सर्व
माहिती हवी आहे
कोकण भवन बेलापूर च्या पुढे मुंबैला जातांना जी खिंड लागते तिचे नाव काय आहे? १५-२० वर्षांपूर्वी जेव्हा तो रस्ता अरूंद होता तेव्हा तिथे नेहमीच अपघात होत आणि त्या "spot" चे म्हन्जे त्या खिंडीचे नाव पेपरात येत असे...मागील ४/५ वर्षात मी त्या नावाबद्द्ल कमीत कमी १५-२० लोकांना विचारलेय (including few ST bus drivers) पण आजकाल "ते" नाव फारसे कुणी वापरत नाहीये असे वाटते.मिपाकर ते नाव सांगू शकतील असे वाटते.
समाज इतका भाबडेपणाने का वागतो?
पुरावा (लघूकथा अनुवाद)हा एक वर्षापेक्षा जुना धागा काही कारणाने पुनर्जीवीत झाला आहे. त्या धाग्यातील काही विचारांवर ही टिप्पणी. त्या लघुकथेचा सारांश असा होता कि आजारी असल्यास कर्जात काही सवलत मिळणे शक्य होते, ती घेण्यास एक म्हातारा तिथे गेला. अधिकार्यांनी त्याच्या कडे आजारी असल्याचा पुरावा मागितला. त्याने सदरा वर करून पोटावर ऑपरेशनचे टाके दाखविले.
रोजनिशीतील काही निखळलेली पाने-------९.
आपण आपलं आयुष्य बरर्याचदा कोणीतरी आखून दिल्याप्रमाणे जगत असतो. रोज घडणार्या घटना रोज त्याच क्रमाने तश्याच घडत असतात. दिवस बदलतात, ऋतू बदलतात... आणि आपण मात्र तीथेच असतो. मनातून खुप वाटत असतं हे सगळं बदलायला हवय..... काहीतरी नवीन आयुष्यात घडायला हवय...बदलायला हवय हे रुटिन. पण पुन्हा इथेही आपल्या आतमध्ये विचारांचा संघर्ष चालूच असतो. कशासाठी? अहो.... उत्तर फार सोप्प आहे.
झपाटलेली......भाग़ दोन
सारिकासाठी आत शारदाबाई स्वत: तीच्याबरोबर राहणार होत्या, ग़ेले दोन दिवस झालं सारिका शांत सर्वाशी बोलत चालत होती.त्यामुळे सर्वजण तीच्याशी बोलत चालत होते.तीला काय आवडते ते तीला देत होते.आनंदराव नसताना ही सारीका चांग़ली व्यवस्थित झालेली होती ह्याचे सर्वाना नवल वाटत होतं.
आनंदराव सारीकाला पाहतील तेव्हा कीती आनंदीत होतील हे आसे सारखे शारदाबाई बोलुन दाखवत होती.
"मुग्धा"
मेंदीचे मन पुन्हा शोधते
आश्वासक तो स्पर्श मुक्याने
ओल्या शपथा कोरे नाते
धूसर वाटा खोल धुक्याने
कळी लाजरी नवीन माती
हलके घेते देहउखाणे
विकासताना अबोल राती
जणू जन्मते नव्या रुपाने
दिशा रोजची भासे नवखी
गात्रांमधले भिन्न तराणे
ती न राहते तिच्यासारखी
ऋतू पालटे नित्यक्रमाने
मोहवणारी अशी चारुता
जिला गवसते तेज नव्याने
पूर्ण उमलली मुग्धावस्था
फिक्सिंगचा जुना इतिहास
(कुणाचाही भावना दुखवायचा हेतू नाही, सहज गंमत म्हणून लेख वाचवा.)
वेदांमध्ये सुद्धा जुगाराचा उल्लेख आहे. असे ऐकले आहे. पूर्वीच्या काळी सुद्धा फिक्सिंग होती का? हा प्रश्न मला पडला.
झपाटलेली.......भाग़ एक
'साँरी,सारीका मेन्टंली अबनाँरमल आहे,' डाँक्टर म्हणाले,
'पण डाँक्टर काही तरी उपाय?', आनंदराव म्हणाले,
'हे बघा आपन तीची औषधे चालु आहेत,पाहुया आपण काही दिवसानी फरक पडतो का ते,'डाँक्टर म्हणाले,
' डाँक्टर आजुन कीती दिवस आसे चालायचे,'आनंदराव म्हणाले,
' आनंदराव परमेश्वरावर विश्वास ठेवा ,प्रार्थना करा, एवढेच मी बोलु शकतो,'डाँक्टर म्हणाले,
मीमकर धुंद रवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मीमकर धुंद रवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
सध्या विविध वाहिन्यांवर त्यांनी घातलेला धुमाकूळ सर्वज्ञात आहेच.
त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशी शुभेच्छा
पार्टी कुठे, कधी आणि केव्हा याबद्दल धुंद रवी यांनी याच धाग्यात टंकावे ही विनंती.
बटाटा भाजी
पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय.
आत्याची म्या लाडाची हाय.
सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली.
म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?”
आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं.
तरीबी म्या न्हाई म्हनून रायली.
मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.”
लई झ्याक बगा.
आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई. फकस्त कांदे.
म्या इचारलं, “रोज देशील?”
हो म्हन्ली.
निष्पाप अभिव्यक्ति
लहान मुलांच्या निष्पाप अभिव्यक्तीत पुष्कळदा गंमत असते. त्या बाबतीतल्या दोन आठवणी
१) ही आठवण मला माझ्या आईनी सांगितलेली आहे.