अजून येउद्या...

दिपाली हास्य