सर्व
सांत्वन
"सांत्वन"
शब्दांच्या लाटांवरती नादाने विणले जाळे
ओंजळदाने घेता मी सजणीला आठवले
साक्षीने चंद्रफुलांच्या या इथेच होतो न्हालो
गंधाने देहभुलीच्या कासाविस भारी झालो
बोटांत स्पर्श स्वप्नांचे ओझरते आले, गेले
ओलावे डोळ्यांमधले काळाने जळते केले
नव्या पहाटेसाठी ओवाळुनी सगळ्या राती
तू येशिल का गे पुन्हा डोहातुनी पाण्याकाठी
फिरून दुःखे झरती स्मरणांची वाहे धारा
अंड्याचे फंडे ७ - खादाडी
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला.
एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (सध्या अमेरिकाभेटीवर)
sbkay@hotmail.com
तुझी आठवण (पुस्तक प्रकाशित)
स.न.
माझा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. दुवा: दुव्यावर टीचकी मारा
http://pothi.com/pothi/book/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%...
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत
-अशोक
चित्र-रंगावली प्रदर्शन
श्री.जगदीश चव्हाण सर,
वाड्यात.......१
मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..?
मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली.
आदत...
घाटकोपर ला ट्रेन पकडून पंख्याचा वारा कुठे मिळतोय ह्याचा शोध घेत मी एका सीटवर विराजमान झाले. हाश-हुश करत रिलॅक्स झाले.फोनची बॅटरी जेमतेम राहिलेली म्हणून गाणी ऐकण्यापेक्षा सभोवताली सुरू असणा-या रंग-बेरंगी बोलक्या चित्रपटाचा आनंद लुटायचा ठरवला. नेहमीप्रमाणे लेडीज डब्यामधे दोन-तीन बायका काही-बाही विकत होत्या.बाकी अर्ध्या-अधिक गप्पांमधे गुंग होत्या आणि उरलेल्या फोन हातात घेऊन उभ्या होत्या.
कबुतरांची सभा
पर्वा एका सरकारी हापिसात
कामासाठी गेलो होतो
आणी नेहमी प्रमाणे वाट बघत
ताटकळत उभा होतो.
कडेला वाटलं माणसं बोलताहेत
पण कबुतरं बोलत होती
कालच्या दिवसात काय काय झालं?
याचे हिशेब तोलत होती
पहिलं दुसर्याकडे पाहुन
मिष्किलपणे हसत होतं
आणी त्यांच्या गमती पाहुन
तिसरं मधिच घुसत होतं
काल म्हणे पहिल्याला
आख्खं कणिस मिळलं
पण दुसर्यानं धक्का दिला
आणी ते हवेतच गळलं
विचार
चला विचार करूया असं ठरउन मी विचार करायला बसलोय, त्याच कारण म्हणजे माझा मित्र, तो लेखक आहे ,त्याला काही सुचत नव्हतं chat वर त्याने मला तसं सांगितल सुद्धा, मी त्याला म्हणालो की ,"असे विचार करून विचार थोडीच येतात, ते अचानक हवेतून पडल्यासारखे टपकतात , आगदी न सांगता." थोडं आजून मी फिलोसोफिकल मारायला लागलो तेव्हा झोप येते असं सांगून तो ऑफ लाईन गेला, कदाचित झोपला ही असेल पण माझी मात्र झोप उडाली.



