भटकंती - हरिहरेश्वर

0
0

नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी.
(क्रमशः )

पण आभाळात फारच ढगांची गर्दी व्हायला लागली आणि आम्ही परत रूमवर आलो. गप्पा मारता मारता ठरवलं की उद्या सकाळीच मंदिरात जायचं दर्शनाला.ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही मंदिरात जायला निघालो.

मंदिरापाशी पोचताच आम्हाला खुणावलं ते त्या मनोहर अश्या समुद्रानं -

हरिहरेश्वरचं मंदिर हे शिवाचं मंदिर आहे.ते केव्हा बांधलं याचा अंदाज करणं जरा कठिण आहे पण बहुदा ते शिवकालीन असावं. या मंदिराचा प्रथम जिर्णोद्धार पहिल्या बाजिराव पेशव्यांनी केला अशी माहिती आम्हाला तिथल्या पुजार्‍यांनी दिली. मंदिरात शंकरा बरोबरच पार्वतीचं पण मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा घालायच्या हेतुनी मार्गस्थ झालो.प्रदक्षिणामार्गावर जाताना जपुन जा वाट फार डेंजर आहे असा प्रेमळ सल्लापण मिळाला स्थानिक लोकांकडुन......

प्रदक्षिणामार्गाची सुरुवात -

प्रदक्षिणा मार्गावरुन दिसणारा समुद्र -

प्रदक्षिणामार्ग तिथल्या रॉकी बीचवरुन जातो...

रॉकीबीच चं समुद्राच्या लाटांनी इरोजन होऊन हनीकोंब स्ट्रक्चर तयार होतात. थोडिशी मधमाश्यांच्या पोळ्यासारखी रचना असल्यानी त्यांना हे नाव पडलं आहे-


समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो....

हरिहरेश्वर समुद्राला खुप ओढ आहे आणि भरतीची वेळ आहे असं कळल्यामुळे जास्त पाण्यात जाण्याचं धाडस नाही केलं....लांबुनच त्या फेसाळत्या लाटांचा आनंद घेतला आणि थोडंफार पाण्यात खेळुन परतीच्या मार्गाला लागलो.........

( फोटो क्रमांक २,३,८ गुगलवरुन साभार )

मस्तच फोटो ! जायला हवे एकदा

1

मस्तच फोटो !
जायला हवे एकदा तरी तिकडे नक्कीच...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लाटांचे फोटो...

2

आवडले.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

असेच म्हण्तो.. लाटांचे तर

3

असेच म्हण्तो..

लाटांचे तर जबरदस्त आले आहेत फोटो.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त.....

4

मस्त.....

छान आहेत फोटो

5

छान आहेत फोटो हास्य

झकास फोटो आहेत. मजा आली. मस्त

6

झकास फोटो आहेत.

मजा आली. मस्त सैर घडवून आणलीत ...


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.