सर्व
दुचाकी लडाखायण … भाग - १४ ( अंतिम भाग )
श्रीनगर मधल्या हॉटेलच्या बाहेर सकाळी पाहीलं तर दोन हत्यारबंद सैनिक पहारा देत उभे होते. श्रीनगर मधे गोंधळ चालु होता. कर्फ्यु लावण्यात आला असल्याने वातावरण तंग होते. काश्मिरसारख्या स्वर्गात हे सैनिक बिचारे नरकयातना भोगत असलेले बघुन मला खरंच वाईट वाटलं... आम्ही लवकर आवराआवरी केली. आज आमचा दुचाकीवरचा शेवटचा दिवस होता.
पश्चिम घाटात पर्यावरण संरक्षण
एक लेख लिहीणे आहे. पण तो "लिहीण्यात" असे पर्यंत आधी एक लहानसा सर्वे. पश्चिम घाटात पर्यावरण संरक्षणा करता काही सूचना आहेत. यातील कोणकोणत्या तुम्हाला मान्य आहेत किंवा नाहीत याचा सर्वे.
१: कोयना, भाटघर, मुळशी, इत्यादी प्रकल्पातून वीज निर्मिती ताबडतोब पूर्ण बंद करावी
२: पश्चिम घाटात असलेल्या सर्व औष्णिक प्रकल्पातून पण वीज निर्मिती ताबडतोब पूर्ण बंद करावी
नको शिवराया ..
नको शिवराया, जन्म आता घेऊ
महाराष्ट्र जो होता, तैसा नाही ||
हवा आहे तु सर्वा, शेजार्या घरी
होई कोण जननी, जिजाबाई ||
आळवती नाव तुझे, जनता ही सारी
एक तुझी जयंती अन, महाराष्ट्र दिनी ||
अवतरशील तुपण, लढावया शत्रुशी
मावळा न दिसे, तुझिया पाठी ||
म्हणवती मावळे, शुरवीर स्वत:ला
अपुल्याच लोकांवर, चाले तलवारी ||
पाहोनि हे सारे, होशिल उदास,
काय होते काय झाले, स्वराज्यात ||
---
वाढता वाढता वाढे लोकसंख्या भारताची
सन २००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली असून १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे . गेल्या दशकात देशाची लोकसंख्या १७ . ७ टक्क्यांनी वाढली असून त्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या तुलनेत जास्त असल्याचे दिसते .
केवढी ही प्रगती
शुभेच्छा !
भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा.
गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा.
तुम्हास तुमचे रुसवे -फुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी राहिल गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा.
कवी:- वसंत बापट
सर्व मीमकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
कोल्हापुरी अख्खा मसूर : नाद्खुळा
कोल्हापूर हे तसं लाटांचं शहर आहे. म्हणजे ते समुद्राकाठी नाही तर लाटांचं शहर अशासाठी की या करवीर नगरीत प्रत्यही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची टूम येत असते. कधी काय तर म्हणे नादखुळा. मग प्रत्येक गोष्टीला नादखुळाच. सचिन कसा खेळला ..नादखुळा ! पाऊस कसा पडला ..नादखुळा! रस्सा कसा झालाय ..नादखुळा! मध्ये 'तुमच्यासाठी कायपण' चालू होतं. जी गत शब्दांची तीच इतर गोष्टींची.
गप्पा-टप्पा
सगळे मीमकर सुस्तावलेले दिसत आहे, अप्रिलच्या उन्हाचा तडाका म्हणावे की महिनाअखेरची झळ 
मरणे कठीण झाले
मरणे कठीण झाले
जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
चहा एके चहा .......
आमच्या लहानपणी (म्हणजे सुमारे ६०-६५ वर्षांपूर्वी) लहान मुलांनी चहा, कॉफी, असली उत्तेजक पेयं पिण्यास वडील माणसांचा खूप विरोध असायचा. मुलांनी दूधच प्यायला हवं असा आग्रह असे. त्यावेळी चहा कॉफीचे (बहुधा) दुष्परिणाम सांगणारे एक बडबडगीत मी ऐकलं होतं. ते असं:
चहा एके चहा, डोळे उघडून पाहा.
चहा दुणे कप, बोलू नको गप.
चहा त्रीक बशी, अक्कल जाते खाशी.
चहा चोक चमचा, तू नव्हे आमचा.
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)
शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.

